लेख- १
लक्ष आणि दुर्लक्ष
--------------------
नमस्कार मित्रहो - प्रेरक -विचार या लेखमालेच्या निमित्ताने आपली नियमितपणे भेट होते आहे , या अगोदर आपल्या साठी भाग-१- आणि भाग -२ मी सादर केले . हे लेखन कसे वाटते आहे ? अभिप्राय जरूर द्यावेत.
भाग -३ रा आपल्या समोर आहे ,हे लेखन सुद्धा तुम्हास नक्कीच आवडेल .
माणसे सध्याच्या दिवसात इतके बिझी होऊन गेलेले आहेत की ..मनाजोगता वेळ काढून मनातले काही आपल्या जवळच्या मित्रांला कशी "शेअरिंग "करावेसे वाटत असते पण व्यस्ततेमुळे इच्छा असूनही न करता येणे .अशी काहीसी द्विधा मन:स्थिती होऊन जावी असे होणे फारसे नवलाचे ठरणार नाहीये .त्यामुळे कित्येकदा "लक्षात असून वेळेअभावी दुर्लक्ष होऊन जाते .
मी लक्षात ठेवून तुम्हाला काही सांगतो आहे ..त्याकडे तुम्ही "लक्ष दिले तर "या सांगण्याचा उपयोग आणि दुर्लक्ष केले तर",हे लेखन प्रयोजन कारणी लागले नाही अशी माझी भावना असेल. थोडक्यात काय..
लक्ष आणि दुर्लक्ष " हे दोन अत्यंत महत्वाचे शब्द आपल्या दैनदिन हरघडी परिणाम करून जाणारे आहेत ..त्यासाठी काही उदाहरणे तुमच्या समोर ठेवतो ..ते पाहून तुम्ही म्हणाल ..अरेच्च्या - खरच की ..!
१. घराकडे नवरा आणि बायकोचे लक्ष असेल तर ..घर व्यवस्थित रहाते ,दोघात समन्वय आणि सुसंवाद असेल तर "कुणी पाहुणे वा निमंत्रित स्नेहीजन येतात त्यावेळी पाहुणचार करतांना फजिती होण्याचे प्रसंग उद्भवत नाहीत.
आपण ज्या ज्या वेळी इतरांच्या घरी जात जातो ..त्यावेळी त्यांच्या घरातील वातावरण लक्षपूर्वक पाहिले तर ,अशा निरीक्षणातून .आपल्यातील न्यून दूर करण्यास खूप मदत होत असते ...अगत्यशील -स्वागतशील यजमान " होण्यासाठी दोघांचेही सगळीकडे चौफेर असे लक्ष असणे आवश्यक असते .
या उलट - जिथे नवरा-बायकोत परस्पर सहयोग नाही " ,याचे तिला काहीच माहित नसते .आणि " .ती घरात कसे करते ? काय करते ",याकडे नवर्याचे कधीच लक्ष नसते " . आणि या गोष्टींचे त्याला आणि तिला अजिबातच महत्व नसते " , ..अशा ठिकाणी ..दोघांच्या ही "दुर्लक्ष करण्याच्या सवयीचे परिणाम - घरभर दिसून येतात ",
माझे सांगणे वाचून "घरात लक्ष देणारी आणि घरात दुर्लक्ष असणारी "अशी अनेक व्यक्ती-रूपे तुम्हाला या क्षणी नक्कीच आठवतील.
२.नवरा-बायको " पुढे "आई-बाबा " या भूमिकेत शिरतात .आणि या नवीन जबाबदारीच्या ओझ्याने गोंधळून जातात ,काहीजण नको तितके दक्ष होऊन "लक्ष देण्याचा अतिरेक करतात आणि आपल्या बालकांना परेशान करून टाकीत असतात ..
आई-बाबांचे आपल्या मुलांकडे लक्ष असणे ", ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ..मुलं घरात आणि बाहेर कशी वागतात ?, शाळेत कशी वागतात ,सगळ्यांशी त्यांचे मित्रत्वाचे नाते आहे काय ? मुलांना योग्य संगत लाभली आहे का ? या काळजीच्या आणि चिंता करण्याच्या गोष्टीकडे प्रत्येक आई-बाबांचे लक्ष असणे गरजेचे आहे.
यासाठी .,वेळेवर लक्ष दिले तरच .."मुलं भरकटणार नाहीत ",आणि दुर्लक्ष झाले तर वेळेवर लक्ष दिले नाही" याचा आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल " हे पण लक्षात ठेवावे .
