T. V. Serial in Marathi Magazine by Sadhana v. kaspate books and stories PDF | टि. व्ही. सिरियल...

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

टि. व्ही. सिरियल...

टि. व्ही. सिरियल...

एका विदेशी मैञिणी सोबत चँटिंग सुरु होती. आमच्या गप्पांचे विषय नेहमी सामाजीक असतात. आजही तेच चालू होते. मी तिला सहज विचारले , तुमच्या काही चांगल्या टि.व्ही. सिरियलची नावे सुचव ना.. फार बोअर होत आहे. त्यावर तिने मला एक लिस्ट दिली. मी खुश झाले. त्यावर तिने मला विचारल, तुमच्या काही हिंदी सिरियलची नावे सुचव ना..! आणि मी बुचकळ्यातच पडले. कारण ; माझ्या डोळ्यासमोर अनेक सिरियल तरळू लागल्या , ज्यात मेकअपचा भडिमार , भावनांचा उद्रेक , नात्यांची अव्हेलना , सुडाच्या भावनेत जळणारे नायक , नायिका, आणि धाडधाड वाजणारं तबला म्युझीक ठासुन भरलेल आहे. आपल्याकडील ९९% मालिका प्रेमकथेवरच आधारीत असतात. प्रत्येक सिरियलचा फाँरमँट ठरलेला असतो. सिरियलचा पहिला एक महिना सोडला तर , पुढे बघण्यासारख काहीच नसत. तरीही ती सिरियल आपले निर्माते ७-८ वर्षे आरामात चालवू शकतात. विशेष म्हणजे पुढे काय होणार हे अगदी न शिकलेला माणुस ही अंदाज बांधु शकतो. बर्याच सिरियलची वन लाइन चांगली असते पण ; तिच्या पटकथेचा पत्ताच नसतो. त्यामुळे मालिका शेवटपर्यंत तग धरत नाहीत.

आपल्या सिरियल मधील स्ञियांना काहीच काम नसते. भडक मेकअप करुन त्या चार भितींच्या आतच एकमेकींबद्दल षडयंञ करत बसलेल्या असतात. दिवसा , राञी, आणि अगदी झोपेतुन उठल्यावरही यांचा मेकअप सारखाच असतो. सर्व मेन नायिका अतिशय सुंदर , नाजुक , सोशिक , कधीही न उलट बोलणार्या , सहनशक्तीचा अंत सहन करणाऱ्या , मुळूमुळू रडणार्या , आणि खुप जास्त चांगल्या स्वभावाच्या असतात. सिरियलच्या २२ मिनीटाच्या एपीसोड मधील १० मिनीटाचे डायलाँग तर ह्या मनातच स्वतःशी बोलत असतात. पुर्ण एपिसोड मध्ये एखादाच सिन महत्त्वाचा असु शकतो आणि तोही सर्वात शेवटी म्हणजे तिसऱ्या भागात शेवटच्या मिनीटाला अर्धवट दाखवला जातो आणि सिरियल संपते. त्यापुर्वी पहिल्या भागापासुन तो सिन हायलाइट करुन दाखवतात ' हे पहा ब्रेक नंतर..' आणि हो असा महत्त्वाचा एपिसोड शुक्रवारी च असतो आणि ऐनवेळी संपवला जातो. प्रेक्षकांना सोमवार पर्यंत ताटकळत ठेवल जातं.

आपल्या सिरियल मध्ये एक नायक- नायिका कमीत ३-४ वेळा लग्न करतात. हिरोचे प्रेम नायिकेवर असते पण; त्याच्यावर प्रेम करणाऱ्या दुसर्याच दोघी असतात आणि त्या मिळुन नायिकेच्या विरोधात प्लँन करत राहतात. आपल्या नायिका मिनीटा मिनीटाला तोल जावुन पडतात आणि हिरो त्यांना पकडतात. मग ते एकमेकांच्या डोळ्यात किमान १० मिनीट पाहत राहतात. बँकग्राउंडला लेटेस्ट मुव्हीच गाण सुरु असत. नायिका प्रेग्नेंट असल्यावर , रिअल मधील वर्ष संपुन जात तरी रिल मध्ये नायिकेचे पोट दिसत नाही.

