चालण्याचा व्यायाम हा सर्वोत्तम व्यायाम प्रकार-
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
व्यायाम शरीरासाठी अत्यंत महत्वाचा असतो!! विरंगुळा म्हणून किंवा व्यायाम म्हणून बरेच लोकं चालायला जातात.. आणि चालण्याच्या व्यायामामुळे शरीराला खूप फायदा होतांना दिसतो! रोज ३० मिनिट चाला आणि तो व्यायाम तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल. चालण तुमच्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. त्याचबरोबर चालण्याचा व्यायाम खूप सोप्पा आहे. त्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत. आणि त्याचे शरीरावर काही विपरीत परिणाम दिसून येत नाहीत. आणि पूर्ण दिवस फ्रेश जाण्यास मदत होते. म्हणजेच 'अॅन अॅप्पल अ डे किप्स डॉक्टर अवे...' ऐवजी 'वॉक इच डे टू किप डॉक्टर अवे!" अस म्हणलं तर ते चुकीच ठरणार नाही... चालण्याच्या व्यायामाचे काही फायदे-
१. चालण्यामुळे तुमच्या हृदयाची शक्ती आणि क्षमता वाढते-
चालण हा एक अत्यंत उपयुक्त आणि सुलभ कार्डीओ एक्सरसाईज आहे. रोज चालण्याच्या व्यायामामुळे स्ट्रोक आणि हृदयाचे विकार होण्याची शक्यता कमी होते. स्ट्रोक असोसिअशन नुसार पटापट चालण्याने हाय ब्लड प्रेशर कमी होण्यात आणि ब्लड प्रेशर वर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. आणि साहजिकच स्ट्रोक चा धोका सुद्धा कमी होतो.
२. चालण्यामुळे इतर आजार होण्याची शक्यता कमी होते-
नियमित चालण्यामुळे शरीर तंदुरुस्त राहत आणि आजार व्हायची शक्यता कमी होते. चालण्यामुळे टाईप २ डायबेटीस बरोबरच कोलन कॅन्सर बरोबर गर्भाच्या कॅन्सर च प्रमाण सुद्धा कमी झालेलं दिसू शकत. नियमित चालण्याच्या सवयीमुळे स्तनाच्या कॅन्सर च प्रमाण सुद्धा कमी झालेलं दिसत. त्यामुळे चालण्याचा व्यायाम अत्यंत उपयुक्त आहे.
३. चालण्यामुळे वजन कमी होण्यास फायदा-
हल्ली सगळेजण एकदम हेल्थ कॉशियस झालेले दिसून येतात. त्यासाठी जिम चा पर्याय आहेच पण वजन कमी करण्यासाठी सगळ्यात सोप्पा उपाय म्हणजे नियमित चालणे. नियमित चालल्यामुळे वजन कमी होण्यास नक्की फायदा होऊ शकतो. रोज ३० मिनिट चालण्याच्या व्यायामामुळे तुमच्या शहरातील अंदाजे १५० कॅलरीज बर्न होऊ शकतात. त्याचबरोबर वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा चालण्याचा व्यायाम उपयुक्त आहे.
४. डिमेन्शिया कमी करण्यासाठी चाला-
डीमेंशिया वयस्कर लोकांमध्ये दिसून येतो. त्यात विचार करण्याची क्षमता कमी झालेली दिसून येते. त्याचबरोबर स्मृती सुद्धा जाऊ शकते. अस दिसून आल आहे कि नियमित चालण्याच्या व्यायामामुळे डिमेन्शिया कमी होऊ शकतो. जर नियमित चालायचा व्यायाम केला तर त्याचा प्रभावीपणे उपयोग झालेला दिसून येऊ शकतो. आणि चालणे हा व्यायाम अतिशय सोप्पा असल्यामुळे तो सहजपणे करता येऊ शकतो.