मोठ्या माणसांना एक समजून घ्यावे लागेल ..की " घरातील मोठ्या व्यक्तींना,आणि मुलांना कैदेत असल्या सारखे वागवू नये "त्यांच्यावर ..लक्ष असावे ..पण.ते अति-लक्ष असू नये याची काळजी घेतली पाहिजे .." दुर्लक्ष मात्र कधीच करू नये .म्हणूनच आपले ."दुरून लक्ष असणे" हे कधीही उत्तमच असेल.
२.लक्षात ठेवून यश -प्राप्तीबद्दल अभिनंदन करावे ,मदतीबद्दल आभार मानावेत , काम केल्या बद्दल धन्यवाद द्यावेत , दिन-विशेष "असेल त्या प्रमाणे शुभेच्छा द्याव्यात ,अभिष्ट्-चिंतन करावे, आशीर्वाद द्यावेत ,उपकाराबद्दल कृताद्न्ता व्यक्त करावी , कार्य-पुरती बद्दल ,उत्तम नियोजनाबद्दल ,आयोजनाबद्दल आवर्जून कातुक करावे , शाबासकीची थाप द्यावी ..
या सर्व गोष्टी मनापसून केल्या तर ..तुम्ही एक उत्तम व्यति आहात " ही गोष्ट लोक कायम लक्षात ठेवतात .
आणि या उलट ..जे लोक इतराकडे दुर्लक्ष करून..स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासठी धडपड करीत असतात " अशा लोकाडे सगळे लोक "दुर्लक्ष करीत असतात ".
२.आपण ज्या कार्यक्षेत्रात कार्यरत असतो त्या ठिकाणी आपण कार्यदक्ष असणे म्हणजेच "सगळेकडे आपले लक्ष आहे..कामाबद्दल सगळी माहिती आहे " असे आपल्याबद्दल मत बनवले जाते .आणि "कामाचा माणूस आहे "असा लौकिक वाढत जातो .
.आणि कामात लक्ष नसणारा ,कामाकडे दुर्लक्ष करणारा माणूस "अशी ओळख झाली , कीर्ती पसरली की ..मग इथून तिथून "दुर्लक्ष केले जाते "
सारांश - दुर्लक्ष करण्याची सवय लक्षात ठेवून दूर करावी.
-------------------------------------------------
लेख -२.
बोलावे- किती- कसे –कुठे ?
----------------------------------------------------------
आपल्या दिवसभराच्या वेळापत्रकानुसार आपण कधी एखाद्या ठिकाणी आपण जाऊन येतो , कुणाच्या घरी , एखाद्या कार्यक्रमाला जात असतो , आपल्या सोशल -लाईफ मध्ये तर नेहमीच विविध ठिकाणी आपण हजर रहात असतो .
प्रत्येक ठिकाणी एकाचवेळी अनेक व्यक्तींशी आपण बोलत असतो ..अशावेळी परस्पर सवांद होत असतांना ..त्या त्या व्यक्तीच्या बोलण्याच्या -आणि त्यानुसार त्याच्या वागण्याचा आपल्या मनावर थेट मोठा परिणाम होत असतो. अशा ठिकाणी व्यक्ती--रूपाचे इतके विविध रंगी -विवध ढंगी नमुने एकत्र आलेले असतात की.या सगळ्यांना भेटून .नंतर आपल्या .मनात .मैत्रीभाव ,आदर, सन्मान ,या सोबतच काहीजणांच्या बद्दल मात्र तिरस्कार , कंटाळा ,वैताग ,अशा अनेक भावना एकाचवेळी निर्माण होतात ..
काहीवेळा एखाद्या ठिकाणी जाऊन येतो ,समारंभ होऊन जातो ,तिथे मत प्रदर्शन करणे बरे नसते या विचाराने गप्प राहून घरी आल्यावर मात्र आपण स्वतःशीच म्हणून मोकळे होतो - बाप रे -या ठिकाणी गेलो नसतो तर फार बरं झाला असतं ,"
मजा येण्ने तर दूरच , एका पेक्श एक नग भेटले .त्यांना भेटून आणि यांचे "एकमेकांचे बोलणे .ऐकूनच डोके फिरून गेलयं राव , वैताग...नुसता ...!
मित्रांनो असे होणे हा माझाच नव्हे तर .तुमचाही असाच अनुभव असू शकतो ताची कल्पना आहे.याचे कारण एकच आणि ते म्हणजे - माणसांचा -स्वभाव ".
