अंधारावर प्रेम करणारी रात्र, चकाकणारे दिवे, निर्मनुष्य रोड आणि काया...
कुठे चालली माहिती नाही, का चालली माहिती नाही, कुणी अडवणारा नाही, कुणी विचारणारा नाही,
तस ते शहर तीला अनोळखी न्हवते, जन्मापासून ती या शहरात वाढलेली. तरीही रात्रीचे २ वाजता अश्या निर्जन ठिकाणी एकट्या मुलीन येण म्हणजे दिड कीलोच्या मेंदू मध्ये हजारो टनचा प्रश्नचिन्हच...
चालता चालता ती त्या पुलावर येऊन थांबली, जो तीला रोज स्वप्नात खुणावत होता. ती त्या पुलापर्यंत कशी पोहोचली हे तीलाही कळाल नाही. काही वेळाने तो आला, एखाद्या मुर्तीकाराने घडवलेली मुर्ती जशी निशब्द स्तब्ध उभी राहते तशी ती उभी होती, जणू संमोहितच.
त्याने खांद्याला अडकवलेल्या झोळीत हात घातला आणि मुठभर हळद बाहेर काढली. तीच्या कपाळावर हळदीचा हाथ फिरवत तो काही तरी मंत्र पुटपुटत होता. शेवटी त्याने झोळीतून एक धारदार सुरा बाहेर काढला, तीचे केस धरले आणि जोवर तीची मान धडा पासून वेगळी होत नाही तोवर सुरा तीच्या माने वरून फिरवू लागला. शेवटी एक जोरदार झटका दिला आणि तीची मान धडावेगळी केली. तीच धड खाली कोसळल. त्याने तीची मान सरळ पुलाखाली वाहणाऱ्या नदीत फेकून दिले. पाण्याच्या तळाशी पोहचताच त्या मुंडक्याचे डोळे उघडले...
आणि काया शुध्दीवर आली.....
तीने आजुबाजुला पाहिलं, एका नदी किनारी वसलेल्या स्मशानात ती बसली होती...
मंतरलेली ती रात्र चंद्रालाही शहारे आणणारी होती. तीच्या आजुबाजुला फक्त आणि फक्त पेटलेल्या चिता होत्या, त्या जळणाऱ्या चितेकडे पाहून ती हसू लागली. खळखळणाऱ्या पाण्याचा आणि जळणाऱ्या चितेवरच्या लाकडाच्या आवाजा व्यतिरिक्त तीचा तो भेसूर हसण्याचा आवाज साक्षात दगडालाही घाबरवणारा होता.
इतक्यात जोर जोरात ढोल वाजू लागले, काही शे माणस ती बडवत तीच्याकडे येत होती. त्या ढोलाच्या मध्यभागी एक प्रेत होत. त्याला नुकतच सरणावर झोपवण्यात आल होत, ढोल वाजवणारे ते तिच्या भोवती नाचू लागले आणि काया आणखी जोरात हसू लागली. अगदी आनंदाने बेभान होऊन.
एका एकी ढोल बंद झाले, त्यांच्यातील काही जण तीच्या जवळ आले आणि तीचे हात पाय बांधून त्या नवीन चितेवर बसवले. काही कळण्याच्या आत त्यांनी ती चिता पेटवली आणि जोर जोरात ढोल बडवू लागते. ती आता शांत झाली होती. तीच हसण बंद झाल होत. तीची काया जळत होती. पण ती गार पडली होती, काही काळ लोटला, त्यांनी ती चिता अर्धवटच पाण्यात लोटायला सुरु केली. तीच शरीर अर्धवट जळाल होत. ती बसलेल्या अवस्थेतच जळत होती. त्या सर्वांनी मिळून तीला पाण्यात ढकललं. ती पाण्यासोबत वाहू लागली. अगदी प्रवाह नेईल तिकडे, वाहत वाहत ती एका उंच धबधब्याच्या टोकाला येऊन ठेपली. त्या धबधब्या वरून खाली कोसळणार इतक्यात तीची झोप मोडली.
