A Heavy Prize - A Mr. Wagh Story in Marathi Fiction Stories by Suraj Gatade books and stories PDF | अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 3 - अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी

Featured Books
  • सर्द हवाएं

    लेख-सर्द हवाएं*******""       यूं तो सर्दियों के मौसम में जब...

  • इश्क दा मारा - 45

    यूवी गीतिका का हाथ पकड़ कर ले जा रहा होता है तभी गीतिका बोलत...

  • लल्लन जी की अद्भुत नौकरी

    गाँव के एक छोटे से कस्बे में रहते थे लल्लन जी। उनका नाम ही उ...

  • चुप्पी - भाग - 2

    क्रांति की हॉकी खेलने की चाह को महसूस करके और उसकी ज़िद को हद...

  • छिनार

    बसंत बाबू, ये ही बोलते थे लोग, 23 साल का खूबसूरत युवक, 6 फिट...

Categories
Share

अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 3 - अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी

चेसिंग दि फॅमिली


               त्यांनंतर पुढचे काही दिवस मिस्टर वाघ बाबाराव देसाई यांच्या कुटुंब सदस्यांचा पाठलाग करू लागला. कधी त्यांच्याशी भेटून चौकशी करायचा. बाबाराव गेली ७ - ८ वर्षे त्यांच्या नातीच्या मुलीकडे प्रभाकडे राहायचे. परिस्थिती खूपच गरीब. प्रभाचा नवरा शेखर एमआयडीसीतील एका फौंड्रीवर कामाला होता. 
             फौंड्रीचा मालक  दहादहा - बाराबारा तास काम करून घेऊन कधी कधी ओव्हर नाईटही राबवून घ्यायचा. पण पगार मात्र कधीच वेळेवर नाही. दिला, तर तो ही तुटपुंजा.
               हे आधीच त्रिकोणी कुटुंब प्रभा, शेखर आणि त्यांची पाच वर्षांची मुलगी संस्कृती. कुटुंब लहान असूनही शेखरच्या पगारात त्यांचे चालायचे नाही. तशात तीन महिन्यांपूर्वी बाबारावांची भर पडली होती. त्यांच्या देखभालीचा औषधाचा बोजा आता यांच्यावर येऊन पडला. 
                मग प्रभा सुद्धा बाबाराव यांच्या येण्याने महिन्याभरात एका खेळणी बनवण्याच्या कारखान्यात नोकरी करू लागली. शेखरच्याच ओळखीने तिला हे काम मिळाले होते. दोन महिने तर तिला सगळे शिकून घेण्यातच गेली. त्यामुळे तिला पगार बंदच होता. पण पुढे काही आशा होती. 

              मिस्टर वाघ कडून मला कळाले, की बाबाराव देसाई यांचा नातू मेल्यानंतर त्यांच्या पणतूने त्याच्या आईची जबाबदारी त्याच्यावर आहे आणि तो एकावेळी दोन म्हाताऱ्यांना सांभाळू शकत नाही असे सांगून त्यांना सांभाळण्यास नकार दिला. त्यांचा नातू मेल्यावर मग शेवटची नातेवाईक ही प्रभाच उरली होती. बाकी जे इतर नातेवाईक होते तेही त्यांना सांभाळायला तयार नव्हती. जास्तीत जास्त एक दोन आठवडे ठीक; रोज कोण सांभाळणार? असे त्यांचे म्हणणे. कोणी तरी असेही म्हणाले होते, की हा म्हातारा मरत का नाही? एवढे जगून हा करणार काय आहे. बायको, मुलगा, सून, मुलगी, त्याची मुले सगळी तर मेली. काय अमर पट्टा घेऊन जन्माला आलंय काय हे थेर्डं कुणाला माहीत. हे ऐकूनच मग प्रभालाच त्यांची दुरवस्था पाहवली नाही आणि तिने त्यांना घरी आणले होते. 

                प्रभा जमेल तशी त्यांची काळजी घेत होती. तिचा नवराही काही कुणकुण करत नव्हता. पण हे किती दिवस?... आणि हे बाबारावांच्या ही लक्षात आलेले...

