१३. "तिचा तो"..
चैताली भापकर.
एक गोष्ट तिची, तिची म्हणजे एकाच तिची नव्हे बरं तिच्या सारख्या अनेक "तिची". तर ती म्हणजे तुमच्या आमच्या सारखीच खूप सारी स्वप्न पाहणारी, आई बाबाच्या ईच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणारी आणि त्यात जरासा वेळ काढून तिच्या त्या राजकुमाराची ती दिवा स्वप्न पहाण्याची तिचीती हौसच खूप भारीच असत तिला. प्रेम म्हणजे खूप आवडता विषय तिचा पण प्रण मात्र प्रेमात न पडण्याचा होता.... त्याचं होतं असं की आई बाबांच्या मते प्रेम हे मुलींनी करूचनये ते फक्तं लग्ना आधी बरका! आणि लग्न झालं की जो कोणी असेल त्याच्या वर मात्र मरेपर्यंत प्रेम करावं मग तो कसाही असेल, आपल्या वर प्रेम करत असेल किंवा नसेल पण तोच आपलं सर्वस्व. हे काही नवीन नाही सर्वत्र सामान्यतः हेच संस्कार होतात मुलींवर . त्यामुळे ती मनात स्वतःलाच नेहमीच समजावत असायची "प्रेमात पडणे तुझ्यासाठी नाही" पण म्हणतात ना ज्या गोष्टी पासून आपण दूर पळत असतो तिच गोष्ट आपल्याला जास्त आकर्षक वटते आणि आपण त्या कडे ओढले जातो. इथे ही तसेच झाले आणि पडली होती ती आता प्रेमात, तिचा तो रोज दिसणारा स्वप्नातला रजकुमार सापडला होता तिला. आता आपल्याच विश्वात ती दंग होती ,ती सारी गोड स्वप्नं आता ती सत्यात जगत होती. जगाचा जणू तिला विसरच पडला होता. प्रेमात ती पूर्ण बुडालेली होती आणि फक्त तिचीच ही अवस्था झालेली होती असे नाही तो ही तितकाच तिच्यात बुडलेला होता, खूप जीव आहे त्याचा तिच्यावर, लहान लहान गोष्टींची काळजी घेतो नेहमीच आधिपासून ते आजही.
रोज सकाळी सकाळी तो एक फोन तिच्या दिवसाची ती गोड सुरुवात असायची.
बाळा म्हणतो तो तिला लाडाने " उठलं का माझं बाळ !" अशी काहीशी ती गोड सुरुवात असायची . पहिले काही दिवस खूप छान गेले, ते वास्तविकतेची जाणीव होई पर्यत त्यानंतर खूप काही बदलू लागले होते,
आता रोज तो तिला समजावत असत ..... आणि ती रोज एकाच प्रश्न त्याला विचारात आणि त्यांचा तो ठरलेला संवाद.
ती : तु आजकाल असा का वागतो आहेस रे.... मला का दूर करतो आहेस तुझ्यापासून?? नाही आवडत ते मला.... मी नाही जाणार तुला सोडून कुठे.
तो : अगं बाळा जरा समजून घे ना मला .... किती दिवस असं सगळं कळत असूनही बालिश सारखी वागणार आहेस . मी जे काही वगतो आहे ते तुझ्यासाठीच आहे गं. तु तरी मला समजून घे की ....... आधिच तुला दूर करण खूप कठीण आहे मला असं बोलून ते अजून नकोस ना अवघड करू . मी तुझ्या सोबत राहिलो तर तुला फक्त "सगळ्यांचा त्रास , टोमणे आणि तिरस्कार मिळेल ....."
ती : तु असलास तर सगळं काही सहन करीन मी..... मला नाही कोणाच फरक पडणार .....