५. चालण्यामुळे पायाचे मसल टोन होण्यास मदत होते-
नियमित चालल्यामुळे पायाचे मसल टोन होण्यास मदत तर होतेच त्याचबरोबर शरीराचा तोल सांभाळायला सुद्धा मदत होते. नियमित चालण्यामुळे हाडाची क्षमता सुद्धा वाढण्यास मदत होते. जर लक्षपूर्वक चाललात तर तुमची वेस्ट आणि अॅब्स टोन होतांना तुम्ही पाहू शकाल. जर टेकडीवर चालायला गेलात तर तुचे काफ मसल म्हणजेच पोटरीचे मसल सुद्धा मजबूत होऊ शकतात. म्हणजेच काय, लोअर बॉडी साठी चालण्याचा व्यायाम उत्तम ठरतो.
६. चालण्यामुळे तुमच्या शरीराला उर्जा मिळते-
चालण्याचा व्यायाम एकूणच उपयुक्त आहे. त्यातही फास्ट चालल्यामुळे तुम्ही नक्कीच फ्रेश व्हाल. फास्ट चालल्यामुळे शरीरातलं रक्ताभिसरण वाढत आणि शरीरातल्या प्रत्येक सेल ला ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश आणि अलर्ट राहू शकता. तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात उर्जा मिळते. आणि त्याचा प्रभाव तुम्हाला कामात किंवा इतर गोष्टींमध्ये दिसून येऊ शकतो. जर तुम्हाला लंच ब्रेक मध्ये वेळ मिळाला तर थोडा चला त्यामुळे तुम्हाला अजूनच फायदे मिळू शकतात.
७. चालल्यामुळे व्हिटामिन डी वाढण्यास मदत होते-
हल्ली उन्हात जाण कमीच झालेलं दिसून येत. त्यामुळे बऱ्याच लोकांना व्हिटामिन डी ची डेफीशीअन्सी असलेली दिसून येते. त्याचा परिणाम हाडांवर आणि प्रतिकारशक्ती वर झालेला दिसून येतो. हे टाळायच असेल तर नियमित सकाळी चालायला जाण गरजेच आहे. सकाळी चालायला गेल कोवळ्या उन्हामुळे शरीरातली व्हिटामिन डी ची कमतरता भरून काढण्यास मदत होते.
९. चालल्यामुळे तुम्ही आनंदी बनता-
कधी कधी तुमचा मूड अचानक खराब होऊ शकतो. त्याची पुढची पायरी म्हणजे तुम्हाला नैराश्य येऊ शकत. त्यावेळी नैराश्य घालवण्यासाठी जर तुम्ही ब्रिस्क वॉकिंग चा पर्याय ट्राय केलात तर त्याचा परिणाम तुम्हाला तुमच्या मूड वर झालेला दिसून येईल कारण चालल्यामुळे इंडोर्फीन शरीरात सोडलं जात आणि त्यामुळे तुमचा मूड फ्रेश बनण्यास मदत होते. त्याचबरोबर निसर्गात चालल्यामुळे तुम्ही आपोआपच फ्रेश आणि आनंदी होता.
इतक्या सगळ्या फायद्यांमुळे तुम्ही चालायला जाण मनावर घ्याच. आणि तुम्ही चालायला जायचं ठरवत असाल तर काही गोष्टी न विसरता करा-
* सैल कपडे घाला. म्हणजे चालायला जातांना काही त्रास होणार नाही.
* आधी वार्मिंग अप करायला विसरू नका. म्हणजेच आधी हळू हळू चाला आणि नंतर फास्ट चला. नंतर मसल रिलॅक्स करण्यासाठी थोड स्ट्रेचिंग करा.
* शकयतो चालायला जातांना चपला घालण टाळा कारण त्यानी पायाला दुखापत होऊ शकते. त्यामुळे चालायला जातांना योग्य ते शूज निवडा.
* रोज त्याच त्याच ठिकाणी चालून कंटाळा आला असेल तर जागा बदला.
* एकट्याला चालायचा कंटाळा येत असेल तर तुमच्या बरोबर कुत्र्याला घेऊन जा.. घरात कुत्रा नसेल तर तुमच्या मित्रांबरोबर जाऊ शकता.
* चालायला जायच्या आधी भरपूर पाणी किंवा ज्यूस प्या. जर खूप अंतर चालणार असाल तर बरोबर पाण्याची बाटली ठेवा.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अनुजा कुलकर्णी.