ही एक सत्यकथा आहे.... माझ्या मैत्रिणीने सांगितली होती... मला वाटलं share करावे म्हणून करत आहे. मी इथे पात्रांची नावे बदलून लिहिले आहे
हि गोष्ट तिच्या मामी बरोबर घडली आहे. तेव्हा तीची मामी 7 महिने ची गरोदर होती. तिचे मिस्टर पोलिस मध्ये असल्यामुळे
त्यांची कधी कधी रात्रपाळी असे.
त्यांनी नुकताच नवीन घरात आपल सामान हलवल होत. घर तस मोठ होत. दोन बेडरूम, किचन पण मोठ... हाँल सुद्धा ऐसपैस होता. मालती ला घर बघता क्षणी आवडल होत. तीने सामानाची लावालावी चालू केली. मोहन जवळ आला आणि पाठी मागुन अलगद तिला मीठी मारली.
' आवडल? ' मोहन ने विचारल.
' खूप... ' मालती लाजत बोलली.
' बर... मला आज जाव लागेल कामाला'
' ठिक आहे... तुम्ही जावा... माझी चिंता करु नका... मी काळजी घेईन माझी '
मोहन हसला. तिने अचूक ओळखल होत त्यांच्या मनातलं.
मोहन निघुन गेला आणि इकडे मालती ने ही तिला जमेल तस घर लावायला चालू केल. मालती ने तर घर आपल मानल होत पण का कुणास ठाऊक ते घर तिला वेगळ्या नजरेने पाहत होत.
सुरुवाती चे काही दिवस चांगले गेले. सगळे पाहुणे घर बघून खूप खूश होऊन निघून गेले. बायका मंडळी मालती ला ' काळजी घे हा ' हा सल्ला देऊन गेल्या. घर आता शांत वाटत होतं... पण ते खरंच शांत होत का?? ते येणाऱ्या काही दिवसात कळनार होते.
आता मोहन ची रात्रपाळी चालू झाली. आज पाहिला दिवस होता रात्रपाळी चा.... मालती ने रोज सारखे मोहन ला डबा बनवून दिला. ' रात्री सांभाळून राहा... जागा नवीन आहे ' अस सांगून मोहन बाहेर पडला.
' मी अस का बोललो... मी तर आधी पण रात्रपाळी ला जातच होतो...मग आज का वेगळ वाटत आहे ' मोहन मनामध्ये विचार करत होता.
इकडे रात्री ची सगळी कामं आटोपून मालती झोपेची तयारी करू लागली. रात्री चे 1.45 झाले असतील तेव्हा मालती ला झोपेतून जाग आली. बाथरूम ला जाऊन आल्यावर मालती पुन्हा झोपू लागली तोच तिला पैंजण चा आवाज आला. तिने दचकून आजूबाजूला पाहिलं पण काहीच दिसत नव्हते. तिला वाटले कि भास झाला असेल. ती पुन्हा झोपी गेली.
सकाळी जेव्हा मोहन आला तेव्हा तिला वाटले की मोहन ला सांगावे पण तिला वाटले की तो तिच्या वर विश्वास नाही ठेवणार म्हनून ती गप्प बसली. सायंकाळी जेव्हा मोहन कामावर जावु लागला तेव्हा तिला काल रात्री चा प्रसंग आठवला.
आज ती जरा सावध होऊन झोपली. आज पुन्हा 1.45 ते 2.00 दरम्यान तिने पुन्हा तो आवाज ऐकला....पैंजणाचा
पण आज तो आवाज जवळून येत होता. तिने मनाशी काहीतरी पक्क केलं आणि ती आवाज कुठून येत आहे हे बघायला निघाली. आवाज किचन मधून येत होता. तिने एक आवंढा गिळला आणि किचन कडे निघाली. ती आता किचनच्या दाराजवळ उभी होती.
आत डोकावून पाहिलं तर काही दिसत नव्हतं. पण पैजनाचा आवाज मात्र येत होता. इतक्यात पाठीमागून कोणीतरी गेल्या सारख झाल. तिने मागे वळून पाहिलं पण कोणीच नव्हतं. ती मनातून खूप घाबरली आणि पळत बेडरुममध्ये आली. तेवढ्यात लाईट गेली. मालती ला आता दरदरून घाम फुटला. तिने अंगावरच पांघरूण अजुन घट्ट केलं.
शेवटी तिने धाडस करून बघितलं. तर तिच्या घशाला कोरड पडली.... बेडरूम च्या दारात कोणी तरी उभं होत. तिने नीट पाहिल तर कोणी बाईंची आकृती दिसली. ती आकृती हळूहळू हाँल मधे जात होती.मालती ने तिच्या पाठी जायचं ठरवलं. ती हळूच उठून जाऊ लागली. तिने हळुच डोकावून हाँल मधे पाहिल पण तिला कुणीच नाही दिसल. ती परत बेडरूम मध्ये आली आणि इतक्यात लाइट पण आली. विचार करून डोकं सुन्न होत आहे असं वाटू लागलं आणि शेवटी मालती मग लाइट चालु करूनच झोपी गेली.
सकाळी लवकरच जाग आली. कारण रात्रभर झोपच लागली नाही. मोहन जेव्हां घरी आला तेव्हा तिला हायस वाटल. वाटल सगळं सांगाव पण मोहन आपल्या वेड्यात काढेल असं मालती ला वाटलं. दिवसभर ती ह्या गोष्टीचा विचार करत होती की तीने जे पाहिलं ते खरं होतं की भास.... मनाचं आणि बुद्धीचं जणु युद्ध चालू होत पण निष्कश काहीच निघत नव्हत.
