मध्यरात्रीच्या वेळी अचानक तलवारीचा खणखणाट वाजू लागला,
कोणाला काही समजेल ह्याच्या आधी तंबूच्या कणाती कापून काहीजण घोड्यावर स्वार झाले, त्याच्या मागे काही लोक पाठलागाला सुटले,
लोकांची दिशाभूल करण्यासाठी
जाता जाता घोडेस्वारांनी तंबूला आगी लावल्या होत्या,
गनीम आया, गनीम आया, भागो पकडो असे सगळीकडे वातावरण झाले होते,
ह्या वातावरणात सगळीकडे गदारोळ माजला होता,
काय झाले अन काही नाही असे कोणाला काही समजायला मार्ग नव्हता,
कमरेला तलवार एक हातात घोड्याचा लगाम धरून घोडेस्वार तुफान वेगाने सह्याद्रीच्या कडेकपारावरून दौडत निघाला होता, सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळलेला असा तो मर्द गडी होता. एका नजरेत सावज गाठणारा
पण आज जसे त्याच्या मागे वाघ लागला आहे असा तो पळत होता
त्याचे साथीदार तर कधीच मागे पडले होते,
ना त्याला श्वास घ्यायला फुरसत होती ना मागे
वळून पाहायला,
त्याच्या चेहरा घामाने कमी अन रक्ताच्या धारांनी सजला होता,
डोक्याला लागलेला वार कधी झाला हे त्याला पण माहित नसावे एक डोळा तर कधीचा जायबंदी झाला होता.
कपाळावरचे रक्त तर कधीच सुकून गेले होते,
एक हात त्याचा कधीचा निकामा झाला होता, कमरेचा शेला त्याने हाताभोवती गुंडाळला होता, पांढराशुभ्र शेला रक्ताने लाल झाला होता,
हातातले रक्त कमरेपासून पायावर अन पायापासून जमिनीवर सांडत होते जसे पाण्याच्या हंड्याला छिद्र पडले होते आणि त्यातून संथधार येते तसे रक्त येत होते.
त्याचा घोडा तर असा बेफाम पळत होता की पून्हा त्याला जन्म मिळणार नाही,
कदाचित घोड्याला त्याच्या धन्याची काळजी होती
अन गणाला त्याच्या धन्याची म्हणजे त्याच्या राजाची ओढ लागली होती,
कसेही करून ह्या स्वाराला आपल्या धन्याला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना निरोप द्यायचा होता,
कि गनीम स्वराज्याच्या जवळ आला आहे, आपल्याला कमालीची शर्थ करावी लागेल शत्रू प्रबळ होता, अन स्वराज्याला खुप मोठा असा धोका होता.
तो एकटाच उरला होता बाकी त्याचे साथीदार स्वराज्याच्या
कामी आले होते, ते वीरगतीला प्राप्त झाले होते. एकटा गणा उरला होता,
भगवी पताका आता त्याच्या शिरावर होती
त्याला लवकरात लवकर हि कामगिरी पार पाडायची होती त्याशिवाय तो मृत्यूला हि जवळ येऊ देणार नव्हता,
गेले पंधरा दिवस गनिमाच्या टोळीत राहून गणाने खडानखडा माहिती मिळवली होती,
किती सैनिक येत आहेत कधी पर्यत येत आहे रसद पुरवठा कसा आहे सगळ्या गोष्टी माहिती करून घेतल्या ,
पण शेवटच्या क्षणी झालेल्या चुकीमुळे त्याचे भांडे फुटले,
दुश्मन सैनिकाच्या तलवारीच्या एका घावाने गणा जखमी झाला
पण शूर गणाने जखमी अवस्थेमध्ये असा वार केला की दुश्मन सैनिक एका वारात यमसदनी गेला,
गणा म्हणजे एक चपळ वारा सहजासहजी न हाती लागणारा ,
सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात वाढलेला एक असा धीप्पाड मल्ल होता,
जेवायला बसला तर त्याला बारा भाकरी दोन लिटर दूध
वीस अंडे असा त्याचा आहार होता,
पण आज त्याला जेवणाची काय पाणी पिण्याची हि उसंत नव्हती
त्याच्या डोळ्यात फक्त रायगड दिसत होता,
छत्रपती शिवाजी महाराजांना एक अती महत्वाचा संदेश पोहचायला होता,
त्याचा कडे शत्रू बद्दल माहिती अन एक गुप्त संदेश होता त्याला तो कोणत्याही परिस्थितीत तो पोहवायचा होता,
दिवस सरत आला होता तरी अजून रायगड बारा कोस राहिला होता,
एकदा का सूर्य मावळला की रायगडाचे दरवाजे बंद झाले का मग स्वतःहा राजे आले तरी उघडत नसे,
गणाला फक्त दरवाजा बंद व्हायच्या आत रायगडावर पोहचायचे होते संदेश उशीरा जर मिळाला तर संकट स्वराज्याच्या जवळ अगदी जवळ येऊन ठेपेलेले असेल
ह्याची त्याला जाणीव होती,
त्याने घोडदौड अशीच चालू ठेवली होती कधीही सूर्य मावळणार होता.
