Prerak - Vichar - 2 in Marathi Motivational Stories by Arun V Deshpande books and stories PDF | प्रेरक- विचार - भाग-२

Featured Books
Categories
Share

प्रेरक- विचार - भाग-२

प्रेरक-विचार - भाग-२

---------------------------------------

लेख- १.
समारंभ आणि कार्यक्रम ..!
---------------------------------------------
प्रसंगानुसार आपण अनेक ठिकाणी जातो. अशावेळी एक गोष्ट हमखास अनुभवावी लागते ..जी अगदी कॉमन आहे. मी घेतलेला हा अनुभव .तुम्ही सुद्धा अनेकदा घेतला असेल. एखद्या समारंभाच्या ठिकाणी फक्त यजमान आपल्याला परिचित असतात, किंवा त्या परिवारातील एखादाच मेम्बर आपल्या मित्रपरिवारातील असल्यामुळे आपण समारंभाला आलेलो असतो , बाकी त्यांच्या परिवारातील इतरांशी आपला परिचय नसतो, ओळख तर नसतेच , केवळ एक -परिचित -म्हणून निमंत्रित "तरीही अनोळखी " असे आपले त्या ठिकाणी स्थान असते .

हे असे समारंभ ,कार्यक्रम ..जास्त करून पारिवारिक - असतात , आपल्या परिचितांच्या -स्नेहीजानाच्या -आणि नातेवाईक या अशा -वर्तुळातील एखाद्या महत्वाच्या व्यक्ती कडून ,नातेवाइका कडून अगदी आग्रहाचे निमंत्रण दिले जाते ,आणि आपल्याला अशा कार्यक्रमांना जावे लागते ,
अशा कार्यक्रमांचे उदाहरणे घायची झाली तर. हे पारवारिक स्वरूपाचे समारंभ कधी मोठ्या स्वरूपाच्या समारंभाचे असते तर ,कधी निवडक पाहुण्यांच्या उपस्थित होणारे कार्यक्रम .असे .यांचे स्वरूप असते - उदा- बारसे , मुंज ,, मुलांचे वाढदिवस, तरुणांचे वाढदिवस, जोडप्यांचे लग्नाचे वाढदिवस, एकसष्ठी ,अमृतमहोत्सव , सहस्त्रचंद्र -दर्शन , आणि साखरपुडा आणि विवाह-समारंभ ,,या शिवाय यश-प्राप्तीचे ,अभिनंदनाचे -कौतुक सोहाळे " असे विविध समारंभ असतात .

आजकाल जवळ जवळ सर्वच फमिली .आपले कार्यक्रम आणि समारंभ दणक्यात साजरे करीत असतात हे आपण पाहत असतो.
अशा ठिकाणी जाण्यासाठी आपण निघतो खरे -पण त्या क्षणा - पासून आपण अस्थिर मन:स्थित असतो , निमंत्रण आले आहे, जावेच लागणार , नाही गेलो तर उद्या समक्ष भेटीत मित्र नाराजी व्यक्त करणार ..त्या पेक्षा हजेरी तर लावून येऊ ",न गेल्या पेक्षा हे खूप बरे.अशी मानसिक तडजोड करून आपण समारंभाच्या ठिकाणी जातो ,

तिथे उपस्थित पाहुण्याच्या गर्दीत -कुणी परिचित दिसतो का ?, भेटतो का ? हे अधिरतेने शोधण्यास सुरुवात करतो .कुणी भेटलाच तर .व्वा -बरं झाल बाबा ! ,आहे कुणी तरी सोबतीला ! असा आधाराचा निश्वास टाकतो ,
पण कधी-कधी कुणीच भेटत नाही, दिसत सुद्धा नाही..मग मात्र , फारच परकेपणाचे फिलिंग मनावर दबाव आणीत असते , मग काय, समोरच्या रांगेत नको रे बाबा ..! आणि खूप मागच्या रांगेत पण नको ..त्या पेक्षा आधल्या-मधल्या रांगेतील खुची पकडून बसले की अर्धे काम होते.

मध्येच अचानक स्वतहा यजमान कोण कोण पाहुणे आले आहेत हे पहातंना प्रत्येक खुर्चीजवळ येऊन हसतमुखाने स्वागत करतात ,आपल्या जवळ त्यांचे थांबणे ,चार शब्द बोलून ..जेवण केल्याशिवाय जायचे नाही बरं का ? अशी प्रेमळ दटावणी -कम आग्रहाची विनंती करणे -हे दृश्य "..आजूबाजूचे पाहुणे पहात आहेत ना ? याची खात्री झाली की मग ..परकेपणा आणि अनोळखीपानाचे दडपण कमी झाल्या सारखे वाटू लागते ..

