*हर्षवर्धन*
-काही दिवसांपूर्वी मॉलमध्ये टंगळ मंगळ करताना मेघाला अचानक हर्षवर्धन भेटला. निर्जन वाळवंटात ओळखीचा व्यक्ती भेटल्यासारखे ती आनंदली. दोघांची शेवटची भेट ही मेघा आणि समीरच्या लग्नाच्या वेळची होती. इतक्या वर्षांनंतर ते एकमेकांना बघत होते मॉलच्या फुड कोर्टाच्या टेबलावर ते बसले. एकमेकांना पाहताना एकमेकांच्या बदलांची स्वतःशीच चर्चा करत होते. कोणीच काही बोलत नव्हतं दोघांत एक शांतता होती
हर्षवर्धन मेघाचा शाळेपासूनचा मित्र होता खूप चांगला मित्र किंवा त्यापेक्षाही काही अधिक. हर्षवर्धनला मेघा खूप आवडायची पण त्याबद्दल तो दिला कधीही काही बोलला नव्हता. तो तीच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. तिचा हसणं, तीचं बोलणं तिचा रोखठोकपणा आणि तिचा समजूतदारपणा यांच्यावर तो फिदा होता. पण त्याचं प्रेम त्याने त्याच्या मनात लपवून ठेवलं होतं. मेघाचा त्यांच्यावर प्रेम वगैरे नव्हतं पण तो तिचा मित्र होता खूप चांगला मित्र. तो तिचा बेस्ट फ्रेंड होता. तो स्वभावाने खूप चांगला होता. ते दोघं खूप वेळ एकत्र घालवायचे शाळेत असतानाच्या पिकनिक, ग्रुप स्टडी अशा सगळ्या गोष्टी ते एकत्रच असायचे. कदाचित त्याचमुळे हर्षवर्धनला तिच्यावर कधी प्रेम झालं हे त्याला काळालाच नाही. पण त्यांच्यामध्ये बोलण्याची हिम्मत कधीच नव्हती. शाळा संपल्यावरही तो तीचा मित्र होता. मेघाच्या घरचे तसे ओपन माइंडेड होते त्यांनी त्यांच्या निखळ मैत्रीबद्दल कधीही प्रश्न केला नाही. किंवा त्यांना कधी त्यांच्या मैत्रीचा प्रॉब्लेम झाला नाही शाळा संपल्यानंतरही जेव्हा कॉलेज निवडायची वळाली तेव्हा हर्षवर्धनने मेघाचे कॉलेज निवडले. त्यामुळे का होईना दोघांच्या मैत्रीला कधीही ब्रेक लागला नाही. कॉलेजच्या सगळ्या वर्षांमध्ये त्यांची मैत्री आणखी गहिरी झाली त्यांच्या दोघांच्या कॉलेजच्या आयुष्यात अनेक मित्र मैत्रिणी आले त्यांच्याशीही त्यांची मैत्री झाली पण त्याचा परिणाम त्यांच्या मैत्रीवर कधीच झाला नाही ते दोघं नेहमीच एकत्रच दिसत त्यांचा उल्लेखही एकत्रच व्हायचा. अगदी कॉलेजच्या प्रोफेसर्सना सुद्धा ते दोघे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत अशीच शंका होती. कारण तो तिच्या शिवाय नाही दिसायचा आणि ती त्याच्या शिवाय पण तसं नव्हतं ते दोघे खूप चांगले मित्र मैत्रिणी होते.
कॉलेजमध्ये त्यांच्या मित्र मैत्रीण सगळ्यांनाच हर्षवर्धनच्या एकतर्फी प्रेमा बद्दल माहिती होते. पण कोणीच कधी काहीच बोललं नाही, कारण हर्षवर्धन मेघाच्या बाबतीमध्ये खूपच इमोशनल होता. हर्षवर्धन दिसायला हँडसम होता तसाच तो कॉलेजच्या स्टुडंट्स चा लीडर होता त्याचा कॉलेजमध्ये एक वेगळा मान होता त्याचप्रमाणे त्याच्या मागे मुलींचा घोळका नेहमी असायचा पण तो मात्र मेघामध्ये रमलेला असायचा कॉलेजमध्ये असताना तो खूप हिम्मतवान ,निडर आणि कोणत्याही परिस्थितीला न घाबरणारा असा होता पण मेघा समोर येताच त्याच्या सगळ्या हिंमतीची वाईट दशा व्हायची त्याच्या तोंडातून शब्द नाही निघायचा आणि म्हणूनच त्याच्या कॉलेजच्या शिक्षणाचा शेवट झाला पण मेघासमोर स्वतःच्या प्रेम भावना व्यक्त करून त्याच्या एकतर्फी प्रेमाचा शेवट मात्र त्याला जमला नाही. त्याने बराच वेळ तिला विचारण्याचा प्रयत्न केला पण त्याला नेहमी भीती वाटायची की प्रेम वक्त करून जर मेघा नाही म्हणाली तर त्यांच्यामध्ये असलेल्या मैत्रीचाही शेवट होईल. तो या गोष्टीसाठी कधीच तयार नव्हता त्याला त्यांची मैत्री हवी होती त्याला मेघा हवी होती ती मैत्रीण म्हणून असली तरी चालेल पण ती हवी होती तिच्याशिवाय त्याच्या आयुष्याचा तो विचार करू शकत नव्हता, म्हणून त्याने स्वतःला व्यक्त नाही केले.
