Ti Chan Aatmbhan - 2 in Marathi Moral Stories by Anuja books and stories PDF | ती चं आत्मभान... 2

The Author
Featured Books
  • You Are My Choice - 41

    श्रेया अपने दोनो हाथों से आकाश का हाथ कसके पकड़कर सो रही थी।...

  • Podcast mein Comedy

    1.       Carryminati podcastकैरी     तो कैसे है आप लोग चलो श...

  • जिंदगी के रंग हजार - 16

    कोई न कोई ऐसा ही कारनामा करता रहता था।और अटक लड़ाई मोल लेना उ...

  • I Hate Love - 7

     जानवी की भी अब उठ कर वहां से जाने की हिम्मत नहीं हो रही थी,...

  • मोमल : डायरी की गहराई - 48

    पिछले भाग में हम ने देखा कि लूना के कातिल पिता का किसी ने बह...

Categories
Share

ती चं आत्मभान... 2

२. एक कमाल मुलगी..

रेखा खांडके.

क्लासरूममध्ये एक आवाज घुमला. खणखणीत, खंबीर आवाजात एक मुलगी बोलत होती. सगळ्याचं लक्ष आवाज कुठून येतोय इकडेच होतं. “I know the subject very well. I have conceptually clear basics of the subject. What he is telling is wrong, then why should I keep silent? Why you all are not accepting the fact? I am confident. If you agree, accept the thing or prove that I am wrong.”

हे डायलॉग आहेत त्या मुलीचे, जिने challenge केले होते एका ट्रेनिंग क्लास मधल्या सरांना. तिचं बोलण ऐकून सगळे आवाक झाले होते! कोणालाच काय बोलाव काही सुचत नव्हते. सर हे त्यांच्या विषयातील एकदम जाणकार. पण तरी त्यांना क्रॉस प्रश्न ती मुलगी करत होती. अशा प्रकारचा क्रॉस प्रश्न आतापर्यंत कधीच काढला नव्हता. ते स्वतः सुद्धा अचंबित झाले होते. सर सुद्धा विचारात पडले आणि त्यांना त्या मुलीचा मुद्दा पटला. त्यानी विचार केला, "अरे खरच असा विचार आपण केलाच नव्हता. खरच ही मुलगी वेगळीच आहे." आणि शेवटी त्यांनी मान्य केले कि त्या मुलीचा मुद्दा बरोबर आहे.

ती मुलगी होती राधिका. मी एकदा तिला पहिले होते ऑफिसमध्ये काही महिन्यांपूर्वी. ती प्रसिद्ध होती तिच्या challenges फेस करण्याच्या वृत्तीमुळे, तिच्या arrogance आणि arguments साठी. तिच्यातले हे गुण खरच वाखाखण्याजोगे होते.

राधिका! सुंदर आणि बुद्धिमान मुलगी! तिला विद्वत्तेचे वरदानही तसेच मिळालेले! शिवाय academics मध्ये कायम topper आलेली. कारण विषयाचे पाठांतर न करता कन्सेप्ट आधी समजाऊन घ्यायचे ही तिची खोड. त्यामुळे अवघड प्रश्नही तिला फारसे जड जायचे नाहीत. ह्याच सवयीचा तिला खूप फायदा होत होता.

शाळेत असतांना राधिका अशी नव्हती. थोडी बुजरी होती. शाळेत असतानच तिला तिच्या सौंदर्याची जाणीव झाली होती. सगळे सर तिला गोंजारायचे. तिला त्या गोष्टीचा खूप राग यायचा, पण ती काही करू शकत नव्हती. राधिका तशी खंबीर मुलगी होती पण आधी तिने कधी कोणत्या गोष्टीला विरोध केलाच नव्हता. ती मनातच कुढत बसायची. तिची घुसमट मात्र आईच्या लक्षात आली. आईची नजर घारीसारखी तीक्ष्ण होती. आईला ही गोष्ट अजिबात आवडायची नाही. आईला आपल्या मुलीला खंबीर बनवायचे होते त्यासाठी तिने राधिकाला जवळ बसवलं आणि दीक्षा दिली. “ राधिका, आज मी आहे तुझी बाजू घ्यायला, तुझे रक्षण करायला. पण तू जसजशी मोठी होशील, तुला तुझे रक्षण करायचे आहे. पुरुष कशाला वचकून असतात तर बुद्धिमत्तेला. तुझ्याकडे देवाच्या कृपेने बुद्धिमत्ता आणि रूप हे दोन्ही भरपूर आहे. त्याचा उपयोग करून सगळ्यांना वचक बसव. गोष्टींचा सामना करायला लागला तर मागे हटायचं नाही.” राधिकाने आई सांगते आहे ते शांतपणे ऐकून घेतलं आणि आईचा प्रत्येक शब्द आत्मसात केले. राधिका मुळातच होती हुशार. आईच्या उपदेशातला मतितार्थ कळला. तिला आईकडून खूप मोठी शिकवण मिळाली होती आणि ती गोष्ट तिने मनावर बिंबवून घेतली होती. राधिका आईच्या शिकवणीनुसार वागायला लागली आणि मग तिला ही अडचण कधीच आली नाही.

