लघुकथा -
तिचा दोष इतकाच की...!
---------------------------------------------------
माधुरी दुपारच्या वेळी घरच्या कामात बिझी असायची , मुलं शाळेतून येण्या अगोदर काम आटोपली की थोडा वेळ मोकळा मिळायचा , त्याचा उपयोग वाचन आणि थोडेफार लेखन
करण्यात घालवता यावा ,असा तिचा मनापासूनचा प्रयत्न असायचा . पण तिचे हे वेळापत्रक साफ कोलमडून गेले होते , कारण गेल्या दोन-तीन महिन्यापासून दुपारच्या
वेळेत नम्रताचा फोन आल्यावर ,हातातली कामं सोडून तिला नम्रताकडे जावे लागत होते . त्याचे कारण ही तसेच नाजूक होते .
नम्रताच्या मिस्टरचे .सुबोधचे आकस्मिक निधन झाले होते , त्यमुळे नम्रताचा फोन आला की माधुरीला तिच्याकडे यावे लागत होते.
ध्यानीमनी नसतांना ,डोळ्यादेखत आपला माणूस कायमचा सोडून जातांना पाहण्याची दुर्दैवी वेळ सर्वावर आली होती , जवळ रहाणाऱ्या माधुरीच्या परिवाराला हे पहाणे टाळता आले नव्हते ,
परिवारावर मोठेच दुखः कोसळले होते , कमी वयात अशा प्रसंगाला सामोरे जाण्याची वेळ नम्रतावर आली ,, अशा प्रसंगात तिला सोबत करण्याची वेळ माधुरीवर आली होती.
दुखः सहन करीत त्यातून मार्ग काढणे भाग होते रोजचे दिनक्रम प्रत्येकाला होतेच , आपपल्या वेळेप्रमाणे आलेला परतणार होता , नॉर्मल होण्यासाठी फार वेळ लागून चालणार नव्हते ",
आपले दुखः ,आपले प्रश्न आपणच सोडवायला पाहिजे आहे ", हे व्यावहारिक वास्तव नम्रताने स्वीकारले ,तसे मनावरचे एक ओझे कमी झाल्याची भावना तिला होऊ लागली .
माधुरीच्या नवर्याने - दिलीपने , तिला सांगून ठेवले की- सगळ काही नॉर्मल होई पर्यंत ,तू नम्रता सोबत असावीस , आपल्या घरातील कामाची, ते होईल की नाही याची काळजी करू नको,
निभावून नेऊ सगळे मिळून , अशावेळी परकी माणसे -आपली होऊन पाठीशी उभी रहातात , आणि तू तर नम्रताची बहिण आहेस, मैत्रिणीसारखी सोबत करावीस तिला . दिलीपच्या
या भावनेशी सगळेच सहमत झाले होते , माधुरीला दिलीपच्या -आपल्या नवर्याचे परिस्थिती समजून घेत वागणे खूप आवडून गेले .
माधुरी आणि नम्रता मावस बहिणी , योगायोगाने लग्नानंतर दोघी एकाच शहरात आल्या , नव्या ठिकाणी एकमेकीला सोबत असलेली बरी म्हणून ..एकाच मोठ्या टाऊनशिप मध्ये वेग-वेगळ्या विंग मध्ये त्यांनी flat घेतले , नम्रताचा flat अगदी पहिल्या विंगमध्ये ,तर माधुरीचा flat अगदी शेवटच्या विंग मध्ये .मागच्या बाजूला , दुसरेच टोक म्हणा की .. समाधान एकच की दोघी
अडी-अडचणीला सोबत आहेत ,त्यामुळे दोघींच्या परिवारातील जेष्ठ मंडळीची काळजी तशी कमी झालेली होती.
सुबोधची नोकरी एक मोठ्या खाजगी कंपनीतली , मोठा हुद्दा ,मोठा पगार ,
भारी कार , आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत , त्याची लार्ज -इमेज " तो मनापासून जपत असे, त्याच्याकडे येणार्याचे डोळे दिपले पाहिजे , सुबोधची लाइफस्टाइल ",पाहून समोरच्या मनात
कोम्प्लेक्स ", आलेला आहे " हे पाहून सुबोध ,त्यात आनंद मानायचा " .
थोडा विचित्र स्वभाव आहे त्याचा ", हे माधुरी आणि दिलीप यांच्या लक्षात आले होते .
दिलीपने मग नाते संबंधात कटुता येऊ नये ,याची काळजी घेत ..नम्रता आणि सुबोध यांच्याशी जेवढ्यास -तेवढे असेच जुजबी संबंध ठेवले , माधुरी आणि नम्रता यांच्यात आपल्या निर्णयाने दुरावा येणार नाही याची काळजी घेत, या दोघींचे नाते नॉर्मल राहील याची काळजी घेण्यास त्याने माधुरीला सुचवले होते.