कॉलेज संपलं बरेच दिवस झाले त्यांच्या भेटीही कमी झाल्या. त्यानंतर हर्षवर्धनने ठरवलं कि त्याला स्वतःला मेघा पुढे व्यक्त व्हावंच लागेल नाहीतर तो तिला कायमचा गमावून बसेल. अशाच एका दिवशी तो मेघाच्या घरी गेला तिला लग्ना साठी प्रपोज करायला. त्याने पाहिले तिथे आधीच खुशीचे वातावरण होते आणि हॉलमध्ये चार वेगळे पाहुणे बसले होते. त्या पाहण्यां मध्ये एक तरुण मुलगा होता. तो समीर होता. त्याच दिवशी मेघा साठी समीर चा स्थळ आलं होतं आणि मेघाने लग्ना साठी होकार दिला होता. त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. क्षणात त्याच्या मनाचे छिन्न विच्छिन्न तुकडे झाले. इतकी वर्ष ज्या विरहाला घाबरून मेघाला आपल्या प्रेमाची त्याने ग्वाही नाही दिली तीच भीती आज आ वासून समोर उभी होती हर्षवर्धनला उशीर झाला होता खूपच उशीर त्याने मेघाला गमावलं होतं ,कायमचं. तेवढ्यात त्याने मेघाचा हसरा चेहरा बघितला त्याला बर वाटलं त्याचवेळी त्याने स्वतःला सावरलं आणि तो घरात शिरला तो येताच मेघाच्या वडिलांनी मोठ्या आनंदानं त्यांचे स्वागत केले आणि त्याची ओळख समीर आणि त्यांच्या फॅमिलीशी मेघाचा बालपणीचा मित्र म्हणून करून दिली. समीरने हर्षवर्धनशी हस्तांदोलन केले मेघाने हर्षवर्धनला हसून तिला मुलगा पसंत असल्याचा इशारा केला हर्षवर्धनच्या डोळ्यात टचकन पाणी आले पण त्याने ते दिसू दिला नाही. त्याने तिला हसून प्रतिसाद दिला त्याला आनंद झाला होता की मेघाला खरंच मुलगा पसंत आहे. त्याने समीर शी गप्पा मारल्या हर्षवर्धनला ही समीर आवडला. त्याला तो खूपच साधा समजदार आणि मनमिळाऊ वाटला मेघा साठी तो योग्य होता. हर्षवर्धन आणि समीरची चटकन मैत्री झाली. त्यानंतर हर्षवर्धन तिथून निघाला पण मेघाला त्याच्या मनात काहीतरी चाललंय असं वाटलं तिने त्याला हाक मारली.
- मेघा- “हर्ष?”
(मेघा हर्षवर्धनला ‘हर्ष’म्हणूनच हाक मारायची)
मेघाचा आवाज ऐकताच हर्षवर्धन थांबला त्याचं मन मागे वळण्यासाठी मुळीच होत नव्हत कारण तो तिला आणखी बघू शकत नव्हता तरी तो थांबला त्याने मागे बघितले आणि तो म्हणाला -हर्षवर्धन- “काय झालं?” त्यांच्या डोळ्यातले भाव तिला कळू नये यासाठी तो पुरेपूर प्रयत्न करत होता. - मेघा- “तुला काय झालंय ?असा वेगळा का वाटतोय आणि एवढा गप्प का? तुला काही बोलायचंय का माझ्याशी?” -हर्षवर्धन- “नाही गं असं काहीच नाही. पण तू मला कळवलं नाही की तुला बघायला मुलगा येणार होता?” -मेघा- “मलाही काल रात्री कळालं. मी तुला सांगण्यासाठी फोन केला होता. काकूंनी सांगितलं की तू झोपलास आणि उठवू नका असं सांगितल्यास म्हणून तुला नाही उठवला त्यांनी आणि मी ही म्हटलं सकाळी फोन करेन पण सगळा गडबडी मध्ये मी विसरले आय एम सो सॉरी परंतू तुला माहिती नव्हतं मग तू कसा आलास?” (तिच्या या प्रश्नावरती हर्षवर्धन कडे कोणतेच उत्तर नव्हते त्याची नजर खाली गेली) -हर्षवर्धन- “मी सहज आलो होतो. ” (मेघाने त्याच्याकडे साशंक नजरेने बघितले) -मेघा- “खोटं बोलू नकोस सहज येणारा माणूस एवढा टापटीप तयारीमध्ये येत नाही. ”
