ऋतुजाच घर आलं .... घराच्या समोर कार पोहचताच ती श्री ला म्हणाली ,
" थांबवा .... आलय माझं घर very very thanx तुम्ही नसते आलात तर अद्यापही
मी तिथेच थंडीत कुडकुडत बसलेली असती सरीना झेलत .... "
" सांभाळून जा ! " एवढच म्हणतं त्याने गाडी सुरू केली .....
गेट उघडून आत शिरतचं ऋतुजा स्वतः शीच पुटपुटली ," संभाळून जा म्हणे ..... हं
पोटात कावळे ओरडून राहिलेत माझ्या .... "
ऋतुजा बाहेरून येऊन थकून गेली होती सोफ्यावर पडतचं ती आईला बोलत होती ..
" आता आपण सर्व जेवन करून घेऊ .... बेटा तू आता आमच्या सोबत जेऊनच घे ! "
आशुतोषलाही आवाज दिला .....
तिकडे श्री घरी जाऊन बिछाण्यावर खिळला ... आईने त्याला जेवन करायला आवाज
देऊनही तो बेडवरून उठला नाही ... सारखा ऋतुजाच्याच विचारात मग्न होता . त्याला कळत
नव्हत आपल्या सोबत का होत आहे असं ?? आपण कोणत्या दुनियेत जगत आहोत ??
आज तिच माझी ऋतुजा जिच्यावर मी प्रेम केलं तिला मी घरी ड्रॉप करून दिलं
पण , एवढा वेळ सोबत घालवून आपण तिच्या समोर आपल्या मनातली भावना व्यक्त
नाही करू शकलो ... नाही तिला असं सांगणार कसं आपण ?? की , मी तुझ्यावर
प्रेम करतो ती तर चक्क विसरूनही गेली आपण दहावी पर्यत एकाच वर्गात होतो ..
तिला खरचं आठवत नसेल का ? नाही तिने आठवूण घेण्याचा मुद्दामहून प्रयत्न नसेल
केला ....
माझं प्रेम हे एकतर्फीच राहिल शेवटपर्यत माझ्यासाठी कारण , मला
वाटतं ऋतुजा माझी कधी होऊच शकणारं नाही ... ( श्री मनातल्या मनात कोसत
होता स्वतः ला .)
तीन चार वर्षाआधी बीटेक
करण्यासाठी जेव्हा श्री दिल्लीला गेला होता तेव्हा त्याच्या शहरातल्या मित्रासोबत
ऋतुजाचा भाऊ आशुतोष त्याचा रूममेट म्हणून तिथे पाचसहा महिण्याने राहायला
आला ... आशुतोष हा मेडिकलचा स्टुडन्ट आणि श्री हा इंजीनियरिंगचा स्टूडन्ट
तरी दोघामध्ये मस्त गट्टी जमली .... एका शहरातलेही होते ते दोघ बाकी तीन मित्र
दुसर्या शहरातले असे पाच मित्र एका रूममध्ये रहायचे .. काही दिवसानं श्री आणि
आशुतोषला जानवून आलं आपली गाण्या पासून कलर पासून खाण्यापर्यतची चोईस
किती सारखी आहे ... टी-शर्ट घ्यायला दुकानात गेल्यावर जे शर्ट आशुतोषच्या
पसंदीला यायचं तेच श्रीला ... रूममधले तिघ मित्र जयेश , रंजित , पराग ते तर
ह्या दोघाना गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणून चिडवायचेही ...
वर्षाचा शेवट शेवट श्रीच बीटेक संपत आलं तेव्हा झालं काय .... पराग एका
मुलीच्या प्रेमात पडला ती मुलगी आशुतोषचा मेडिकल कॉलेज मधली त्याची
क्लासमेटच त्याच्याच रुमच्या समोर तिची चार फ्लोरची इमारत होती . ती मुलगी
जाता येता सारखी परागच्या नजरेत भरायची तो तीला रूममधूनबघत रहायचा ती
बाहेर कधी पडते म्हणून .... ती बाहेर पडली की हा सारखा तिचा जाण्यायेण्यावरचा
पहारा ठेऊन बसलेला असायचा ...
तिचं नाव होतं आराध्या .... ती दिसायला छान आहे म्हणून पराग तिच्या
सौदर्यांला भुलला पण ,
तिला कळलं आपला क्लासमेट आशुतोष इथे समोरच रहातो .. ती त्याच्या सोबत
हळूहळू ओळख पटवण्याचाही प्रयत्न करते .. मित्र म्हणून तो तिचा संपर्कात असतो
ती मात्र आशुतोषचा प्रेमात पडते ..
कॉलेजला जाता येता ती त्याला लिफ्ट देते ...
परागला वाटते आशुतोष आणि आराध्या मध्ये काही चालूच आहे .. तो तसं
त्याला डायरेक्ट विचारू शकतं नाही ..
आपल्या मनातील भावना तो कुणाच जवळ व्यक्त करू शकतं नाही . जयेश तो तर
बाहेर असायचा कॉलेज पार्ट टाईम जॉब ह्यातच त्याचा वेळ निघून जायचा . रूमवर
येऊन तो कधीकधी न जेवता झोपी जायचा .. रंजित त्याला तर पुस्तकाच्या
पलीकडचं जग ठाऊकच नव्हतं म्हणावं लागेल ...