अचानक कुणीतरी टिआरपी साठी मरत , पुन्हा जिवंत होत. कोणीतरी कोमात जातं , कोणाचा तरी अँक्सीडेंट होतो , मग प्लास्टिक सर्जरी ने नविन चेहरा येतो. विशेष म्हणजे एका सिरियल मध्ये अँक्सीडेंट झाला की इतर सिरियल मध्येही होतो. हल्ली तर एक नविन ट्रेंड आला आहे. सर्व चँनेलवर अंधश्रद्धेवर आधारित मालिका सुरु आहेत. काला टिका , कवच , शक्ती , नागिन , नागार्जुन , काली वगैरे वगैरे..! जग कुठे चालल आहे आणि आपण कुठे जातोय ? टि.व्ही. हे एकमेव माध्यम आहे ज्यातून आपण कमीत कमी वेळात जास्तित जास्त चांगल्या गोष्टी समाजापर्यत पोहचवू शकतो. पण सर्व उलटं सुरु आहे. एकीकडे डाँ. नरेंद्र दाभोळकर यांच्यासारखे थोर व्यक्ती अंधश्रद्धा निर्मुलनासाठी आयुष्य पणाला लावतात . आणि हे सिरियल वाले अर्ध्या तासाच्या एपिसोड मध्ये त्या कार्याची किंमत शुन्य करुन टाकतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ; याविरोधात कोणी कंप्लेनही करत नाही. आश्चर्याची गोष्ट आहे.

सिरियल साठी मी काही प्रोड्युसर ला भेटले होते. मी माझ्या कथेची तारीफ करत नाही; पण माझी कथा खरच चांगली होती. साधी सरळ घडणारी एक प्रेरणादायी कथा. त्यात कसलाच मसाला नव्हता. पण , सर्व प्रोड्युसर च म्हणण होत की , " बेटा इसमें मसाला डालो.. जितना ज्यादा मसाला उतना ज्यादा टिआरपी.. ! सिधी स्टोरी लोग देखते नही..एक इंसान की दो बिवी दिखाओ , एक घरके अंदर एक बाहर,.. टिआरपी डबल..प्राँफिट डबल..!" मनात विचार आला की सर्व प्रेक्षक वर्गाला एका पारड्यात बांधुन त्यांच मुल्यमापन करणारा हा एकटा प्रोड्युसर कोण ? खरच लोकांना हे आवडत का ? काहीनां आवडत असेल काहींना नाही .. मग हे लगेच त्यांच्यावर लेबल लावुन मोकळे कसे काय होवु शकतात ? आणि कदाचित लोकांना आवडत नसेल पण सर्व चँनलवर सारखीच गत म्हणुन लोक त्यातल्या त्यात बरी वाटणारी मालिका बघत नसतील कशावरुन ? एका दृष्टिने प्रोड्युसर च्या बजटचा विचार केला तर त्यातून डबल प्राँफिट मिळवण्याचा हेतु साहजीकच. म्हणजे आर्थिक हेतु पुर्ण करण्यासाठी काहीही बनवायच का ? आणि आपण प्रेक्षकांनी काहीही बघायच का ? ओव्हराआँल बघता , आपल्या मालिका ठराविक साच्यातून बाहेर पडायला किती वेळ घेतील कुणास ठाऊक ? आणि काय स्वीकारायच आणि काय नाही हे आपण कधी ठरवणार कुणास ठाऊक ?

शेवटी मी माझ्या मैञिणीला ' दिल दोस्ती दुनीयादारी ' आणि आणखी एक दोन मराठी मालिका बघ म्हणुन सांगणार होते पण त्या बिचारीला मराठी कुठ येत होत .. शेवटी सि यु लेटर म्हणुन चँट थांबवली.

( टिप - बोटावर मोजण्या इतक्या सिरियल चांगल्या आहेत , त्यांचा मला नितांत आदर आहे . )