काही काही ठिकाणी तर "आमची इतकी माणसे आहेत " हे दाखवण्यासाठी निमंत्रण देऊन मान्यवर पाहुण्याची संख्या लक्षणीय अशी वाढवली जाते ..सहाजिकच अशा ठिकाणी ..कुणीच कुणाच्या परिचयाचा नाहीये " हे पाहून तिथे आलेला प्रत्येकजण मनातल्या मनात अपसेट " झालेला असतो "अशा ठिकाणी आपली हजेरी असेल तर अवघडलेपण आपल्या वाट्याला येते " आणि मग नको ते कार्यक्रम आणि नको ते जाणे अशा ठिकाणी " असे विचार मनात येऊ शकतात.

एखाद्या कार्यक्रमाचे चित्र नजरेसमोर आणून पहा -,

मांडवात खुर्च्या टाकून बसलेले पाहुणे तसेच मुकाटपणे बसून इकडे तिकडे पहात .कधी हा कार्यक्रम संपतो रे बाबा ! असे मनातल्या मनात नक्कीच म्हणत असतो." हे दृश्य नेमके उभे राहील .

कारण कार्यक्रमाचे यजमान -आयोजक -संयोजक .यापैकी कुणीही आलेल्या पाहुण्याचा त्यांचा एकमेकांशी परिचय करून देत नाहीत ,की ओळख सुद्धा करून देत नाहीत थोडक्यात असे म्हणता येईल की- आलेल्या व्यक्तींचा परिचय असला काय ..नसला काय ..याने काही फरक पडत नाही ..येणारा येतो..हजेरी लावतो ..बुफे लाईनीत उभे राहून आवडेल ते खाऊन त्यानंतरच जातो "हे सर्वांनाच माहितीचे आहे.

हे असे होण्याचे कारण -आपल्या स्वतःच्या वागण्यात आहे, स्वताच्या "स्व: " कोंडून ठेवण्यात आहे. कारण ,पूर्वी सारखे मोकळे वातावरण नाही, एकमेकांचा सहवास नाही, कुणी आपणहून परिचय करून घेतोय ..असे जाणवले तरी .लगेच समोरचा माणूस अलर्ट " होऊन स्वताच्या कोशात बंद होऊन जातो . तसे म्हटले तर काहीजण ग्रुप जमवून बोलत बसलेले आपल्या दिसत असतात ..असे लोकं ....इतर कुणाला खुची ओढून -या हो .बसा ..असे " म्हणत नाहीत " ..जणू आगंतुक आणि विना-परिचयाच्या व्यक्तींना सुरक्षित अंतरावर ठेवणे बरे असते " असा विचार ते करीत असतात..
अपडेट असलेली माणसे -अपटुडेट दिसणारी माणसे ".आजूबाजूच्या इतर सगळीकडे सफाईदारपणे दुर्लक्ष करून ..स्वतःकडे सगळ्यांचे लक्ष वेधून कसे घेता येईल ? या प्रयत्नात असतात , सहाजिकच ..अशा ठिकाणी असलेल्या इतर सामान्य जनतेच्या दृष्टीने अशी माणसे -आउट आफ रेंज " असतात

अशा वातावरणाचा एकत्रित परिणाम शेवटी - हे असे समारंभ , कार्यक्रम ..आलेल्या कुणालाही आनंद देऊ शकत नाही ना समाधान .अगदी निर्जीव आणि बेजान वाटतात हे असे कार्यक्रम, आणि आयोजक व यजमान ते तर ..त्यांच्या प्लानिंग प्रमाणे सोपस्कार पार पडत आहेत ना .मग,बाकी काळजी करण्याचे कारण नाही.अशा मनोवस्थेत असतात.त्यांनी त्यांचा आनंद मिळवलेला असतो ..कारण, त्यांनी दिलेल्या आमंत्रण -प्रमाणे सगळेजण तिथे आलेले असतात ..हे एव्हढे आणि इतकेच समाधान त्यांना मोठा आनंद देणारे असते.

हे सगळा वाचून तुमच्या मनात प्रश्न येऊ शकेल -की - हे असे होत असते हे खरेच आहे ..मग, यावर काय उपाय आहे,?


