A Heavy Prize - A Mr. Wagh story in Marathi Fiction Stories by Suraj Gatade books and stories PDF | अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 4

Featured Books
  • सर्द हवाएं

    लेख-सर्द हवाएं*******""       यूं तो सर्दियों के मौसम में जब...

  • इश्क दा मारा - 45

    यूवी गीतिका का हाथ पकड़ कर ले जा रहा होता है तभी गीतिका बोलत...

  • लल्लन जी की अद्भुत नौकरी

    गाँव के एक छोटे से कस्बे में रहते थे लल्लन जी। उनका नाम ही उ...

  • चुप्पी - भाग - 2

    क्रांति की हॉकी खेलने की चाह को महसूस करके और उसकी ज़िद को हद...

  • छिनार

    बसंत बाबू, ये ही बोलते थे लोग, 23 साल का खूबसूरत युवक, 6 फिट...

Categories
Share

अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 4

फ्यू मोअर डेथ्स्


     मध्यरात्री कधी तरी विरेन मरण पावला होता. आता हे प्रकरण जास्तच चिघळत जात होते. म्हणून मग कार्तिकने निर्णय घेतला, की विरेनची पोस्टमार्टम इथेच डेंटल हॉस्पिटलमध्ये होईल. त्याला जॉ सर्जरी साठी इथे आणण्यात आले होते. शुद्धीवर आल्यावर र्मालाही इथेच आणले गेले होते. चीफ सर्जन, डीन, चेअरमन, हॉस्पिटल ओनर सर्वांनीनी आडकाठी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना दटावून, धमकी देऊन, भीती घालून गप्प केले गेले. त्यांनाही शांत बसण्याशिवाय पर्याय नव्हताच. कारण त्यांनी जास्तच आडवे लावले असते, तर त्यांची ओथेरिटी किंवा लायसेन्स कॅन्सल होण्याची भीती होतीच. शेवटी युद्ध पातळीवर हे प्रकरण हाताळले जात होते. आणि पंतप्रधानांपासून मुख्यमंत्रींपर्यंत सर्वच यात लक्ष घालून होते. शेवटी त्यांनी परवानगी दिली.
     असे करण्यामागे कार्तिकचा तर्क होता, की इथेच जर अटॉप्सी झाली, अटॉप्सीसाठी विरेनची बॉडी नेण्याच्या मधल्या काळात विरेनच्या डेडबॉडीशी काही छेडखाणी होण्याची शक्यता खूपच कमी होते. कार्तिकला आता कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती. 
    खरे तर या मागे दुसरेही कारण होते. विरेनची बायको रमाही विरेनला ठेवण्यात आलेल्या हॉस्पिटलच्या जनरल वॉर्ड मधील बाथरूम मध्ये मेलेली आढळली होती...
      
