Ti Chan Aatmbhan - 6 in Marathi Moral Stories by Anuja books and stories PDF | ती चं आत्मभान... 6

The Author
Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

ती चं आत्मभान... 6

स्वज्योत..

सुनिता भावसार.

गार्गी आणि जुई दोघी जिवाभावाच्या मैत्रीणी, अगदी लहानपणापासूनच्या. शाळेत जी घट्ट मैत्री जमली ती छान जमलीच. दोघी एकत्रच वाढल्या. शिकल्या, स्वप्ने पाहीली. दोघीही हुशार, मनमिेळाऊ, बोलक्या. यथावकाश दोघींची लग्ने झाली. दोघी दुरावल्या. दोघींना एकमेकींची इतकी सवय होती त्यामुळे दोघींना सुरुवातीला जड गेले. पण त्यावरही दोघींनी मार्ग शोधला. पत्रे लिहून भेटीची तहान पत्राद्वारे भागवू लागल्या. पहिली काही महीने लंबीचवडी पत्रे आणि त्या मधे नवऱ्याच्या, सासरच्या गोष्टी असायच्या. दोघी पत्रातून मन एकमेकींसमोर मन मोकळ करायच्या. पण दोघी संसारात गुंतल्या. जशा संसारात, जबाबदारीत गुंतत गेल्या तसे पत्रात हळूहळू खंड पडू लागला. पत्रलेखन कमी कमी होत गेल. मग वर्षांत एखादे ख्यालीखुशालीचे पत्र येऊ लागले.

गार्गी ने सुरुवातीच्या काळात संसाराची गरज म्हणून नोकरी धरली. पण काही काळातच गार्गीला मुले झाली. मग मुले झाल्यावर त्यांचे खर्च भागविण्यासाठीनोकरी आवश्यक होती. नंतर एक एक जबाबदारी पेलण्यासाठी ती राबतच राहीली. वर्षा नु वर्ष घरात आणि ऑफिसमध्ये रोजच परीक्षा देत राहिली आणि स्वतःला सिद्ध करत राहीली. अंगभूत हुशारीने नोकरीत वरवर जात राहीली. आयुष्यातील 50 वर्ष घर आणि ऑफिस ही तारेवरची कसरत करत होती. आज सुद्धा नेहमीच्या लगबगीने घरचे सर्व आवरले, डबे भरले, आणि ती ऑफिस ला पोहोचली. तिने ऑफिसच्या रगाड्यामधे स्वतःला झोकून दिले. गार्गी ऑफिस मध्ये मनापासून काम करत होती. ऑफिस सुटायच्या आधी सरांनी तिला बोलावून घेतले आणि हसत हसत तिच्या हातात बढती आणि पगार वाढीची ऑर्डर ठेवली. आनंदाने तिचे डोळे भरून आले. केलेल्या कष्टाचे चीज झालेले पाहून मन त्रुप्त झाले. भरल्या मनाने सर्वांचे अभिनंदन स्वीकारत गार्गी बाहेर पडली. घरी सर्व जण कसे खुश होतील असा विचार करत ती पेढे घेऊन आली. आज तिचे मन हलके झाले होते. तिच्या कष्टांच चीज झाल होत. तिने मस्त चहा बनवला आणि छान गाणी ऐकत चहा घेतला. कोणी ऐकायला नव्हते तर थोडे गाऊनही घेतले. सगळ्यांना घेऊन बाहेर जेवायला जायचे ठरवून गार्गी तिच्या आवडीची साडी नेसून तयार झाली. कधी एकदा नवरा येतो आणि त्याला ही आनंदाची बातमी सांगते असे तिला झाले होते. आणि तो आला.....गार्गी आनंदाने त्याला बढती ची बातमी सांगू लागली, पण नवरा खुश व्हायच्या ऐवजी स्तब्ध झाला. तिला वाटल होत नवरा खुश होईल. पण नवरा काहीच बोलला नाही. गार्गीला काही कळेना. तो आपल्या आनंदात सहभागी होइल या आशेने ती त्याच्या कडे पाहू लागली. पण तो कौतुक सोडाच, काहीतरी वेगळच बोलणार होता. तो गंभीरपणे म्हणाला," गार्गी, तू ही बढती घेऊ नकोस. बढती नको असे सांग." गार्गी नवऱ्याच बोलण ऐकत होती आणि नवऱ्याच बोलण ऐकून तिला धक्का बसला. तिने आश्चर्य चकीत होऊन विचारले," का? माझ्या कष्टांच चीज झाल आणि आता मी बढती का नको घेऊ?". नवरा गार्गीच बोलण ऐकून घेताच खेकसला,