             आणि एक दिवस बातमी थडकली. बाबारावांच्या खुनाला चारच दिवस झाले असतील आणि दिनेश याचाही मृत्यू झाला होता. हा तोच बाबरावांचा नातेवाईक होता ज्याने बाबारावांच्या मरणाची कामना बोलून दाखवली होती. 
            कसा मेला तो? की कोणी मारले असेल त्याला? 
            सुरवातीला कोणाला असा अंदाज आला नाही, की बाबारावांच्या खुनाचा आणि यांच्या मृत्यूचा काही संबंध असेल... पण पुढे हा त्यांचा नातेवाईक आहे अशी माहिती समोर आल्याने त्या दृष्टीने तपास चालू करण्यात आला होता. या तपासात मिस्टर वाघ अग्रेसर. 
            दिनेशच्या बॉडीला तर लास्ट मुव्हमेंटला चितेवरून खाली उतरवून मिस्टर वाघने अटॉप्सीसाठी पाठवले होते. त्याच्या या वागण्यावर गावकरी, दिनेशचे संबंधी - नातेवाईक फारच खवळले होते. पण मिस्टर वाघने कोणाच्याच नाराजीला भीक घातली नाही. पोलिसही मिस्टर वाघसोबत असल्याने कोणी काही आवाजही काढला नाही नंतर. 
           सर्व तपास युद्ध पातळीवर चालू होता. कमिशनरना हवी तशी चालढकल करता येणं शक्यच होतं नव्हतं. वरून त्यांच्यावर खूप प्रेशर येत होतं. याच गडबडीमुळे दिनेशच्या बॉडीचा अटॉप्सी रिपोर्ट काही तासांतच सगळ्यांच्या समोर होता.
           यावेळी मिस्टर वाघ कोठे आहे हे कोणालाच माहीत नव्हते. रिपोर्ट त्याला मेल करण्यात आला... 
          दिनेश वय सदतीस वर्षे. त्याच्या शरीरावर खोल असा घाव कुठेच नव्हता. एक छोटा कट त्याच्या डाव्या हातावर होता. ज्यातून भळाभळ रक्त वाहून गेले होते. आणि ओव्हर हेमोरेज (अति रक्तस्रावा) मुळे तो मेला होता. 
          पोलिसांनी दिनेशच्या घरात इंटेरोगेशन केल्यावर त्यांना कळले होते, की दिनेशचा मृत्यू झाला तेव्हा तो एकटाच घरी होता. आणि फळे कापून घेत असताना त्याच्या हातावर घाव झाला होता. घरात जागोजागी पडलेल्या रक्ताच्या डागांवरून हे लक्षात येत होते, की दिनेशने रक्त थांबवण्याचा जमेल तो हरेक प्रयत्न करून पाहिला होता, पण काही उपयोग झालेला नव्हता. शेवटी तो फेंट होऊन देवाऱ्यासमोर पडला होता. त्याने मुठ भरून हळद आपल्या घावात भरली होती. पण रक्त थांबले नव्हते. 
           हे सगळे झाल्यावर दोन - तीन तासांनी दिनेशच्या घरातील लोक जे परगावी देवस्थानी गेले होते, ते परतले. पाहतात, तर दिनेशची ही अवस्था. त्याला लगेच हॉस्पिटलला नेण्याची लगबग - गडबड करण्यात आली होती, पण कुणी एकाने तो संपला असल्याची ग्वाही दिली होती. 
               त्या व्यक्तीला बोलावून घेण्यात आले.
     "तुम्ही कोण आणि दिनेश मेलाय हे तुमच्या लक्षात कसे आले?" 
               आत्तापर्यंत सीबीआय ऑफिसर कार्तिक याने येऊन केस हातात घेतली होती. तो सर्व इन्वेस्टीगेशन रिपोर्ट गठीत केलेल्या समितीसमोर सादर करणार होता. आणि सीबीआय इन्वेस्टीगेशन टीमचा  इंचार्ज होता. आल्या - आल्या त्याच्या टीमला कमिशनर कडून ब्रीफ दिला गेला होता. आणि त्यांनी इथून पुढे केस हाती घेतली होती. पण कमिशनर व त्यांची टीम सुद्धा सोबत काम करणार होती. 
                कार्तिकने त्या व्यक्तीला प्रश्न केला होता. 
        "मी रवी पवार. पुढच्या गल्लीत पाटील दवाखाना आहे तिथे मी कंपौंडर म्हणून काम करतो." 
        "आय सी!"

