lifezon - 8 in Marathi Fiction Stories by Komal Mankar books and stories PDF | लाईफझोन ( भाग -8 )

Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

लाईफझोन ( भाग -8 )

    अभय शांतपणे मला समजवत होता 

अभयच बोलणं ऐकून माझ्याचेहऱ्यावर मंद स्मित पसरले पण अचानक त्याचा आवाज किंचित बदलला ....

' निराशा पूर्णपणे वांझोटी आहे रेवा , जी कधीच फलश्रुती देत नाही ... सृजनात्मक शक्तीच्या आसपासही ती आपल्याला भरकटू देत नाही . तुझीही निराशा कळते अगं मला ,  मी दोन वर्षे तुम्हाला भेटायला आलेलो नाही हो ना ! अगं मी दोन वर्षे माझ्या घरचाना तरी कुठे म्हणून भेटलो मी माझ्या कार्यात पूर्णपणे गुंतलो होतो अगदी कात्रीत सापडलो होतो .
मला त्यातून बाहेरही पडता येत नव्हतं .. तिथे मी पहिल्यावर्षी एका सामाजिक संस्थेलाही जॉईन झालो स्टडी आणि अनाथ मुलांना शिकवायला जाणं त्यांच्या गरजा पूर्ण करने माझा ह्याच्यातच वेळ निघून जायचा . मी हे तुम्हाला भेटायला आल्यावर सागणारच होतो पण . दुर्दैवाने ..... '

अभयचा स्वर कातर आणि रडका झाला तो स्वतःला सावरत माझ्याशी परत बोलू लागला ,

' तुझी निराशा दूर कर रेवा ..... रेवा उठ .... आणि हे निराश विचार बाजूला सार .. 

माझ्यासाठी तरी आधीसारखी हस मला बरं वाटावं म्हणून निदान एवढं तरी करशील ना ग आपल्या ह्या मित्रासाठी ?? '

' होय अभय ! खरं सांगतो आहे तू तुला छान वाटावं म्हणून मी नेहमी हसत राहील 

पण तू असं नको रे सोडून जायला हवं होतं आम्हा सर्वांना ....' 

' रेवा , सागराच्या विशाल रुपापुढे नदीचे काहीच अस्तित्व नसताना तरीही ती पूर्णतः प्रयत्नात असते सागराला मिळण्याकरिता . कारण .... कारण .... तिच्या पत्रातील प्रत्येक 

धारेच्या प्रत्येक थेंब आशेचा अमृत प्राशन करीत असतो ...  जेव्हा झाडावरच पिवळं पान

गळून पडते तेव्हाच नवं पान उगवते ना ग ! प्रत्येकाला ह्या सृष्टीचं सौन्दर्य अनुभवता यावं 

म्हणून जन्म मिळतो ... त्यासाठी मृत्यूही गूढ संकल्पना आहेच की ! 

वार्धक्यात त्रासलेला तो जीव मरणाची वाट बघत असतो ... जेव्हा तो त्या यात्नांतून 

मुक्त होतो तेव्हाच तो सुखावतो ... मलाही त्या बिमारीने यातना दिल्या मी नसतं जगू शकलो असतो ग  .... त्या बिमारीची लागटही मला त्या भेळवाल्या काकडून झाली .
ह्यात माझा काहीच दोष नव्हता रेवा ... भूक भागवण्यासाठी रोज मी सकाळी त्यांच्या स्टॉलवर जाऊन भेळ खायचो .... आणि तिथेच माझं आयुष्य संपलं हे व्हेंटिलेटरवर 
असताना मला कळलं ... येणारा काळ आता मृत्यूच्या स्वाधीन असणार म्हणून मी 
तेवढंच चेहऱ्यावर स्मित ठेवत अखेरचा श्वास सोडला ... !' 


अभय मला कळवळून सांगत होता ...... ' बस्स अभय बस्स ..... मी समजले ! '

माझ्या डोळ्यात पाणी तरळले आणि तो रडक्या स्वरात उतरला .

' मला माहिती आहे रेवा तू माझी जिवलग खूप जवळची मैत्रीण आहेस ...! ' 

अभय प्रसन्न हसला . 

' अभय , तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट मी लक्षात ठेवण कधीच निराश होणार नाही ... '

' ह मलाही माझ्या प्रिय मैत्रिणीकडून हीच अपेक्षा आहे . आता मला छान वाटतं प्रभूला राहवले नाही म्हणून त्याने मला तुझ्यापर्यंत पोहचायला साह्य केले ... त्याच्या वतीने तुला आशेचा मार्ग गवसो ... तू नेहमी हसत राहावी असच वाटतं ग मी नाही आहो तुमच्यात म्हणून कधी दुखी होऊ नको .... सँडी , डॅन आणि प्रद्युमनलाही सांग त्याची खूप आठवण करतो मी .... आपल्या मैत्रीला तुम्ही जिवातजीव असे पर्यंत जपा मला खूप आनंद होईल . ' 
अभय मंद हसला ... 

' आता मला निघायला हवे रेवा .... मला अनुमती दे ! '

' कुठे कुठे निघतोय तू अभय ? ' मी गडबडले ....

' जिथून आलो , त्याच ठिकाणी परत जातोय रेवा ....'

' नाही अभय तू जाऊ नको ...' मी आग्रहाने त्याला थांबवत होती . 

' नाही ग रेवा मला थांबता नाही येणार .... तू जेव्हा मनातून माझी आठवण करशील तेव्हा मी तुला दिसणार नाही पण नक्की तुझ्या जवळ असेल . ' अभय हळुवार बोलतं होता .

' अभय नको रे जाऊ अभय ..... अभय .... अभय ...!' मी बडबडले .... आणि बघता 

बघता अभयची आकृती पुसटशी झाली तो क्षणातच अदृश्य झाला मला दिसेनासा झाला .

बेडवरून उठून मी लाईट ऑन करत अभयला आजूबाजूला शोधू लागले पण तो दिसलाच नाही आणि त्या दिवसांनंतर अभयने कधीच मला अशी अचानक भेटही दिली नाही .