"का? म्हणून विचारतेस, तुला काही कळते का? तू ऑफीसर होशील आणि मी एक साधारण कर्मचारी, माझे सर्व सहकारी मला हसतील, माझा अपमान होईल. ऑफीसर बायकोचा नवरा म्हणून माझी हेटाळणी करतील.माझ्या मागे मी कसा टाकाउ आहे, निष्क्रिय आहे हे बोलतील. आणि मला बढती मिळण्याची शक्यता नसताना तू माझा असा अपमान कसा करु शकतेस? या बढती वाचून तुझे असे काय अडले आहे? का आता तुला तुझ्या अधिकाराचा तोरा सगळीकडे मिरवायचा आहे? सगळ्या नातेवाईकांमध्ये चर्चा रंगेल की नाकर्ता नवरा अजून आहे तिथेच आहे पण बायको बघा किती पुढे गेली. नाही नाही, मला नाही चालणार! ते काही नाही तू बढती नको असेच सांग." गार्गी बधीर होउन ऐकत होती. नेहमी प्रमाणे त्याचा संताप बघून ती गप्प बसली. तिला गप्प पाहून तो पुढे समजुतीच्या स्वरात म्हणाला," तुला काही समजत नाही गार्गी. अशी आमिष देऊन वरीष्ठ लोक तुझा गैरफायदा घेतील. जग फार वाईट आहे . आणि तुझ्या प्रगती बद्दल लोक नाही नाही त्या शंका घेतील ते वेगळच. मला लोकांचे टोमणे ऐकावे लागतील. एखाद्या बेसावध क्षणी मी रागाच्या भरात संसार मोडला तर? त्या पेक्षा तूच नाही म्हण आणि आपण मानाने जगू." गार्गी सगळ ऐकत होती आणि मनातून दुःखी होत होती. मरगळलेल्या मनाने तिने कपडे बदलून स्वयंपाक केला. सवयीने हात चालत होते पण मन आतल्या आत आक्रंदत होते. पण मन मोकळ करणार तर कुठे? गार्गी मनातच आपल्या जोडीदाराचा स्वार्थीपणा पाहून दुःखी होत होती. तिच्या मनाचा तडफडाट होत होता. दुसऱ्या दिवशी ती संतापातच सर्व आवरु लागली. गार्गी ऑफिसला निघाली. त्यावेळी तिला नवऱ्याने 50 वेळा बजावले की आज बढती नको असेच सांगून ये. तावातावाने गार्गी ऑफिसला निघाली खरी पण पावले तिकडे वळेचनात. तिच्या डोक्यात विचारांचे ठोके पडत होते, डोके फाटेल का काय असे वाटत होते. तिला वाटले थोडे शांत पणे बसावे आणि डोके शांत करण्यासाठी ती एका बागेत जाऊन झाडाखाली बसली. डोळे बंद करून ती आपल्या आयुष्याचा विचार करु लागली. आपण आपल्या नवऱ्याला विरोध का नाही केला, का प्रश्न नाही विचारले, आपल्या पडखाऊ स्वभावाचा तिला राग येऊ लागला. तेवढ्यात कोणीतरी तिला धपकन मारले. घाबरून गार्गीने डोळे उघडले तर पहाते तो काय ती चक्क जुई होती. इतक्या वर्षांनी जुईला अचानक पाहून गार्गीला आनंद झाला आणि दोघीही एकमेकींच्या गळ्यात पडून रडायला लागल्या. जरा सावरल्यावर गार्गीने जुईची चौकशी केली. येणार असल्याचे कळवले का नाही यासाठी तिच्यावर चिडली. पण जुईने बिनशर्त माफी मागितल्यावर गार्गीने तिला घाईघाईने माफ करुन टाकले. जिवाभावाची मैत्रीण किती दिवसांनी गार्गीला भेटली होती आणि तिच्यावर राग तो किती वेळ राहणार? जुईच्या नवऱ्याचे ऑफिस चे काम काही दिवस तिथे होते म्हणून जुई ही गार्गी ला भेटायच्या ओढीने बरोबर आली होती. जवळच्या हाँटेल मध्ये ती उतरली होती आणि सहज पाय मोकळे करायला ती बागेत आली होती तेव्हा तिला गार्गी दिसली. मग काय... दोघी मैत्रीणी