कमिशनरची केबिन, कार्तिकने सविस्तर सगळे पहायचे म्हणून मिटिंग घेतली होती...
        "दिनेशच्या रक्तात 'वॉरफरीन' नांवाचे मेडिसीन सापडले आहे. ब्लड क्लॉटिंग डिसऑर्डरसाठी हे औषध दिले जाते. असे दिसते, की त्याच्या रक्तात गुठळ्या होत असाव्यात आणि त्यासाठी त्याला हे औषध चालू असावे. त्याने जखम होण्याआधी नुकतेच हे औषध घेतले असावे. म्हणूनच त्याचे रक्त वहायचे थांबले नाही. आणि खूप रक्तस्राव झाल्याने तो मेला." पॅथलॉजिस्टनी दिनेशचा अटॉप्सी रिपोर्ट ब्रीफ केला.
"आता ही ब्लड क्लॉटिंग काय भानगड आहे?" 
मीडिया आणि ह्युमन राईट्सवाल्या लोकांच्या प्रश्नाच्या भडिमाराला नुकतेच तोंड देऊन आलेले कमिशनर वैतागले होते.
"युज्वली ब्लड क्लॉट्स हे फायद्याचेच असते. त्यामुळेच तर जखम झाली, की काही वेळाने आपले रक्त वहायचे थांबते. पण याची गरज नसतानाही जेव्हा रक्ताच्या गुठळ्या व्हायला लागतात, तेव्हा ते धोकादायक ठरते. यामुळे स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक होण्याचा संभव असतो." 
"कमिशनर, दिनेशला असा काही आजार होता का याची चौकशी करा." कार्तिकने फर्मान सोडले.
"नवीन!" कमिशनरनी त्यांच्या कोर्टात आलेला बॉल खाली पडून न देता तसाच नवीनच्या कोर्टमध्ये पोहोचवला.
"येस सर!" म्हणून एक कडक सॅल्युट ठोकून नवीन ही पुढ्यात आलेली नवीन कामगिरी पार पडण्यास निघून गेला.

                नवीन गाडी स्टार्ट करणार इतक्यात,
"शाल आय?" कोणीतरी प्रश्न विचारला.
नवीनने काच खाली करून पाहिले. गाडीबाहेर मिस्टर वाघ उभा होता. नाखुषीनेच नवीनने दार उघडले.
"या बसा."