    दोघांच्याही आटॉप्सीज् एकाचवेळी करण्यात आल्या. बाबाराव देसाईंच्या अटॉप्सीचा इंचार्ज असलेला फिजिशियन याही अटॉप्सीज् सुवरवाईज करत होता. 
    काही तासांतच अटॉप्सीजचा रिपोर्ट आला. मिळण्यासारखे जास्त काही नव्हतेच. म्हणूनच पोस् मार्टम लगेच उरकला होता. 
    रिपोर्टवरून समजले, की विरेनचा मृत्यू अनेस्थेशियाच्या ओव्हर डोसमुळे झाला होता आणि त्याच्या मृत्यूच्या दोन तास आधी त्याच्या बायकोचा रमाचा मृत्यू झाला होता. तिने बाथरूम मध्ये आपल्या हाताची शीर कापून घेतली होती. 
  पतीच्या अपराधाचे ओझे सहन न होऊन तिने आत्महत्या केली असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. कारण तो खून असल्याची काहीच लक्षणे दिसत नव्हती. 
  कार्तिकलाही बाबारावांचा खुनी पकडणे अधिक गरजेचे असल्याने त्याने रमाचा विषय तिथेच थांबवला. प्रश्न राहिला होता तो विरेनच्या मृत्यूचा. त्याला अनेस्थेशियाचा ओव्हर डोस कसा झाला? हे शोधून काढणे आता क्रमप्राप्त होते.
  हॉस्पिटल मधील सर्वांची चौकशी करण्यात आली. विरेनच्या देखभालीसाठी असलेल्या नर्सेस व त्याची ट्रीटमेंट करत असलेल्या डॉक्टर याचे इंटेरॉगेशन करण्यात आले. पण कुणाचीच चूक आढळून आली नाही. पुन्हा सारे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्येही काहीच संशयास्पद नव्हते. मिस्टर वाघही यावेळी काही करू शकला नाही. 
   पण त्याने एक गोष्ट मात्र सर्वांच्या निदर्शनास आणून दिली, की अटॉप्सी रिपोर्ट मध्ये सांगितल्याप्रमाणे विरेनचा मृत्यू अनेस्थेशियाच्या ओव्हर डोसमुळे झाली असे म्हंटले गेले असले, तरी त्याची मात्रा ही नॉर्मलच होती. त्याला एक्सेसिव्ह अनेस्थेशिया देण्यात आला नव्हता. ऑपरेशन वेळी त्याला लोकल अनेस्थेशिया देण्यात आला होता आणि त्यामुळे तो पूर्ण बेशुद्धावस्थेत होता. कदाचित म्हणून नंतर त्याला जो अनेस्थेशियाचा डोस देण्यात आला तो त्याच्या प्रकृतीला तो अनेस्थेशिया मानवाला नसेल असा मिस्टर वाघने काढलेला निष्कर्ष. 
                 कार्तिकने मारलेल्या ठोशामुळे विरेनच्या जबड्याची करकोळ सर्जरी करावी लागली होती. त्यासाठीच त्याला अनेस्थेशिया देण्यात आला होता. सर्जरीनंतर आठ तास तो बेशुद्धावस्थेतच होता. उठल्यानंतरही त्याचा जबडा खूप दुखत होता. पण घडलेले काही त्याला आठवत नसल्याने तो भ्रमिष्टासारखा वागत होता. त्याला खूप त्रास होत होता म्हणून त्याला पुन्हा एकदा अनेस्थेशिया देण्यात आला होता. आणि हे चीफ सर्जनच्या परवाणगीनेच झाले होते. यात कोणता धोकाही नव्हता. पण विरेन मेला होता. हे कोणालाही अपेक्षितच नव्हते.
        शेवटी कार्तिकच्या या मोठ्या चुकीमुळे त्याला ताबडतोब या केसवरून हटवण्यात आले. आणि पर्यायाने संपूर्ण सीबीआय टीमलाही. पण ही बातमी कुठेही लीक होऊ नये याचीही पुरेपूर काळजी घेण्यात आली. 

        इथे केस अजिबातच पुढे सरकत नव्हती, पण मृत्यू वर मृत्यू मात्र होत होते. आणि दुसरीकडे आणखी एक कडी या केसला जोडली जात होती. दुसऱ्या अंगाने या केसची चौकशी चालू होती. 
    केस पुन्हा कमिशनरच्या ताब्यात आली होती. बाबाराव हे समाजसेवक म्हणूनही काम करायचे आणि त्यांच्या या कार्याचा खूपशा 'कार्यकर्त्यांना' त्रास झाला होता. त्या दृष्टिकोनातून आता केसचा विचार चालू झाला होता. 
      प्राथमिक चौकशी अंती तरी यातील कुणीच त्यांना धमकी दिल्याचे काही आढळून आले नाही. 
      पण बाबू सुतार नांवाच्या एका माणसाची आणि बाबारावांची काही महिन्यांपूर्वी भर रस्त्यात भांडण झाल्याचे पोलिसांना समजले. 
हा बाबू सुतार दिसायलाच खवट माणूस. वय साधारण चाळीस - पंचेचाळीस. गावांत याचे दोन दुकान गाळे. बरोबर. मलाही जेव्हा कळले तेव्हा आधी असेच वाटले, की दुकान गाळे असणे हा काही गुन्हा नाही. मग ते का भांडले असतील. 
          नंतर मिस्टर वाघ कडूनच मला कळाले, की त्याचे जुगाराचे अड्डे आहेत. गेमिंग पार्लर. त्याचा हा व्यवसाय लायसन्स्ड् आहे. म्हणजे असे म्हंटले तरी जाते. पण तिथे येणारे लोक ज्या योग्यतेचे (लायकीचे) असतात यामुळे गल्लीतील इतर लोकांना त्याचा त्रास व्हायचा म्हणूनच बाबाराव बाबूला बोलले होते. 
         बाबूचे म्हणणे होते, की माझ्याकडे येणारे लोक कसेही असोत. असतात तर ते माझे कस्टमर. आणि मी माझ्या कस्टमरला काहीच बोलू शकत नाही. आणि यावरूनच दोघांची जुंपली होती. या बाबूचे बाजूच्या दोन गावांतही मिळून तीन 'गाळे' आहेत. दिवसाला नाही म्हंटले तर चार - पाच लाखांचा 'गवणा' तरी नक्कीच गोळा होतो अशी मिस्टर वाघने मला माहिती पुरवली. हे सांगत असताना त्याच्या चेहऱ्यावरील भाव मला सांगत होते, त्याला मी किती बावळट वाटलो होतो त्यावेळी. 
"काय? मला या गोष्टी माहीत नाहीत... आणि ते चांगलंच नाही का?" मी त्याला प्रश्न केला.
        यावर तो नुसताच हसला.

