Trachlasacha janm in Marathi Magazine by Sadhana v. kaspate books and stories PDF | ट्रँव्हलसचा जन्म

Featured Books
Categories
Share

ट्रँव्हलसचा जन्म

ट्रँव्हलसचा जन्म

आगळ्या वेगळ्या ट्रँव्हलसची निर्मिती, कल्पना ने केली होती. आज त्याच ट्रँव्हलस एंजन्सीचा उद्घाटन समारंभ आहे. लोकांची भरपुर गर्दी झाली आहे. स्ञी - पुरुष दोघेही तेवढ्याच संख्येने उपलब्ध आहेत. आगळ्या वेगळ्या ट्रँव्हलसची आगळी वेगळी न्युज छापण्यासाठी मिडीया देखील हजर आहे . बराचवेळच्या प्रतिक्षेनंतर कल्पना ने स्वतः रिबीन कापुन, स्वतःच्या स्वप्नांच दालन सर्वांसमोर खुल केल. सर्वांना उत्सुकता लागली होती या ट्रँव्हलसच्या जन्माची कहानी ऐकण्याची . जास्त वेळ न घेता मिडीयाने प्रश्न विचारायला सुरुवात केली.

पञकार - मँडम, ही ट्रँव्हलस खास महिलांकरिता आहेच , पण यातील सर्व वर्कर सुद्धा लेडिजच आहेत . एक स्ञी ड्रायव्हर राञभर जागुण लातूर ते पुणे ट्रँव्हलस सुरक्षितपणे चालवू शकेल का ?

कल्पना - का नाही ? सरला ठकराल विमान उडवु शकतात. सुरेखा भोसले रेल्वे चालवु शकतात. तर ही स्ञी ट्रँव्हलसही चालवु शकते.

पञकार - मँडम , या ट्रँव्हलसची कल्पना तुम्हाला कशी सुचली ?

या प्रश्नाचे उत्तर देताना ,तिचा भुतकाळ तिच्या डोळ्यासमोरुन तरळु लागला.

कल्पना लातूरची. कल्पनाचे कुटुंब अगदी मध्यमवर्गीय होते. कल्पनाचा नुकताच पुण्याला इंजिनीअरिंगला नंबर लागला होता. पहिल्या सेमिस्टरच्या सुट्यात ती घरी आली होती. सर्वकाही खुप छान सुरु होतं. सुट्ट्या संपल्या आणि ती परत जायला निघाली . तेव्हा निर्भया प्रकरण घडल होत. अख्खा देश हादरला होता. प्रत्येक मुलीचा बाप हादरला होता. त्याला अपवाद कल्पनाचे वडिल कसे असतील . ती एकटी ट्रँव्हलस ने जाणार या कल्पनेने त्यांच्या काळजाला घर पडत होती. ते तिला सोडविण्यासाठी , सोबत येण्याचा विचार करत होते. पण त्यांची तब्येत खुप खराब झाली होती. अंगात भयंकर ताप चढला होता. थंडीही वाजुन येत होती.

वडिल - बाळा तुला मी एकटीला जावु देणार नाही. वातावरण चांगल नाही.

कल्पना - पप्पा तुमची काळजी समजतेय मला . पण तुमची तब्येत अजुन बिघडली तर काय करायचं ? आणि आधीच पैशांची

चणचण , त्यात तुमचा जाण्याचा येण्याचा खर्च . नकोच त्यापेक्षा मी एकटी व्यवस्थित जाईल.

वडिल - अग पण ..

कल्पना - पण बिन काही नाही... ठरलय माझं. तुम्ही येणार नाही..ओके ! आणि तुम्ही विसरताय .. मी कराटे शिकतेय.

वडिलांना मुलीच्या समजुतदारपणाचं कौतुक वाटलं आणि त्याच क्षणी काळजीन जिव मावळल्यागत झाला. वडिलांनी मायेने डोक्यावरुन हात फिरवला.