आणि नेहमी असंच बोलण व्हायचं ते त्यांच्यात ज्यात कधीच कहीच उत्तरं मिळत नसत पण दोघेही एकमेकांना एकमेकांविषयी वाटणारी काळजी च दाखवत होते हे त्यांच्या लक्षातच येत नव्हतं. दोघांचा ही जीव एकमेकांसाठी तितकाच होता, तेवढच प्रेम होते, तितकीच काळजी होती किंवा त्या ही पेक्षा जास्त पण आता तो खूप घाबरत होता. स्वतः पेक्षाही जास्त तिच्यासाठी तिची काळजी वाटत होती त्याला .
तिच्यासाठी तिला त्रास होवू नये म्हणून तो तिच्या पासून दूर पळत होता पण त्याला हे समजत नव्हते की तो जे काही वागतो आहे त्याचाच तिला अधिक जास्त त्रास होतोय ,पण तो तरी काय करणार बिचारा वास्तविकताच खूप अवघड होती. प्रेम त्यांनी केले होते पण ते करताना समाजाच्या त्या नियमांना विसरून केलं होतं आणि आता त्यांची जाणीव झाली होती. समाजातील त्या खोट्या प्रतिष्ठेसाठी जी आपली पाठ फिरता लगेच गेलेली असते. आशा समाज्यासाठी जो स्वतः च्या स्वर्था प्रमाणे नियम बदलतो. अशा आपल्या माणसांसाठी ज्यांना त्यांची इज्जत हीच नेहमी कोणाच्या ही आनंदापेक्षा मोठी वाटते. अशा जगासाठी ज्याला रोज कोणाच्या तरी आब्रूचे लचके मजेने तोडायला आवडतात. अशा रूढी की ज्या सोयी प्रमाणे बदलतात. ह्या सगळ्यांसाठी तो तिला दुःखवत होता जी फक्त त्याच्या सुखाचा विचार करते.
पण तो भूतकाळ जो कधीच पाठ नाही सोडत असाच तिच्या ही पाठी हात धुवून होता. छोटासा पण खूप खोल होता , ती ...तिच... ते ....तो ...ती आधी दुसऱ्या कोणाचीतरी बायको होती ..... हो वयाच्या सोळाव्या वर्षी तिच लग्न झाले होते ते ही समाजाच्या साक्षीने, लहान होती ना ती? तेव्हा कुठे गेला होता कायदा ? ते नियम ? सगळे साक्ष होते तिच्या त्या कोवळ्या जीवाच्या ( वाटोळं) सोहळ्यात. आणि मग जे व्हायच तेच झालं . नकोत्या वयात आलेल्या नको तितक्या जबाबदाऱ्या, सासूच टोचून बोलनं, नणंदेचे नखरे, सगळं काही विचीत्र त्यात ती स्वतः ला नाही टिकवू शकली आणि परत घरी निघून आली, संपल ते सगळं तो संसार जो सुरू झालाच नव्हता तो थांबला तिथेच आणि नवऱ्याने सोडून दिलेली ती असा शिक्का वयाच्या अठराव्या वर्षी पडला तिच्यावर, पण ते घर ती सोडून आली होती की मग ती कशी नवऱ्याने सोडून दिलेली . आजूबाजूच्या बायका कुजबूजायच्या " बघा कशी चालतीय तोंडावर करुन नवऱ्याने सोडून दिले पण त्याच काही वाटतंच नाही हिला"...... अशा अनेक गोष्टी तिला ऐकायला लागायच्या.... बरं उलट तीने सोडून दिलेला तो नवरा असं हवयं ना??? पण इथे ही त्या जुन्या समाज रीती , पुरुष प्रधान समाज मग तो कसा असं मान्य करेल ........ आता तब्बल सहा वर्षानंतर तिला जे हवं ते प्रेम मिळालं होतं पण तो भूतकाळ तिला तिच भविष्य घडवू देत नव्हता. काय चूक होती तिची ? काय असं केलं होतं तिने की तिला तिच सुख मिळत नव्हतं ? तेव्हा तिचा ते लग्नं नियम बाह्य असून सुद्धा ह्याच सगळ्या लोकांनी आशिर्वाद दिलेच होते ना आणि आज ती तिच्या सुखाचा विचार करते तर त्यांना रूढी, परंपरा, नीती-नियम आठवले लगेच. तिला आजही का हक्क मिळत नाही हवं तसं जगण्याचा ? काय चूक आहे तिची ? आता तर प्रेम केलं होतं तिने , जरा सुखाची स्वप्ने पहायला सुरू केली होती, आत्ता कुठे "आयुष्य खुप सुंदर आहे" असं ऐकलेलं वाक्य पटायला सुरुवात झाली होती. तोपर्यंत गेलंच लगेच मांजर आडवं . सगळी दुःख तिच्याच पाठी होती इतके दिवस ज्या प्रेमासाठी तरसत होती ते समोर होत पण मध्ये एक मोठी इज्जत, समाज, प्रतिष्ठा नावाची दरी होती आणि ती तिला पार करावी लागत होती ते तिच असणार प्रेम मिळवण्यासाठी. शेवटी ती हरली असंही ती पहिली हरणारी नव्हती अशा अनेक "ती" हरल्या होत्या ह्या समाज्याच्या प्रतिष्ठे समोर......