हॉटेल रुमवर आल्या आणि गप्पांचा मस्त फड जमला. एकमेकींना एकमेकींची माहिती दिली आणि घेतली. जुई गृहिणी होती. सासू, सासऱ्यांकडे पहात होती. घर अगदी व्यवस्थित सांभाळत होती. मुलांचा अभ्यास नवऱ्याच्या वेळा सांभाळत होती. आले गेले, पै पाहूणा, सणवार, रितीभाती सांभाळताना तिची दमछाक होत होती. आधी एवढी उत्साहाने सळसळणारी, काही करुन दाखवायच्या उर्मी ने झपाटलेली जुई पार कोमेजली होती. खाष्ट सासूची बोलणी खाऊन खाऊन तिचा उत्साह करपून गेला होता. नवरा त्याच्या कामात आणि मुले त्यांच्या त्यांच्या विश्वात मशगुल झाले होते. सगळ्यांच्या सोयी पहाणारी जुई मात्र कोणाच्याही खिजगणतीतही नव्हती. तिच्या अस्तित्वाचे भान घरात कोणलाही नव्हते. तिचे असणे आणि तिचे करणे हे नवऱ्याने गृहीत धरले होते. सर्व कर्तव्य पार पाडूनही तिचे कर्तृत्व नवऱ्याला मान्य नव्हते. जुई खूप छान गायची. लग्नाआधी ती गायनाचे कार्यक्रम करायची. ते सर्व लग्नानंतर बंद झाले होते. ती संगीताचा रियाज करु लागली की नवरा म्हणे, आधी घरातील कामे आवर मग गात बस. आणि अशी वेळ तिला मिळयचीच नाही. हळूहळू रियाज बंद झाला. जुईच्या जीवनातून संगीत नाहीसे झाले. त्या मुळे निर्माण झालेली पोकळी नवऱ्याच्या प्रेमाने भरून निघू शकली असती पण त्याला ते समजलेच नाही. तिचे मिटत जाणे त्याला जाणवलेच नाही. आता एक रेकॉर्ड बनवणाऱ्या कंपनी ने जुई ला गायला बोलावले होते. जुई ला जायचं होतं पण नवऱ्याला त्यात काही अर्थ वाटत नव्हता. तू एक गाणं गाऊन जेवढे पैसे मिळवशील त्यापेक्षाही कितीतरी पटींनी जास्त पैसे मी कमावतो मग तुला गायची गरजच काय? त्यापेक्षा घरी लक्ष दे. घरी सगळ्यांना काय हव नको बघ ते तुझे काम आहे गाणे नाही. असे नवरा म्हणाला. जुई ने खूप प्रयत्न केले पण तिला गाण्याची परवानगी मिळाली नाही. ती निराश झाली. हे सर्व सांगताना रडू तिला आवरत नव्हते. गार्गी ने तिच्या प्रमोशन चे सर्व जुई ला सांगितले. तिच्या प्रगती ने जुई खुश झाली. पण नवऱ्याचे बढती नाकारण्याचे फर्मान ऐकून ती भडकलीच. "आपल्याला आपल्या आयुष्यातील निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही का ? आपण काय एक यंत्र आहोत का? की आपल्याला मन, भावना नाहीत? तू स्वतः कमावती आहेस आणि माझ्या वर सर्व घर अवलंबून आहे तरीही आपल्या दोघींची स्थिती सारखीच आहे. आपण कमावू लागलो तरीही मानेवरचे समाजाचे जोखड आपण भिरकावून देऊ शकलो नाहीत." गार्गी म्हणाली," देवाने जन्माला आल्यापासून स्त्रियांवर जास्त जबाबदारी टाकली आहे. पुरुष सगळ्या बंधनांतून क्षणार्धात मोकळा होऊ शकतो पण आपण नाही. कोण काय म्हणेल याची काळजी आपणच वाहायची. आपण आई, बहीण, पत्नी, मुलगी, सून आहोत पण एक व्यक्ती ही आहोत,हे कोणीच लक्षात घेत नाही. ऑफिस मध्ये असो वा घरात, आपल्याला प्रत्येक आघाडीवर आपले अस्तित्व सिद्ध करावे लागते. सगळ्याच्या चुकांना आपण क्षमा करतो मग आपल्या कडून सर्व परफेक्शनची अपेक्षा का? "

