Shabdgandh in Marathi Poems by Sonal Sunanda Shreedhar books and stories PDF | शब्दगंध - कविता

Featured Books
Categories
Share

शब्दगंध - कविता

नमस्कार! मी सोनल सुनंदा श्रीधर. 
मी अनेक कविता लिहिलेल्या आहेत. काल केलेल्या काव्यरचना आज आपल्या पुढ्यात वाचायला आणत आहे आशा करते, माझ्या कविता आपणास आवडतील.
आपल्या प्रतिक्रिया कळवा.
काही सुधारणा सुचवायच्या असेल तर आपले स्वागत आहे. 
आपण मला instagram वर ही follow करू शकता. 
धन्यवाद. 

YouTube वर ही मी आज एक पोस्ट केलेला video आपण like, share, comment करू शकता. 



======================================
1) क्षण
--------
हिंदोळ्यावर झुलते 
मन कसे हे फुलते ग

क्षणाक्षणाला भलते 
उंच उंच उडते ग

स्वप्नांसवे फिरते 
गाणे वेडे गुणगुणते ग

क्षण ते प्रेमाचे मनास 
फुलपाखरू होऊन रंगते ग
---------
सोनल सुनंदा श्रीधर 
======================================
2) जिद्द 
----------
उराशी बांधून गाठोडी 
जिद्द निघाली ध्येयवेडी 

पाऊलवाट सोडून गेली
नव्या वाटा शोधून आली

शिखरावर पोहचण्यासाठी 
जिद्दीने निघाली ध्येयवेडी 

काटे सारे तुडवत ती
पाठीवरची थाप झाली 

बाबाच्या आशेवर ती
स्वप्नांची कात झाली

आईच्या कष्टाची ती 
तेवणारी वात झाली
----------
सोनल सुनंदा श्रीधर
======================================

3) विश्वास
-----------
किती देऊ पुरावे 
तुला जपण्याचे 
का नसे विश्वास  
माझ्या झुरणाचे

खरेखुरे मरावे
तुझ्या प्रेमापोटी
सांग कितीदा 
मरावे तुझ्यासाठी

कसा देऊ विश्वास
तुला जिंकण्याचा
नको आता भास
तु माझा असल्याचा
-----------
सोनल सुनंदा श्रीधर
======================================

4) ज्ञानदा 
-----------
भेटलो नाही मात्र
बोलुन भास झाला 

ज्ञानदा तु माझाच
संत ज्ञानेश्वर झाला 

कितीदा रे ज्ञानेश्वरी
तुझ्या मुखी ऐकावी

टाळात कुटुनी ध्यान  
तुझ्या पायी झुकावी
-----------
सोनल सुनंदा श्रीधर 
======================================

5) आठवण
--------
काढ आठवण 
व्याकुळता मन 
कर एक फोन
बोल शब्द दोन

जरी आजकाल 
व्यस्त असल्याने 
बोलने नाही झाले
मनास दे धीर 

खचून नको जाऊ 
काढ आठवण 
फुलेल चेहरा 
जुने आठवून 
-----------
सोनल सुनंदा श्रीधर 
======================================

6) मैना
----------
झाडावरती बसून मैना
गाणे बावरे गात होती

तांबडा सुर्य हिरवा डोंगर 
कुतूहलाने पाहत होती

रान मोकळे जागताना 
हर्षभराने न्याहाळत होती
 
पानाफुलातुन फिरताफिरता 
मैना बावरून पाहत होती
----------
सोनल सुनंदा श्रीधर
======================================

7)  छंद
----------
जोपासता छंद
बालपण आठवे

चित्रे, कात्रणे 
वह्यात सापडे

कागदाची नाव
पाण्यात बुडवी 

भातुकली माझी 
बालपण जगवी

उगाच झाले मोठी 
बालपण भारी होते

कट्टी बट्टी नंतर ही
ओठी हसू होते
--------
सोनल सुनंदा श्रीधर
======================================

8) तो क्षण 
------------
उंबरठा ओलांडून 
जाताना दूरदेशी 
मायेचा तो क्षण
जपून ठेवला उराशी 

हसणे, खेळणे माझे 
उंबरठ्यावर सोडून आले
त्या घरची लेक मी
या घरची लक्ष्मी झाले

नात्यांची झालर नवी
डोईवरती सजवून गेले
बाबाची लाडकी होते 
आठवून कंठ दाटून आले 
------------
सोनल सुनंदा श्रीधर
======================================

9)  वेल
-----------
नात्यांची ती वेल उगवली
विश्वासाने पुढे चल

फुलेल ती पानोपानी 
आधार थोडा देऊन बघ

वाकली जरी
झुकली जरी
मदतीने भरून घे 

तुझ्यातल्या वेलीला
नवे बळ देऊन बघ 

बहरून येता कर्तव्याने
तु ही थोडं हसून चल

आत्मविश्वास जागेल जेव्हा 
जग जिंकून आभाळात डोकून बघ
----------
सोनल सुनंदा श्रीधर
======================================

10)  आयुष्य 
--------------
तळहातावरच्या फोडासारखे 
जपतो लेकराला 
दुखही लपवतो लेकरासाठी
बाप म्हणती तयाला

फाटका पदर जरी 
मायेन हात फिरवी 
तिच्या कष्टाची जादूगरी 
जीवापाड जपा आईला तरी

आईवडिलांच आयुष्य 
त्यांनी तुमच्यासाठी गमावलं 
दुष्काळात ही लेकरांना 
मायेन वाढवलं 

थोडी तरी जाणं 
तुम्हाला राहु द्या 
शिळी का होईना 
पोटभर खाऊ द्या 
---------------
सोनल सुनंदा श्रीधर
======================================

11) प्रेम 
------------
काजळाने काळजात 
बघा ठाव घेतला 
काळजीने मनाचा 
असा घाव घातला 

प्रेम झाले वेडेपिसे 
काळजाने दावा ठोकला
काजळाच्या रेषेखाली
प्रेमाने संसार थाटला

नटलेल्या संसाराची 
कहानी तशी जुनी झाली
थकलेली प्रेमिका 
मनाने तरूण राहिली 
--------------
सोनल सुनंदा श्रीधर 
======================================

12) हरवलेला माणूस 
----------------
सोशल दुनियेत गुरफटलाय रे माणूस 
हळुहळू वास्तवातून हरवलाय माणूस 

मुखवटे न्यारे न्यारे चढवून आहे 
जिवनाचा प्रवास सारा दडपून आहे 

नव्या तंत्रज्ञानाने संवेदना हरवल्या 
माणूसपणाच्या खाणाखुणा विखूरल्या

सांगावे कधी कुठे कशी अब्रू लुटली जाते
माणसातल्या घृणत्वाला काय शिक्षा होते? 

अरे लाचारी लपवताना नाकी नऊ येती 
काळजाची कातडी भाकरी साठी रडती

पोटाच खळगी भरेल का फुटपाथवर 
महागाईचे लाड संपतील का क्षणभर?
-------------------
सोनल सुनंदा श्रीधर
======================================