ठरल्याप्रमाणे , ती ट्रँव्हलसने निघाली. लेडिजच्याच बाजुची सिट तिने बुक केली होती. कल्पनाचे पिरीयड्स चालु होते. सेकंड डे असल्यामुळे फ्लो जास्त होता. त्यामुळे तिचे पोट दुःखत होते. ती त्या वेदना दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करत होती . ट्रँव्हलस साधारणतः 1 वाजता चहा नाश्त्यासाठी थांबते . तेव्हा वाँशरुम ला जावु असा विचार करत ती बसुन राहीली . पण ट्रँव्हलस थांबलीच नाही. आता युरिन कंट्रोल करण अवघड होतं. काय करावं हा विचार करत असतानाच २: ३० वाजता ट्रँव्हलस एका धाब्यावर थांबली . तशी कल्पना पटकन ट्रँव्हलस मधुन उतरली. आणि समोर वाँशरुम कुठे आहे याच्या शोधात नजर फिरवु लागली. धाब्यावर, कबुतरांचे थवे बसावे तशी बेवडी माणसं पित बसली होती. एकही टेबल रिकामा नव्हता. बरेच जण सिगारेट चा धुर सोडत होती. कोण भाजलेले शेंगदाणे खात होतं... कोण चकना .. वाँशरुमचा बोर्ड तिला कुठेच दिसला नाही. तिने दुसरीकडे पाहीलं , तर काही अंतर सोडुन अंधारात उघड्यावर स्ञिया वाँशरुम ची क्रिया करत होत्या . रस्त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांचे फ्लँश लाईट अचानक त्या स्ञियांना तोंड झाकायला भाग पाडत होते . पण कल्पनाला ते मान्य नव्हतं. कस बसणार उघड्यावर ? आणि का बसावं ? तिने परत शोधाशोध करायला सुरुवात केली. अचानक एका गाडीचा फ्लँश लाईट दुरवर चमकुन गेला आणि तिला त्या उजेडात बंद अवस्थेतील एका रुमचं लेडिज वाँशरुम दिसलं.तिला खुप हायस वाटलं. ती मोबाईल च्या उजेडात तिथे पोहचली . दरवाज्याला बाहेरुन कडी होती. तिने ती उघडली आणि आत गेली . आत जाताच तिने दरवाजा बंद केला. ' स्ञियांना जन्मतःच ईश्वराने दिलेली देणगी म्हणजे सिक्थ सेन्स '. जो कल्पना कडेही होता. तिला जाणवलं की कोणीतरी आपल्याकडे पाहत आहे. ती खाञी करणारं तेवढ्यात एक हात तिच्या मागुन आला आणि त्याने तिच्या ब्रेस्ट ला दाबण्याचा प्रयत्न केला. त्या अनोळखी स्पर्शाने ती घाबरली आणि किंचाळली आणि शाँक बसल्यागत गरकन वळली. तो हात झटकुन समोर पाहीलं. बाथरुमला मागच्या बाजुला खिडकी होती . त्याचे गज आणि काचा काढुन टाकल्या होत्या . एक माणुस सहज आत येईल एवढी मोठी उघडी खिडकी होती. त्या खिडकीबाहेर एक बेवडा उभा होता. त्याचे लालबुंद डोळे . वासनांध चेहरा पाहुन कल्पनाचा जिव घाबरुन गेला. १८ वर्षाची कोवळी पोरं.. पहिल्यांदा तिच्यासोबत अस काहीतरी घडल होत. त्या माणसाने खिडकीतुन आत येण्याचा प्रयत्न केला. तीने त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला. पण तो ऐकेना. वाँशरुम मधील फुटकी बकेट तिने त्याच्या डोक्यात घातली. तसा तो थोडा व्हिवळला. ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करु लागली , त्याने पुन्हा तीच्या खांद्यावर हात टाकुन तिला मागे खेचल. तिने त्याचे केस जोरात ओढले . आणि प्रसंगावधान राखुन त्याचा हात पिरगाळला. आणि नाकावर एक जोरात पंच मारला. आणि झटकन दरवाजा उघडुन ती बाहेर पडली. तिथुन जी पळत सुटली ती थेट ट्रँव्हलसच्या दारापाशीच जावुन थांबली . अचानक तिचं अंग लटलट कापायला सुरुवात झाली. कान नाक डोळ्यातुन वाफा बाहेर पडत असल्याची जाणीव होवु लागली. ट्रँव्हलसच्या दोन पायऱ्या चढणही तिला शक्य होत नव्हत. तिचा तोल जात होता. ती कशीबशी चढली. सिटवर मटकन बसली.चेहरा स्कार्फने बांधुन , दातखिळी बसल्याप्रमाणे तोंड न उघडता ती ओक्साबोक्शी रडु लागली. तिचे श्वास जड झाले होते. स्कार्फ ओला झाला होता. तो अनोळखी स्पर्श तिच्या डोक्यातुन जात नव्हता. तिला तिच्या शरीराचा तो स्पर्शित भाग आत्ताच्या आत्ता कापुन फेकुन द्यावासा वाटतं होता. पोटाच्या वेदना जास्तच वाढल्या होत्या. कंट्रोल न होणारं युरिन ति बळच कंट्रोल करत होती. तिच्या मनात असंख्य विचारांच काहुर माजल होतं. अचानक मनात विचार आला पप्पा सोबत असते तर झाल नसत का ? एका अनोळखी स्पर्शाने माझे हे हाल आहेत तर त्या निर्भयाचं काय झाल असेल ? तिला काय वाटलं असेल ? कस सहन केल असेल तिने ? एखादी प्रेग्नेंट वुमेन किती वेळ युरिन कंट्रोल करु शकत असेल ? त्याचा तिच्या शरीरावर काय परिणाम होत असेल ? किती यातना होत असतील तिला तासन् तास कंट्रोल करताना. कित्येक तरुण मुलींना अंघोळ करताना त्यांच्या आया विचारतात , बाळा पाठ घासायला येवु का ? जिने जन्म दिला ति ही स्पर्श करण्यासाठी परवानगी मागते. ती आई जिला शरीरावरची प्रत्येक खुणं माहीत असते, त्या आईला , तिच्या प्रेमळ हाताच्या प्रेमळ स्पर्शालाही मुली लाजेपोटी नाही म्हणतात. बाप, भाऊ , मिञ यांच्या सोबत असताना सतरावेळा ओढणी निट आहे का हे चेक करतात...आणि कोण हे लांडगे परवानगीशिवाय आमच्या शरीराला घाणेरडा स्पर्श करतात. काय अधिकार आहे त्यांना ? या विचाराने कल्पना तळमळत होती.आत्ताच्या आत्ता ही ट्रँव्हलस तोडुन फोडुन बाहेर पडावं आणि त्या माणसाच्या हातांनां दगडाने चेचाव अस तिला वाटत होतं. जोरजोरात रडावं... किंचाळावं.. का ? काय मिळालं त्याला तिथ स्पर्श करुन ? असं कोणत समाधान मिळालं ? का ...?? का ..?? राञभर ती रडत होती. राञभर पोट दाबत होती.