श्री जवळ वेळ असायचा दिवसभर कॉलेज मधून आल्यावर चार नंतर तो रूमवर
पडूनच आपला पुर्ण वेळ स्टडीला दयायचा .. पराग कॉलेजवरून आल्यावर त्याला
एकदा वाटलं आपल्या मनात साचलेला सर्व गाळ आपण आज श्री समोर उघड करावा
तो नक्कीच मला समजून घेईल म्हणून पराग आपली कॉलेजची बँग खांद्यावर उतरवून
ठेवत श्री जवळ जात त्याला म्हणतो ,"
श्री मला तुला काही सांगायचं आहे ...." त्याच्याकडे बघत श्री म्हणतो ," हं सांग ऐकतो
आहे ...."
....
......
" मी ....."
" हं समोर बोल .... "श्री परागला म्हणतो ....
" मी ..... एका मुलीचा प्रेमात पडलो . "
घाबरतच त्याने श्री ला बोलून दाखवलं ....
" काय वेड विड लागलं का तुला की प्रेमाचं भुत झोमलं .... कोण ती ? "
त्याला रागवतं आणि दटावतच समोरचा प्रश्न श्रीने केला ...
" ती आराध्या ... आपल्या रूम समोरची इमारत ."
आपल्या रूम समोरच्या इमारतीत कोणी आराध्या रहाते हे तो पहिल्यादा
परागच्या तोंडून ऐकत होता श्री मुलीपासून खुप लांब होता दरम्यान चा काळात
पाचवी सहावी पासुन आणि नंतरही त्याच्या मनात घर करून होती ती ऋतुजा ...
" मग सांग ना तिला जाऊन ...."
......
......
......
......
दोन तीन मिनिट स्तब्ध राहून पराग म्हणाला ,"
अरे ती माझी नाही होऊ शकतं ."
परागच्या मनात शंका होतीच की आशुतोष आणि आराध्या मध्ये काहीतरी सुरू आहे .
तो तसचं श्री ला बोलला . पण , पराग समजतं होता तसं त्यांच्यात काहीच नव्हतं .
" तिच्यावर दुसरा कोणी तरी प्रेम करतो ...."
" तुला कसं माहिती ?? " तो कोण आहे हे विचारण्या ऐवजी श्री ने त्याला विचारले .
" बघितलय रे मी स्वतः च्या डोळ्यांनी ......"
रडवल्या स्वरात मनात खेदाची भावना उत्पन्न करून पराग बोलला .
" ओहहहहह मग जाऊ दे ना तिच्या सुखाची आस धर ती त्याच्यासोबत खुश आहे
ना ! ह्यात तू आनंद मानून जग ...."
" पण , मला तिला सांगायच आहे ....."
" तुला जे वाटते ते कर ....." त्याच्यावर चिडतच श्री म्हणाला .
परागने आपल्या बँग मधून रजिस्टर काढलं त्याचं पेज फाढल आणि लिहायला बसला ....
त्याची ही activity बघून श्री वैतागतच त्याला म्हणाला ,"
हे काय करतो आहे आता ...."
" चिठ्ठी लिहितो आहे तिला ......" चिठ्ठीवर प्रिय आराध्या लिहतचं तो उद्गारला .
त्याच दिवशी आराध्या आशुतोषला बागेत नेऊन प्रपोज करते . आशुतोष तिला
प्रपोज स्विकारायला काही अवधि मागतो .
परागची चिठ्ठी लिहूनही पुर्ण होते .. पण , तो ती चिठ्ठी स्वतः तिला द्यायला
तयार होतं नाही .. तो हे काम श्री ला सांगतो .
" श्री अरे तू मित्रासाठी एवढं नाही करू शकतं का ? प्लिज माझ्यासाठी
ती येतच असेल तू बाहेर जाऊन उभा रहा ती आली की दे तिला ही चिठ्ठी ..."
आराध्या एकटीच त्या दिवशी आपल्या कारने येत होती आशुतोषला काही काम
होतं म्हणून तो कॉलेज मध्ये थांबला होता ....
आराध्याची कार येताना दिसली तसा श्री समोर जाऊन उभा राहिला ती कार मधून
उतरतच त्याने ती चिठ्ठी आराध्याला देत म्हटलं ," हे चिठ्ठी तुझ्यासाठी ...."
ती त्याच्याकडे एकटक बघतच होती तिला मनात वाटलं हा तर आशुतोषचा रुममेटस
ना ! ती म्हणाली ," आपले नाव ??"
" श्री ...." असं म्हणतच तो तिथून वेगाने रूम मध्ये आला ..
आराध्या आपल्या बेडरूममध्ये जाऊन फ्रेश झाली आणि ती चिठ्ठी वाचायला हाती
घेतली .... तिला वाटलं नव्हतं आपल्या वर एवढं प्रेम करणारा कोणीतरी आहे .
क्षणभर तिच्या डोळ्यातून आसवाची गळती होत होती .... पत्राच्या खाली परागने
तुझ्यावर प्रेम करणारा मी एकतर्फी प्रेमी असं टाकल्याने तिला वाटलं श्री तिच्यावर प्रेम
करतो
आणि ते पत्र तिला श्री ने
दिल्याने तिला हे आशुतोषला सांगायचच होतं म्हणून ती ताबडतोब कॉल करून एका
कॉपी शॉप मध्ये आशुतोषला भेटायला बोलवते त्याला ते पत्र दाखवून ती सांगते
हे पत्र मला श्री ने दिलं ....
आशुतोषच्या पायाखालची जमिनच सरकते त्याचा विश्वास बसत नाही
श्री असं करू शकतो ह्या गैरसमजूतीतच तो कुणाच एक न ऐकून घेता त्याच रात्री रूम
सोडून जातो ....