ती बेडवर ऊठून बसली. तीच शरीर घामाने डबडबल होत. घसा कोरडा पडला होता. घोटभर पाणी प्यावे म्हणून ती बेड वरुन खाली उतरली आणि पाणी शोधू लागली. डोळे चोळत ती दुसऱ्या रुममध्ये पोहोचली. तीच्या समोर ओळीने लोक झोपले होते. काही विचार करून तीने त्यांच्या चेहऱ्यावरील चादर हटवली. तीथे ओळीने निष्प्राण शरीर ठेवले होते. इकडे तीला खूप तहान लागली होती. काय कराव कळत नव्हत. ती धावत होती या खोलीतून त्या खोलीत पण तीला पाणी दिसत न्हवत. दिसत होती ती फक्त प्रेतांची रांग...
ते एका हॉस्पिटलचे डेड हाउस होत, एव्हाना हे तीच्या लक्षात आलं होतं. तीला रडायला आल पण तीला रडता येत न्हवतं, तीचा घसा आणखी कोरडा पडला, काही ही करून तीला पाणी हव होत...
इतक्यात तीची नजर पोस्टमार्टेम करण्यासाठी ठेवलेल्या सुऱ्यावर पडली. कायाने तो सुरा उचलला आणि काही विचार न करता समोर पडलेल्या बॉडी समोर उभी राहिली. त्याच्या चेहऱ्यावरील चादर हटवून तो सुरा थेट गळ्यात रोवला...
मानेतुन निघणार रक्त ती घटाघट पिऊ लागली. पण तीची तहान शमत न्हवती, ती प्रत्येक शरीरामध्ये सुरा भोसकू लागली...
"काया" कोणी तरी तीला आवाज देवू लागल. तीच तिकडे लक्ष वेधल तीला थंडी जाणवू लागली. कोणीतरी तीच्या अंगावर पाणी ओतत होत...
तीने डोळे उघडले, समोर तीच्या तीचे वडील उभे होते. शेजारी तीची आई रडत उभी होती, डॉक्टरांनी तीला बाहेर बसण्याची विनंती केली.
डॉक्टरांनी काया कडे पाहिल, ती काही क्षण शांत वाटली पण पुढच्या क्षणी जोरदार किंचाळली,आणि तीने रडायला सुरूवात केली...
काही काळ असाच गेला. ती शांत झाली. डॉक्टरांनी तीला विचारल " आता बर वाटतय ? " कायाने होकारार्थी मान हलवली. त्यानंतर डॉक्टरांनी कायाला बाहेर बसायला सांगितले.
" डॉक्टर काय झालय माझ्या मुलीला plz सांगताल का ?" चिंतातुर तीच्या वडिलांनी डॉक्टरांना विचारल.
" तुमची मुलगी जास्त भुतांच्या गोष्टी वाचते का ? किंवा भुताटकीचे चित्रपट किंवा सिरीयल वगैरे ?"
" हो तीला आवड आहे या सगळ्याची "
"मग त्याच कारण हेच आहे की सतत एकाच गोष्टीत अडकून राहिल्याने ती स्वतःला गोष्टी मध्ये पाहते आणि याच गोष्टी तीच्या स्वप्नात येतात "
" पण डॉक्टर स्वप्न तर काही सेकंदाचे असतात आणि ही रात्रभर अशी वागते याच कारण काय ?"
"तेच तर शोधायचे आहे, कारण ती झोपल्यावर तीच्या शरीराच नियंत्रण पुर्णपणे छोटा मेंदू घेतो आणि तो ते नियंत्रण मोठ्या मेंदू पर्यंत जाऊ देत नाही, म्हणून तीला जाग येत नाही, आणि ती त्याच विश्वात राहते..."
"मग यावर काही उपाय ?"
" सध्या तरी नाही, पण मला विश्वास आहे ती लवकरच बरी होइल "
डॉक्टरांचे ते शब्द वरचेवर होते हे कायाच्या वडिलांना कळून चुकलं. ते केबिनच्या बाहेर आले. काया आणि तीची आई बाहेर बसले होते.
कायाने तीच्या वडिलांन कडे पाहील आणि पुन्हा एकदा हसली...