' तब्येत ठीक नाही का? ' मोहन ने विचारलेल्या प्रश्नावर मालती ची तंद्री भंगली.
' नाही.. म्हनजे ठिक आहे तब्येत ... का अस का विचारल तुम्ही? '
' अग मी सहज विचारलं... एवढ दचकायला काय झालं? '
' काही नाही ' मालती ने वेळ मारून नेली.
तिने ठरवल की आज हया गोष्टींचा छडा लावायचा. आज ती जागीचं होती. घड्याळात १.४५ चा ठोका वाजला आणि इकडे मालती च्या ह्रदयाचा ठोका चुकला. लाईट ही अचानक गेली... तोच किचनमध्ये आवाज झाला. मालती आपल्या बेड वर बसून बेडरूम च्या दरवाजात पाहू लागली. तोच तिला एका बाई... साधारण ३५-३८ ची असेल... हातात ग्लास घेऊन किचन मधून हाँल कडे जाताना दिसली. बेडरूम मधून किचन ते हाँल असा पॅसेज नीट दिसत होता. मालती ला आपल्या डोक्यावर विश्वासच बसत नव्हता. ती हळूच उठून तिच्या पाठी गेली. ती हळूहळू हाँल मधे जात होती. तिने त्या ग्लास मधे जे होत ते पिलं. थोडा वेळ तशीच उभी राहिली आणि अचानक खाली कोसळली आणि गायब झाली. मालती ने तिला अंधारात शोधल पण ती दिसली नाही. मालती धावतच बेडरूममध्ये आली. तिला चक्कर येऊ लागले. पोटातल बाळ पण घाबरल अस वाटत होतं. ती तशीच बेडवर पडून राहिली. घाबरुन डोळ्यातून पाणी यायला लागलं. तिला कधी झोप लागली कळालच नाही.
नंतर हा प्रकार रोज १.४५ ते २.१५ च्या दरम्यान रोज घडू लागला. लाईट बरोबर ह्या वेळेतच जाऊ लागली. आठवडाभर हेच चालू होत. शेवटी मालती ने ठरवलं की मोहन ला सगळं सांगायच आणि लवकरात लवकर इथून जायच. तिला आता एक क्षण ही त्या घरात राहायच नव्हत. मोहन जसा घरी आला तस तिने रडत सगळ सांगितले आणि मोहन काय बोलेल ह्याची वाट पाहू लागली. मोहन ने ५ मिनीटं तिच्या डोळ्यांत पाहिल आणि बोलला ' ठिक आहे... उद्याच आपण हे घर सोडून जाऊ.'
मालती ला खरंच वाटत नव्हत की मोहन एवढ्या सहज तयार होईल. मोहन ला तिच आश्चर्य चे भाव चेहर्यावर दिसले आणि बोलला ' मालू... तुझे डोळे कधी माझ्याशी खोट नाही बोलणार .... चल सामान भरूया ' मालती ला खूप आनंद झाला.
दुसऱ्या दिवशी सकाळीच त्या दोघांनी घर सोडले. ते जात असताना ६५-७० वयाचे एक गृहस्थनी त्याना त्या घरातून निघताना पाहिले.
'ह्या घरात राहायला आला का? ' आजोबा ना विचारल
दोघांनी एकमेकांकडे पाहिले. ' राहत होतो आजोबा... आता घर सोडून जात आहे ' मोहन बोलला.
' चला... माझ्या घरी चला' आजोबा बोलले.
तस दोघेही आजोबा च्या मागे जाऊ लागले. आजोबांनी मालती कडे पाहिले तस त्या सगळ कळाल.
आजोबा बोलु लागले ' ही गोष्ट ५ वर्षा पूर्वी ची आहे. हे घर सुमन आणि आकाश च होत. सुमन... एक हसरी मुलगी... खूप लाघवी... पण नशिबाने तिच्या वर अन्याय केला होता... तिला मूल न देवून... मग दोघात खूप भांडण होऊ लागले... रागात आकाश तिला मारत असे... कधीकधी २-३ दिवस घरी येत नसे आणि आल्यावर परत भांडण.... एक दिवस असच खूप भांडण झाले. आकाश घरातून निघून गेला. सुमन रडत बसली. अचानक काही ठरवल्या प्रमाणे ती किचन मध्ये गेली. एक ग्लास दुध घेतल आणि त्यात विष मिसळल. एका दमात सगळ दूध पिऊन टाकलं. ग्लास तसाच हातात घेऊन ती बाहेर हाँल मधे आली आणि तिथेच तिने प्राण सोडले. सकाळी जेव्हा आकाश घरी आला तेव्हा सुमन मरून पडली होती. पोलिसाना कळवण्यात आलं. तिच्या शरीराचा पंचनामा झाला तेव्हा कळल की ती २ महिन्याची गरोदर होती आणि ती त्या रात्री १.४५ ते २.१५ दरम्यान मृत झाली होती. हे ऐकून आकाश खुप रडला' सांगताना आजोबा चे डोळे पण पाणावले.
तेव्हा मालती ला कळाल की हे सगळं तिला का दिसत होत. कारण मालती सुद्धा गरोदर होती. ती बाई... तिच किचन मधून हाँल मधे जाण... आणि १.४५ ते २.१५ ची वेळ...
मालती ला आता सुमन ची दया येऊ लागली. नकळत तिच्या डोळ्यात पाणी आलं. आजोबांचा निरोप घेऊन दोघ निघाली. जाताना घराच्या दारावर मालती ने हळुवार हात फिरवला.
वाचकहो... ही माझी पहिली कथा आहे... आवडली तर नक्की सांगा... लिखाणात काही चूक झाली असेल तर माफ करा...
धन्यवाद.