नमस्कार वाचक हो. विचार मंथना च्या पहिल्या लेखा मध्ये आपलं स्वागत आहे. वाचनाची आवड आणि त्यातून निर्माण झालेल्या विचारां च्या लेखना ची उत्सुकता हेच माझ्या ‘“विचारमंथन” या श्रुंखला युक्त लेखाचे मूळ आहे. रोजच्या जीवना मध्य आपल्या कडे माध्यमांची कमी नाही आपण बरेच विषय, बातम्या, वृत्तपत्र, टेलिव्हिजन मीडिया, रेडिओ यां कडून वाचतो ऐकतो त्यातले काही विषय आपल्या डोक्यात राहतात तर काही निघून जाता पण काही विषय असे असतात की ते डोकं भंडावून सोडतात. काही विषय हास्याचे असतात काही नंतर उत्तरही नसतात तर तर काही खूप विचार करायला लावणारे असतात सतत त्यांचे विचार आपल्या मना मध्ये घोळत असतात.त्यांचा विचार सोडणं अप्रिय असतं आपल्याला. तर काहीं चा विचार करणं ही काळाची गरज असते.अशाच माझ्या वाचना मध्ये आलेल्या समाचार घटनाया बद्दल मी विचारमंथना त लिहिते. आज मी आपल्या भारता मध्ये कर्नाटक येथे झालेल्या निवडणुकां आणि त्या नंतर झालेला गोंधळ, तशी स्थितीला राजकारण, सत्ताकारण, तिथे चाललेला घोडेबाजारआणि त्या नंतर कोर्टाची भूमिका आणि नंतर आला निर्णयया सर्व घटनांवर लक्ष देता विचार करा लागणाऱ्या बऱ्याच गोष्टी समोर आल्याआणि त्या मी माझा प्रिय भारतीय नागरिकां बरोबर शेअर कराव्या असं मला वाटलं. या विषयावर लिहिण्याचे मुख्य कारण म्हणजे आपण सर्व. एवढय़ा दिवसांच्या राजकीय नाट्यामध्ये आपण आपल्या देशाच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला का? नसेल घेतला तर घ्या स्वतः विचार करा या घटनांबद्दल आणि माझा हा पुढील लेख तुम्हाला तुमच्या विचारां साठी एक धागा देण्याचा प्रयत्न करेल.
प्रिय भारतीय
आपल्या देशाचे राजकारण सध्या तापले होते. तसे ते नेहमीच तापलेले असते. पण कर्नाटकाच्या निवडणुका थोडा खास होत्या. काँग्रेस की भाजप ? या साध्या प्रश्नावर आपला संपूर्ण देश विचारात पडला होता.हा प्रश्न साधा यासाठी कारण त्याचं उत्तर आधी आपल्या संविधान मध्ये सविस्तर नियमा प्रमाणे दिला गेला आहे. आणि ते असं की ज्याच्याकडे जनाधार असेल तो सत्तेत. या नियमानुसार जनतेने उत्तर दिले आहे मग तरी आपल्याकडे आज या प्रश्नाला एवढे महत्त्व का आले ? भारत सर्वात मोठा लोकशाही असणारा देश आहे आणि लोकशाहीचा हाच अर्थ आहे की त्यात लोकांच्या मताला सर्वतोपरी मानले जाते मग जनतेच्या मतानंतर ही परिस्थिती निर्माण झाली तरी कशी ? आपल्या लोकशाहीला काय झाले? ती धोक्यात तर नाही ? लोकशाही मध्ये संविधानाला असाधारण महत्त्व आहे. आपण पृथ्वीवर जरी जन्म घेतला असेल तरी भारतीय नागरिक होण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिला आहे, मत मांडण्याचा अधिकार दिला. पण आज त्याच संविधानाच्या नियमांना डावलण्याचे प्रयत्न करण्यात आले. सत्तेची भूक, राजकारण, पक्षांमधले मतभेद, भारत जिंकण्याचे स्वप्न, राजकारणामध्ये पुन्हा सक्रिय आणि सज्ज होण्याची आव्हाने, या सारख्या स्वकेंद्री इच्छांसाठी भारतासारख्या मोठय़ा लोकशाहीची पायमल्ली करणारी घटनाक्रमे समोर येतात. ते राजकारण करत नाहीयेत ते फक्त सत्ताकारण करत आहेत. कोणता पक्ष कोणती आघाडी सगळे सारखेच. मिळणाऱ्या मतांची किंमत आहे पण बहुमताची किंमत नाही. आणि ती वेळ लवकरच येईल जेव्हा संविधानाला, मतदाराला आणि त्याच्या मताला महत्त्व राहणार नाही महत्त्व राहील ते फक्त काही लोकांना. आणि त्याला लोकशाही म्हणत नाहीत. भारतीय नागरिक हो आपले अस्तित्व धोक्यात आहे.भविष्याच्या पदरा मध्ये काय दडले हे सांगणं कठीण आहे. संपूर्ण जगाचा इतिहास साक्षी आहे जेव्हा जेव्हा मूठभर लोक देश चालवायला निघतात तेव्हा तेव्हा पारतंत्र्याची घडी बसते लोकशाहीची दैना होते. भविष्य विकास या गोष्टी दूर राहतात. जनतेची बर्बरता होते .