तसे पाहिले तर सुबोधने ,माधुरी आणि दिलीप यांचे बरोबर इतर लोकांशी तो जसे वागायचा ,तसे वागण्याची मुळीच गरज नव्हती .. पण "स्वतःच्याच अखंड प्रेमात असणार्या सुबोध सारख्या माणसाला " इतरांच्या भावनांचा विचार करायचा असतो ", हे सुचत नसते , मग, तसे वागणे तर दूरच.. एक तर सुबोध आणि दिलीप यांच्यात- एक व्यक्ती म्हणून , परस्पर मित्र व्हावे".असे समान धागे काहीच नव्हते , दिलीपचा स्वतंत्र व्यवसाय होता , तो खूप मोठा व्याप असलेला नसला तरी , एक उत्तम व्यावसायिक म्हणून दिलीप सर्वत्र परिचित होता , हे करीत असतांना ,त्यांने
आपल्या सामाजिक कार्याच्या आवडीचा ,त्यातील जाणीवेचा ठसा उमटवला होता .
दिलीपचा नेमका हा गुण विशेष ..,त्याचा मित्र-परिवार ,त्याचे समाज-कार्य-उपक्रम हे सगळं सुबोधच्या चेष्टेचा विषय होता , दिलीपच्या कोणत्याच कामाबद्दल कधी चांगले बोललाय ",असे होत नसे .
नम्रताला हे जाणवायचे .. ती माधुरीला म्हणायची .. सुबोधचे हे वागणे पाहून मला तर वाटत असते की - सुबोध नक्कीच दिलीपचा मत्सर -हेवा "करतो , कारण त्याच्या सारखे याला जमत नाही आणि करता पण येत नाही ",, मग असे विचित्र वागून तो आनंद मिळवतो . माधुरी मला फार त्रास होतो ग सुबोधच्या अशा स्वभावाचा .!माधुरी तिची समजूत घालीत म्हणे - नम्रता - हे सगळ कळतंय आम्हाला सुद्धा . दिलीप सुबोधच्या वागण्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करतो , तू नको वाईट वाटून घेऊ . दिलीपला तुझी काळजी वाटते .
नम्रता म्हणायची- माधुरी , दिलीप आणि तू, किती समजूतदार आहात ग , इतकं समजून घेण कस ग जमतंय तुम्हाला नाही
तर आमच बघ ..फक्त आणि फक्त विसंवाद आहे आमच्यात .
नम्रता आणि सुबोध या नवरा -बायकोतील मानसिक अन्तर ,वैचारिक अंतर गंभीर स्वरूपाचे होते ", ही गोष्ट माधुरीला या दुखाच्या दिवसात कळू लागली , सुबोधच्या लेखी -नम्रताची किंमत
फक्त घरासाठी आवश्यक असणारी बाई इतकीच होती.,बायको म्हणून तिला या घरात आणले, हेच मोठे उपकार केलेत मी " असे तो बोलून दाखवायचा .स्वतंत्रपणे नम्रता काहीच ठरवू शकत नसे, करू शकत नसे , पैश्या साठी तिला तरसायला लावणे , तिच्या आवडी पूर्ण करणे हेतू-पुरस्सर टाळणे ", आणि तिला रडवून ..एखादी क्षुल्लक वस्तू देतांना सुबोध खूप खुश व्हायचा ",
नम्रता असे विचित्र आयुष्य जगात होती ? सुबोधचे हे रूप नम्रताने जगासमोर कधीच आणले नव्हते ,.
बाप रे ! माधुरीला हे ऐकणे सुद्धा सहन होत नव्हते .
आता तर सुबोध या जगात ही नाहीये .."गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये ", अशी पद्धत आहे आपल्याकडे . म्हणजे एकूण काय,नम्रताने जे भोगलय ,सोसलय ,ते कधीच समोर येणार नाही ?,
सुबोध ने आपले कोणतेच व्यवहार त्याची आर्थिक गुंतवणूक ,कुठे ,कसे आणि किती पैसे ? आहेत याबद्दल नम्रताला कधीच सांगितले नव्हते , तिच्यावर विस्वास ठेवावा , बायको म्हणून तिला माहिती असणे ", या गोष्टीना त्याच्या दृष्टीने काडीची किंमत नव्हती ." याचा परिणाम नम्रताला भोगावा लागत होता ..
त्यातल्या त्यात समाधानाची एक गोष्ट घडत होती , ती ही की -त्याच्या ऑफिस कडून, त्याच्या सी .ए कडून आर्थिक कार्यवाही -व्यवहारबद्दल मदत मिळाली म्हणून आर्थिक प्रश्न सुटण्यास त्रास झाला नाही, पण पैश्यासाठी वणवण फिरण्याची वेळ तर नम्रातावर सुबोधमुळे आलीच होती ना ? त्याने या सर्व गोष्टी जबाबदारीने ,समजुतीने ,विस्वसाने नम्राताशी शेअर केल्या असत्या तर ? किती बरे झाले असते .
दिवस काही एकसारखे नसतात , वेळ लागेल थोडा ,पण यातून नम्रता बाहेर पडेल , आपण आहोतच तिच्या मदतीला ., सुबोध जरा व्यवस्थित वागला असता तर ?
या जर-तर ने माणसांची आयुष्य सावरण्य ऐवजी उध्वस्त झालेली आहेत , यात नम्रताचा काय दोष ?
तिचा दोष इतकाच की ..दुर्दैवाने ती सुबोध सारख्या माणसाची बायको होती. माधुरीच्या नजरे समोर सतत नम्रताचा चेहेरा येत होता.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लघुकथा -
तिचा दोष इतकाच की ....
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
9850177342
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------