राधिकाच शिक्षण पूर्ण झाले. घरच्यांना आता वेध लागले तिच्या लग्नाचे. हिऱ्याला कोंदणही साजेसेच मिळाले. नवरा- विश्वासही हुशार, आणि समजूतदार. त्याची राधिकाला नेहमीच साथ होती. त्यामुळे तिची झळाळी उत्तरोत्तर वाढतच राहिली. नवीन नोकरी लागली. तिने जीव लाऊन काम केले. राधिकाला त्याचे फळही मिळाले. बॉसची अत्यंत आवडती assistant ही बिरुदावली कायम राखली. अत्यंत क्लिष्ट गोष्टी ती सोप्या रीतीने सोडवत असे. स्मरणशक्ती अफाट. पाहिजे ती गोष्ट आवश्यक ते वेळेत सादर! कोणत्याही बॉसला आणखी काय हवे? बॉस सुद्धा सगळी महत्वाची कामे तिला सांगू लागले. तिच्यावर बॉसचा सुद्धा पूर्ण विश्वास बसला होता! बॉसची आवडती म्हणजे साहजिकच तिला त्याचा फायदाही होत होता. पण ह्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. दुस्वास...... मनुष्यप्राण्याचा अधिकारच तो! प्रत्येकजण, मग तो पुरुष असो को स्त्री, प्रत्येकजण तिच्या लागले मागे कुचूकुचू बोलायला आणि बदनामी करायला. कारण कानामागून येऊन ती तिखट झाली होती. आपल्या मागून आलेली मुलगी इतकी पुढे जातीये ही गोष्ट कोणाला सहन होईल? मग काय, सगळ्यांनी जणू विडाच उचलला तिचे खच्चीकरण करायचा. चान्स मिळाला की इतर कर्मचाऱ्यांकडून टोमणे तिला ऐकावे लागायचे. अश्यावेळी तिला मदत झाली आईच्या शिकवणीची. राधिकाच्या कानावर तिच्या मागे कोण काय काय बोलतायत हे पडत होतच. पण लोकांच्या टोमण्यांना घाबरेल इतकी कमकुवत राधिका कधीच नव्हती. तिनेही मग विडा उचलला हे आव्हान स्वीकारायचे. कारण कर नाही त्याला डर कशाला? राधिका स्वतःशी प्रामाणिक होती. वर्ष संपले. बॉस ने success celebrate करायाला बाहेरगावी जायचे ठरवले. ह्यावर पण कुचाळक्या झाल्याच. 'हा पण तिचाच प्लान असणार. ती बोलली आणि आपला बॉस लगेच तयार. बॉस ला स्वतःच्या मनाप्रमाणे वागायला लावते.' एक ना दोन.. काही वाट्टेल ते आरोप तिच्यावर होत होते. खर तर बॉसला तिनेच सांगितले होते की, सर्वचजण कष्ट करतात. सर्वांना बदल मिळावा म्हणून त्यांना चांगला चेंज देऊयात. म्हणजे पुढच्या वर्षी अधिक जोमाने काम करतील. यात भावना होत्या की सर्व खुश व्हावेत. पण लोकांना हे दिसलेच नाही. राधिका कशी चुकीचं वागते हेच दाखवण्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहीलं होत. पण राधिका अनभिज्ञ होती. तिला कल्पना सुद्धा नव्हती ह्यावेळी सुद्धा सगळे तिच्या विरुद्ध बोलतायत.