दोघांनी दिनेशच्या घरच्यांकडे आणि त्यांच्या माहितीनुसार त्यांच्या फॅमिली डॉक्टर मोहन पाटीलकडे चौकशी केली या सगळ्यात त्यांनी रवी पवार या त्याच क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या कंपौंडरला सोबत घेतले.  मोहन पाटीलला ते भेटले, तेव्हा दिनेशला ब्लड क्लॉटिंग डिसऑर्डर असल्याचे नक्की झाले. आणि ही केस मार्गी लागली(?)
               पण आता याला मर्डर म्हणायचे, की अक्सिडेंटल डेथ हे ठरवणे मुश्किल झाले होते. दिनेशच्याच हलगर्जीपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे सध्या तरी याला अक्सिडेंट कन्सिडर करून पुढील इन्वेस्टीगेशन चालू ठेवण्याचे कार्तिकने ठरवले, पण दिनेशची डेडबॉडी त्यांच्या नातेवाईकांकडे न सोपवता मॉर्गमध्येच प्रिजर्व्ह करून ठेवण्यात आली. हा कार्तिकचाच निर्णय होता. 
              ही केसच अशी होती, की कोणाच्या भावना दुखावल्या जातील याचा विचार करत बसणे श्रेयस्कर नव्हते आणि हे कार्तिक जाणून होता. त्याला कुठे तरी अजूनही शंका येत होती, की हा खुनच असावा. आणि जरी नसला, तरी त्याला कोणती रिस्क घ्यायची नव्हती. त्याने स्वतःही मॉर्ग मध्ये जाऊन दिनेशची डेडबॉडी पाहिली होती. त्यालाही काही सस्पिशियस पाहताक्षणी तरी वाटले नव्हते. 
                आणि पुढे आणखी एका मृत्यूची बातमी येऊन थडकली. बाबाराव देसाईंच्याच कुटुंबातली. आणि सर्वांचा मोर्चा त्या घटनेकडे वळला. 
               बाबाराव देसाई यांच्या पणतूची विरेनची आई वारल्या होत्या... बाबारावांची नातसून लीलावती. जीच्यामुळेच त्याने बाबारावांना सांभाळण्यास नकार दिला होता. 
              मधल्या काळात मिस्टर वाघ चौकशीसाठी यांच्याकडे आला होता. त्याच्या कडूनच ही बातमी पोलिसांपर्यंत पोहोचली होती. 
             मिस्टर वाघला कार्तिक, कमिशनर आणि त्यांची इन्वेस्टीगेशन टीम हॉस्पिटलला भेटले. न्यूरो सर्जरी हॉस्पिटल होते ते. हॉस्पिटलच्या चीफ सर्जनला भेटल्यावर त्यांना लीलावतीबाईंची केस हिस्ट्री समजली. तो पर्यंत विरेनला स्टँडबाय ठेवले होते. त्याच्या सोबत वाघ आणि एक सीबीआय ऑफिसर होते. वाघ विरेनकडे पाहून स्मित करत होता. विरेनला त्याचे असे पाहणे असह्य झाले आणि त्याने खाली मान घातली. 

             विरेनचे वडील रमाकांत मेल्यावर त्याचा लीलावतीबाईंना खूप मोठा धक्का बसला होता. या इमोशनल ट्रोमामुळेच त्यांच्या मेंदूत कळ मारायला सुरू झाली. ती इतकी विकोपाला गेली, की त्यांना या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. 
             त्यांना ब्रेन कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. थर्ड स्टेज. अगदीच नाजूक. तरी सर्जन्सनी त्यांना ऑपरेट केले होते. सर्जरी सक्सेसफुल झाली होती. पण त्या रिकव्हर होत नव्हत्या. त्यांना मेंदूत 'एनाप्लॅस्टिक एस्ट्रोसिटोमस' नांवाचा ट्युमर झाला होता. हा ट्युमर बरा होणारा नाही. तो वाढतच राहतो. पण सर्जरी, किमोथेरपी (केमिकल मेडिकेशन) किंवा रेडिएशनच्या ट्रीटमेंटने याला आटोक्यात ठेवता येते. 
            ऑपरेशन झाल्या नंतरही गेली दोन महिने त्या व्हेंटिलेटरवरच होत्या. ऑपरेशन ठीक झाल्याने व इतर ट्रीटमेंट्सही चालू असल्याने त्या जगतील वाचतील, बऱ्या होतील या आशेवर विरेन होता, पण तसे काहीच होत नव्हते. शेवटी व्ह्यायचे ते झाले होते. 

