Satyamev Jayate in Marathi Film Reviews by Anuja Kulkarni books and stories PDF | सत्यमेव जयते..

Featured Books
Categories
Share

सत्यमेव जयते..

सत्यमेव जयते..

भ्रष्टाचारावर बरेच चित्रपट आलेत आणि त्याच यादीत भ्रष्टाचार, सत्तेचा सातत्याने होणारा गैरवापर हाच विषय घेऊन सत्यमेव जयते ह्या चित्रपटाची भर पडली आहे. जॉन अब्राहम त्याच्या लुक्स साठी ओळखला जातो. बॉलिवूडचा अ‍ॅक्शन मॅन जॉन अब्राहम आणि मनोज वाजपेयी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरकडे जॉनचे चाहते नजरा लावून बसले होत़. याचे कारण म्हणजे, जॉनचा यापूर्वी आलेला परमाणुहा चित्रपट.परमाणुला बॉक्स ऑफिसवर मोठा प्रतिसाद मिळाला होता. साहजिकचं यानंतर जॉनकडून असलेल्या लोकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्यामुळे सत्यमेव जयतेची प्रेक्षक वाट पाहत होते आणि अखेर १५ ऑगस्ट ला हा चित्रपट प्रदर्शित झाला. मिलाप जव्हेरी याचं दिग्दर्शन ह्या चित्रपटाला मिळाल आहे.

सत्यमेव जयते ह्या चित्रपटाचा ट्रेलर अंगार रोमच उभा करतो आणि चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढवतो. देशभक्ती जागवणारा अजून एक चित्रपट म्हणून सत्येव जयते कडे पाहण्यास हरकत नाही. ह्यावेळी सिनेचाहत्यांना स्वातंत्र दिनानिमित्त भरपूर मनोरंजन मिळणार आहे ह्यात काही शंका नाही आणि मनोरंजनाबरोबर देशप्रेम सुद्धा वाढीस लागेल हे अगदी नक्की.

सत्य नेहमीच जिंकते आणि अखेर सत्याचा विजय होतो या संकल्पनेवर हा चित्रपट आधारला आहे पण चित्रपटातील अतिरंजीततेमुळे शेवट पचत नाही. पण जॉन च्या फॅन्स साठी मात्र सत्यमेव जयते चांगलीच ट्रीट मिळेल ह्यात शंका नाही. पण जॉन अब्राहमच्या चांगल्या अॅक्शनची अपेक्षा पूर्ण होत नाही अस काही प्रेक्षकांच मत आहे. काहीच्या मते ही अॅक्शनसुद्धा बिभत्स रूप घेते. चित्रपटाचा विषय वास्तवाला धरून आहे. आजच्या भ्रष्टाचारावर भाष्य करणारा आहे. पण चित्रपटाची मांडणी मात्र प्रचंड कमकुवत असल्यामुळे लेखकाचं म्हणणं लोकांपर्यंत पोचवण्यात चित्रपट कमी पडतो.

पूर्ण चित्रपट भर चांगलेपणा आणि वाईटपण ह्यांची लढाई दाखवली आहे. आणि त्याचबरोबर देशभक्तीवर ही कथा फिरते. ह्या चित्रपटाचे तगडे स्टार कास्ट अपेक्षा नक्कीच उंचावतात. मराठमोळी अमृता खानविलकर, मल्हार मालिकेमधला देवदत्त नागे ह्यांच्या भूमिका देखील ह्या चित्रपटात पाहायला मिळतील. अमृता खानविलकरने राझी ह्या चित्रपटात अभिनयाची चुणूक दाखवली होती त्यामुळे ती सत्यमेव जयते मध्ये कसा अभिनय करते हे पाहणे विशेष ठरणार आहे.

जॉनने भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या एका सीरिअल किलरची भूमिका साकारली आहे. जॉन सीरिअल किलरची भूमिका साकारतो आहे म्हणजे भरपूर अॅक्शन ह्या चित्रपटात पाहायला मिळणार हे अगदी नक्की. आपल्या पित्याच्या मृत्यूचा सूड उगवण्यासाठी आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी तो एकटाच मैदानात उतरला आहे. या लढाईत जॉन अनेकांना संपवतो. खाकीच्या रक्षणासाठी खाकीच्याच विरोधात उभा राहतो. मनोज वाजपेयी हा सुद्धा ट्रेलरमध्ये दिसतोय. पण त्याची ही भूमिका अलीकडे त्याने बागी2’मध्ये साकारलेल्या भूमिकेसारखी भासतेय. सीरिअल किलरच्या शोधात असलेला पोलिस अधिकारी मनोज साकारतो आहे.

भरपूर अ‍ॅक्शन आणि ड्रामा याने रंगलेला सत्यमेव जयतेहा चित्रपट स्वातंत्र्य दिनी रिलीज होतो आहे. म्हणजेच, या चित्रपटाचा गोल्डया चित्रपटाशी बॉक्स ऑफिस संघर्ष बघायला मिळणार आहे. १५ ऑगस्टलाच अक्षय कुमारचा गोल्डप्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. अक्षय कुमारचा 'गोल्ड' आणि आता जॉनचा सत्यमेव जयतेही बॉक्स ऑफिसवर धडकणार आहे. म्हणजे बॉक्स ऑफिस वर अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम या दोघांमध्ये कोण वरचढ ठरेल हे पाहण्याकडे आता सगळ्यांचे लक्ष वेधून राहील आहे. आणि यापैकी तुम्ही सर्वांत आधी कुठला चित्रपट पाहाल, याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. अर्थातच या निर्णयाआधी सत्यमेव जयतेचा ट्रेलर एकदा तरी पाहायलाचं हवा.

