Guide in Marathi Magazine by Sadhana v. kaspate books and stories PDF | गाईड

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

गाईड

गाईड

प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी अस होतच की , अचानक कुणीतरी विचारत , तुझ स्वप्न काय आहे ? किंवा आयुष्याच ध्येय काय आहे ? आणि आपण एकदम गांगरुन जातो. कारण बर्याच वेळा आपल्यालाच माहीत नसत की काय करायच आहे ? किंवा स्वतः ला आवड कशात आहे ? कधी कधी आपण ह्या गोष्टीचा विचारही केलेला नसतो. सद्यस्थितीला आयुष्य इतक महाग झाल आहे की जगण्यासाठी काहीना काहीतरी काम करावच लागत. त्यामुळे प्रत्येकजण शिक्षण संपल्यावर कुठेतरी जाँब बिझनेस वगैरे करत असतो. सुरुवातीला काही दिवस खुप सुंदर वाटत. स्वतः कमावतो ही फिलींग खुप भारी वाटते. मग चालु होते डेली रुटीन. आता हेच डेली रुटीन जीवघेणे , कंटाळवाणे वाटु लागते. त्यात एखादा जुना मिञ अचानक IPS वगैरे होतो . मग तर खुपच अस्वस्थ होतो आपण. आता खुप मोठ काहीतरी करायच असत. तगमग होते. धावपळ होते. स्वतः चा असा वेळ मिळत नाही. फक्त धावतोय...पण कशासाठी ते माहित नाही. मग जाणीव होते समाधान , आनंद याची. त्यावेळी पैसा गौण वाटतो. काहीतरी चुकतय याची जाणीव होवु लागते. आणि अचानक जाणीव होते. आपल्याला यातल काही करायचच नव्हत. आवड दुसर्याच क्षेञात .. आणि काम करतोय तिसऱ्याच क्षेञात . आता ? शोध सुरु होतो स्वतः चा. " काहीतरी वेगळ करायचय " ही भावना इतकी जागृत होते की बाकी काही सुचतच नाही. या परिस्थितीत बर्याच जणांना उमगत की नक्की काय करायच आहे. पण बरेच जण तिथेही कन्फ्युज असतात. स्वतः ला काय हवय हे शोधण सर्वात कठीण काम आहे. ते कळाल की मग मार्ग आपोआप सुचत जातात.

एकदा ठरल की काय करायच आहे की आपण लगेच गावभर दवंडी पिटवतो. मला हे करायच आहे. आणि इथेच आपण फसतो. डायरेक्ट करुन दाखवण्यापेक्षा बोलुन दाखवल की माणुस विनोदाचा भाग होऊन जातो. ' हा अमुक तमुक करणार आहे म्हणे..तोंड बघ म्हणाव आरश्यात. ' अशी वाक्य अगदी जवळच्या व्यक्तीकडून ऐकायला मिळतात. आणि बर्याच जणांच नवीन जन्माला येणार स्वप्न मनातच खुडुन जाण्याची शक्यता असते.

