1.30 A.M # In hevhan # vheri heppy - 1 in Marathi Moral Stories by Anuja Kulkarni books and stories PDF | १.३० ए.एम # इन हेव्हन...# व्हेरी हॅपी! - १

Featured Books
  • My Passionate Hubby - 5

    ॐ गं गणपतये सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा॥अब आगे –लेकिन...

  • इंटरनेट वाला लव - 91

    हा हा अब जाओ और थोड़ा अच्छे से वक्त बिता लो क्यू की फिर तो त...

  • अपराध ही अपराध - भाग 6

    अध्याय 6   “ ब्रदर फिर भी 3 लाख रुपए ‘टू मच...

  • आखेट महल - 7

    छ:शंभूसिंह के साथ गौरांबर उस दिन उसके गाँव में क्या आया, उसक...

  • Nafrat e Ishq - Part 7

    तीन दिन बीत चुके थे, लेकिन मनोज और आदित्य की चोटों की कसक अब...

Categories
Share

१.३० ए.एम # इन हेव्हन...# व्हेरी हॅपी! - १

"१.३० ए.एम # इन हेव्हन...# व्हेरी हॅपी!"- १

रविवार दुपारची वेळ... रियाला वेळ जाता जात न्हवता! तिला काय कराव सुचत न्हवत. कोणाशी बोलायची सुद्धा तिला इच्छा न्हवती. तितक्यात तिला रोहित ची आठवण झाली. आणि तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आल... तिनी लगेच मोबाईल हातात घेतला आणि ती विचार करायला लागली,

"रोहित ला फोन करू का व्हॉट्स अॅप.." असा विचार करत तिनी घड्याळ पाहिलं. दुपारचे २ वाजले होते. रोहित झोपला असेल उगाच त्याची झोप मोड नको असा विचार तिच्या मनात आला. ह्यावेळी फोन करण तिला नकोस वाटल म्हणून तिनी विचार केला,

"उगाच फोन करून त्रास देण्यापेक्षा व्हॉट्स अॅप वर ऑनलाईन आला तर बघू. रोहित ला व्हॉट्स अॅप करते.. ऑनलाईन आला तर बोलेन.. नाहीतर मी पण झोपेन!" असा विचार करत तिनी व्हॉट्स अॅप उघडल आणि रोहित ला मेसेज करायला लागली,

"वॉट्स अप रोहित? आलास की पिंग मी.. जाम कंटाळा आलाय.. वेळ जाता जात नाहीये! ऑनलाईन आलास तर प्लीज लगेच मेसेज कर!" रिया नी इतका मेसेज केला आणि वेळ जात नाहीये म्हणून वेळ घालवायला काय करायचं तर लोकांचे स्टेटस पाहू असा विचार तिनी केला. आणि सगळ्यांचे स्टेटस काय आहेत ते पाहायला लागली. स्टेटस वाचता वाचता तिला रोहितचा स्टेटस दिसला.. तो स्टेटस पाहून रिया जरा उडलीच! "१.३० ए.एम # इन हेव्हन...# व्हेरी हॅपी!" तिनी भुवया उंचावल्या.. आणि परत नाव चेक केल. रोहितचाच स्टेटस आहे हे कन्फर्म केल आणि त्या स्टेटस चा काय अर्थ आहे ह्याचा विचार करायला लागली. पण स्टेटसचा अर्थ तिला काही केल्या उमजत न्हवता. रोहितनी सुद्धा तिला काही सांगितलं न्हवत आदल्या रात्री त्यानी काय केल होत. रिया विचारात पडली, "काय असेल स्टेटस चा अर्थ?" तिनी बराच वेळ विचार केला पण तिला काहीच कळल नाही... रिया मोबाईल खाली ठेवणार तितक्यात मेसेज आल्याचा आवाज आला! तिनी पटकन मोबाईल हातात घेतला आणि कोणाचा मेसेज आहे ते पाहायला लागली... रोहितच होता! रोहित ऑनलाईन आला आणि त्यानी रियाचा मेसेज पाहून तिला लगेचच उत्तर दिल होत,

"हे रिया.. हाय!! नाईस टू सी यु ऑन व्हॉट्स अॅप.. झोपली नाहीस? तू रविवारी दुपारी झोपतेस ना? बट गुड टू सी ऊ ओनलाईन... कधीतरी ज्या गोष्टी घडतात त्याचा आनंद घेतलाच पाहिजे. हाहा... वॉट्स अप?"

"वा.. तू आलास ऑनलाईन! मला पण वाटल तू झोपला असशील दमून सो तुला फोन नाही केला.. आणि व्हॉट्स अॅपवर आले." रोहित चा मेसेज पाहून रिया भलतीच खुश झाली...