राधिका उत्साहाने सेलेब्रेट करायला तयार होत होती.. आणि इतर मात्र तयार ह्या दोघाना रंगेहात पकडायला. सगळे पोचले माथेरानला. मिटिंग झाली. पुढच्या वर्षीच प्लान झाले. त्याची चाचपणी झाली. पडताळणी झाली. कृती आराखडा झाला. त्यात सुद्धा राधिका अग्रेसर. मार्केट परिस्थिती, आपले products, त्याची मागणी, सर्वांचा अभ्यास स्वभावानुसार आधीच केलेला. त्यामुळे टेबल चर्चेत हिरीरीने भाग घेतला. राधिकाचा उत्साह वाखाखण्याजोगा होता. आणि ह्यावेळी सुद्धा राधिकाच चमकून राहिली होती. त्यामुळे इतरांचा नुसता जळफळट होत होता. कोणी कोणत्याही चर्चेत सहभाग सुद्धा नोंदवला न्हवता कारण बाकी सर्व आले होते फक्त मजा करायला. आणि राधिका विरुद्ध पुरावे गोळा करायला. राधिकाच्या मते ट्रीप मस्त झाली. तिला वाटत होत आता तरी तिच्या विरुद्ध होणारी गॉसिप बंद होईल पण तस काहीच झाल न्हवत. परत आल्यावर तर गॉसिपला उधाण आले. खोट्या गोष्टी किती सांगू आणि किती नको ...... तिखट मिठ लाऊन वाट्टेल त्या वावड्या उठल्या. ऑफिस मधले लोकं, मनाला वाटेल ते पसरवत होते. इकडे राधिकाला काहीच पत्ता न्हवता. राधिका खुश होती की आता तरी तिच्याबद्दल ऑफिसचे लोकं चांगले बोलत असतील पण एक दिवस ह्याचा उद्रेक झालाच...... एका मीटिंग मध्ये, तिच्या समोर तिच्या बद्दल कोमेंट झाल्या. 'बॉस नेहमी तिलाच उजवे माप देतात. कारण आम्हाला काही कळत नाही असे समजू नका इत्यादि. इत्यादि.' आता मात्र राधिकाची सहनशक्ती संपली होती. सगळ्यांसाठी इतका चांगला विचार करून सुद्धा कोणालाच त्याची किंमत नव्हती. उलट आता तर, सगळे तिच्याविरुद्ध अधिकच वाईट बोलत होते. राधिकाच्या अंगाचा तिळपापड झाला. तिने प्रत्येकाला केलेली कामातील मदत, त्यांनी केलेल्या चुका, राधिका ने केलेल्या दुरुस्त्या, त्यांना समजाऊन सांगितलेले काम, त्यांना पाठीशी घालेतेले, सगळे सगळे तिच्या नजरेसमोरून गेले. आणि तिने निर्णय घेतला ह्या सगळ्या गोष्टी बॉस च्या कानावर घालायच्या. आणि तिने नावानिशी सरांना सगळ सांगितले. जेव्हा सरांना हि गोष्ट कळली, तेव्हा त्यांनी सगळ्यांना धारेवरच धरल. आणि मग मात्र सगळे गप्प झाले. सगळ्यांनी माना खाली घातल्या. राधिकानी आपल्याला मदत केली आणि आपण त्याची जाणीव सुद्धा ठेवली नाही ह्या गोष्टीचा सगळ्यांना पश्चाताप होत होता. सगळ्यांना जाणवलं, आपण राधिकानी केलेल्या चांगल्या कामाचा जाणीव ठेवली नाही. त्याचा उल्लेखही केला नव्हता. ऑफिस मधल्या सगळ्यांना आपली चूक उमगली आणि त्यांनी चूक कबुल सुद्धा केली. शेवटी सगळं सुरळीत झाल.

ह्यावेळी पण राधिकानी तिच वेगळेपण सिद्ध केल होत. राधिका घाबरली नाही, उलट परिस्थितीचा सामना केला. राधिकाच वेगळेपण, हुशारी, आक्रमकपणा सगळच वाखाखाण्याजोग होते. परंतु ऑफिस मध्ये जो प्रकार झाला त्याचा त्रास राधिकाला होत होता. शेवटी राधिका एक माणूसच होती. राधिकानी आपल्यावरचे सगळे आरोप खोटे ठरवले पण झालेल्या प्रकारामुळे तिच्या मनावर ताण आला होता. आणि शेवटी तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.