सकाळी सकाळी ती हाँस्टेलवर पोहचली. राञभर युरिन कंट्रोल केल्याने , तिला युटिआय इंनफेकशन झाल होत. अनबिअरेबल अँबडाँमिनल पेन चालु झाले. बराच ञास तिला सहन करावा लागला फिझीकली आणि मेंटली सुद्धा . ती राञराञ विचार करण्यात घालवु लागली . आणि शेवटी तिने काहीतरी ठरवलं तेव्हा कुठे तिच्या मनाला शांती मिळाली. इंजिनीअरिंग पुर्ण झाल्यावर , तिने स्वतः चा बिझनेस स्टार्ट केला . बरीच मेहनत केली . पै पै जोडुन स्वतःच्या स्वप्नांसाठी ती झटु लागली. काही इन्हेस्टर्स , बँकेकडुन काही लोण घेवुन शेवटी तिने तिची कल्पना सत्यात उतरवली. वुमेन ट्रँव्हलस आगळी वेगळी ट्रँव्हलस . जी फक्त महिलांसाठी आहे. त्यात महिलांसाठी स्वच्छता गृह आहे. ट्रँव्हलसच्या ड्रायव्हर पासुन , सर्व वर्कर्स लेडिजच आहेत. ट्रँव्हलस मध्ये एक काँर्नर आहे , जिथे रेडिमेट चहा , काँफी आणि स्नँक्स आहे. महिलांचा प्रवास सुखाचा आणि सुरक्षित करण्यासाठी या ट्रँव्हलसचा जन्म झाल्याचे सांगुन कल्पना ने कार्यक्रमात उपस्थित सर्वांची मन जिंकली.टाळ्यांच्या कडकडाटात सर्व स्ञियांनी उभारुन तिला स्टँन्डिंग अवेशन दिले. उद्घाटन सोहळा व्यवस्थित पार पडला. आता वेळ होती पहिल्या ट्रिपची लातूर ते पुणे वुमेन ट्रँव्हलस !