            विरेनची चौकशी चालू झाली. त्याला व त्याच्या बायकोला सर्जनच्या केबिनमध्येच बोलावून घेतले होते. त्याची बायको रमा तर रडून अर्धमेली झाली होती. सासूचे असे जाणे तिला धक्का देऊन गेल्याचे दिसत होते. तिचे आई - वडील व बाकीचे नातेवाईक एव्हाना हॉस्पिटलमध्ये जमा झाले होते. 
             विरेन कडून माहिती मिळाली, की रमाकांत त्याचे वडील जाण्याच्या आधीपासून त्याच्या आईच्या लीलावतीबाईंच्या डोक्यात कळ मारायला चालू झाली होती. पुढे तर उलट्याही. पण त्यांनी किरकोळ काही तरी असेल म्हणून लक्ष दिले नव्हते. डोकेदुखीच्या, पित्ताच्या गोळ्या घेऊन त्या आपले दुखणे तात्पुरते बरे करायच्या. आणि इतके गंभीर काही असेल असा कोणाला अंदाजच आला नव्हता, कारण लीलावतीबाईंना ऍसिडिटीचा त्रास होता व त्यामुळे सतत डोके दुखत असेल, उलटीचा त्रास होत असेल म्हणून कोणीच आणि त्यांनीही लक्ष दिले नव्हते. बऱ्याचदा त्या गोष्टी विसरायच्या, त्यांची नजर कमजोर झाली होती, त्यांना कोऑर्डीनेशन करणे अवघड जायचे व स्वतःचा तोल संभाळणेही त्यांना शक्य व्हायचे नाही. पण हे सगळं वय परत्वे होत असेल असेच सर्वांना वाटले होते. खरे तर ही एस्ट्रोसिटोमाची लक्षणे होती. ज्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले होते. 
             रमाकांत वारल्याच्या धक्क्याने जेव्हा लीलावतीबाई घेरी येऊन पडल्या, तेव्हा एका क्लिनिकमध्ये नेल्यावर तेथील डॉक्टरला काही शंका आली आणि त्याने लिलावतीबाईंचे एमआरआय स्कॅन करण्याचे रेकमेंड केल्यानंतर ते या हॉस्पिटलला आले होते. स्कॅनिंगनंतर त्यांना एनाप्लॅस्टिक एस्ट्रोसिटोमस असल्याचे निदर्शनास आले होते. 

            एस्ट्रोसिटोमा हा ग्रेड थ्री ब्रेन ट्युमर आहे जो सेरेब्रेम (सेंट्रल नर्व्हस सिस्टीमचा सर्वात वरचा भाग) मधील ताऱ्याच्या आकाराच्या ग्लियल सेल्समध्ये तयार होते, ज्याला एस्ट्रॉसाइट्स म्हणतात. हे ब्रेन (मेंदू) व स्पाईनल कॉर्ड (पाठीचा कणा) मध्ये स्थित असते. हे नर्व्हस टिशूजना न्यूट्रिशन पोहोचवण्याचे काम करते व ब्रेन व स्पाईनल कॉर्डवर होणारे मोठे आघात रिपेयर करण्याचेही काम करते. २० - ४०% एस्ट्रॉसाइट्सचा भाग हा ग्लियाने प्रमाणित असतो. ग्लियाला सेंट्रल नर्व्हस सिस्टीमचा ग्लू म्हंटले जाते. हे व्हाईट मॅटर (यात इलेक्ट्रिक इम्पल्सचे वाहक नर्व सेल बॉडीज किंवा न्यूरॉन असतात. हे ग्रे मॅटर चे विविध भाग कनेक्ट करायचे काम करते व हे कण्याच्या आतील बाजूस असते) आणि ग्रे मॅटर (यात नर्व फायबर्स किंवा एक्सॉन असते. विविध न्यूरॉन्स, स्नायू व ग्रंथींना माहीत पुरवण्याचे काम हे करते व हे कण्याच्या बाहेरील बाजूस असते) या दोन्ही टिशूज् मध्ये असते. सेंट्रल नर्व्हस सिस्टीम या दोन टिशूज् पासून बनलेली असते. 
            एनाप्लॅस्टिक एस्ट्रोसिटोमस हा ग्रेड थ्री एस्ट्रोसिटोमा (हाय ग्रेड एस्ट्रोसिटोमा) आहे. ग्रेड तीन व चारचे एस्ट्रोसिटोमस हे वेगाने वाढणारे व अति घातक असतात. त्यामुळे ते कॅन्सरस असतात. आणि म्हणूनच क्युरेबल नसतात. 

