Maauli in Marathi Film Reviews by Anuja Kulkarni books and stories PDF | माऊली...

Featured Books
Categories
Share

माऊली...

माऊली...

‘लय भारी’ या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनिलिया एकत्र येत ‘माऊली’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभरात रितेशची लोकप्रियता किती अफाट प्रमाणात आहे याचा प्रत्यय आला आहे. रितेश देशमुख सर्वच वयोगटाचा आवडता हिरो आहे. सध्या मराठी चित्रपट वेगवेगळे विषय घेऊन प्रेक्षकांसमोर येतांना दिसतात आणि प्रेक्षकांची मनं जिंकतांना दिसत आहेत. देशभरामध्ये मराठी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये रितेशची मोठ्या प्रमाणावर क्रेझ आहे. आणि याच कारणामुळे रितेशची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे. ‘स्कोर ट्रेंड्स इंडिया’च्या लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत रितेश टॉप १० मध्ये आला आहे. ‘माऊली’च्या प्रमोशनच्या सुरूवातीला स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर रितेश १७ व्या स्थानावर होता. मात्र चित्रपटाचं प्रमोशन सुरु झाल्यानंतर त्याच्या लोकप्रियतेत वाढ होत तो थेट ९ व्या स्थानावर पोहोचला.

विशेष म्हणजे या चित्रपटाचा टीझर शाहरुख खानने ट्विटर अकाऊंवरून शेअर केला होता. दीड मिनिटांच्या या टीझरमध्ये जबरदस्त अॅक्शन आणि संवाद ऐकायला मिळाले आहेत. या चित्रपटात रितेश एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. या सिनेमात रितेशसोबत ‘मिर्झिया’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेली अभिनेत्री सैयामी खेर या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर, माऊलीचं पहिलं गाणं "माझी पंढरीची माय" प्रेक्षकांना ऐकायला मिळाल. हे गाणे रितेशने शेअर केल्यानंतर केवळ दहा मिनिटांच्या आता या गाण्याला सहाशेहून अधिक लाइक्स आले असून ८५ हून अधिक लोकांनी हे गाणे शेअर केले आहे. हे गाणे अप्रतिम असल्याचे लोक प्रतिक्रियांच्या माध्यमातून सांगत आहेत. ‘आपले नाव ऐकले नाय, असे एक बी गाव नाय अन् हाणल्या बगैर सोडले तर माऊली आपले नाव नाही,’ या संवादाने रितेशची एण्ट्री होते. शाहरुखने रितेशच्या या चित्रपटाचा टीझर शेअर करण्यामागचे कारण म्हणजे त्याच्या झिरो या चित्रपटाशी बॉक्स ऑफिसवर टक्कर टाळण्यासाठी रितेशने माऊलीच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती. त्यावेळीसुद्धा शाहरुखने ट्विटरवर भावनिक पोस्ट लिहित रितेशचे आभार मानले होते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने याचा पोस्टर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये जबरदस्त अॅक्शन आणि दमदार संवादांचा समावेश करण्यात आला असून ‘आपल्या सारखा TERROR नाय’ हा रितेशचा संवाद चांगलाच गाजत आहे.

चित्रपटाची कथा-

माऊली (रितेश देशमुख) एका गावात पोलीस ऑफिसर म्हणून येतो. त्या गावात नाना (जितेंद्र जोशी) या गावगुंडाचे राज्य असते. गावातल्या लोकांना तो प्रचंड त्रास देत असतो. लोकांच्या जमिनी बळकावणे, लोकांना मारणे ही त्याची नित्याची कामे असतात. माऊली गावात आल्यानंतर तो त्याला देखील सतावू लागतो. या सगळ्याला माऊली तोंड कसा देतो? नानाचे प्रस्थ कशाप्रकारे संपवतो, हे माऊली या चित्रपटात पाहायला मिळते.