"मला एक सांग ग रिया, आज तू व्हॉट्स अॅपवर टाईम पास करतीयेस? कस काय ग? तुला आवडत नाही ना व्हॉट्स अॅप वर जास्ती वेळ थांबायला? मी बोलायला येत तेव्हा वेळ नाही 'आत्ता वेळ नाही..' अस सांगतेस आणि काहीतरी उत्तर देऊन घाईन जातेस! आज काय झालाय काय तुला? तू मेसेज करून मला वेळ आहे का विचारती आहेस?" रोहित बोलला आणि त्यानी भरमसाठ इमोजीटिकॉन्स रियाला पाठवल्या.... आणि पुढे बोलला, "कस काय बुआ आज अस झाल? सांग सांग... आय अॅम क्युरिअस टू नो!"

"हाहाहा.. किती ओव्हर करतोस रे! आणि इतके सारे इमोजी? भावना पोचल्या बर का.. हाहा! आय नो.. मला नाही आवडत इथे जास्ती वेळ घालवायला पण आज भयंकर बोअर होतंय! काहीच करावस वाटत नाहीये. टी.व्ही नको वाटतोय,वाचन नको वाटतंय काहीच करावस वाटत नाहीये! सो थॉट इथे तू आहेस का ते पाहू.. असशील तर गप्पा होतील! तसही आपण एकमेकांना वेळ देण गरजेच आहेच! आय शुड नो यु बेटर...आणि हल्ली बाकी कोणाशी बोलायची इच्छा देखील होत नाही! आज तर जाम कंटाळा आलाय.. "

"ओह हो.. कामापुरती मामी! तुला वेळ जात नाहीये आणि बोअर होतय सो लगेच मला मेसेज! आणि आता आठवण झाली का की आपण एकमेकांना वेळ देण गरजेच आहे? मी म्हणतो तेव्हा तुझ्याकडे उत्तर तयार असतात इथे न बोलायची.. सोप्प असत इथे बोलण म्हणून इथे! आणि वा... हे बर आहे! कामापुरात बोलायचं आणि इतरवेळी मी बोलायला आलो की वेळ नाही सांगून मोकळ व्हायचं! आणि आज फक्त माझ्याशीच बोलायचंय? नाईस! माझा इतका इम्पॅक्ट आहे तुझ्यावर? की आता तुला इतरांशी बोलायची इच्छा नाहीये... हे नवीनच कळल.. आहे म्हणजे माझ थोड तरी महत्व आहे! मस्त वाटत रिया.. आपल्या आवडत्या व्यक्तीला फक्त आपल्याशीच बोलायचं आहे. फिल्स गुड! लव यु रिया!"

"का त्रास देतोस रे? तू आहेसच माझ्या आयुष्यात महत्वाचा.. मी तुला खूप महत्वाची जागा देणारे.. आणि आहेसच तू भारी! आय नो..माझा कंटाळा तूच घालवणार एका मिनिटा मध्ये! ओह.. पण मी तू बोलायला आलास की बोलत नाही? अस करते का मी? सॉरी.. व्हेरी सॉरी.. आणि मुद्दाम नाही करत रे..पण नको वाटत इथे वेळ घालवायला. मानसिक त्रास होतो अमूल्य वेळ इथे टाईमपास करायला घालवून, " रिया नी एक सॅड इमोजी रोहित ला पाठवली आणि रिया बोलायची थांबली.

"हे.. मजा करतोय! सॅड होऊन रडू बीडू नकोस! प्लीज! मी बहुतेकवेळा मस्त मूड मध्ये असतो! सो चिल मारा मॅडम.. माझी प्रत्येक गोष्ट इतकी सिरीअसली नाही घ्यायची. आणि बरेच दिवसांनी इथे बोलतोय.. उगाच मूड खराब नको करुस. भेटून बोलण्यातली मजा काही औरच असते पण प्रत्येकवेळी भेटण जमेल अस नाही म्हणून वॉट्स अॅप हा पर्याय.."

"नाही नाही रडत.. नाही! पण तू म्हणालास ते लागल मला! मी फक्त कामापुरती बोलते का तुझ्याशी? मला कंटाळा आला म्हणून मी तुझ्याशी बोलते.. अशी वागते मी? म्हणजे मला कधी अस वाटलच नाही! ह्या आधी कधी अस न्हवता बोललास..."