             विरेनच्या वागण्यातून दिसून येत होते, की त्याला अतीव दुःख झाले आहे. 
             इन्वेस्टीगेशन केल्यावर समजले, की लिलावतीबाईंचे व्हेंटिलेटर कुणी तरी बंद केले होते. त्या कोमात असल्याने साहजिकच हे कोणाला लवकर समजले नाही. आणि कळले तेव्हा खूप उशीर झाला होता. 
           जनरल आयसीयू मधील व सोबत हॉस्पिटल मधील सर्व एक अन् एक सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले. संशयास्पद असे काहीच आपडले नाही. मिस्टर वाघ तेवढा हरेक फुटेज मध्ये वारंवार दिसत होता. कार्तिकला त्यामुळे मिस्टर वाघवरच संशय आला. म्हणून आत्तापर्यंत गप्प असलेला व लीलावतीबाईंच्या इन्वेस्टीगेशनमध्ये भाग न घेतलेला मिस्टर वाघ मौन तोडून बोलला. त्याने जनरल आयसीयूचे रात्री एक वाजून छत्तीस मिनिटांचे फुटेज रन करायला सांगितले. 
            यात विरेन व्हेंटिलेशनपाशी कॅमेऱ्याकडे पाठ करून उभा असलेला दिसत होता. काही सेकंदात तो त्याच्या डाव्या बाजूला आईकडे वळला आणि तो पाणी पीत असताना दिसला. 
"हा नक्की काय प्रुव्ह करण्याचा प्रयत्न करतोय? नीट बघा तो जाणून बुजून आपण पाणी पीत असल्याचे दाखवतोय. झुम ऑन द व्हेंटिलेटशन मशीन. त्याचे स्वीट्च विरेन पाणी घेण्याआधी ऑन होते आणि तो पाणी पिताना बंद आहे. आता काय प्रश्न विचारायचे ते विरेनला विचारा. मला नाही!" मिस्टर वाघने कार्तिकला दटावले. त्याच्या तीक्ष्ण नजरेची व सावधगिरीचे हे दर्शन होते. 

     मिस्टर वाघच्या तीक्ष्ण नजरेतून ही सुक्ष्म गोष्ट सुटली नव्हती. त्याला विरेनवर आधीपासूनच शंका आली होती. त्याने पूर्वी केलेल्या विरेनच्या चौकशी मध्ये कधी तरी चुकून विरेन आई लवकर गेली तर बरे होईल असे बोलून गेला होता. आणि म्हणूनच लिलावतीबाईं मेल्यानंतर मिस्टर वाघ विरेनकडे पाहून सतत स्मित करत होता. 