जुई म्हणाली," याचे उत्तर आपल्या कानावर लहानपणापासून पडणारे शेरे आहेत, की सर्व समाजाचा उत्कर्ष ,अधोगती ही स्त्रियां वर अवलंबून आहे. तिने घराकडे दुर्लक्ष केले की घर विस्कटून जाणारच. तिने सर्व आघाड्यांवर जिंकलेच पाहिजे. बंधने आपल्या वरच, मन मारुन जगणे, त्याग करणे हे मुलींचेच काम आहे. मगच आपण महान ठरतो आणि आपल्याला अजून त्याग करायला लावून पुरुष त्यांच्या मस्तीत जगतात. मग एवढे शिकून सवरूनही आपल्या स्थानात फरक काय पडला? पूर्वी च्या बायकांमध्ये आणि आपल्यात फरक काय ? "

एकदम गार्गी चा चेहरा उजळला. ती म्हणाली," फरक नाही कसा, नक्कीच पडला आहे. नाहीतर आज मी ज्या स्थाना पर्यंत पोचले आहे ती पोचले असते का, तू स्टेजवर बसून हजारो लोकांसमोर गाऊ शकली असतीस का? आताच्या आपल्या परीस्थितीला आपण स्वतः जबाबदार आहोत. आपल्या क्षमतांवर आपला स्वतःचाच विश्वास नाही. आपला संसार आपल्या शिवाय चालूच शकत नाही. आपली कर्तव्य पार पाडताना आपली आवड, छंद जोपासायचा. अधिकार आपल्याला आहे हे स्वतः ला मान्य असेल तेव्हाच ते आपण इतरांना पटवून देऊ शकतो. माझी बढती ही माझ्या आत्मविश्वासासाठी आणि माझ्या कष्टांसाठी आवश्यक आहे हे मी ठासून सांगायला हवे. पटवायला हवे. आपण आपला पतीशी लग्न केले आहे त्याच्या स्टेटटसशी नाही. पगार कमी असेल तर मी त्याच्या वर प्रेम करणार नाही असे शक्य नाही. तू सुद्धा गायला लागलीस तर तुही काही घर सोडणार नाहीस. उलट तुझ्या आवडीचे गायन करून तुला जे समाधान मिळेल तू तेच तुझ्या घराला देशील. जर आपणच समाधानी, खुश नसू तर आपण घरातील सर्वांना कसे आनंद वाटू शकू? तेव्हा चल, आज पासून आपल्या मतावर ठाम राहू. आपले घरातील आणि आपल्या लोकांच्या मनातील स्थान आदराचे करु. आपण कमजोर नाही नाही उलट सर्वांना बळ आपण देत असतो हे लक्षात आणून देऊ."

जुई चा चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे तेज पसरले. एकमेकींशी बोलल्यावर दोघी एकदम मोकळ्या झाल्या. दोघींनी एकमेकींना शुभेच्छा दिल्या आणि अतिशय आत्मविश्वासाने त्यांनी बाहेर पाऊल टाकले. एक नवीन आव्हान पेलायला. एक स्वतः चे स्थान बनवायला. एक नवीन शिखर पादाक्रांत करायला त्यांनी हिरीरीने पाऊल टाकले होते आणि आता पर्यंत इतकी शिखरे स्वबळावर पार केली होती की हे आव्हान तर त्या सहजच जिंकणार होत्या.

Remember, not failure but low aim is a crime.

सुनिता भावसार.