ध्येय ठरल की आपण सार्या जगाकडुन सल्ले घेत फिरतो. जसे की आपले मिञ , आपल्या नात्यातील खुप शिकुन मोठ्या नोकरीला लागलेली आपली मोठी भावंड , पाहुण्यातील सो काँल्ड सल्लागार वगैरे वगैरे. बर्याचवेळा आपले जवळचे मिञ किंवा घरचे आपल्याला समजुन घेतात पण त्यांच्याकडे योग्य सल्ला उपलब्ध असेलच असे नाही. पण इतरांकडुन काही ठरलेले वाक्य ऐकायला मिळतात , जसे की घरच्यांकडुन.. ' आता जाँब सोडुन असले धंदे करायचेत का ? ते फलाण्याच पोरग बघा ५०,००० महिना कमवतय. तुम्ही जाँब सोडायचा विचार करा. ' साधारण मिञांकडुन , ' लोकाला जाँब मिळना,.आन तु सोडायचा विचार करतोस का ? अवघड आहे , ' सो काँल्ड नातेवाईक , ' या वयात हे काय खुळ घेतलय डोक्यात ? ' कोणी पोरगी द्यायच नाही. काही तरी वेगळ करण्याच्या प्रयत्नात फेल होताच प्रयत्न अर्धवट सोडुन घरी बसलेले लोक , ' इथ मी दोन वर्ष झाल ट्राय करतोय काही झाल नाही. तुझ्याने होणार नाही सोड नाद. हे वाटत तितक सोप्प नाही. ' शेजारी पाजारी , ' फार मोठी स्वप्न बघु नये. ' आपल्याला शोभेल तेच कराव माणसाने. वगैरे वगैरे. यासर्वात काहीजण तुम्हाला मुद्दाम चुकीचही गाईड करतील. तुम्हाला दिशाभुल करतील पण एक गोष्ट लक्षात ठेवा , ' मेहनत ' आणि ' नशिब ' या दोन गोष्टी तुमच्यापासुन कधीच कोणीच हिरावु शकत नाही. काही वेळा पुरते तुम्ही भरकटु शकता पण नशिबात असेल आणि तुम्ही मेहनत करत असाल तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल ! थोडे लेट व्हाल पण नक्की व्हाल . गाईडन्स घ्यायला कोणाकडे जायच हे ठरवता आल पाहिजे. समोरचा जे सांगतोय ते चुक की बरोबर ते ओळखाता आल पाहिजे. ऐकलेल सर्वच घ्यायच की मोजकच गरजेच घ्यायच ते ठरवता आल पाहिजे. बरेच जण जळतात की हा मागुन माझ्या पुढे जाईल. मी मार्गदर्शन केल तर माझी स्पर्धा वाढेल. पण अशा लोकांना एक सांगावस वाटत , की हव तर सरळ नाही म्हणा पण चुकीच गाईड करु नका. आणि जर तुम्ही अस करत असाल तर माणुस म्हणुन तुम्हाला परिपुर्ण होण्याची गरज आहे. नियत बदलण्याची गरज आहे. नियत चांगली असली की वाईटातुनही चांगल निर्माण होत. तुम्ही स्पर्धेला घाबरताय म्हणजे तुमचा स्वतः वर स्वतःच्या क्षमतांवर विश्वास नाही. सो इम्प्रुव्ह युवरसेल्फ !

मानवी स्वभावात काही ञुटी असतात. जसे की मला हे करायच आहे , हे आपण सर्वांना सांगुन मोकळे होतो पण हेच ' स्वतः ला ' ठामपणे सांगायच विसरतो. मार्गदर्शनासाठी गावभर फिरतो पण स्वतः ला मार्ग विचारतच नाही. अर्थातच इतरांचे यश , अपयश , अनुभव यातुन आपल्याला खुपकाही शिकायला मिळत. पण माझ वैयक्तिक मत थोड वेगळ आहे. प्रत्येकाचा प्रवास , स्ट्रगल , परिस्थिती , ध्येय , प्रायाँरिटीज , नेचर वेगळ असत. त्यामुळे जो नियम दुसर्याला लागु पडतो तोच तिसऱ्याला लागु पडेल अस नाही. परिस्थिती नुसार संदर्भ बदलतात. सो स्वतःच्या प्रवासाचा मार्ग स्वतः निवडा. त्यावर चालताना पाळायचे नियम , शेवटचा टप्पा स्वतः ठरवावा. जगात स्वतः शी निगडीत असा कुठलाच प्रश्न नाही ज्याच उत्तर स्वतः ला माहित नाही. स्वतः ला विचारा मला काय हवय ? त्यासाठी काय कराव लागेल ? त्यासाठी लागणाऱ्या क्षमता माझ्यात आहेत का ? नसतील तर त्या डेव्हलप कशा करायच्या ? स्वतःला वेळेच लिमिटेशन द्या म्हणजे.. आळस आणि ढिलेपणा राहणार नाही. स्वतः च स्वतः चा बाँस व्हा . वेळ पडल्यावर स्वतः ला रागवा. छोट्या छोट्या अचिव्हमेंटनंतर स्वतः ला शाबासकी द्या . कारण जेव्हा जिंकाल तेव्हा ,कोणालाही क्रेडिट देण्याऐवजी " मी सेल्फमेड आहे !" हे म्हणण्यात जो अभिमान आहे तो कशातच नाही .कुणीतरी म्हणटल आहे , काँईन टाँस केल्यावर कुठली बाजु आली हे पाहण्यापेक्षा , कोणती बाजु यावी म्हणुन हृदय धडधडत होत हे ओळखता आल की सगळे प्रश्न सुटतात. सगळ्या प्रश्नांची उकल आपल्या आत दडली आहे. बाहेर फिरण्यासोबतच एक सैरसपाटा स्वतःच्या मनात मारा. स्वतः व्हा स्वतः चे गाईड !