"हो बरोबर.. ह्या आधी तू माझ्याशी कधीच आपणहून बोलायला आली न्हवतीस. नेहमीच मीच येतो बोलायला.. मग मला सुद्धा वाटणारच ना.. आज काय अस झाल की रिया आपणहून बोलतीये? काय काम काढलाय की माझी आठवण येतीये. हाहा!"

"त्रास नको देऊस रे.. बाय द वे, एक सांग, तू हक्काचा आहेस ना माझ्या?"

"ओके ओके.. आता नो त्रास! मजा येते तुला त्रास द्यायला.. आणि हक्काच्याच लोकांना त्रास देता येतो. मग ती व्यक्ती चिडते.. मग तिला मनवायच. वेगळीच मजा असते. आणि वो... आज भारी मज्जा आहे माझी! मनातल सगळ ओपन करतीयेस! बघू काय काय बाहेर पडतंय माझ्याबद्दल! आणि मी हक्काचा आहे अस म्हणालीस मस्त वाटल रिया! नाईस!! आणि मी आहेच तुझ्या हक्काचा.. तू सुद्धा बर का माझ्या हक्काची.. मी तुला त्रास देणार.. आणि कधीही तुला माझी गरज लागली तरी मी असेन तुझ्याबरोबर.. " रोहित नी परत भरमसाठ इमोजीजी पाठवले.. आणि परत बोलायला लागला, "आणि नो ग रिया! मी काहीही बोललो की काहीतरी फालतू विचार करत बसू नकोस! तू प्रत्येक गोष्टीचा इतका काय विचार करत बसतेस? मजा करत असतो मी.. तुला माहितीये मी कसा आहे! आयुष्य लाईटली घ्यायचं. आणि आहेच तुझ्या हक्काचा! तुम्ही हवा तितका त्रास द्या! तुझ्यासाठी कितीही त्रास सहन करेन.. नो प्रोब्लेम! आणि मी पण तुला त्रास देईन.. खूप त्रास द्यायची हिम्मत नाही आपली पण उगा थोड.." रोहित नी फ्लाइंग किस चा इमोजी पाठवला.

"त्रास देणार तू मला.. ओके ह! ट्राय करून बघ! बाय द वे, फ्लाइंग किस... काय मूड मध्ये आहे आज.. ह्या आधी अस कधी वागला नव्हतास! मस्त वाटतंय पण... आणि तू माझ्या हक्काचा आहेस आणि नेहमीच माझ्यासाठी काय पण? वा वा...अस आहे का! कितीही त्रास देऊ? वा..पण विसरू नकोस ह शब्द! आज उगाच गिल्ट दिलस मला! हाऊ मीन! बर,ते सोड, तुझा स्टेटस काय आहे सांग! काय अर्थ त्याचा?"

"कोणता स्टेटस ग? मला नाही आठवत.. मी सारखे स्टेटस बदलत असतो.. सवय लागलीये रोज नवीन स्टेटस ठेवायची! तश्या मला बऱ्याच वाईट सवयी आहेत!! कांट हेल्प! पण आपल लग्न झाल की नक्की बदलेन ही सवय. तेव्हा तू असशील, मला अजून कश्याची गरजच लागणार नाही. खरच.. तू नाहीस बरोबर मग वेळ कसा घालवू कळतच नाही. मग इथे टाईमपास करतो.. "

"ओह.. तुला वाईट सवयी आहेत? मला न्हवत माहित! मला तर एकदम गुणी रोहितच माहिती होता! हाहा! आणि तुला स्टेटस आठवत नाहिये? फेकू रोहित!! खर सांगतो आहेस की उगाच नाटक?" विचार करती आहे असा इमोजी टाकून रिया बोलायची थांबली.

"खरच नाही आठवत ग.. एक मिनिट पाहू दे!" इतक बोलून रोहित नी स्टेटस पहिला आणि तो हसायला लागला,

"हाहाहा.. खर तर हसायला नको... आणि मी घाबरलो आहे! तू बघितलास म्हणजे माझा स्टेटस..."

"मग? बघायला नको होता का काय?"

"वाच की.. मी जस्ट म्हणालो, वाचलास माझा स्टेटस! आय थॉट, तुला व्हॉट्स अॅप आवडत नाही म्हणजे तू कश्याला इथे येशील आणि कश्याला वाचशील माझा स्टेटस! सो लिहू मस्त स्टेटस! पण माय बॅड, तू वाचला स्टेटस.."

"विषयांतर नको! त्याचा अर्थ काय ते सांग... १.३० ए.एम # इन हेव्हन...# व्हेरी हॅपी?? साउंड्स इंटरेस्टिंग... खूप काहीतरी भारी केल काल?"

अनुजा कुलकर्णी.