lifezon - 4 in Marathi Fiction Stories by Komal Mankar books and stories PDF | लाईफझोन ( भाग -4)

Featured Books
  • શ્રાપિત પ્રેમ - 18

    વિભા એ એક બાળકને જન્મ આપ્યો છે અને તેનો જન્મ ઓપરેશનથી થયો છે...

  • ખજાનો - 84

    જોનીની હિંમત અને બહાદુરીની દાદ આપતા સૌ કોઈ તેને થંબ બતાવી વે...

  • લવ યુ યાર - ભાગ 69

    સાંવરીએ મનોમન નક્કી કરી લીધું કે, હું મારા મીતને એકલો નહીં પ...

  • નિતુ - પ્રકરણ 51

    નિતુ : ૫૧ (ધ ગેમ ઇજ ઓન) નિતુ અને કરુણા બીજા દિવસથી જાણે કશું...

  • હું અને મારા અહસાસ - 108

    બ્રહ્માંડના હૃદયમાંથી નફરતને નાબૂદ કરતા રહો. ચાલો પ્રેમની જ્...

Categories
Share

लाईफझोन ( भाग -4)

    सँडी जवळ जवळ महिन्याभऱ्यानंतर परतली .  मला तुम्हाला आज भेटायचं आहे वेळ ठिकाण माहिती नाही पण  , भेटणं खूप महत्त्वाचं आहे काहीतरी संगायच तिला रडवलेल्या स्वरात ती बोलतं होती असं अभय मला कॉल करून बोलला .  
       
       ब्नॉर्मनच्या बेटा शेजारी आम्ही सारे जमलो . सँडीला यायला उशीर होतो आहे ह्याची अप्रत्यक्ष कणव लागतच डॅन म्हणाला , " काही तरी भयाण घडलं असावं असं वाटतं छे छे ! 

   ती आज कुठे कॅलिफोर्नियावरून इंडिया मध्ये परतली आहे काही तरी आपल्यासाठी 
सरप्राईज असावं . " अरुंद रस्त्याकडे बघत प्रद्युमन म्हणाला , "अरे ती बघा  सँडी येत आहे . " 
   
       चेहऱ्यावर काळजीचे सावट घेऊन ती जवळ येत आमच्या बाजूला येऊन बसली . 
" माझी खूप वाट बघावी लागली ना ?? " तिनं हळुवारपणे विचारलं . 

" ती .... ती ... तिला जरा बरं नाहीये म्हणून यायला उशीर झाला मला . "  ती क्षमायाचनेच्या सुरात म्हणाली . 

" ती कोण ? " न राहून मी विचारलं .

" मॉम ... " 

निःशब्द स्तब्ध सँडी काही तरी आमच्या पासून लपवत होती मॉमला बरं नाहीये की अजून काही घडलं ?? ह्या प्रश्नचिन्हाने आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर बारा वाजले .

" ....... अंघोळीसाठी बाथरूममध्ये ती शिरली शॉवर ऑन केला . शॉवरच्या भरधारेत न्हाताना अंगावर काटा उभा राहिला असावा  . बाहेरून दाराचं लॉक खोलत जवळ आलेली मानवी आकृती तिला दिसलीच नाही . एक पिंगट ग्रे कलरचा कोट त्याच्या अंगावर परिधान केलेला दिसला तो शेवटचाच .

      पुढच्या क्षणी मॉमच्या शरीरावर वार झाले . शॉवरच्या धारामध्ये तिचं रक्त मिसळून गेलं .. 
       
        तिचा किचळणारा आवाज ऐकून मला वाटलं लिझार्ड असावी तिला बघून ती किंचाळली पण तो किचळण्याचा तिचा शेवटचा आवाज माझे कान बधिर करतो . विलंब न करता मी तिच्या खोलीचा दरवाजा उघडून बघते तर रक्ताने माखलेलं शरीर शॉवरच्या पाण्याने स्वच्छ धुवून निघतं होत ...  मी जागीच कोलमडून गेली ! घाईघाईने मी तिच्या विवस्त्र शरीरावर  बाथरूममधला पडदा भिरकावला .