दरवाज्या बंद होण्याच्या आधी काही वेळ एक तोफेचा बार केला जाई म्हणजे आता दरवाजा बंद होणार अशी माहितीवजा ती सूचना होती,
त्या आवाजा नंतर एक दोन घटकेचा काळ लोटला कि रायगड किल्ला बंद होत असे त्यानंतर तो सकाळी उजाडल्या शिवाय उघडत नसे,
गणाला असे वाटत होते की मनोगती यावी अन क्षणात महाराजांना पुढे उभे राहावे पण नियतीपुढे तो बेहाल होता,
त्याच्या कष्टाची आणी स्वामिभक्तीचि आज परीक्षा होती,
तो त्याच्या देवाला हेच गाऱ्हाणे घालत होता कि माझा संदेश महाराजांच्या चरणी पोहोच व्हावा. मग देह पडला तरी चालेल, पण तोपर्यंत तरी काही श्वास मला दे उधार
ही चलबिचल चालू असताना त्याच्या कानावर तोंफांचा आवाज आला. अन आता औंदाघटकेत गडाचे दरवाजे बंद होणार,
तोफांचा आवाज ऐकताच त्याने घोड्यावर प्रेमळ थाप मारली अन त्या घोड्याला बोलला कि आज जर उशीर झाला ना तर आपल्याला जिवंत राहून पण उपयोग होणार नाही,
आज धर चाल गड्या वाऱ्याची पोहचव मला रायगडी
तरच फडकलेला भगवा दिसेल शिरावरी,
हे शब्द ऐकतच नवल घडले घोडा वाऱ्याच्या गतीने पुन्हा धाव घेऊ लागला होता.
आता तर गणाच्या शरीरातले रक्त येणे हि बंद झाले होते,
किवा म्हणा संपले होते पण गणासाठी स्वामिभक्ती जीवनापेक्षा श्रेष्ठ होती.
तोफांचा आवाज आल्यापासुन एक एक क्षण त्याला वर्षा सारखा भासत होता, अन अंतर काही संपत नव्हते.
पण त्याचे दुर्दैव म्हणजे तो गडाच्या दारापर्यंत पोहचू पर्यत गडाचे दरवाजे बंद झाले होते, अन जवळजवळ त्याच्या पुढचे सगळे मार्ग बंद झाले होते, आता काही जरी झाले तरी दरवाजे सकाळ पर्यंत उघडणारे नव्हते स्वताः राजांना हा दंडक होता. अश्या परीस्थितीत सकाळ पर्यंत तग धरणे मुश्कील होते, जसा वेळ जात होता तशी गणाच्या डोळ्यासमोर अंधारी यायला सुरवात झाली होती.
इतक्या मुश्किलीने आपण जीवाची बाजी लावत आलो पण आता ह्या सगळ्या गोष्टीचा काही उपयोग नाही ह्या कल्पनेने त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
घोड्याच्या तोंडाला फेस येऊन सुकून पण गेला होता, कमाल म्हणावी लागेल त्या घोड्याची त्यानेही गणाप्रती आपली स्वामी भक्ती सिद्ध केली होती. त्याने एकदा गणाकडे पहिले अन आपला देहातून एक ज्योत निघून आसमंतात सामावली गेली, आपल्या अश्वाने प्राण सोडला ह्या गोष्टीचे गणाला कमालीचे दुखः झाले पण त्याने मरताना आपली स्वामीनिष्ठा सिद्ध केली होती पण आपल्या कडून ते देखील होणार नाही हे त्याला कळून चुकले होते.