नवी कोरी वुमेन ट्रँव्हलस दिमाखात नटुन थटुन सर्वांच्या स्वागतासाठी उभी होती . सर्व महीला प्रवाशी त्यात चढल्या . महिला वर्कर्स आणि कल्पनाही पहिल्या प्रवासासाठी सज्ज झाल्या . वुमेन ट्रँव्हलस रोडवर धावु लागली. ट्रँव्हलस मध्ये सर्व वयोगटातील स्ञिया प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी आल्या होत्या. त्यात एक १४ वर्षाची मुलगीही होती. राञीचे १ वाजले होते. त्या मुलीच्या पोटात अचानक दुःखु लागले. तीला पहिल्यांदा पिरीयड्स आले होते. ती चिमुरडी भांबावली होती. काय होतय ते कळत नसल्याने ती रडत होती. क्षणाचाही विलंब न करता , एक लेडी वर्कर तिला आई एवढ्या मायेने वाँशरुम मध्ये घेवुन गेली. कल्पनाच्या चेहऱ्यावर पहिली समाधानाची लकेर पसरली . क्षणभर तिच्या मनात विचार डोकावला , आज इथे साधी ट्रँव्हलस असती तर ? ट्रँव्हलस मध्ये पुरुषांच्या मानाने स्ञिया कमीच असतात. या चिमुरडीने काय केल असत ? ट्रँव्हलस थांबली असती का तिच्यासाठी ? तिने कुणाला मदत मागीतली असती. तिला उघड्यावर जाव लागलं असत तर ? किंवा जे माझ्या सोबत झालं ते हिच्यासोबत झालं असत का ? नाही जे माझ्या सोबत झालं ते इतरांसोबत होवु नये म्हणुन तर ही ट्रँव्हलस मी जन्माला घातली. नाहीतर अश्या घटनांना दुर्लक्षित करुन , गप्प बसणार्याही खुप असतात. काही , सरकारने आम्हाला सौरंक्षण द्याव , आमची काळजी घ्यावी म्हणुन फक्त बोलणार्याही असतात. सरकारने तर हे करायलाच हवं.. पण आपणही एक नागरिक म्हणुन स्वतः साठी आणि देशातील इतरांसाठी काहीतरी करायला हवं. वाट बघण्यात काहीही अर्थ नसतो. वाट पाहत बसलो तर अनेक वर्ष अशीच जातील. त्यापेक्षा आपणच बदल घडवायला हवा. आज ही ट्रँव्हलस लातूर ते पुणे आहे , लवकरच देशभरात याची व्याप्ती होईल याची दखल मी घेईल...असा ठाम विचार करुन कल्पना खिडकीतुन बाहेर पाहण्यात रमली. समाधानाने गार वारा ती चेहऱ्यावर घेत होती.

स्वतः बदलाचा भाग होउन बदल घडवणारी कल्पना माझ्यासाठी युगाच आहे.