बाबा सुरुवात कुठून करू समजत नाही, तुमच्या बद्दल सांगायचं झालं तर लहानपणी हाथधरून जे आपल्याला चालायला शिकवतात ते बाबा असतात
आपण काही चांगले केल्यावर .जे अभिमानाने सगळ्याना सांगतात.ते बाबा असतात.माझ्या मुलांना काही कमी पडू नए या साठी जे घाम गाळतात....
ते बाबा असतात.आयुष्याच्या रस्त्यावर चालताना
जे आपल्याला चुकताना सावरतात..ते बाबा असतात.
खरं तर सगळ्याचं प्रेम हे दिसून येत ,पण बाबां च प्रेम हे कधी दिसून येत नाही..कधी खिशात पैसे नसतील तर तर पैसे आहेत का बाहेर चालला आहेस ना..पैसे आहेत का अस विचारणारे फक्त बाबाच असतात.. खर तर त्यांनी पूर्ण आयुष्य मुलांना आणि घर सभाळण्यतच गेलं आहे.. काळजी काय असते ना ते बाप झाली वर कळेल असं बोलणारे देखील बाबाचं असतात.. तस मी थोडा फार तुमच्या सारखच दिसतो.. कधी वडील म्हणून नाही राहिले ,एक चांगला बेस्ट फ्रेन्ड म्हणून राहिले.. नातेवाईक मित्रमंडळी ह्यांना समजून घेनारे आणि ती नाती जपणारे म्हणजे माझे बाबा..तुमच्या साठी मी तुमचं आधार कार्ड आहे..कधी मागे नाही हटणार.. जस तुम्ही घर चालवताना तसच मी पण पुढे तुमच्या सारखच बनेल..आज मी 26 वर्षा चा आहे..तुम्ही कायम बोलता की मी तुमच्या साठी काही करू शकलो नाही.. पण बला मला इतकी वर्ष तुमची तर सभाळून मोठं केलत.. माझ्या अवडी निवडी मला काय आवडत हे तुम्हाला माहीत असत..कधी माझा मूड ऑफ असेल तर तुम्हाला लगेच कळत आणि विचारता की काय झालं काही सांग..अस वाटत की मी एक मेव मुलगा असेल जो आपल्या बाबानं बरोबर सगळ्या गोष्टी शेअर करतो .. घरातलं वातावरण चांगलं ठेवण.. छोटंसं घर आहे अपल पण त्या घरात किती प्रेम आहे ..कारण माझे बाबा प्रेमळ आहेत.. त्यांच्या मुळे आम्ही बिंदास मनमोकळे पणाने जगू शकतो.. कर्जाचा डोंगर आहे पण घरात समजून देत नाही की पैसे कसे येतात घर कसं चालत..पण मी कायम बोलत असतो. बाबा आहेत ना मग काही टेन्शन नाही ते करतील सगळ बरोबर.. खर तर ते माझी साठी खूप मोठा आधार आहेत.. मुलांच्या खुशी मदे आपली खुशी मानणारे .. तुम्हाला वाटत की मुलाचं प्रेम फक्त आई वरच..पण बाबा तुमच्या वर किती प्रेम करतो ते फक्त आम्हाला च माहीत आहे.. तू रोज आठवण काढताना तुमच्या आई ची..आणि तुमच्या बाबांची आठवण येते पण तुम्ही बोलून दाखवता का ? तसच आमचं आहे प्रेम खूप आहे पण दाखवता आणि सांगता येत नाही.. तुम्ही कायम खुश रहाव आनंदी रहाव असाच वाटत आम्हाला.. स्वतःची स्वप्ने विसरून, आपल्या मुलांची स्वप्ने आपले मानून जगणारे ते भोळे वडील..! आपली प्रत्येक लहान-थोर गरज मागे टाकून आपल्या मुलांसाठी धडपडणारे ते निःस्वार्थी वडील..! अशा या वडिलांच्या जराशा कठोर स्वभावामागे लपलेले त्यांचे ते अथांग प्रेम, ते मायेने भरलेले हृदय, वात्सल्याचे तेज असलेले त्यांचे ते डोळे कधी कुणाच्या नजरी पडलेच नाही.