Shubh Lagn Savdhan in Marathi Film Reviews by Anuja Kulkarni books and stories PDF | शुभ लग्न सावधान...

Featured Books
Categories
Share

शुभ लग्न सावधान...

शुभ लग्न सावधान...

लग्न हा विषय चित्रपटांमधून बऱ्याचदा मांडला गेला आहे. लग्नातील धम्माल, मजामस्ती, यातून निर्माण होणारी नात्यांची गुंतागुंत यावर आधारित हिंदीत तुफान हिट ठरले असले तरी मराठीत असा प्रयोग झालेला नाही. कारण लग्नाबद्दलचा चित्रपट काढतांना तो अतिरंजक झाला तर कंटाळवाणा होऊ शकतो. समीर सुर्वे यांनी लग्नसंस्थेवर भाष्य करणारा पण त्यातूनही कुटुंबसंस्था, तरुण पिढी, कमिटमेंट, लग्नाचे बंधन अश्या वेगवेगळ्या पैलूवर प्रकाश टाकत हलका फुलका मनोरंजन करणारा 'शुभ मंगल सावधान' हा चित्रपट केला आहे. त्यामुळे 'हम आपके है कौन', 'हम साथ साथ है' अशा सिनेमांसाख माहोल आता मराठी सिनेमातही पाहायला मिळणार आहे. पण अर्थात, आजच्या पिढीला साजेसा असा हा चित्रपट तयार केला आहे. 'शुभ लग्न सावधान' सिनेमाच्या माध्यमातून लग्नातील धम्माल, मजामस्ती, यातून निर्माण होणारी नात्यांची गुंतागुंत या मराठी सिनेमात रसिकांना अनुभवता येणार आहे. ह्या चित्रपटात एका लग्नाची गोष्ट पाहायला मिळणार आहे. ह्या चित्रपटामध्ये लग्न हे बंधन नसून बंध आहे. लग्न ही एक जबाबदारी आहे हे सांगण्यात आल आहे. दोन कुटुंबांचा सोहळा ह्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘शुभ लग्न सावधान’ असे या सिनेमाचे शीर्षक लक्षात घेता, हा सिनेमा लग्नसंस्थेवर आधारित असल्याचा अंदाज येतो. दुबईत चित्रीकरण करण्यात आलेल्या या सिनेमाच्या पोस्टरवर सुबोध आणि श्रुती झळकत असून, या दोघांची सुंदर प्रेमकहाणी यात दाखवली जाणार असल्याची जाणीवदेखील होते. एकंदरीत हा सिनेमा लग्नसंस्थेवर आधारित जरी असला, तरी विवाह करण्यास अनुत्सुक असलेल्या एका प्रियकराची झालेली मजेशीर अवस्था या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सध्या सुबोधची तुला पाहते रे ही मालिकाही सुरू आहे. आणि ती लोकप्रिय होतेय. सविता दामोदर परांजपे सिनेमातही सुबोध दिसला आहे. त्यामुळे सध्या सुबोध भावे सगळीकडे छा गया है!!

समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित या सिनेमाचे सोशल नेट्वर्किंग साईटवर मुख्य पोस्टर लाँच करण्यात आले. या सिनेमाच्या पोस्टरवर सुबोध भावे आणि श्रुती मराठे या मराठीच्या प्रसिद्ध कलाकारांची केमिस्ट्री पाहायला मिळते. 'बंध नायलॉन'चे या मराठी सिनेमानंतर अभिनेता सुबोध भावे आणि श्रुती मराठी या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. तब्बल दोन वर्षांनी ही जोडी रसिकांना पाहायला मिळणार आहे. शिवाय दुबईतील विहंगम दृश्यदेखील या सिनेमाच्या पोस्टरवर आपल्याला पाहायला मिळते. पल्लवी विनय जोशी यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात, डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत ,विद्याधर जोशी ,किशोरी आंबिये यांचीदेखील महत्वपूर्ण भूमिका आहे. लगीनघाईवर आधारित असलेल्या या संपूर्ण सिनेमात मराठमोळ्या लग्नाचे सनईचौघडयांचा नाद रसिकांना अनुभवता येणार आहे. लग्न म्हटले की, वधू-वर पक्षाचा आनंद आणि उत्साह अक्षरश: ओसंडून वाहत असल्याचं पाहायला मिळतं. एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेला हा लग्नसोहळा पाहण्यासारखाच असतो. खास करून, नवरीकडील नातेवाईकांकडून वरपक्षाचे केले जाणारे स्वागत, वऱ्हाडी लोकांमध्ये चर्चेचा विषय असतो. त्यामुळेच लग्नातील या धावपळीला आणि नवरोजींच्या स्वागताची लगबग दाखविणारं ‘नवरोजी’ हे गाणं नुकतचं सोशल नेटवर्किंग साईटवर लॉन्च करण्यात आलं. याचं संगीत-दिग्दर्शन चिनार महेश यांनी केले आहे. तर जसराज जोशी आणि किर्ती किल्लेदार यांचा सुरेल आवाज या गाण्याला लाभला आहे. ‘ शुभ लग्न सावधान’ या चित्रपटातील एका गाण्याचं चित्रीकरण दुबईमध्ये चित्रीत करण्यात आलं असून हे गाणं चित्रीत होत असताना सुबोधला प्रचंड दातदुखीचा त्रास जाणवू लागला होता. मात्र तरीही त्याने याकडे दुर्लक्ष करत चित्रीकरण पूर्ण केल्याचं समोर आलं आहे. दातदुखीने त्रस्त झालेल्या सुबोधने दुबईतील एका दंतचिकित्सकाकडे उपचार घेतले होते. मात्र तरीदेखील त्याचा त्रास कमी होत नव्हता. परंतु चित्रीकरणाचं वेळापत्रक विस्कळीत होऊ नये यासाठी त्याने चित्रीकरण सुरु ठेवलं. विशेष म्हणजे प्रचंड त्रास होत असतानादेखील त्याने हा त्रास चेहऱ्यावर जाणवू दिला नाही. त्यामुळे चित्रपटाचं चित्रीकरण वेळात पूर्ण होऊ शकलं. भावनिक साद घालणारं ‘ओ साथी रे हे’ गाणं नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित झालं आहे. उत्कृष्ट संगीत, गाण्याचे शब्द आणि त्याला मिळालेली सुबोध श्रुती यांच्या भुरळ घालणाऱ्या अभिनयाची साथ यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या मोठ्या पसंतीस पडत आहे. काही कारणास्तव एकमेकांपासून दूर गेलेल्या सुबोध आणि श्रुती यांच्यावर भाष्य करणार हे भावनिक गाणं चित्रपटाला एक वेगळ्या वळणावर घेऊन जातं. या गाण्यात सुबोध – श्रुतीच्या नात्यात आलेला दुरावा पाहायला मिळतो. प्रेमीयुगुलांना आकर्षित करणार हे गाणं मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केले आहे. शिवाय, चिनार आणि महेश यांचे संगीत असलेल्या या गाण्याला बेला शेंडेचा आवाज लाभला आहे.