यावर उपाय आहे -हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर . आणि हा उपाय एकट्याने करावयाचा नसून मिळून करायचा आहे,प्रतिसाद देऊन करायचा आहे. यासाठी आपण स्वतःच्या कोशातून बाहेर पडायला हवे आहे. मोकळेपणाने बोलून सर्वात मिसळून बोलायला काय हरकत आहे ? सुरुवात केल्यावर -काही बोलणार नाहीत, काही थोडावेळ बोलून थांबतील , काहीजण ओळख झाली या आनंदात ..लगेच मोकळेपणाने बोलायला लागतील ..कारण "कुणीतरी पुढे व्हावे , त्याने लीड घ्यावा ..,मी कशाला उगीच ..! अशा विचाराने खूपजण न बोलता एका ठिकाणी तास न तास तसेच बसून रहातात..पण आपणहून कुणाशी बोलणार नाहीत की ओळख करून घेणार नाहीत.
हे असे आहे पहा ..पुढच्या वेळी बघा ट्राय करून ...!
-----------------------------------------------------------------------------------------------

लेख-२

लेख- वेळ कसा घालवायचा ?
-----------------------------------------------------------

हा प्रश्न जवळपास प्रत्येकालाच पडत असतो . जे लोक इतर वेळी आपापल्या कामात असतात , त्यांना काम संपवल्यावर जो रिकामा वेळ असतो ..तो थोडा असो व खूप ..अशावेळी त्यांना एकच चिंता असते - "बापरे ,आता हा वेळ मी कसा घालवू ?
आणि जे लोक रिकामेच असतात ,त्यांना वेळच वेळ असल्यामुळे ."वेळ कसा घालवू ? हा प्रश्न त्यांना कायमच पडलेला असतो. निवृत्त झालेली माणसे, आणि वृध्द आणि "जेष्ठ-नागरिक " यातील सगळ्यांनीच काही -स्वतहाला कोणत्या न नकोणत्या कामात गुंतवून घेतलेले असते असे नसते , या वयोगटात सुद्धा अनेकजण असे असतात की ..त्यांना "उगवलेल्या दिवसभरात ..कस वेळ काढायचा ? हा प्रश्न पडलेला असतो.

या "वेळेचे काय करायचे किंवा "मी वेळ कसा घालवू ?"
मित्रांनो - हा प्रश्न आपल्याला व्यक्तिगत रूपाने सोडवत येतो ,तसाच तो सामुहिक रूपाने सुद्धा सोडवता येऊ शकतो
आता हेच पहा .. नेहमी कामात व्यस्त असलेल्या व्यक्तींनी एक लक्षात ठेवावे की - कामाच्या तणावाने आपले मन थकून गेलेले असते, आणि आपले शरीरही तितकेच थकून गेलेले असते.. .पण, या गोष्टीकडे लक्ष देण्याची आपल्याला सवयच नाहीये ,आणि अशा "विश्रांतीचे काय महत्व आहे ? हे सुद्धा जाणून घेण्याची त्यायारी कधी दाखवत नसतो.

त्यामुळे ..आठवड्याची सुट्टी .मग ती रविवारी असेल, किंवा कार्यालयाच्या नियमाप्रमाणे एखाद्या दुसऱ्या एखाद्या दिवशी असेल , या ऑफ -डे " च्या दिवशी..नेहमीच्या रुटीन कामाला बाजूला सारून .खूप दिवसा पासून न केलेले एखादे आवडते काम हाती घेऊन ते पूर्ण करण्यास आरंभ केला तर " बघा ..तुम्हालाच नंतर जाणवते ..अरेच्च्या - हे काम करतांना मला तर वेळेचे भानच उरले नाही की..या वेळेत काम पूर्ण झाल्याच आनंद तर अधिकच ,मग .कंटाळा आणणारा वेळ अशा सत्कार्यात घालवला तर "वेळ सारथी लावल्याचे समाधान नक्कीच मिळवता येते.

वेळ छान केंव्हा जातो ?
या प्रश्नाचे उत्तर आहे ..कामाच्या माणसांचा वेळ कामातच छान जातो आणि ..आळशी माणसांचा वेळ अर्थातच "आळसात-आरामत जात असतो ". पण, मित्रांनो .या दोन्ही प्रकारच्या "वेळ घालवण्यात खूप मोठा फरक आहे , जो नेहमी कार्यरत असतो ,त्यला सारे जग विचारीत असते , आणि जो फक्त आळसात .म्हणजेच "निष्क्रिय -राहून वेळ वाया घालवतो त्याला लोकांच्या दृष्टीने काही किंमत नसते ..

यावरून एक अनुमान काढू शकतो की - विधायक कार्य करण्यात वेळ घालवणे -हे व्यक्तीच्या व्यक्तीमत्वात भर टाकणारा गुण आहे ", आणि म्हणून " निष्क्रिय- माणूस " म्हणजेच वेळ वाया घालवणारा माणूस , त्यापासून दूर राहणे बरे ", असे लोक ठरवतात..