दिवस-रात्र एक करून आपल्या मेहनतीचा घाम गाळून एक वडील मोठ्या उत्साहाने आपल्या परिवारासाठी छान घरकुल उभारतो. जीवनाच्या प्रत्येक वळणावर ढाल बनून ते आपल्या परिवाराचा बचाव करतात. येणार्या प्रत्येक संकटांना ते एकट्याने सामोरे जातात, इतरांना धीर देताना स्वतःच्या सर्व वेदना, अश्रू मात्र लपवून ठेवतात. सतत आपल्या मुलांवर आनंदाचा वर्षाव करण्याचा त्यांचा प्रयत्न चालूच असतो. स्वतः एके काळी जे दुःखाचे दिवस पाहिले तशी आपल्या मुलांवर कधीच पाळी येऊ नये म्हणून ते आरोग्याचा विचार न करता काम करत असतात. बघायला एकदम कठोर असणारे ते वडील मनाने तेवढेच कोमल असतात. ते आपल्या मनातील भावना जास्त कधी व्यक्त करत नाही आपण विसरतो की लहान असताना जेव्हा आपण आजारी असायचो तेव्हा आपल्या आईचे डोळे अश्रूने भरायचे पण तिला धीर देणारे आपले वडीलच असायचे. स्वतःचा एकही वाढदिवस न मनवणारे ते वडील आपल्या मुलांचा प्रत्येक वाढदिवस मात्र मोठ्या थाटामाटात साजरा करतात मुलांचे भविष्य घडविण्यासाठी आपल्या स्वप्नांचा त्याग करणार्या वडिलांचा विचार कधी आपण करतच नाही. पूर्ण जीवन आपल्या परिवारासाठी झटत असतात. घराचा पूर्ण भार त्यांच्या खांद्यावर असतो. एकदा सुद्धा तक्रार न करता ते आपले मोठ्या प्रेमाने निभावतात. अशा या वडिलांना सुखी ठेवणे, त्यांच्या आत्मसन्मानाची काळजी घेणे, त्यांची अपुरी स्वप्ने पूर्ण करणे हे आम्हा मुलांचे कर्तव्य आहे.वडील जरासे ओरडतात, चिडतात म्हणून ते मनाला लावून घ्यायचे नाही. उलट त्यामागे लपलेली त्यांची ती माया, काळजी समजून घ्यायची. त्यांचा आदर केला पाहिजे. त्यांच्या भावना जपल्या पाहिजे. त्यांनी आपल्यासाठी केलेल्या कष्टाचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे. जीव ओतून प्रेम करणार्या त्या वडिलांना आपण मुलांनी समजून घेणे खूप गरजेचे आहे.नवीन घेतलेत तेव्हा मुलांना नवीन कपडे घेऊया" म्हणून स्वत: जुने कपडे वापरून मुलांसाठी नवे कपडे, फटाके घेणारे आपलेच बाबा असतात ना. स्वत: काही न बोलता मुलांचा शिक्षणाचा खर्च, pocketmoney , कपडे, ई. सगळे कोणतीही अपेक्षा न ठेवता करणारे आपलेच बाबा असतात.
कुठे पडलो किंवा खरचटले कि लगेच तोंडातून निघत आई गं पण मोठ्या अपघातातून वाचलो कि बाप रे!असे उद्गार तोंडातून निघतात. कारण छोट्या संकटांसाठी आई आठवत असली तरी मोठी वादळे पेलताना बाबांची साथ लागते. आई रडते म्हणून तिचं दुख: दिसत पण बाबा रडत नाहीत तर संयमाने वागून पूर्ण परिस्थिती सावरतात दुख: त्यांना पण होत असतं पण ते दाखवत नाहीत.माझे दादा पण अशेच आहेत. दादा म्हणजे माझे वडील मी त्यांना दादा म्हणतो. खरं तर ते घरात सगळ्यात मोठे त्यामुळे सगळे त्यांना दादा हाक मारत त्यामुळे आम्ही पण दादा हाक मारायला शिकलो वडील म्हणजे एक अशी व्यक्ती… जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता, तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता, तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता, आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता…स्वतःची स्वप्ने विसरून, आपल्या मुलांची स्वप्ने आपले मानून जगणारे ते भोळे वडील..! आपली प्रत्येक लहान-थोर गरज मागे टाकून आपल्या मुलांसाठी धडपडणारे ते निःस्वार्थी वडील..! अशा या वडिलांच्या जराशा कठोर स्वभावामागे लपलेले त्यांचे ते अथांग प्रेम, ते मायेने भरलेले हृदय, वात्सल्याचे तेज असलेले त्यांचे ते डोळे कधी कुणाच्या नजरी पडलेच नाही.. स्वतः एके काळी जे दुःखाचे दिवस पाहिले तशी आपल्या मुलांवर कधीच पाळी येऊ नये म्हणून ते आरोग्याचा विचार न करता काम करत असतात. बघायला एकदम कठोर असणारे ते वडील मनाने तेवढेच कोमल असतात. ते आपल्या मनातील भावना जास्त कधी व्यक्त करत नाही.