लव यु जिंदगी..
‘लव्ह यु जिंदगी’ सचिन पिळगावकर आणि कविता लाड-मेढेकर यांचा एक कौटुंबिक चित्रपट! प्रेक्षकांच्या नवीन वर्षाची सुरुवात एकदम हटके आणि रंजक करण्यासाठी हा चित्रपट ११ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘लव्ह यु जिंदगी’ मध्ये अभिनेते सचिन पिळगावकर यांची प्रमुख भूमिका आहे आणि त्यांच्या सोबतीला अभिनेत्री कविता लाड- मेढेकर आणि प्रार्थना बेहरे देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने हे तिघेही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. नुकताच या चित्रपटाचा नवीन पोस्टर प्रदर्शित झाला असून त्यामध्ये तिघांचा नवा लूक आपण पाहू शकतो. तसेच कविता लाड-मेढेकर आणि सचिन पिळगावकर यांची जोडी प्रेक्षकांना पहिल्यांदाच अनुभवयाला मिळणार आहे. इतकंच नव्हे तर कविता लाड-मेढेकर आणि प्रार्थना बेहरे देखील पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. इतकच नाही तर चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन मनोज सावंत यांचं आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा प्रथम चित्रपट आहे.
लव यु जिंदगी' हा प्रेमाची गोष्ट सांगणारा चित्रपट आहे. प्रेमाची व्याख्या वयाच्या तरुण, प्रौढ, ज्येष्ठ अशा तीन टप्प्यात बदलत असते. कितीही वय झाले तरी माणसाने आनंदी राहणे, छंद जोपासणे सोडू नये. आयुष्यात प्रेमाबरोबरच प्रत्येक क्षणाचा आनंद मिळवण्याचा प्रयत्न करावा. अशा आयुष्यावर शतदा प्रेम करावे असे लव यु जिंदगी ह्या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. 'लव्ह यु जिंदगी' या चित्रपटाचा टीझर पाहिल्यावर हे लक्षात येते की, सचिन पिळगावकर साकारत असलेल्या अनिरुद्ध दाते या व्यक्तिरेखेचे वयाच्या बाबतीत फारच वेगळे मत आहे. जसे की, ते त्यांच्या वाढत्या वयाच्या सत्याला स्वीकारण्यास तयार नसून आपण आजही ते तारुण्य अनुभवू शकतो, त्याच उत्साहाने मनमौजी आयुष्य जगू शकतो असे त्यांना वाटते आणि म्हणूनच पुन्हा एकदा तारुण्य जगण्यासाठी त्यांची असलेली धडपड चित्रपटात पाहायला मिळणार आहे. असा हा विनोदी, भावनात्मक आणि रोमांचकारी कथा असलेला चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात काही शंका नाही.
सचिन पिळगांवकार हे त्यांच्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचा अभिनय नेहमीच उत्तम असतो. कविता लाड-मेढेकर यांनी सुद्धा आजवर त्यांच्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रेक्षकांनी देखील त्यांच्या प्रत्येक भूमिकेला मनापासून प्रतिसाद दिला आहे. पण नवीन वर्षात ‘लव्ह यु जिंदगी’मुळे कविता लाड-मेढेकर यांची नवी भूमिका आणि तिघांचीही पहिल्यांदाच जुळून आलेली ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहणं नक्कीच रंजक ठरणार आहे. आणि काहीतरी वेगळ पाहायला मिळणार अशी प्र्रेक्षकांची अपेक्षा नक्कीच असेल.
हा सिनेमा सकारात्मक संदेश देणारा, मनाला स्पर्श करणारा आहे. बऱ्याच वेळा वय वाढल म्हणून आयुष्य कंटाळवाण करण्याकडे काळ वाढायला लागतो. पण आनंदी राहायला वयाची मर्यादा नसतेच. वय झालं म्हणून व्यक्तीने आनंदी राहायला फक्त समाजाच्या दृष्टीने वयाला साजेशेच काम किंवा छंद बाळगण्याची गरज नसते. वय वाढल आहे म्हणून मनासारखं आयुष्य जगायचं नसत हे तर अगदीच चूक. वय फक्त शरीराच्या वयाचा आकडा असतो ते मनाच्या व्यापकतेचे परिमाण नसतं. मनाचा तजेला, आनंद, जिंदादिली हे वयानुरूप येणाऱ्या तथापि लादल्या जाणाऱ्या बाह्य बाबींवर अवलंबून नसते, नसावे, हेच हा चित्रपता मध्ये सांगण्या आल आहे. अनिरुद्ध आणि रिया यांच्यात मैत्री होते. त्यांची मैत्री अनिरुद्ध दातेच्या आयुष्याला वेगळी आशा आणि दिशा देते, सकारत्मकतेने आयुष्याकडे बघायला सांगते. लव यु जिंदगी हा चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला आपल्या जीवनातील चांगल्या किंवा वाईट गोष्टींची आठवण करून देतो. या चित्रपटात सचिनजीनी अनिरुद्ध दाते ची उत्तम भूमिका केला आहे. त्या निरुत्साही आयुष्याकडून उत्साही जीवनाकडील वाटचाल सकारत्मक जीवन जगण्याची सांगड घालून देते. आणि सचिन पिळगावकर ह्यांना अभिनय करतांना पाहण नेहमीच आनंददायी असत. दिग्दर्शक आणि सिनेनिर्मिते या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत की, आयुष्यावर प्रेम करण्यासाठी वयोमर्यादा नसते, त्यासाठी गरजेचं असतं ते उत्साही मन आणि आयुष्य भरभरून जगण्यासाठी लागणारं एक गोड धाडस. म्हणूनच वय विसायला लावणारा हा चित्रपट प्रेक्षक पाहणार ह्यात काही शंका नाही.
