Shikshan in Marathi Classic Stories by Harshad Molishree books and stories PDF | शिक्षण...

Featured Books
Categories
Share

शिक्षण...


शिक्षण...

कुठे तरी एका साम सुम  रस्त्या वर जिथं ना माणूस ना मानसा ची जात.... अगदी काळोख, रात्रीच्या सुरेख चांदण्या च्या प्रकाशात एक मुलगा हळू हळू आपले दोनी हाथ खिशात टाकून... चालतोय, थोडं पुढे असंच येऊन मुलगा थांबला व समोर एक विजेच्या खांब्या खाली येऊन बसला खिशातून एक पत्र काढला आणि पत्र बघताच बोलला... 

"जगण्याची ओढ न मारण्याची जाणीव आहे...
आलो अश्या रस्त्यावर जिथं ना जीव ना जाती आहे"...

त्या मुलाने पत्र उघडून वाचायला शुरवात केली...???

"कुणाल अरे चल लवकर उठ बाळा ६ वाजले शाळेत जायला उशीर होईल बाळा".... आई

"यार हे आईचा ना रोज च किट किट आहे मला तर अजिबात इच्छा नाही आहे जायची शाळेत आज, देवा का तू सोमवार आणतो परत, रविवार बरा असतो घरी रहायला मिळतं".... कुणाल मनातल्या मनात स्वतः सोबत बोलत होता

"कुणाल अरे कुणाल उठ कि आता चल".... 

"हो ग आई उठतो"...   कंटाळा करत कुणाल झोप मोडून उठला व थोड्या वेळ नन्तर शाळेला जाण्या साठी निघाला.....

कुणाल..... आता काय बोलवा या पोरा बद्दल अभ्यासात धड नाही... शरीरात बळ नाही... पण तरी म्हणतात ना आम्ही पण किसीसे कम नाही... अगदी शांत स्वभाव पण जर डोक फिरलं तर मग तू कोण नि मी कोण... अशी त्याची ओळख 

रोज सारखं आज पण कुणाल वर्गाच्या बाहेर थांबला आहे अभ्यास नाही केलं ते एक कारण तर आहेच पण एक कारण... हे पण आहे कि गेल्या २ वर्षा पासून कुणाल ने शाळे ची फी नाही भरली... व या साठी रोज त्याला बाहेर थांबवा लागायचा, आज तर कुणाल खूप रागात आहे, मित्र कुणाल ला नुसतंच चिडवत होते त्याची मज्जा घेत होते टोमणे मारत त्याला बोलत होते.... कुणाल ने ठरवलं कि काही हि करून उद्या बाबा ला शाळेत घेऊन यायचा बस्स... कुणाल असं विचार करत घरी पोचला, आई विचारते कुणाल ला कि काय झाला पण कुणाल रागात फुगून बसला आहे एक शब्दाने काय बोलत नाहीये... संध्याकाळी बाबा आले, बाबांनी कुणाल ला हाक मारली....

" कुणाल आहेस कुठे हे धर पिशवी.... कुणाल" 

कुणाल रागात उठून आला व बाबाच्या हातातून पिशवी घेऊन आतमध्ये जाऊन ठेऊन आला...

"काय झालं कुणाल आज खूप शांत दिसतोय".... बाबांनी अगदी प्रेमाने काळजी घेत विचारलं

"काय महित शाळेतून आला तेव्हा पासून असाच शांत आहे, धड बोलत नाहीये... दुपारी जेवला पण नाही"... आई बाबांना बोलली

"जेवला पण नाही कुणाल काय झाला बेटा सांग तर कोण काय बोलला का काय झालं"...  

"मला काय माहित नाही बाबा उद्या, कुटून पण तुम्ही आधी शाळेत पैसे भरा.... नाहीतर मी शाळेत नाही जाणार बस्स".... कुणाल असं बोलत रडू लागला, अणि रडतच घरा बाहेर निघुन गेला....

कुणाल चे आई बाबा विचार करू लागले... की काय करावं, बाबा शांत होऊंन बसले अणि विचार करू लागले की काय करावा आता... आई कुणाल च्या मागे  मागे आली व कुणाल ला घरी घेऊन आली.... बाबांने कुणाल ला अगदी प्रेमाने विचरलं...