चित्रपटाची कथा-

'शुभ लग्न सावधान' ही कथा अनिकेत(सुबोध भावे) आणि रुचा(श्रुती मराठे) ह्यांची आहे. अनिकेत आणि रुचा दुबई मध्ये स्थित झालेले असतात. दोघांच एकमेकंवर प्रेम असत पण अनिकेत मात्र लग्नाच्या विरोधात असतो. पण रुचाला मात्र लग्न करायचं असत. रुचा अनिकेतला इरा(रेवती लिमये) च्या लग्नासाठी भारतात, इगतपुरी मध्ये घेऊन जाते. आणि मग काय होत हे कळण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपट पाहावा लागेल आणि पुढची मजा अनुभवावी लागेल.

ह्या चित्रपटाचे कथानक तरुण पिढीला आकर्षित करेल. हल्ली खूप मुला-मुलांच्या मनात लग्नाबद्दल संभ्रम असतात त्यांना हा चित्रपट आवडेल. आजच्या पिढीला आवडेल असा हा चित्रपट आहे पण काही ठिकाणी फक्त लग्न समारंभावर जास्ती प्रकाश टाकला गेला आहे अस वाटून जाईल. बाकी ह्या चित्रपटात काहीच होत नाही अस सुद्धा वाटून जाऊ शकत. चित्रपटात पात्रांवर आणि त्यांच्या नात्यावर जास्त प्रकाश टाकला असता तर चित्रपट अजून चांगला झाला असता. काही सिन्स उगाच ओढून ताणून वाढवले अस सुद्धा वाटू शकत आणि पुढे काय होणार ह्याचा अंदाज सहज लावता येतो. पण डेस्टिनेशन वेडिंग, लग्न सोहळ्यातील परंपरा आणि लग्नसंस्था हे रसिकांना अनुभवता येणार आहे. सध्या लोकांचा लग्नसंस्था, यातील परंपरा यावरील विश्वास उडत चालला आहे. या गोष्टी काळाच्या ओघात लुप्त होऊ नये यासाठी सिनेमातून प्रयत्न केल्याचे समीर यांनी सांगितले आहे.

पण, सुबोध भावे आणि श्रुती मराठे ह्यांचा अभिनय आणि त्यांची केमिस्ट्री सुरेख दाखवली आहे. त्यामुळे चित्रपट कंटाळवाणा होत नाही. इरा आणि रोहन(रेवती लिमये आणि प्रतिक देशमुख) ह्यांना फार काम नाहीये पण दोघांनी चांगल काम केल आहे.

डेस्टिनेशन वेडिंग, लग्न सोहळ्यातील परंपरा आणि लग्नसंस्था हे रसिकांना अनुभवता येणार आहे. फ्रेम्स इन मोशन प्रोडक्शन निर्मित 'शुभ लग्न सावधान' हा लग्न समारोहावर आधारित असलेला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाचं शुटिंग दुबई आणि इगतपुरीमध्ये झालं आहे. लग्नाच्या निमित्ताने कुटुंबीय,नातेवाईक, मित्रपरिवार एकत्र येतात. त्यानंतर कशी धम्माल,मजामस्ती होते, नात्यांचे बंध कसे उलगडतात हे या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. शिवाय दुबईतील विहंगम दृश्यदेखील या सिनेमात पाहायला मिळतील.. लगीनघाईवर आधारित असलेल्या या संपूर्ण सिनेमात मराठमोळ्या लग्नाचे सनईचौघडयांचा नाद रसिकांना अनुभवता येणार आहे. लग्न म्हटलं की सगळं कसं मंगलमय असतं. पण या मंगलमय प्रसंगीही सावधान म्हणावं लागतंच. आणि शुभ लग्न सावधान या सिनेमात तर हे पदोपदी म्हणतोय नवरदेव. तो लग्नाला घाबरतोय, बायकोला घाबरतोय. याचं कारण नक्की काय? ते कळण्यासाठी चित्रपट पाहावा लागणार. हा सिनेमा आज १२ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला असून सध्या विवाहोत्सुकांसाठी खूप खास ठरणार आहे, हे मात्र निश्चित!