चित्रपटविषयी थोडेसे-

सत्यमेव जयते ह्या चित्रपटाची कथा नवीन नाहीच! वीर अर्थात जॉन अब्राहम ह्याच्या बदल्यावर आधारलेला हा चित्रपट आहे. ह्या चित्रपटाला 'ओल्ड वाईन इन द न्यू बॉटल' अस म्हणल तर वावग ठरणार नाही. पण ह्या चित्रपटातले संवाद मात्र उत्तम आहेत. चित्रपटा मधले काही संवाद आणि जॉन अब्राहम ला बघण्यासाठी हा चित्रपट नक्कीच पाहावा. कथेत नाविन्य नसल तरीही एकदा पाहायला हा चित्रपट काहीच हरकत नाही आणि तुम्ही जर जॉन अब्राहनचे फॅन असाल तर तुम्ही हा चित्रपट अजिबात चुकवू नका. सत्यमेव जयते ही अश्या एका तरुणाची कहाणी आहे जो रागाने आणि त्वेषाने भ्रष्टाचाराविरुद्ध लढतो. चित्रपटाचे कथानक काही खास नाही. त्यात काहीच वेगळेपण नाही. त्यात सिनेमाचे एकूण अंतरंग पाहिल्यावर चित्रपट वास्तवापासून कोसो दूर असल्याची जाणीव होते. चित्रपटातल्या अनेक गोष्टी सत्तर ऐंशीच्या दशकातील हिंदी चित्रपटांची आठवण करून देतात. चित्रपटातले संगीत अंगावर येते, अतिरंजीतपणा, वाजवीपेक्षा जास्त हिंसा चित्रपटाला कंटाळवाणा बनवते. चित्रपटाच्या सुरुवातीला वीर (जॉन अब्राहम) एका पोलीस अधिकाऱ्याला जिवंत जाळतो.येथून चित्रपटाला दिशा मिळते आणि पुढील दोन तास चित्रपट एकसुरीपणे चालतोय. जिथे पोलीस अधिकारी गुन्हा करतो तिथे तिथे जाऊन वीर त्यांचा खात्मा करतो. चित्रपटात एक वळण येते पण शेवटपर्यंत भ्रष्ट अधिकाऱ्यांचा खात्मा हाच एककलमी अजेंडा चित्रपटात राबवला आहे म्हणजे काहीच नवीन पाहायला मिळत नाही.

चांगल्या आणि वाईटामधील संघर्ष चित्रपटात हेच दाखवल आहे. पण पटकथा आणि संवाद यांचा योग्य मेळ आहे अस वाटत नाही. चित्रपट नीट न मांडल्यामुळे चित्रपट भरकटतो आहे अस वाटून जातं. तस पाहायला गेल तर नायक जॉन अब्राहम आणि खलनायक मनोज वाजपेयीमधील संघर्ष अधिक चांगल्या पद्धतीने दाखवता आला असता पण या आघाडीवर चित्रपट कमजोर पडतो आणि काही ठिकाणी चित्रपटाची पकड सुटते आहे का अस वाटून जात..

ह्या चित्रपटात सगळ्य कलाकारांनी चांगल काम केल्याच दिसून येत. मिलाप जावेरींच्या दृष्टीकोनाच्या तुलनेत कलाकारांनी केलेला अभिनय खूपच चांगला आहे. नायकाच्या भूमिकेत असणाऱ्या जॉन अब्राहमने एका हिंसक, आक्रमक अँग्री यंग मॅनची भूमिका चोख बजावली आहे. मनोज वाजपेयीने एका सच्च्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका सुरेख वठवली आहे. त्यांनी आपल्या रोल ला पूर्ण न्याय दिला आहे. आणि ते उत्तम अभिनय करतात हे पुन्हा एकदा दाखवून दिल आहे. नवोदित आयेशा शर्मा कॉन्फिडंट दिसते पण तिला अजून भरपूर सरावाची गरज आहे. चित्रपट चांगले आणि वाईटच्या युद्धात अडकतो. चित्रपटात देशभक्तीचे काही डोसही देण्यात आले आहेत. पण एकंदरच चित्रपटातले संवाद सुमार असून चित्रपट त्यामुळे ढासळतो. पण हा चित्रपट अॅक्टिंग साठी बघायचा असेल तर कथेचा फार विचार न करता पहा मग त्या चित्रपटाची मजा घेता येईल.

थोड्यक्यात-

फक्त मनोरंजन आणि जॉनला पाहायचं असेल तर हा चित्रपट बघायला हरकार नाही पण नवीन काही पाहायला मिळेल अश्या आशेनी गेलात तर मात्र तुमचा हिरमोड होईल. कधी कधी मारामारी थोडी जास्त आहे का असही वाटून जाईल पण प्रत्येकाची आवड समान नसते. काहींना अॅक्शन आवडते त्यांना मात्र हा चित्रपट नक्कीच आवडेल. तुम्ही सत्यमेव जयते का पाहणार आहात हे आधी ठरवून मग चित्रापट बघा म्हणजे तुमचा हिरमोड होणार नाही आणि तुम्हाला चित्रपटाचा आनंद देखील घेता येईल. आणि खूप मारामारी असल्यामुळे ह्या चित्रपटाला "ए" सर्टिफिकेट मिळाल आहे त्यामुळे लहान मुलांना मात्र ह्या चित्रपटाला नेता येणार नाही हे ही विसरू नका.

अनुजा कुलकर्णी.