का नेहमी असंच होतं? का सगळं तिलाच सहन करावा लागत? का सगळे तिच्या वरतीच दोष देतात? सगळ्या रीती का तिनेच निभवायच्या ? सगळे त्याग तिचेच का बरं? एका घरातून निघून दूसरऱ्या घरी जायचं तिने अन तरीही ती सगळीकडे परकीच असं का ? अशे खूप सवाल आज तिला पडतायतं पण त्याची उत्तर कोण देणार ??? नाही माहिती तिला आता ती एकटीच आहे आणि सोबतीला खूप सारे प्रश्न .......
इच्छा आहे की मिळतील तिला सगळ्या प्रश्नांची उत्तरे!!!!! .......
आणि तो .....तो आहे ना अजून तिचा ......
हो आहे तिच्या सोबत अजूनही ....... हारले सगळे तिच्या प्रेमापुढे , तिने तिच्या निस्वार्थी प्रेमाने त्याला जिंकल होतं. तो आता तिचा होता तिच्या सोबत...... तो तिला एवढचं बोलला
"आता मी आहे, सगळं मी पाहतो तु फक्त हसतं रहा नेहमी कारण तेच तर आहे जे मला कायम तुझ्या चेहऱ्यावर पहायला आवडतं. तु अशीच खुश रहा फक्त, मग मला सगळ्या जगाशी लढण्याची सुद्धा ताकद आहे माझ्यात. चुकलो आहे जरासा पण माफ करशील ना ??? जगाच्या त्या प्रतिष्ठे साठी तुला दुखवलं आणि तु मात्र कधीच साथ नाही सोडलीस ..... आणि आता मी कधीच नाही लांब जाणार तुझ्यापासून तु जा म्हणटलीस तरीही"
ती ( जराशी लाजून आणि खूप हसत ) " वेडा कुठला माझा !! किती वेडा आहेस रे तु !!! तुला का जा म्हणेल बरं? तु गेलास तर ........ मला माझा बालिशपणा कुठे दाखवता येणार मग ......आणि सोडायचं असतं तर इतका त्रास घेतला पण नसता आणि दिला पण नसता "
तो फक्त तिच्या डोळ्यात पहात होता ते तेज परत एकदा चमकत असतं आधीसारखचं कारण ती खूप खूप खूश असते...... तिला तिच्या प्रश्नांची सगळी उत्तरे तरी नाहीत मिळालेली पण हा तिने तिचे प्रयत्न सोडले नव्हते ती तिच्या प्रेमावर ठाम होती, तिचा तिच्या प्रेमावर आणि त्याही पेक्षा जास्त त्याच्यावर विश्वास होता........ आणि आज तिचा तो तिच्या सोबत आहे .... समाजापेक्षा पण एकमेकांत जास्त खूश आहेत आणि तो कायम तिचाच आहे आणि ती त्याची......
-चैताली भापकर.