मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर कॅनडा वरून येणार एक विमान थांबत..
राधा विमानतळाच्या वैटिंग रूम मध्ये बसलेली असते ती तिच्या कॅनडावरून येणाऱ्या चुलत भावाची..म्हणजेच राजेशीची वाट बघत असते..
मूळचा कोल्हापूर चा असलेला राजेश पुण्यातुन 10 वि ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या नंतर राजेश कॅनडा ला उच्च शिक्षणा साठी गेला होता..आत्ता शिक्षण पूर्ण झाले म्हणून पुन्हा तो आपल्या मायदेशी परतत होता..
जशी अनौसमेन्ट झाली तशी राधा लॉबी मधून बाहेर आली आणि राजेश कुठल्या गेट मधून बाहेर येतोय का ते पाहायला लागली..
तेवढ्यातच तिला राजेश दिसला..
ती मोठ्याने ओरडली..
"hiiiiiii राजेश"
राजेशनेही हात दाखवून प्रतिक्रिया दिली..
जवळ येताच राधा ने त्याला विचारले..
"कसा आहेस आणि कसा झाला प्रवास"
राजेश "अग हो हो सगळं इथेच विचारणार आहेस का चल आधी गाडीत बसू मग बोलू"
दोघेही बहीण भाऊ गाडीत बसले..
राजेश "हां बोल आत्ता"
तू कशी आहेस आणि काका काकी कसे आहेत..
राधा "सगळे मज्जेत"
राजेश "मस्त..आत्ता मला सांग आपण आत्ता कुठे चाललोय"
राधा "कुठे चाललोय म्हणजे घरी..पुण्याला..!"
राजेश "नको एक काम कर ड्राइवर ला सांग आधी आपण कोल्हापूर ला जाऊया..
कोल्हापूर च्या अंबाबाई च दर्शन घेऊया मग तिथून घरी जाऊया चालेल का..?"
राधा"नको..आज नको तू आजच आलाय तू दमला असशील आधी आराम कर थोड्या दिवसांनी जाऊ मग आपण सगळे.."
राजेश "नको मला नेहमी वाटायचं की जेव्हा मी भारतात परतेंन तेव्हा सगळ्यात आधी कोल्हापूर ला जाऊन देवी च दर्शन घेईन नंतरच माझ्या कॅरिअर ला सुरवात करेन.."
राधा "ठीक आहे तस मला येण्यासारखं नव्हतं तरी पण चल आत्ता तुझी ईच्छा आहे तर.."
गाडी अडीच तीन तासातच कोलपुरात पोहचते..
राधा आणि राजेश मंदिराच्या जवळच उतरतात आणि ड्रायव्हर गाडी पार्क करण्यासाठी गाडी घेऊन जातो..
राजेश"चल आपण देवी साठी ओटी आणि नारळ घेऊया.."
राधा"नाही तूच घे..मला घेण्यासारख नाही आहे.."
राजेश.."बररर.."
असं म्हणून राजेश दुकानातून नारळ आणि ओटी घेतो..
राजेश "चल आत्ता मंदिरात तरी येणार आहेस ना..?"
राधा "अरे नाही तुला बोलली ना मी मला नाही येण्यासारखं
तूच जाऊन ये मी थांबते बाहेर.."
राजेश"अग मागास पासून ऐकतोय मी मला नाही येण्यासारखं नाही येण्यासारखं नेमकं झालाय तरी काय.."
राधा"अरे मला आज 2 दिवस आहेत(मासिक पाळी)आहे..
म्हणून म्हटलं मला नाही येण्यासारखं..
राजेश"ओहहहहहह..म्हणजे तस आहे म्हणून नाही येणासारखं का.."
म्हणजे इतक्या वर्षात हे बदललंच नाही का..?
राधा"बदलल नाही म्हणजे"
राजेश "म्हणजे हेच की ह्या तुमच्या मंथली डेझ मध्ये कुठल्याही मंदिरात देवघरात इव्हन घरामध्ये सुद्धा वावरायच नाही ते.."