तेव्हा बाथरूमच्या खिडकीसमोरून कोणी तरी तोंडाला बांधलेलं ग्रे कलरचा कोट घातलेला पुरुष पळताना दिसला तो शेवटचाच . त्याच्या पाठमोऱ्या आकृतीला मी पळताना बघत राहिली  तो दोन मिनिटांतच अदृश्य झाला . त्याला मी जाऊन पकडूही शकली नाही .... माझ्या मॉमच्या खुनीला मी पकडू शकली नाही .... पण त्याला मी असच सोडणार नाही आहे . "
            
      तिचं बोलणं ऐकून सर्वाचा थरकाप उडाला . कितीतरी वेळ ती आमच्याजवळ रडत राहिली . मॉम जग सोडून गेली आता आपलं कसं होईल ह्या भीतीने नाही तर मॉमच्या असिम प्रेमाचा समुद्र आता कायमचा आटलेला होता त्या प्रेमाची सांगता तिचं मन जीर्ण करीत होतं . 

        त्या दिवशीच तिने ते घर सोडले आणि आपल्या म्हाताऱ्या ग्रँडपाच्या घरी राह्यला ती  निघून गेली . 

       सँडी त्या खुनीच्या शोधात होती . हा ग्रे कलरचा कोट तिला रात्री उशिरापर्यंत डोळ्यासमोर येऊन छळत होता . कधी कधी आमच्या सोबत रस्त्याने चालत असतानाही तिला तो समोरून जात असल्याचे भास व्हायचा . ते भास होते की सत्य हे अजूनही कोड्यातच होते . कारण त्याला मॉमचा खून करून पळत जातांना सँडीनेच 
प्रत्यक्षात पाहिले होते .  

      सँडीच्या हातात तिच्या मॉमडॅडचे फोटो लागले होते लग्नतर तिच्या मॉम सोबत त्याने केले नव्हते तो साथ सोडून निघून गेला . त्यांनी दुसऱ्या मुलीशी धार्मिक विवाह केल्याचे तिला आईकडून समजले होते .  

      त्या फोटोत तिने तोच ग्रे कलरचा कोट त्याने परिधान केलेला बघितला आणि तिला भोवळ आली .  

       तो .... तो माझ्या मॉमच्या खून का म्हणून करेल ?? माझ्या मॉमने त्याचं काय बिघडवलं , मॉम त्याच्यापासून प्रेग्नेंट आहे हे कळताच तर त्याने मॉमला सोडून दुसऱ्या मुलीशी धार्मिक पद्धतीने विवाह केला ... ओहह गॉड ! म्हणत तिने तो फोटो बॅग मध्ये टाकला . 

      "   आपल्याला आज  रात्री निघायचं पॅरिसला  . " 

  ती बॅग मधला फोटो आमच्या समोर ठेवत म्हणाली . 

" ही तर तुझी मॉम आहे आणि हा कोण ? "  डॅन तो फोटो बघत उद्गारला . 

" हा तोच व्यक्ती आहे  ... "  पण ह्याच काय आम्हाला काही कळलं नाही एवढ्यात 

अभय म्हणाला , " सेम कोट ग्रे कलर ....! " 

आम्ही सर्व फ्लाईटने त्याच दिवशी पॅरिसला जायला निघालो .  सँडीला तिच्या मॉमकडून 

तो पॅरिसला कुठे राहतो ते सांगितलेलं होते त्याच माहितीच्या आधारावर आम्ही त्याचं 

घर गाठलं . 

          घर अगदी एखाद्या विशिष्ट प्रकारच्या संगमवर दगडाच्या भिंती आणि काचाने बांधलेले होते बाहेर खूप मोठं गार्डन फुलं झाडांनी सजलेल .  पाईनचे वृक्ष प्रवेश दाराजवळ उभे होते . 
               
         तिथे गेल्यावर समोरच पोर्च मध्ये तिसीतली एक लेडीज हातात पाईप घेऊन पाणी मारतांना दिसली .

    सँडी हातातला फोटो दाखवत म्हणाली , " हे इथेच राहतात ना ? " 

"  नाही ....." त्या अतिशय क्लिष्ट चेहरा दुःखी करत म्हणाल्या .

" मग कुठे राहतात ?? " सँडी चा प्रश्न क्षणभरासाठी वाटलं त्यांच्या काळजावर 

घाव करून गेला  . 

दोन मिनिटं स्तब्ध झालेल्या त्या पुढच्या क्षणीच उद्गारल्या , 

" ते सहा वर्षांपूर्वीच वारले आहेत .... "   

  त्या महिलेने दिलेल्या माहितीने आम्ही सारे पार गारठलो .