माऊली या चित्रपटाची सुरुवातीची काही मिनिटे ही व्यक्तिरेखांची ओळख करून देण्यात घालवली आहे. त्यामुळे चित्रपट सुरुवातीला संथ वाटतो. पण चित्रपटातील अतिशय महत्त्वाचे रहस्य उलगडल्यानंतर चित्रपटाला एक वळण मिळते. चित्रपटात आता काही तरी वेगळे घडेल असे वाटत असताना पूर्वीच्या अनेक बॉलीवूड चित्रपटात वापरण्यात आलेले तेच तेच कथानक चित्रपटात पाहायला मिळते. चित्रपटाच्या कथेत दम वाटत नाही. तसेच चित्रपटात पुढे काय होणार याची कल्पना आधीच येते पण रितेश चा अभिनय आणि डायलॉग कंटाळा येऊन देत नाहीत. या सगळ्यात बाजी मारली आहे ती रितेश देशमुखने. त्याने त्याची भूमिका, त्यातील विविध छटा इतक्या सुंदरपणे मांडल्या आहेत की त्याच्या अभिनयाला प्रेक्षक आपणहून दाद देतो. जितेंद्र जोशीची भूमिका उत्तम झाली आहे. सिद्धार्थ जाधव, सैयामी खेर यांनी देखील त्याला खूप चांगली साथ दिली आहे. जेनेलिया आणि रितेश एका गाण्यात एकत्र थिरकताना दिसतात. ही त्या दोघांच्या फॅन्ससाठी एक पर्वणीच आहे. जेनेलिया खूपच छान दिसत असून त्यांची केमिस्ट्री बघायला मजा येते. चित्रपटातील अॅक्शन दृश्य मस्त जमून आली आहेत आणि अॅक्शन आवडणारे प्रेक्षक नक्कीच ह्या दृश्यांना दाद देतील. तसेच चित्रपटाच्या संवादासाठी संवाद लेखकाचे जितके कौतुक करू तितके कमी. अप्रतिम संवादामुळे हा चित्रपट उत्तम बनतो. या चित्रपटातील संवाद प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवणार ह्याची खात्री चित्रपटगृहात जाऊन तुम्ही करून घेऊ शकता. चित्रपटातील गाणी अजय अतुल यांची आहेत. बॅकराउंड स्कोर मस्त झाले आहे. एकंदरीत या माऊलीला भेटू शकता..

* हा चित्रपट का पाहावा-

१. चित्रपटातले डायलॉग्स-

रितेश देशमुखचे ह्या चित्रपटातले डायलॉग दमदार आहेत. आणि फाईट सिन्स तर झक्कास!! लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खिळवून ठेवण्याची कसब "माऊली" अर्थात रितेश देशमुख मध्ये आहेच आणि ते हा चित्रपट पाहतांना लक्षात येत. त्यामुळे, डायलॉग आणि फाईट सिन्स साठी हा चित्रपट एकदा पहिलाच पाहिजे.

२. सैयामी खेर आणि रितेश देशमुखची केमिस्ट्री पाहण्याकरता-

सैयामी खेर चा हा पहिलाच मराठी चित्रपट. त्यामुळे दोघांची केमिस्ट्री पाहण्याकरता हा चित्रपट पाहू शकता.

३. जितेंद्र जोशी नकारात्मक भूमिका पाहण्याकरता-

जितेंद्र जोशीमी साकारलेली खुनशी गुंडाची भूमिका बघायला हा चित्रपट पाहायलाच हवा.

४. अजय-अतुल ह्याचं संगीत-

अजय-अतुलयांची लोकप्रियता वाढतांना दिसत आहे. त्यांची गाणी हृदयाला थेट भिडतात. त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी माऊली ह्या चित्रपटात नक्की बघण्यासारखी असतील.

५. रितेश देशमुखचा नवा लुक-

रितेश देशमुख ह्या चित्रपटात एका नव्या रुपात आपल्यासमोर येतो. आणि ते पाहतांना मजा नक्की येईल.

'मर्जिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये धमाकेदार पदार्पण करणारी अभिनेत्री सैयामी खेर आता 'माऊली' चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. 'माऊली' या चित्रपटसाठी सैयामीनं मराठीतील सुपरस्टार सिद्धार्थ जाधवकडून मराठीचे धडे घेतले आहेत. सैयामी उत्तम मराठी बोलते, पण चित्रपटात तिच्या तोंडी ग्रामीण बाजातील संवाद होते. भाषेतील ते बारकावे तिला सिद्धार्थ जाधवने शिकवले. दोघांच्याही आवडीनिवडी सारख्याच असल्यानं काही दिवसांत दोघांची मैत्री जमली. सिद्धार्थ आणि सैयामीला सेटवर मोकळा वेळ मिळाला की दोघंही चित्रपटातील संवादांवर काम करत. सिद्धार्थकडून ती अनेक गोष्टी समजून घेतल्या. पण मराठी भाषेचा हा ग्रामीण बाज सैयामीनं कितपत आत्मसात केलाय ते पाहण्याकरता चित्रपट बघणे गरजेचे!

14 डिसेंबरला रितेशचा हा चित्रपट प्रदर्शित होणात असून, आदित्य सरपोतदारने त्याच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'मुंबई फिल्म कंपनी' आणि 'हिंदुस्तान टॉकीज'च्या निर्मिती अंतर्गत साकारल्या जाणाऱ्या या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी अजय- अतुल या जोडीने घेतली आहे. या चित्रपटाची निर्मीती रितेश देशमुखची पत्नी जेनिलीया देशमुख यांची आहे.

दमदार अॅक्शन बघायला आणि उत्कृष्ट संवाद ऐकण्याकरता एकदा चित्रपट गृहात जाऊन बघू शकता.