बैठक झाल्यानंतर दोघांनाही ऋतुजा ऐकांतात बोलायला घेऊन गेली .... ऋतुजा जातच होती तर
आशुतोषने तिला थांबवून घेतलं .... आणि तो आशनाला म्हणाला ,
" डॉ . आशना माय सिस्टर ऋतुजा .... आणि ऋतुजा त्या रात्री श्री सोबत दिल्लीला मी ह्यांनाच
भेटायला गेलतो ......."
ऋतुजाला आधीच श्रीने सर्व सांगितलं होतं हे आशुतोषला ही माहिती होतं .....
" दादा म्हणजे ह्या आराध्याची सिस्टर आशना आहेत ?? "
ऋतुजा ही आता चकित झाली हे काय घडत आहे .... आपल्या भावासोबत म्हणून
आशुतोष म्हणाला ....
" हो ऋतुजा ....."
आशनाता लग्नाला आधीच विरोध होता आणि आशुतोषचा ही ..... पण ऋतुजा त्यांना म्हणाली ,
" दादा तुझा घरूनच लग्नाला विरोध ह्यांना ( आशना ) ही लग्न नाहीच करायचं म्हणे .... पण दादा
ऐक ना आराध्या नाही आहेत पण तू आशनाजी मध्ये तुझ्या आराध्याला शोध ... आशनाजी पण
तुझ्यावर प्रेम करायच्याच ना मला श्री ने सांगितलं दादा ..... तुम्ही ठरवा आता काय ते ...."
म्हणून ती तिथून त्या दोघांना ऐकातात सोडून तिथून बैठकीत गेली ....
काय बोलावं आशुतोषला ही सुचतं नव्हतं आणि आशनालाही नाही आशुतोष जेव्हा आपली नजर
तिच्यावर रोखून बघायचा तर त्याला तिच आराध्या त्याच्यात दिसायची तो तिला म्हणाला ,
" एक बोलू तुमच्यात आजही माझी आराध्या जिवंत आहे ..... जेव्हा तुमच्याकडे बघतो तेव्हा मला असं
जाणवतं तीच माझ्या समोर आहे तिचा मृत्यू झाला ती हे जग सोडून गेली हे स्वप्न वाटतं जेव्हा
मी डॉ. आशना तुमच्याकडे बघतो ......"
तेव्हा ती म्हणाली ,
" मी तुमच्यावर आजही प्रेम करते हं तेवढच माझी दिदी करायची कदाचित आमच्या दोघीला एकाच
आशुतोषवर एकाच दिवशी प्रेम झाले होते .... तुम्हाला एक प्रश्न विचारू ? "
आशुतोष म्हणाला ,
" हो विचारा ....."
" आराध्या म्हणून माझा स्विकार करणार का ? "
आशुतोषच्या चेहर्यावरचं हास्य तिने वापस आणलं होतं ..... आशुतोष तिला बोलला ..
" काय म्हटलं प्लिज परत एकदा म्हणा ...."
तिने परत तेच वाक्य बोललं ..
" आराध्या म्हणून माझा स्विकार करणार का ? "
तो सौम्य स्वरात तिला म्हणाला ,
" तुम्हाला मी आराध्या म्हटलेलं आवडेल का ? "
तिने मानेनच होकारं दिला ....
दोघही रूमच्या बाहेर पडले .... बैठकीत येऊन आशुतोषने सांगितले .....
" मला मुलगी पंसद आहे ......"
--------------------------------------
आशुतोष आणि आशना ह्याचं लग्न तर थाटामाटात रितीरिवाजा नुसारं पार पडलं .....
*********
श्री आणि ऋतुजाच ही लग्न झालं आपल्या आपल्या संसारात सर्व रममाण झाले ....
पण नियतीने त्या रात्री श्री वर वार केला ......
ऋतुजा श्री चा बाळाला जन्म देणारं होती श्रीच आठ महिण्याचं मुलं तिच्या उदरात वाढत होतं
नियतीला त्यांच्या सुखी संसारात विर्जण घालायचचं होतं ....
नियती आपले डाव कशी मुकणारं .... श्री त्या दिवशी अॉफीसच काम पुर्ण करून रात्री दहा वाजता
घरी जायला निघाला .... वाटेत ट्राफीक जाम आहे म्हणून कोणी तरी त्याला कॉल केला की शहरात
नकाबंदी आहे ....
त्याने कार दुसर्यामार्गाने काढली ..... पाऊसाळ्याचे दिवस होते ... खुप चिखल साचलेला होता
काचावरून सरीचा धारा ओघळत होत्या ..... समोरचं श्री ला दिसेनास झालं .... ऋतुजा घरी त्यांची
वाट बघत बसली होती श्रीच पुर्ण मन ऋतुजात होतं तिला कधी जाऊन भेटतो असं अॉफीस सुटल्यानंतर
त्याला रोज वाटे आज सारखं त्याचं मन ऋतुजाकडे वेध घेतं होतं ....
त्या मार्गाने भरवेगात एक मेट्याडोर आला श्री ला ही त्या मुसळधार पाऊसात ट्रर्निंग समजलं नाही
मेट्याडोरने ही जोराची धडक दिली ....
विल वरून त्याचा हात घसरला आणि कार सुसाट वेगाने एका झाडावर जाऊन आदळली ....
कारच्या काचा श्री च्या डोक्यात खुपसल्या रक्तबंबाळ देह झाला होता .... रात्रभर ऋतुजा त्याला कॉल
करतच राहली पण काहीच प्रतिसाद नव्हता येतं तिचा श्री कार अपघातात जागीच ठार झाला होता ...
ही बातमी ऋतुजाला दुसर्या दिवशी समजली .... श्री चा मृत्यूदेह घरात पडून होता ऋतुजाला प्रत्येक
लहान मोठ्या दुखातून बाहेर काढणारा तिचा श्री तर मरणाअवस्थेत एक लाश बनून निश्चित पडून होता ...
ऋतुजाला ह्यातून सावरनेच खुप गरजेचे होते .... नियतीचे फेरे कुणाला चुकल ेजे व्हायचं
ते घडलचं ...
तिथून एक महिण्यानं नव्या श्री चा जन्म झाला ..... गोडस हसरा चेहरा श्रीचं रूप लाभलं
होतं त्याला ...
तोच आता ऋतुजाच्या जगण्याची उमेद होता .....
त्याला ऋतुजाने नाव दिलं श्री .... ती त्याला श्री म्हणूनच साद घालायची !
पाऊस नेहमी पडतो गरजतो बरसतो नात्याचं ही एक वलय मृगजळात बंधिस्त
करतं ..... ???? आठवणीचे ठस्से
समुद्रकिणारी वाळूवर त्या कोरले होते ...... ते ठस्से पाऊलाचे श्री आणि ऋतुजाचे !
प्रेम पुष्प नव्याने उमलते कधी श्री आणि ऋतुजाना एकत्र घेऊन येतं
तर कधी ... आशुतोषचं हरवलेलं प्रेम आशनात गुंतून जाते आराध्या समजून तिच्या
भोवती मन घिरट्या घालते प्रेम पाखराची दुनिया अशीच अधोरेखित होते ...
मेघ काळेकुट्ट एकत्र आले की प्रेम जीवांची लहर काळजात धस्स होतं सर्वांग शहारून
घेते .... थेंबथेंब सरीने पापण्या ओलावून जातं मृगजळ इथेच पुर्ण होते ......
( समाप्त )
© कोमल प्रकाश मानकर