त्याला माहित होते आता काही उपयोग नाहीये ती त्याने शेवटचा पर्याय म्हणून गडाच्या दरवाज्यातून आवाज देऊन पहिला पण त्यांना काहीच उत्तर आले नाही.
आता त्याला समजत नव्हते कि हा संदेश मी कसा पोहच करू कोणाकडे तो संदेश देणे शक्य नव्हते गणा तो संदेश फक्त महाराजांना देणार होता.
की करावे ह्या विवंचनेत असताना त्याची सहज नजर एका मोठ्या झाडाकडे गेली, त्याने विचार न करता आपल्या घोड्याचा लगाम सोडून हाती घेतला अन त्या झाडावर सरसर चढून गेला.एक हात अन डोळा जायबंदी झाला असताना त्याने एवढे मोठे धाडस केले.
त्याने त्या झाडावरून दोरीच्या सहाय्याने उडी मारली ती थेट बुरुजावरून तो गडा मध्ये कोसळला, ते पाहून सगळे एका क्षणात त्याच्या भोवती तलवारी अन भाले उगारून मावळे उभे राहिले. त्याने आपल्या कपड्यात लपवलेली मुद्रा काढून दिली अन राजांना बोलवा असा एक शब्द त्याच्या मुखातून आला. तो एक गुप्तहेर आहे असे समजल्यावर महाराजांना वर्दी देण्यात आली.
एक मावळ्याला महाराजांना बोलवण्या साठी पाठवण्यात आले. महाराज आपल्या शयनगृहात बसले होते मावळा
परवानगी घेऊन आत गेला.
अन गुप्तहेर आला आहे आपण चलावे त्याची हालत खूप गंभीर आहे. महाराज तसेच लगोलग बाहेर आले
महाराजांना येताना पाहून गणा कसाबसा मुजरा करायला उभा राहिला, त्याची हालत पाहून महारांजाना गहीवरून आले.
महाराजांनी गणाला प्रेमपूर्वक मिठी मारली गणाला ह्यातच सगळे शर्थ झाले.
त्याला जणू आपल्या जायबंदी झालेल्या शरीराचा जणू विसर पडला होता, त्याने वेळ न दवडता आपल्या जवळचा गुप्त संदेश महाराजांकडे दिला,
जसा तो संदेश महाराजाचरणी अर्पण झाला तसा गणाच्या देहातून प्राण सोडला, गणाच्या चेहऱ्यावर काम फत्ते केल्याचे समाधान तरळत होते.
महाराजांना गणाच्या मृत्युचे फार वाईट वाटले,
महाराजांना गणाची स्वामिभक्ती खूप भावली
गणाच्या माहितीच्या आधारे महाराजांनी स्वराज्यावर आलेले संकट वेळेवर तर टळलेच याउलट मावळ्यांनी दुश्मन सैनिकाच्या टोळ्याचा बंदोबस्त करून खूप मोठी सोन्याचांदीची लूट मिळवली. त्याच्या सोबत अरबी घोडे, हत्यारे असा लाखो रुपयाचा ऐवज मिळवला.
गणाच्या कामगिरीवर खुश होऊन महाराजांनी गणाच्या कुटुंबियांना जहागिरी देऊन त्याचा योग्य असा सन्मान केला.
अन पुढील पिढीसाठी गणाच्या शोर्याच्या सन्मानार्थ एक मोठे स्मारक बांधले गेले
त्यावर असे लिहिलेले होते
“स्वराज्याचा शूर मावळला”
“त्याने मातीसाठी देह ठेवला”
आज हि जेव्हा केव्हा कोणी मावळा शिवाजी महाराजांना संदेश घेऊन सह्याद्रीच्या काडेकपारातून जात असतो तेव्हा तेव्हा गणाचा आत्मा त्याची सुरक्षा करत असतो.
धन्यवाद
हि एक काल्पनिक कथा असून केवळ मनोरंजनासाठी केली आहे.