(या सगळ्या गडबडीमध्ये हर्षवर्धन विसरला होता की तो प्रपोज करण्यासाठी एकदम तयार होऊन आला होता. आता त्याला सुचत नव्हते की काय उत्तर द्यावेमग त्याला आठवलंतो म्हणाला )
-हर्षवर्धन- “अग वेडे ही तयारी यासाठी की आजपासून मी माझा फॅमिली बिझनेस जॉईन करतोय मी म्हटलं ऑफिसच्या पहिल्या दिवशी तुला भेटून जावं म्हणून आलो होतो. ”
-मेघा- “वाह अभिनंदन !शेवटी तू काका काकूंचा स्वप्न पूर्ण केलास. आज खूपच चांगला दिवस आहे आपल्याकडे आज दोन दोन खुशखबरी आहेत. तुझ्या बिझनेसची आणि माझ्या लग्नाची. ”
हर्षवर्धन- “हो तुला ही अभिनंदन. मी येतो. ”-मेघा-
“थांबना इतक्यात का चाललास तुला माझ्याशी काही बोलायचंय का? तुला समीर आवडला नाही का काही चुकीचं आहे का ? नसेल तर सांग मी आताच नकार देते”
(त्याच्या मनात आलं की तिलाओरडून सांगावं ‘की हो हे चुकीचे आहे कारण मी तुझ्यावर खुप प्रेम करतो तुझ्याशिवाय जगू नाही शकत, तुला मी लग्नासाठी प्रपोज करायला आलोय आणि तुझा लग्न माझ्याशी झालं पाहिजे’पण त्याच्या मनातली वाक्य आजही त्याच्या ओठांवर यायला तयार नव्हती त्याने तिच्या डोळ्यात पाहिले आणि तो म्हणाला)
-हर्षवर्धन- “समीर खूप चांगला मुलगा आहे तो तुला खूप खुश ठेवेल. ”
-मेघाला तिच्या बेस्ट फ्रेंडकडून हे ऐकून खूप आनंद झाला होता.
-तो तिथून निघाला त्याच्या घरी गेला बेडरूमचा दरवाजा बंद केला. मुले कधी प्रेम भंगा मध्ये रडत नाहीत असा ऐकला होता त्याने पण तो रडला, खूप रडला त्याला आवरला नाही गेला. नॉर्मल मुलांसारखा तो दारू पिऊन पडला वगैरे नाही पण धाय मोकलून रडला. त्याच्या आयुष्याचा चित्रपट त्याच्या डोळ्यासमोरून चालला होता. मेघा बरोबरचे प्रत्येक क्षण त्याला आठवत होत. आयुष्याने त्यांच्या हृदयावर घणाघाती आघात केला होतापण तो सावरला त्याने शपथ खाल्ली कधीही न रडणेयांची. त्याने मेघाला मारलेली थाप खरी करायचा ठरवलं त्याने त्याचा फॅमिली बिझनेस जॉईन केला. त्याच्या आई वडिलांना खूपच आनंद झाला. पण मुलाचा यांत्रिकी पण त्यांना खेचत होतं त्यांनी त्याला बराच वेळा लग्न करण्यासाठी मनवायचा प्रयत्न केला पण त्याने नकार दिला. -मेघाच्या लग्नात हर्षवर्धन आवर्जून उपस्थित होता. स्वतःचं मन घट्ट करण्यासाठी तयाची आवश्यकता त्याला वाटली मेघासाठी त्याच्या मनातला कप्पा नेहमीच राहणार होता. अचानक मेघाच्या लग्नामध्ये झालेल्या प्रसंगाने त्याच्या आशा वाढवल्यापण नंतरमेघाने दाखवले निडरपणा साहस त्यांचा त्याला खूप अभिमान वाटलात्याने मनात आलं की ‘म्हणून तर मी तुला प्रेम करतो. ’ लग्नात त्याने मेघाला वचन दिले कधीही मित्र म्हणून तुला माझी गरज लागली मी नेहमी उभाअसेन. * या सगळ्या घटनाक्रमानंतर इतक्या वर्षांनी मेघा आणि हर्षवर्धन एकमेकांना पाहत होते त्यांचा भूतकाळ त्यांच्या समोर तरळत होता. शाळा कॉलेजच्या घटना मैत्रीच्या आठवणी ताज्या झाल्या जणू काही त्या कालच घडल्या होत्या इतक्या वर्षांचा अंतर आलच नव्हत.
-दोघे हसले मग मेघाने बोलायला सुरुवात केली
-मेघा- “हर्ष ! कसा आहेस?”
उर्वरित पुढील भागात
हर्षवर्धन मेघाला भेटल्या मुळे समीर व मेघाच्या संसारिक आयुष्यामधील वादळ कुठले वळण घेईल ह्या आपण अपराध बोध तिसऱ्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत.
***