राधा"तस ते आधी पासून चालत आलाय ते कसं बदलेल..
तू जाऊन ये बघू मंदिरात नकोस वाद घालू माझ्याशी..
जा बघू"
राजेश "नाही हा वाद घालण्याचा विषय नसून वाद सोडवण्याचा विषय आहे.."
मासिक पाळी हा तुम्हा महिलांचा दोष किव्हा एकदा रोग नसून ती फक्त एक नैसर्गिक क्रिया आहे..
आणि त्याचा कुठल्याही देव किव्हा धर्माशी काहीच संबंध नाही..
कुठल्याच ग्रंथात किव्हा धार्मिक पुस्तकात त्याचा उल्लेख नाही..
मग हे सगळ का??
आपल्या ह्या देशात विनाकारण काही महिलांना पाच दिवस हा जाच सोसावा लागतो..
काही ठिकाणी तर महिलांना घरामध्ये प्रवेश करन्यास पण मनाई असते..
मग ही एक प्रकारच अनिष्ट प्रथाच झाली ना...
मग ही अनिष्ट प्रथा का बंद होऊ नये..
भारतात सती जाणे..बालविवाह ह्या प्रथा बंद झाल्याचं ना मग हे का नाही बंद होत..
ह्याला का नाही कोण विरोध करत..
राधा"हो बाबा तू आलंयस ना तू कर आत्ता बंद पण आधी आत जाऊन दर्शन घेऊन ये बघू लवकर
मी थांबते इथेच बाहेर"
राजेश"एक मिनिट मी जर आत जाईन तर तुला घेऊनच जाईन..
आणि आपण सुद्धा एका देवीच्याच दर्शनाला आलोय ना..
ती सुद्धा एक स्त्री आहे ना..
मग एका स्रीरूपी देवीच्याच गाभाऱ्यात जायला एका स्त्री मज्जाव का..?
तू एवढी शिकलेली आहेस मग तू सुद्धा ह्या विरोधात आवाज उठवायला हवा...
एरवी तुमच्या स्त्री-पुरुष समानता जाग्या होतात ना मग इथे का नाही..
एखादा व्यक्ती ज्याच्यावर खून,बलात्कार,दरोडे असे गुन्हे दाखल असतात तो देवाचे दर्शन घेऊ शकतो ते सुद्धा व्ही.आय.पी रांगेतून..
पण त्यांचं ठिकाणी एका निष्पाप महिलेला त्या देवाच्या गाभाऱ्यात जाण्यास मनाई असते..
ही असमानता का..??
कुठली ही परंपरा आणि कुठली ही संस्कृती..??
(राधा तो जे काय बोलतोय त्याकडे तोंड उघड ठेवून ऐकतच असते)
राधा"हो अरे मला ही वाटत हे सगळं बंद झालं पाहिजे पण कोण करेल बंद एकदा एकदा होईल पुन्हा थोड्या दिवसांनी आहे तस चालूच आणि खेड्यापाड्या मध्ये तर हे चालूच राहणार जोपर्यंत तिथे कोण पोहचत नाही तोपर्यंत"
राजेश "असुदे आपण करू बंद ते म्हणतात ना चांगलं काय करायचं असले तर त्याची सुरवात आपल्या घरापासून करायची असते आपण करू सुरवात..
आणि ह्या विषयावर मी एक आर्टिकॅल च लिहणार आहे आत्ता आपण करूच ही प्रथा लवकरात लवकर बंद..
तू चल आत्ता माझ्याबरोबर आत बघू आपण देवी च दर्शन घेऊया.."
राधा होकारार्थी मान हलवते आणि दोघेही जाऊन देवीचं दर्शन घेतात..
आपल्या संस्कृतीत आणि परंपरेमध्ये अश्या काही ज्या अनिष्ट प्रथा रूढी अजूनही आहेत त्या लवकरच नष्ट व्हायला हव्या..हीच देवीच्या चरणी मागणी..
धन्यवाद..!!
लेखक:- सुशिल सुर्यकांत पाडावे