घरी आल्या आल्या तिने झालेला सगळा प्रकार विश्वासला सांगितले. तिला आता त्या ऑफिस मध्ये नोकरी करायची इच्छा नाही हे सुद्धा सांगितलं. विश्वास तसा समजूतदार. त्याने शांतपणे सगळे ऐकून घेतले. राधिकाचं बोलण पूर्ण झाल आणि तो बोलायला लागला,“तू नोकरी सोडणार हे सरांच्या कानावर घातलस? सर काय म्हणाले?” राधिका उत्तरली, “मी नाही बोलले नोकरी सोडण्याविषयी सरांजवळ. पण झालेल्या प्रकारामुळे त्यांना सुद्धा वाईट वाटल होत. बिचारे सर. त्यांच्यावर पण नसते आरोप झाले. त्यांनी रागावर कसाबसा काबू ठेवला पण नंतर मात्र प्रत्येकावर ते बरसले. कारण माझ्या कामाबाबत कोणालाच काही बोलता आले नाही. माझं काम किती चोख आहे हे सरांना माहिती आहे. सर नेहमीच माझ्या बाजूनी बोलतात. पण आता नको वाटत रे तिथे काम करायला. मी आहे खंबीर पण झालेल्या प्रकारचा मला खूप त्रास झाला. माझ्या मागे काहीही बोलत होते ऑफिसचे लोकं. आणि ते मला कळल तेव्हा माझी काय अवस्था झाली असेल? अश्या ठिकाणी काम कराव अस नाही वाटत आता." राधिकाच्या डोळ्यात पाणी आल,

“तुझ्या राजीनाम्याबद्दल मी विचारतोय. तू अजून राजीनामा दिला नाहीयेस ना?” विश्वासनी विचारलं. राधिकाने मान खाली घातली आणि म्हणाली, “मी सरांशी काही बोललेच नाही. तशीच बाहेर पडले आहे. उद्या राजीनामा मेल करेन सरांना.”

विश्वासनी राधिकाचं बोलणं ऐकलं. तिचा हात हातात घेतला आणि बोलायला लागला, "राधिका, अग जग हे असेच आहे. तू नोकरी बदललीस म्हणून काही बदलणार नाही, फक्त नावे बदलतील पण वृत्ती तशीच राहणार आहे. आणि तू कधी झालीस इतकी कमकुवत? राधिका, तू नेहमीच खंबीर आहेस आणि खंबीरपणे परिस्थितीचा सामना देखील केलास पण सगळ सुरळीत झाल आणि आता पळून का जातीयेस? उलट तू मानाने त्याच ऑफिस मध्ये काम कर. तुला अजूनच आदर मिळेल ऑफिस मध्ये. आणि मी तुला कधी विचारले आहे ऑफिस बद्दल? माझा तुझ्यावर विश्वास आहे. मी तुला कधी बोललो नाही पण मला पण तुझ्या आणि तुझ्या सरांबद्दल काहीतरी माहिती देण्यासाठी फोन आले होते. पण मी अजिबात लक्ष दिले नाही. आणि तुला काही विचारले नाही कारण माझा तुझ्यावरचा विश्वास! मला एवढी खात्री आहे की अगदी तुला जरी कोणी आवडला तर प्रथम तू मला सांगशील, तू अस काही सांगत नाहीस तोपर्यंत मला अजिबात काळजी नाही. निवांत आहे मी. आणि माझे प्रेम इतके तकलादू नाही, की कोणी सोम्यागोम्या आला तर तुला माझा विसर पडेल. आणि त्या ऑफिस मधून राजीनामा द्यायचा विचार मनातून काढून टाक. तू काही चूक केली नाहीस मग तू का घाबरून जगणार?” राधिका विश्वास कडे पाहत होती. तिच्या आणि विश्वासमधला बॉंड किती घट्ट आहे ह्याची जाणीव तिला झाली आणि राधिकाला डोळ्यांना धार लागली. डोळे पुसत ती अलगद ती विश्वासच्या मिठीत शिरली. डोळे पुसले आणि हळूच म्हणली, "थँक्यू विश्वास. माझा खंबीरपणा कमी होऊन दिला नाहीस. आईच्या शिकवणीमुळे मी खंबीर झाले आणि आज माझ्यातला खंबीरपणा टिकवून ठेवायला तू मदत केलीस. आय लव यु विश्वास." आणि परत विश्वासला घट्ट मिठी मारली.

अशी ही राधिका, कोणाची idol होऊ शकते? हो .... हीच राधिका , जी स्मार्ट आहे, सुंदर आहे, जिचा आत्मा , मन पवित्र आहे, जी आपले मत ठामपणे मांडते. आपल्या सहकार्याला पाठीशी घालते, त्याला चुका समजून सांगते, तशीच संसारात पण रमते. आणि आयुष्य खंबीरपणे जगते. अशी राधिका सर्वांमध्ये राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!!!!

रेखा खांडके.