"कुणाल जेवायचं नाहीये का"... कुणाल ने काय उत्तर नाही दिला रागत

"चल बाळा जेवून घे.. उद्या मी येतो शाळेत, भेटतो मॅडम ना आता जेवून घे चल"...

"काय भेटतो, बाबा पैसे भरा ना नाहीतर मला परीक्षेत नाही बसू देणार १० वि आहे ते मॅडम लोकं पैसे नाही भरले म्हणून वर्गा बाहेर उभे करतात... मी नाय, तुम्ही उद्या या आणि पैसे भरा"....

"बरं चल येतो मी उद्या... जेवून घे आता"... 

बाबा विचार करू लागले कि काय करावं पैसे तर नाही आहेत... तेव्हाच आई आली बाबा कडे आणि त्यांना समजावलं  कि होईल सगळं ठीक...

आज कुणाल चे बाबा शाळेत आले... मॅडम ना भेटायला, कुणाल मॅडम च्या ऑफिस च्या बाहेरच थांबला होता... कुणाल च्या बाबांनी मॅडम ला हाथ जोडून भरपूर विनंती केली पण मॅडम काय  ऐकायला तयार नव्हती... त्यांचा हि अगदी ठीक होतं कि २ वर्षा पासून पैसे नाही भरले, पण नुसतं पैस्यान मुळे इथं एकाचा आयुष्य निर्भर आहे... त्याचा काय ????

मॅडम ने कुणाल ला शाळेत बसवण्यास हि नाकारलं, कुणाल चे बाबा अगदी निराश होऊन ऑफिस च्या बाहेर आले व कुणाल चा हाथ पकडला व त्याला बोलले....

"कुणाल चल बाळा घरी".... हे ऐकून कुणाल रडू लागला, कुणाल ला हे समजलं कि मात्र पैसे नाही भरले या कारणा मुळे त्याला शाळेत घेत नाहीये...

कुणाल काय न बोलता बाबांचा हाथ पकडून घरी निघुण आला... घरी आल्या सकट आई ने विचारलं...

"काय झाला ओ... घरी कसा काय हा"...

"हो ते मॅडम काय ऐकत नाहीयेत शाळेचे"...

कुणाल खूप रडत होता व त्याला रडताना बगून आई बोलली...

"बाळा रडू नकोस बघ जे काय होतो ना जगात ते चांगल्या साठीच होत असतं"... आई ने कुणाल ला जवळ घेतलं

"बाळा रडू नको तू काळजी करू नकोस मला तुझ्या पेक्ष्या जास्त टेन्शन आहे मी तुला घरी बसवून नाही ठेवणार मी बघतो काय तरी २-३ दिवस थांब तू मी करतो काय तरी"... बाबा 

२-३ दिवस म्हणता महिनाभर असाच निघून गेला पण पैस्याचं काय झाला नाही कुणाल चे बाबा परत शाळेत मॅडम ना भेटून आले पण तरी काय फायदा नाही झाला... पैसे भरल्या शिवाय काय होणार नव्हतं 

कुणाल अगदी शांत शांत राहू लागला... घरात खूप चीड चीड करायचा, बाबा घरी आले कि पहिला प्रश्ण मात्र एकच कि बाबा पैस्याचं काय झाला का... मात्र हे रोज चं झाला होतं आणि रोज बाबा शांत पणे एकच उत्तर दयाचे कि होईल उद्या... 

"करतो मी होईल काय तरी करतोय मी होईल"...... 

रोज आपल्या मित्रांना शाळेत जाताना बघुन कुणाल मनातल्या मनात 
रडायचं कि काय करू... अगदी मित्रांनी विचारलं कि खोटं बोलायचा कि बरं नाहीये म्हणून येत नाही शाळेत... कधी खूप चीड चीड करायचा कुणाल जेवण पण नाही करायचा आणि हे बघुन आई बाबांची तर हालत व्हायची पण आता ते तरी काय करू शकतात... प्रयत्न तर करत आहेत....