काही माणसे स्वतःच्याच प्रेमात पडलेली असतात ..मी यंव .आहे..मी त्यंव आहे..."हे कौतुक-गाणे -रेकार्ड " लावून देतात के बस रे बस , " किती बोलावे ? याचे भान विसरून गेलेली अशी माणसे .समोरच्या व्यक्तीला बोलण्याची संधी देत नाहीत ,स्वताच्या असलेल्या आणि नसलेल्या मोठेपणाची ( ? ), टिमकी वाजवत रहाणे हेच त्यांचे काम असते , शेकडो वेळा आपण या गोष्टी लोकांना सांगितल्या आहेत ",हे विसरून अशी माणसे ..आपल्या समोरच्या माणसाची संयमाची परीक्षा पहात असतात .
काहीजणाना आपण कुणाशी बोलत आहोत याचे भान नसते.आणि ते जाणून घेण्याची त्यांची तयारी नसते .."अज्ञानातही -प्रचंड आत्मविस्वास बाळगून तारे तोडणार्या माणसांना पाहिले की मला त्यांचे कौतुक करवावे वाटते , आपण कोण आहोत ,आपल्या मर्यादांची जाणीव न ठेवता ..एखाद्या विद्वान व्यक्तीला सुद्धा गप्पगार करण्याची यांची क्षमता "पाहून भलेभले चकित होऊन जातात ,आणि कुणीतरी मध्ये हस्तक्षेप करून .या बोलक्या -बाहुल्याच्या तावडीतून खरोखरच्या ज्ञानी व्यक्तीची सुटका करतो " हे पाहून विचार येतो .बोलणे " म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा घटक आहे.त्याला अजिबात महत्व न देणारी माणसेच माणसे भवताली वावरतांना दिसून येतात.
काही ठिकाणी तर ..- स्वतःच्या वागण्याने .अस्तितवाने .स्वताचे हास्यास्पद -असे फिरते प्रदर्शन घडवणारी माणसे भेटतात ,त्यांचे रहाणे ,त्यामुळे त्यांचे दिसणे ..काहींचे त्यांच्या वयास न शोभणारे वागणे -वावरणे " हे सगळा पाहून..बघणार्याने लाजावे अशी परिस्थिती असते ...कुठे -किती -कसे ? हे तीनही प्रश्न अशा माणसांना पडत नसतील का कधी ?..माझ्या मते तर.असे कळत असते पण ते काही केल्या वळत नसते .कारण एकच ..मी -आणि मीच " याचा अतिरेक ..सगळ्या ठिकाणी असतो. लोकांच्या चर्चेचा विषय ..मग.त्यासाठी "काहीपण करण्याची अशा माणसांची तयारी असते..म्हणून..आपल्या बोलण्याला .कुणी हसेल का ? हा पोरकटपणा पाहून लोक मनातल्या मनात चिडत असतील ..हे माहिती असून सुद्धा अशी माणसे बिलकुल बदलत नाहीत ..
लहान -थोर, स्त्री-पुरुष , तरुण-तरुणी ..वयोगट कोणताही असो ..लोकांच्या आपल्याकडे बघण्याची एक नजर असते , आपण कसे असुत, कसे बागतो..बोलतो याबद्दल त्यांच्या निश्चित अशी अपेक्षा असते ..नेमक्या या परीक्षेत आपण नापास होणे .ही खचितच शोभणारी गोष्ट नाही.
ज्या व्यक्तीच्या बोलण्यात सौम्यपणा ,आदर व्यक्त होणारी भाषा , नम्रपणा ,समवयस्कांशी बोलतांना अपेक्षित असणारा समंजसपणा , मृदू आणि कठोर नसणारे शब्द..लहानांशी लहानहोऊन खेळकरपणे वागणारा -बोलणारा ..मोठ्यांशी तितक्याच आदबशीरपणे ..त्यांचे ऐकून घेत मोजक्याच शब्दात बोलणारा " असे वागणारे नक्कीच आहेत ,अशा व्यक्तींच्या सहवासात रहाणे ..त्यांना अनुभवणे..हे एका अर्थाने एक खरे संस्कार-शिबीर "असेल. आपण मन:पूर्वक ते अनुभवले तर.. कुठे -कसे- आणि किती बोलावे" याचे शिक्षण नक्कीच घेता येईल..
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२