चित्रपटाची कथा-
ही गोष्ट आहे वयाच्या पन्नाशीला आलेल्या अनिरुद्ध दाते (सचिन पिळगावकर) या गृहस्थाची. बायको, मुलगी आणि जावई असे त्यांचे कुटुंब. हा गृहस्थ वयाच्या पन्नाशीला आला असला तरी मनाने पात्र तो पंचविशीत आहे. तरी आजूबाजूचे लोकं त्याला सारखी वयाची जाणीव करून देत असतात. अश्यावेळी अनिरुद्ध दातेला तारुण्यातल जगायचं राहून गेलेलं आयुष्य आठवत असत. दरम्यान त्याची भेट रिया (प्रार्थना बेहरे) या तरुण मुलीशी होते. फॅशनेबल आणि नृत्यप्रशिक्षक असलेली ही रिया आपलं जीवन बिनधास्त जगत असते. गोव्याहून पुण्याला राहायला आलेली ती एक 'डान्स क्लास' चालवत असते. या डान्स क्लासमध्ये अनिरुद्ध दातेचा प्रवेश करवण्यासाठी ती अनेक युक्त्या लढवते. अनिरुद्धला देखील ऑफिसच्या 'शर्ट पॅन्ट'मधून बाहेर पडत 'टीशर्ट जीन्स'मध्ये येण्याची इच्छा असतेच.
अनिरुद्ध डान्स क्लासमध्ये प्रवेश घेतो आणि रियाकडून नृत्याचे प्रशिक्षण घेऊ लागतो. हळहळू रिया 'अनिरुद्ध'चा फॅशनेबल 'अनि' करून टाकते. रियाचे मित्र-मैत्रिणी अनिरुद्धचे मित्र होऊन जातात. लेट नाईट पार्टी, बाईक राईड असं सर्वकाही सुरु होते आणि अनिरुद्ध व रियामधील जवळीक वाढते. खरी गमंत घडते ती, एकीकडे रिया आणि दुसरीकडे अनिरुद्धची मुलगी या दोघी बाळंत होतात. रियाच्या बाळाला अनिरुद्ध आपले नाव देण्यास तयार होतो आणि त्यामुळे उडणारा गोंधळ पडद्यावर पाहणे मनोरंजक आहे. कारण, या प्रकरणामुळे अनिरुद्धच्या घरचे वातावरण कमालीचे गरम होते. पण, हे बाळ नक्कीच अनिरुद्धचे आहे की दुसऱ्या कोणाचे हे जाणून घेण्यासाठी सिनेमा पाहायचा की नाही हा निर्णय मात्र तुमचा... सचिन पिळगावकर, कविता लाड, प्रार्थना बेहरे, समीर चौघुले यांनी आपल्या भूमिका चांगल्या निभावल्या आहेत. सिनेमातील दोन्ही गाणी चांगली झाली असून छायांकनाचे काम ही उजवे आहे. सचिन पिळगावकर आणि कविता लाड-मेढेकरचा अभिनय उत्तम..ह्यातली गाणीसुद्धा लोकप्रिय झालेली आहेत. संवाद सुद्धा उत्तम आहेत..चित्रपट पाहत असतांना चेहऱ्यावर स्मितहास्य नकीच असेल.
एस. पी. प्रोडक्शन्स निर्मित या चित्रपटाची निर्मिती सचिन बामगुडे यांनी केली आहे. तर गेली १७ वर्ष झी टीव्ही, झी सिनेमा आणि झी मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे मनोज सावंत या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. दिग्दर्शनाबरोबरच कथा आणि पटकथालेखन ही मनोज सावंत यांनी केलं आहे.
थोडक्यात सांगायचं, आयुष्याच्या नेहमीच प्रेमात पडत राहायचं असेल तर हा चित्रपट नक्की पाहावा. हा चित्रपट पाहून, स्वतःवर सुद्धा प्रेम करायला शिकाल. कुटुंब आणि जोडीदारावर प्रेम करायला शिकायचं असेल तरी हा चित्रपट पाहावा.. थोडक्यात म्हणजे संपूर्ण कुटुंबासाठी हा चित्रपट!!मानवी भावनांचं सुरेख प्रदर्शन करणारा, प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हा चित्रपट स्वतःच वेगळ स्थान निर्माण करतोय. हे सर्व अनुभवायचे असेल तर हा चित्रपट पाहावा.