             कार्तिकचा एकच सणसणीत हात विरेनच्या कानाखाली पडल्यावर विरेनचा धीर सुटला आणि तो सगळी गुपिते फोडू लागला...
"आईच्या ऑपरेशनसाठी आणि आता तिच्या ट्रीटमेंटसाठी खुळ्यासारखा पैसा वाया गेला होता. मी एक साधारण माणूस तीस हजाराच्या नोकरीत काय काय बघणार होतो. जे काय होतं ते सगळं तर ट्रिटमेंटसाठी विकून बसलो. वरून काही कर्जही झाले. आता असह्य झालं होतं. कुठून आणणार होतो मी पैसे?" विरेन हमसून रडत रडत सगळं कथित करत होता.
     त्याची बायकोही हुंदके देतच होती. कदाचित हा सगळा प्रकार तिला आधीपासून माहीत असावा. कारण मिस्टर वाघला तिच्या रडण्यात काळजी मात्र वेगळ्याच गोष्टीची वाटत असल्याचे जाणवून गेले होते. 
"अरे मग डॉक्टरना सांगून रीतसर तू व्हेंटिलेटर काढू शकत होतास. त्यासाठी हे करण्याची काय गरज होती?" 
हे ऐकून कार्तिकच्या डोक्यात तिडीक गेली होती. तो विरेनवर ओरडला आणि त्याच तिरिमिरीत त्याने आणखी चार - पाचदा विरेनला कांफडवले.
       विरेन खाली कोसळला. त्याची बायको रमा त्याला सावरण्यासाठी पुढे सरसावली. पण कार्तिकच्या इशाऱ्यावर एका लेडी ऑफिसरने तिला बाजूला ओढले. तिचा आक्रोश काही कमी झाली नाही. ती लेडी ऑफिसरच्या कचाट्यातून सुटण्याचा प्रयत्न करत होती. लेडी ऑफिसरची पकड इतकी मजबूत होती, की तिचा तो प्रयत्न फोल ठरला. 
       कार्तिकने तिच्या रडण्याला काहीच भीक घातली नाही. त्याने एका ऑफिसरला इशारा केला. त्या ऑफिसरने पुढे होऊन विरेनला उभा केला. विरेन त्याचा आधार मिळूनही धडपडतच होता. तो नीट स्थिर झाल्यावर कार्तिकने एक जोरदार ठोसा त्याच्या पोटात लगावला.
"बोल साल्या!" कार्तिक ओरडला.
        हे सगळं हॉस्पिटलमध्येच चालू होते. पण कार्तिकला थांबवण्याचे धाडस त्याच्या क्रूर चेहऱ्याकडे पाहून कोणीच करत नव्हते.
"मी... मी... बऱ्याचदा..." विरेनला बोलण्याशिवाय गत्यंतर नव्हते. तशा परिस्थितीतही तो सांगू लागला,
"डॉक्टरना याबद्दल वारंवार सांगण्याचा... सांगण्याचा प्रयत्न केला. पण... पण त्यांचे म्हणणे होते, की... की तुमचे म्हणणे आम्ही मान्य करू. पण मग... मग तुमच्या आईला घरी... घरी काही झाले, तर... तर आम्ही ती जबाबदारी घेत नाही... त्यामुळे तुम्हाला डेथ सर्टिफिकेटसाठी आमच्याकडून कसलीच... कसलीच मदत होणार नाही... आणि डेथ सर्टिफिकेट तर... डॉक्टरांच्या... डॉक्टरांच्या सर्टिफिकेट शिवाय डेथ सर्टिफिकेट गव्हर्नमेंट इशू करत... करत नाही. आणि आईचे इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी मला... मला तिच्या डेथ सर्टिफिकेटची गरज होती... होती... म्हणून... म्हणून मला हे... करावे... करावे लागले..." 
       विरेन जसा जसा सारा खुलासा करत होता, तसे तसे कार्तिकच्या डोक्याची शीर तट्ट फुगत होती.
"मला... मला ठाऊक होते. पणजोबांच्या खुनाचा तपास चालू असल्याने माझे हे असे करणे खूप रिस्की आहे, पण माझ्याकडचे पैसेही संपले होते. माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नव्हता. कर्जाचा बोजा वाढत होता. व्हेंटिलेटर बंद होणे ही हॉस्पिटलचा हलगर्जीपणा आहे असा कांगावा करून यांच्याकडून हवी ती रक्कम उकळणे व डॉक्टरचे ओथेन्टीक सर्टिफिकेट सुद्धा मिळवणे हा माझा प्रयत्न होता..."
      विरेनचा हा प्लॅन कदाचित यशस्वी झाला देखील असता, जर मिस्टर वाघ तिथे पहिल्यापासून उपस्थित नसता तर... आपल्या हॉस्पिटलचे रेप्युटशन जपण्यासाठी हे प्रकरण दाबण्याचा हॉस्पिटलने पुरेपूर प्रयत्न केला असता. आणि विरेन हॉस्पिटलकडून पैसे उकळण्यात यशस्वी झाला असता.
      विरेनचे हे स्पष्टीकरण ऐकून तर कार्तिकचे डोकेच फिरले. त्याच मेंटल अनकॉन्शियसनेसमध्ये त्याने जोरदार ठोसा विरेनच्या जबड्यावर मारला. विरेनचा जबडा डिसलोकेट झाला. तो जोरात जमिनीवर आदळला आणि त्याच्या तोंडातून भळाभळा रक्त वाहू लागले. त्याला धरलेला ऑफिसरही भेलकांडे खात दूर जाऊन आदळला. आता पर्यंत रडत असलेली रमा हे दृश्य पाहून लेडी ऑफिसरच्या हातातच बेशुद्ध झाली. पण आता मात्र इतका वेळ शांत असलेले इतर ऑफिसर्स आणि कमिशनर कार्तिकला सावरून बाहेर घेऊन गेले. मिस्टर वाघ मात्र तेथेच उभा होता. विरेनला ट्रीटमेंटसाठी घेऊन जाताना पहात. रमालाही दुसऱ्या स्ट्रेचरवर टाकून तेथून नेण्यात आले.
       या भयानक कॉन्स्पिरसीमधील एक केस तरी सॉल्व्ह झाली होती. मार्गी लागली होती. आणि तीही मिस्टर वाघमुळे!
      पण हे प्रकरण एवढ्यावर थांबणारं नक्कीच नव्हते...