Vaidhavya-stree janmachi shokantika in Marathi Women Focused by Savita Satav books and stories PDF | वैधव्य-स्री जन्माची शोकांतिका

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

वैधव्य-स्री जन्माची शोकांतिका



    स्री,जिची अनेक रुपे आहेत.अगदी देवी समान म्हणून तिची पूजा बांधली जाते,पण खरच वास्तविक जीवनात तिला मानाचे स्थान आहे.स्री-पुरुष समानता ही फक्त कागदावरच आहे.प्रत्यक्ष चित्र फार वेगळे आहे.आणि त्यात ती विधवा असेल तर.........
     
     खरतर नवरा नसण यात तिचा काहीच दोष नसतो.पण तरीही समाजात तिला अतिशय वाईट वागणुक मिळते.सप्तपदी चालताना सात जन्म ज्याच्या बरोबर सोबत करायाच वचन तिने घेतलेल असत.त्याच्या बरोबर आयुष्याची सुंदर स्वप्न तिने पाहिलेली असतात.तो तिचा सुख दुःखाचा सोबती असा अर्ध्या वाटेवर तिला सोडून जातो तेव्हा काय होत असेल तिच.हे आभाळाएवढ दुःख ती कस सहन करत असेल,करत का कुणी विचार.

   एवढा दुःखाचा डोंगर कोसळूनही ती उभी रहाते,परिस्थितीशी दोन हात करायला,कुणासाठी,तर तिच्या पिलांसाठी.पण तरीही तिला दूषण दिल जात.मग तिन आयुष्यभर आपल दुःख उगाळत बसायच का ? पूर्वीच्या काळी तर भयंकर अघोरी प्रकार केले जायचे,शरीरावर अन मनावरही.आता तस नसल तरी मनावर आघात होतातच,तिला अपशकुनी ठरवल जात.अनेकांच्या सहानुभूतीचा,दयेचा विषय होते ती.तर पुरुषांच्या नजरेतील वासनेची शिकार होते ती.

    ती ने छान आवरल,चांगली राहीली तर ही आपल्यासाठी उपलब्ध आहे,असा कितीतरी जणांचा समज होतो.आशा नजरा तिला लगेच कळतात.बरेचदा घरातल्यांचीही तिच्याशी वागणूक बदलते.नवरा गेल्यानंतर तिच्या अंगावरील दागिने उतरविण्याच जो अघोरी प्रकार होतो,तो पाहीला तरी अंगावर काटा येतो.वाटत ओरडून सांगाव सगळ्यांना बास करा हे सगळ,पण धाडसच होत नाही,पण आता करायला हव.लग्नसमारंभ,पुजा,हळदीकुंकू यासारख्या धार्मिक कार्यक्रमात तर ंबिचारी कानकोंडी होवून जाते,कितीतरी सामारंभात बायकांना हळदीकुंकू लावत असताना,अशा स्रीयांना पाहून लावणाऱ्या पुढे निघून जातात,किंव या स्वतः हून लावू नका म्हणून सांगतात.खरच किती वेदना होत असतील त्यांच्या मनाला.का करायच हे सगळ.लग्नाआधीही आपण नटतोच,साजशृंगार करतोच,मग पतिनिधनानंतर यावर बंधन का ??आपल्या अवतीभोवती अशा कितीतरी घटना आपण पहातो पण बघण्या पलिकडे आपण काहीच करत नाही.जिच्या वाट्याला हे दुःख  आल एकदा स्वतःला तिच्या जागी ठेवून बघा.

    का ती एक सर्वसामान्य आयुष्य जगू शकत नाही,ज्या मुलांना ती रक्ताच पाणी करुन वाढवते,मोठ करते.त्यांच्या लग्नातही ती सगळ्या धार्मिक विधींपासून लांब रहाते.अशा वेळेस साधी विचारपूसही न करणाऱ्या नातेवाईकांना याचा मान दिला जातो.अन ती मात्र आडबाजूला एखाद्या कोपऱ्यात बसते का?? लहान वयात वैधव्य आलेल्या क्वचितच काही जणींचा पुर्नविवाह होतो.कितीतरी जणी सगळ आयुष्य एकटे पणात घालवतात.कुटुंबाने समजून घेतल ,आधार दिला तर त्यांच जगण थोड सुसह्य होत.पण तरी त्या जगण्यात उपकाराची,मिंधेपणाची जाणीव असते.

    काळ बदलला,विचार बदलले असे आपण म्हणतो,पण खरच मनापासून विचार करा,खरच परिस्थिती तशी आहे.एक स्री म्हणून मला सतत या गोष्टीची टोचणी रहाते.बराचदा स्रियाच या सगळ्याला कारणीभूत असतात.त्याच एकमेकींविषयी आकस ठेवून असातात.

   पत्नीच्या निधनानंतर विधुर म्हणून कुठल्या पुरुषाला अशी वागणूक मिळालेली तुम्ही पाहिलीत का.उलट त्याच्या साठी लगेच स्थळ सुचवली जातात मग तो कुठल्याही वयाचा असला तरी.कारण प्रश्न त्याच्या पोटापाण्याचा असतो.कुठल्याही शुभकार्यात त्याला डावलल जात नाही.की तो विधुर आहे म्हणून अपशकुनी किंवा पांढऱ्या पायाचा अशी त्याची हेटाळणी होत नाही.तो एकटा कसे आयुष्य काढेल म्हणून त्याच्या लग्नाचा विचार होतो.पण दुर्दैवाने   एका स्रीच्या मग ती कितीही तरुण असली तरी असा विचार होत नाही.तिने आपल आयुष्य आसच एकटेपणात काढाव,तिच्या नशीबाचे भोगच आहेत ते तिला भोगावेच लागतील म्हणत तिच्या   मनाचा विचार कुणीच करत नाही.

    पुरुष जर पत्नी निधनानंतर सर्वसामान्य आयुष्य जगू शकतो तर मग स्रींया बाबतीत हा दुजाभाव का? ठिक आहे,बाकी कुठला विचार नका करु तिच्या बाबतीत पण एक माणूस म्हणून सर्वसामान्य आयुष्य जगण्याचा तिचा हक्क तरी नाकारु नका.तुमच्या रुढी,परंपरा यात तिचा बळी देवू नका.आपण एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत आहोत मग आपले विचार नक्कीच बदलू शकतो.
        
        सविता सातव