प्रत्येक वयोगटातील स्त्री--पुरुषांनी , तरुण -तरुणींनी , मुला-मुलींनी " नेहमीच "वेळेचे नियोजन"करण्यास शिकले पाहिजे ..म्हणजे .जुन्या जमान्यातील सुत्राप्रमाणे ." काळ-काम "यांचे गणित सोडवतांना .लागणाऱ्या वेळेचा योग्यतम उपयोग करता येणे शक्य असते.

आपल्या हाती असलेल्या वेळेत आपण काय करावे याला ही खूप महत्व आहे" त्यामुळेच "आपण वेळेचा सदुपयोग करतोय की वेळेचा अपव्यय करतोय " याचे भान असायला हवे आहे..
योग्य पद्धतीने -नियोजनपूर्वक- आणि दिलेल्या वेळेनुसार कार्यपूर्ती "या परीक्षेत पास होणारी व्यक्ती ..कधी अपयशी झालेली आहे " असे दिसून येणार नाही , सहाजिकच ..फावल्या वेळेत ते त्यांच्या आवडीच्या गोष्टी करण्यात वेळ घालवू शकतात .अशा वेळी त्यांना कुणी..म्हणणार नाही की- हा फुकटचा वेळ वायाघालवतो आहे "
,
विद्यार्थ्यांनी .अगोदर अभ्यासाचा वेळ, मग, खेळायचा वेळ ..हे दोन नियम पाळले तर .त्यांना बोलणी खाण्याची वेळच येणार नाही.. पण बहुतेक वेळा उलटे होते .कारण अशी मुलं - अभ्यासाच्या वेळेतच - काही न करता बसून राहतात ..,खेळायची वेळ झाली कि मात्र ...वेळ कसा घालवू ? हा प्रश्न नाही पडत.

आपल्या सर्वांचा खुपसा वेळ "करमणूक "या नावाखाली आपण घालवतो . "मन रमवणे -या साठी आपण .नेहमीच
टीव्ही आणि त्यावरच्या मालिका आणि इतर कार्यक्रमा पहाण्यात खूप वेळ घालवतो , आता तर इंटरनेटवर- फेसबुक आणि मोबाईल वरचे गप्पा -ग्रुप ", आणि "फ्रेंड बरोबरच्या गप्पा " यात किती वेळ घालवला जातोय जातोय " हा प्रश्न आता सामाजिक चिंतनाचा विषय बनून राहिलेला आहे.
यात वेळ घालवणारे .याचे समर्थन तितककेच जोरदार करतात , दुसरी बाजू अशी पण आहे की " या सर्व 'गोष्टीत "वेळ वाया घालवला जातोय " असे मत व्यक्त करणारे काही कमी नाहीत

आजकाल ...असी परिस्थती दिसते आहे की ..घरात माणसे नाहीत .जी आहेत ती .कामाच्या निमित्ताने सतत बाहेर असतात .अशा वेळी जी कुणी व्यक्ती घरात शिल्लक राहते ..तिच्या समोर .. "वेळ कसा घालवू ?,
हा प्रश्न एखाद्या संकटां सारखा भीषण स्वरूपाचा होऊन बसलेला असतो...
अशा व्यक्तीला आपण " वेळ घालवण्यासाठी तू अमके कर, तू हे कर, तू ते कर " सूचना करणे तितकेसे योग्य ठरणार नाही. कदाचित तो वैतागेल आणि रागाने म्हणेल सुद्धा.. आलास मोठा शहाणा ..मला सांगणारा .तू बघ न राहून .अशा बंद घरात .मग कळेल तुला ..माझी व्यथा .."
मित्रांनो त्याचे दुखः: आणि त्याची व्यथा समजून घेतली पाहिजे .कारण त्याच्यावर जी वेळ "आली आहे ,ती, एक लादलेली अवस्था आहे ..एरव्ही त्याला वेळ कसा घालवू ?" हा प्रश्नच पडला नसता .

थोडक्यात काय तर. "वेळ सगळ्यांनाच सारखा मिळालेला असतो ..त्याचा विनियोग कसा करायचा हे मात्र ज्याचे त्याने ठरवावे "असे असले तरी .."वेळ वाय घालवू नये ये " तो सदा कार्यापुरती असावा " हे कुणी अमान्य करणार नाही.. कार्यमग्न राहावे - "वेळ कसा घालवायचा ? हा प्रश्न पडणार नाही.
------------------------------------------------------------------------------------------------------------------

ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.

मो-९८५०१७७३४२