बघता बघता, परिक्षे ची वेळ आली.... २ महिन्या नन्तर परीक्षा आणि कुणाल जसा चा तसा घरी बसला.... आहे शाळे चा काहीच पत्ता नाही....

एक दिवस कुणाल घरी मस्त झोपला होता, आपल्याच स्वप्नेच्या दुनियेत हरवून.... तेव्हाच अचानक आई ने कुणाल जोरात हाक मारून उठवलं....

"कुणाल उठ बघ तुझ्या शाळेतून मॅडम आलेत"....

हे ऐकताच कुणाल पटकन उठला,

अगदी गार झोपेतून उठल्या मुळे कुणाल काहीच नीट दिसत नव्हते, विस्कटलेले केस वरतून लाल डोळे.... कुणाल शांत पणे त्या बाई समोर बघत होता

आईने त्या बाईंना घरात बोलावलं...

"अरे काय शाळेत पाठवायचा आहे की नाही... याला, आणि हे काय त्याचा १० वि चा वर्ष आहे आणि हा असा झोपला आहे, काय चालय नक्की तुमचं शिकवायचा आहे की नाही पोरा ला".... madam

"हो madam पण आता मोठ्या मॅडम ला कुणाल चे 'पपा भेटून आले पण, ते आता त्याला परवानगी देतच नाही तर मग कसं पाठवू मी पोराला"....... आई

"अरे परवानगी देत नाही म्हणजे, तुम्ही पैसे भरा ना आधी, अस कसं म्हणताय तुम्ही".....

"पैसे असले असते तर मुलाला का असं घरी बसवून ठेवला असता आम्ही"....

"अरे समजा तुम्ही , पैसा मुळे पोराचा आयुष्य वाया घालवू नका"....

"आता त्याला शाळेत पाठवा आज बोर्ड चा फॉर्म पाठवण्याची अंतिम तारिक आहे, त्याला लवकर शाळे चा ड्रेस घालून शाळेत पाठवा आणि सोबत त्याचे दोन फोटो फॉर्म ला जोडायला"....

"हो मॅडम पाठवते मी"..... आई

इतकं बोलून मॅडम निघून गेले....

मॅडम आणि आईचं बोलणं संपे परंत तर कुणाल ने डोळे सुजून घेतले रडून रडून...

आईने कुणाल ला शांत केलं व बोलली...

"चल पटकन अंगोळ करून घे आणि जा शाळेत.... चल उठ".....

कुणाल अंघोळ करून शाळेत जाण्यासाठी तयार झाला, आईने त्याच्या जवळ ₹ ५० दिले, आणि सांगितलं की जाताना फोटो कडून घे urgent... कुणाल ने होकार दिला व निघाला....

कुणाल शाळेत फोटो घेऊन पोचला, फोटो मध्ये ही त्याचे डोळे अगदी सुजलेले दिसत होते, कुणाल जसा तसा घाबरत घाबरत, शाळेत मॅडम च्या ऑफिस मध्ये गेला...  

"काय आता आलास, कळत नाही का तुला"..... शाळेत ले बाई

कुणाल एका शब्दाने काय बोलला नाही
कुणाल ने मॅडम ला फोटो दिले व फॉर्म वर हकताक्षर केली....  मग त्याला त्या मॅडम ने principal च्या ऑफिस मध्ये पाठवलं....

"May i come in madam".... कुणाल 

"Yess come in".... 

"बाबा कुठे आहे तुझे, when he is going to pay your fees, its last term your board exams are coming how will you tackle the exams, what about your studies".....

कुणाल शांतच होता त्याला काहीच कळे ना की काय बोलावे....

"Call Your parents tommorrow".... madam

"Oook mam"..... कुणाल

कुणाल घरी आला.... संध्याकाळी बाबा आल्यावर आईने सगळ 
बाबांना सांगितलं, दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा कुणाल सोबत शाळेत आले.... आणि principle ला भेटले....
बाबांन कळे fees भरायचे पैसे नव्हते.... पण मॅडम ने कुणाल ला परीक्षेत बसायची परवानगी दिली, आणि त्याला रोज exrta class साठी बोलावलं....