        बाबू सुतारला आत घेण्यात आले. बाबू सुतारचे क्रिमिनल रेकॉर्ड काढण्यात आले. तसा तो कोरा होता. काही क्रिमिनल रेकॉर्ड नाही. 
       हा फक्त एका टेररिस्टच्या स्टेटमेंटमध्ये त्याचा उल्लेख रेकॉर्ड झाला होता. पण त्यालाही काही वर्षे झाली होती.
       टेररिस्टचा संदर्भ या केस मध्ये येताच. होम मिनिस्ट्रीच्या आदेशानुसार तातडीने आयबीला यामध्ये ओव्हर द नाईट इन्क्लूड् करण्यात आले. 
       ही केस मोस्ट इफिशियन्ट आयबी ऑफिसर वरूण त्रिपाठी यांच्याकडे सोपविण्यात आली. ही इज् २००९ बॅच पुलीस ऑफिसर फ्रॉम महाराष्ट्र कॅड्रे.
केसची धुरा पुन्हा कमिशनर कडून वरुणकडे सोपवण्यात आली. कमिशनरला हे तसे मानवणारेच होते. कमिशनर रामचंद्र शिंदे हे कामचुकार नक्कीच नव्हते. पण ही केसच इतकी जटिल आणि नाजूक होती, की त्यांना ते इंचार्ज असताना ती अनसॉल्व्ह्ड राहणे मान्य नव्हते. त्यामुळे या केसची जबाबदारी दुसऱ्या कोणावर तरी जाणे त्यांना तसे नाहरकतीचेच होते.
         आल्या आल्या पहिले वरूणने बाबूला इंटेरोगेशनसाठी आत घेतले. इंटेरोगेशन रूममध्ये दोघेच होते. सर्व सर्विलेन्स कॅमेराज् वरुणच्या सांगण्यावरून बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे बाबूचे इंटेरोगेशन रेकॉर्डवर आले नाही. त्यामुळे त्यांच्यात नेमके काय बोलणे झाले हे मात्र कोणालाच समजले नाही. 
        इंटेरोगेशन रूमच्या बाहेरून कमिशनर, नवीन काही इतर केसशी रिलेटेड ऑफिसर्स आणि मिस्टर वाघ त्यांना वन वे मिररच्या पलीकडून पाहत होते. नवीन हे इंटेरोगेशन त्याच्याकडील एक्शन कॅमेरामध्ये कोणाच्याही न कळत रेकॉर्ड करत होता. ही गोष्ट मिस्टर वाघच्या डोळ्यांतून मात्र सुटली नाही. नवीनने सुरवातीपासूनच मिस्टर वाघवर अविश्वास दाखवला असे नाही व तसे म्हणता येणार; पण त्याच्या डिडक्शन्सवर शंका उभी करण्याचे काम केले होते, म्हणून मिस्टर त्याच्यावर विशेष लक्ष ठेऊन होता. 
       पण याचवेळी तो आणखी एका कामात होता आणि ते म्हणजे वरुण बाबूला काय विचारतोय आणि बाबू काय उत्तर देतोय याकडे. इंटेरोगेशन रूम साऊंड प्रूफ असल्याने त्यांच्यातील बोलणे कोणाला ऐकू येत नव्हते. नवीनचा कॅमेराही त्यांची हलती तोंडेच कॅप्चर करत होता.  पण वाघ त्यांचे म्हणणे पूर्णपणे समजू शकत होता...
'बाबू, मला तुझी फालतू माहिती नकोय! मुद्द्याला हात घाल!' 
      बाबूला वाटत होते, त्याच्या गेम पार्लरसाठीच त्याला आत घेतले आहे. त्यामुळे तो आपलाच इतिहास वरुणला सांगत होता. हे पाहून मिस्टर वाघला हसू आवरले नाही. त्याचे हसणे पाहून कमिशनर व बाकीचे ऑफिसर्स कोड्यात पडले. 
'अरे हा मूर्ख आहे का? याला कशाचाच सिरीयसनेस नाही!' अशी टीका नवीनने स्वतःशीच नोंदवली, पण त्याच्या हलणाऱ्या होठांवरून मिस्टर वाघला नवीनचे त्याच्या विषयीचे बोलणे समजले. मिस्टर वाघने त्याच्या टिकेकडे दुर्लक्ष केले आणि म्हणाला,
"असे केल्याने आपण किती ग्रेट इन्वेस्टिंगेटर आहोत ही दाखवण्याची या वरुणची धडपड किती केविलवाणी आहे!" 
आपल्याला आतील गोष्टी कळतायत हे यांना समजायला नको म्हणून मिस्टर वाघने विषय बदलला. 