मॅडम च्या ह्या निर्णय मुळे कुणाल अत्यंत खुश होता....  आता रोज कुणाल शाळेत जायचा extra classes साठी.... आणि मन लावून अभ्यास करू लागला

बघता बघता 2 महिने निघून गेले आणि परिक्षे चा दिवस आला, कुणाल ला खूप भित्ती वाटत होती की काय होईल पेपर कशे जातील, आखा वर्ष भर काहीच अभ्यास नाही झालाय जे आहे ते थोडं फार Extra classes मध्ये झालं तेच... कुणाल असं विचार करत करत Exam center वर पोचला....

आई बाबा खूप खुश होते की.... आपला मुलगा १० वि ची exam देतोय

कुणाल ने जशे तशे पेपर दिले, त्याला जमलं तेवढं त्याने मन लावून पेपर लिहले पण तरी कुणाल ला ही अपेक्षा नव्हती की तो पास होणार की नाही....

कुणाल ने आपल्या आई बाबा ला जेव्हा बघितलं तेव्हा दुःखात बघितलं, मनात पास होऊ की नापास पण आता आई बाबांन साठी काय तरी करावं हे त्यांनी मनात ठरवलं.....

आज शेवटचं पेपर देऊन कुणाल घरी आला, आईने रोज प्रमाणे त्याला जेवण दिलं आणि विचारलं....

"पेपर कसा गेला आज चा"...आई

कुणाल ने काही उत्तर दिले नाही जेवून तो शांतपणे बसला....

कुणाल ने आखा दिवस हेच विचार करण्यात व्यतित करून टाकलं की पैसे कामावण्या साठी काय करावं, संध्याकाळी हेच विचारात कुणाल बाहेर मित्रांसोबत थांबला होता तेव्हा त्याने एक माणसा कडून ऐकलं की जवळ च्या एका Tours & Travels office , मध्ये एक मुलगा हवा आहे कामासाठी, कुणाल ने काही विचार न करता त्या माणसा सोबत कामाचं सगळं बोलून घेतलं....

दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून कुणाल, तयार होऊन बसला.... आईने विचारलं कुणाल ला...

"सकाळी आज लवकर उठलास आणि एव्हडा तयार होऊन कुठे चालला"....

"कुठे नाही बस्स इथेच मित्रांसोबत"....

"बरं लवकर ये घरी"....

कुणाल ९:०० वाजता घरातून निघाला व सांगितलेल्या वेळेवर 
ऑफिस ला पोचला, तिथं त्या ऑफिस मध्ये कुणाल ला जास्त काही न विचारता निकाम ४००० वर नौकरी वर ठेवलं....

कुणाल खूप खुश होता एवढा खुश की त्याचा आनंद अगदी गगनात मावे ना....

कुणाल घरी आल्यापासून नुसतं आई ला विचारत होता की बाबा कधी येतील बाबा कधी येतील, संध्याकाळी बाबा जशेच घरी आले कुणाल ने बाबांना चहा आणून दिला.... आणि अगदी शांत भावाने कुणाल बाबांना बोलला....

"बाबा मी उद्या पासून कामाला जाणार आहे, इथं जवळच ऑफिस आहे travelling ची त्यात"....

कामावर...??? बाबा हे ऐकून आश्चर्याचा भावाने कुणाल कडे पाहू लागले....

"अजून काय तुझं वय आहे का कामावर जायचा".... ???

"बाबा ना बोलू नका... काही नाही तर थोडी फार मदत होईल घरा साठी"....

"आई बाबा हे ऐकून खुश झाले"....

"पण बाळा अजून तु लहान आहेस, तुझा वय कमवायचा नाहीये"...

"पण तरी बाबा"...

"काय नाय जाऊद्या त्याला कामाला".... आई अगदी प्रेमाने बोलली, बोलताना आईचे डोळे भरून आले

"Thank you आई".... कुणाल अगदी खुश होऊन बोलला....

कुणाल ला दुपारी 1 ते रात्री 9 वाजे परंत चा वेळ दिला होता कामाचा, दुपारी १ वाजता वेळेवर कुणाल कामावर पोचला....
.............................................................. To be continued .....................................................