"एवढंच कळतंय तर स्वतः करायचे ना इंटेरोगेशन." नवीनने मिस्टर वाघला टोमणा मारला. 
"नवीन!" कमिशनरने नवीनला खडसावले.
"होय सर! आतापर्यंत या विजय वाघची ठोस अशी कुठे काय मदत झाली आहे? पिकनिकला आल्यासारखे हा आपल्यासोबत फिरत असतो फक्त!"
मिस्टर वाघचे लक्ष आतही होते. तो नवीनला ऐकत होता, पाहत मात्र आत होता. चेहऱ्यावर बेपर्वाईचे स्मित. आपल्याला हा सिरियस्लीच घेत नाही हे पाहून नवीनची मात्र जास्तच चरफड झाली.
         अब्दुल हकीम ज्या टेररिस्टच्या स्टेटमेंटमध्ये बाबूचे नांव रेकॉर्ड झाले होते, त्याला दोन वर्षांपूर्वीच फाशी झाली होती. त्यामुळे त्याच्याशी इंटेरोगेशन करणे शक्यच नव्हते. पण त्याच्या स्टेटमेंटमध्ये त्याने सांगितले होते, की बाबूने रत्नागिरी मधून हत्यारे आणून याला सप्लाय केली होती. त्यांनी या बदल्यात त्याला दोन लाख रुपये देण्यात आले होते. ही हत्यारे समुद्र मार्गे कोस्ट गार्ड्सना हुलकावणी देण्यासाठी रत्नागिरीत इम्पोर्ट केली गेली होती. पण ही एका नागरिकाने योग्य ठिकाणी पोहोचवणे कमी धोक्याचे आहे असे वाटून बाबूला यात सामील करून घेतले होते.
         वरुणने याविषयी बाबूला विचारणी केली असता बाबूला दरदरून घाम फुटला. त्याने घाबरत का असेना, पण अब्दुलचे स्टेटमेंट धुडकावून लावले. त्याने सांगितले, की त्याने फक्त अब्दुलला राहण्यासाठी जागा मिळवून दिली होती. रोजच्या भेटण्यातून त्यांची मैत्री होत गेली. अब्दुल हा केमिकल इंजिनियर आहे आणि तो नोकरीचा इंटरव्ह्यू देण्यासाठी म्हणून इकडे आला आहे असे त्याने बाबूला सांगितले होते. अब्दूलने त्याला नांवही शाहनवाज असे सांगितले असल्याचे त्याने वरुणला सांगितले. 
अब्दुलच्या स्टेटमेंटने बाबू सुतारला आधीही अडचणीत आणले होते. जेव्हा त्याच्यावर व त्याच्या साथी टेरिरिस्ट्सवर केस चालू होती. यामुळेच तर शहरातील सर्वजण तेव्हापासूनच बाबूला घाबरायला चालू झाली होती. पण त्यावेळी बाबूचे बोलणे एटीएसच्या इन्वेस्टीगेशनशी तंतोतंत जुळत असल्याचे पाहून त्याला उच्च व सर्वोच्च न्यायालयानेही निर्दोष ठरवले होते. बाबूला नाहक अडकवण्याचा अब्दुलचा प्रयत्न फोल ठरला होता. बाबूचा विश्वास संपादन करण्यासाठीच अब्दुलने त्याला त्याचे गेमिंग पार्लर्स सुरू करण्यासाठी  पैशांची मदत केली होती. त्याच पैशांतून त्याचे 'दुकान गाळे' उभे राहिलेले होते.

(कॉन्फिडेनशीयल इन्फॉर्मेशन व सेक्युरिटी इशूज् निमित्त मी त्या टेररिस्ट अटॅकची संपूर्ण माहिती देऊ शकत नाही. त्यासाठी क्षमस्व...)

          बाबूला सोडून देण्यात आले. 

          नवीन एका हॉटेल रूमच्या बाहेर होता. त्याने दार ठोठावले. त्याच्या ठोठावण्यावरून ते काहीतरी सांकेतिक होते हे त्या वाजवण्यावरून लक्षात येत होते. 
          दार जरा उघडल्यासारखे झाले आणि त्या तेवढ्याच फटीतून नवीन आत शिरला. 

रात्रीची वेळ बाबूला घरी सोडण्यात आले होते. मात्र त्याला शहर सोडण्याची परवानगी नव्हती. बाबू घरी न जाता त्याच्या दुकानाकडे गेला. सकाळपासून झालेल्या मनःस्थपाचा निचरा त्याला करायचा होता. 
दुसऱ्या दिवशी तोही दुकानात मेलेला सापडला...