त्यांच्या हाल अपेष्टा ऐकणारं कोणी उरत नाही. हीच भीती आपल्या संविधान निर्माता डॉ बाबासाहेब आंबेडकरांना होती की भारतीयांचा भूतकाळ हा पुन्हा त्यांचा भविष्यकाळ म्हणून समोर नाही आला पाहिजे म्हणून त्यांनी निवडणुका, सत्तेचे विकेंद्रीकरण, न्याय व्यवस्था, प्रशासकीय अधिकारी या मार्गाने लोकशाहीसाठी भक्कम असे कुंपण तयार करून ठेवले आहे. आणि या कुंपणाच्या रक्षणाची कार्य मतदारांचे आहे. जेव्हा हे लोकशाहीचे कुंपण कोणी तोडण्याचा प्रयत्न करेल तेव्हा लोकशाहीच्या रक्षणा साठी प्रत्येक मतदाराने एक भारतीय नागरिक म्हणून लढले पाहिजे. आपल्या आपल्या भारताशी असलेला संबंध दाखवून दिला पाहिजे यातच आपला सन्मान आहे. प्रत्येक भारतीयाचा सन्मान हा भारतीय संविधानामध्ये लिखित आहे. आणि म्हणूनच सन्मानाने जगायचे असेल तर आपल्या संविधानाची पायमल्ली रोखली पाहिजे. भारतातील कोणताही पक्ष मग तो जुना असो किंवा नवा त्यास आपल्या भारतीय संविधानाला बदलण्याचा त्याच्या नियमांना दूर सारण्याचा अधिकार नाही. भारत कुठल्या पक्षाचा किंवा त्या पक्षाच्या महत्त्वाकांक्षांचा किल्ला नाही .भारत एक देश आहे जिथे करोडो भारतीय राहतात ज्यांना स्वतःची मत आहेत आणि ती मांडण्याचा अधिकारही आहे.हे माझ्या भारतीय बंधू भगिनींनो मतदारांनो गरज आहे आपण आपल्या भारताच्या लोकशाही वरील कुंपणा कडे लक्ष दिले पाहिजे कारण कुंपण तुटण्याची पूर्ण शक्यता आहे. सध्याच्या घडणाऱ्या घटनांचा नीट अभ्यास करा. भारतीय राजकीय परिस्थिती काही तरी सांगण्याचा प्रयत्न करतेय. जन आदेशाची रवानगी कचऱयाच्या डब्यात कशी करतात हे आपण पाहिलेच आहे. यावेळी न्यायसंस्थेने वाचवले पण पुढच्या वेळी काय होईल? न्याय संस्थे पुढचे पेच काही कमी नाही ? न्यायव्यवस्थे बद्दल आलेल्या समाचार यांमध्ये खुद्द चीफ जस्टिस ऑफ इंडिया बद्दलअसंतोष व्यक्त करणारे तीन न्यायाधीश ही बातमी काही आपल्या साठी जुनी नाही. म्हणून भारतीय हो आपण नेहमी वेगवेगळ्या पक्षांच्या बाजूने उभे राहतो. हा चांगला तो चांगला हा विकास करेल तो विकास करेल. या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण भारतीय म्हणून एकत्र आलं पाहिजे. कुणीही मनमानी कारभार करणार नाही याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि असं कोणी करत असल्यास त्वरित पाऊल उचलले पाहिजेत, आवाज उचलला पाहिजे, मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. उत्तम उमेदवार निवडून दिला पाहिजे झाला खरच प्रदेशाची माहिती असेल जो खरच जनतेला महत्त्व देत असेल जनतेच्या मताला महत्त्व देत असेल प्रसंगी जबाबदारी स्वीकारणारा असेल आणि असा एकही उमेदवार नाही भेटला तरी मतदान करा NO vote ला, नो वोट म्हणजे काही लोकांना वाटतं कीआपले मत वाया गेले पण असे काही नाही नो वोट म्हणजे आपला कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही हे दाखवण्याची किंवा सगळ्यांना नाकारण्याची आपली ताकद आहे म्हणून यज्ञ उमेदवार न दिसल्यास याचा वापर नक्की करा अयोग्य उमेदवाराला निवडून देशाचं व आपलं स्वतःचं भविष्य धोक्यात नका घालू. मतदान हा तुमचा हक्क आहे म्हणून मतदान नक्की करा नाहीतर भविष्यात पारतंत्रात जाण्याची तयारी ठेवा कारण जगात हिटलर, लादेन, मुसोलिनीयांच्या उदयाचे मुख्य कारण हे कुठेना कुठे सुरुवातीला त्यांना न झालेला विरोध हाच आहे. लोकशाहीमध्ये विरोधाला खूप मान आहे करण विरोधा मुळे लोकशाहीला बळकटी मिळते त्यामुळे विरोधात झालाच पाहिजे पण जिथे लोकशाहीत विरोध होत नसेल तिथी लोकशाही कमजोर असते तिची पावले हुकूमशाही कडे जात असतात. प्रिय भारतीय आपली लोकशाही बळकट आहे ना? आपल्या देशात विरोध संपवण्यासाठी विरोधी पक्षाला दाबण्याचे कारस्थान तर होत नाही ?आपल्या लोकशाही ला तडा तर जात नाही? लोकशाही मध्ये प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते प्रत्येकाला समान हक्क आहे आणि जर हे हक्क कुणा एखाद्याकडे जास्त जाणार असतील किंवा एखाद्याला जास्तीचा अनैतिक फायदा होत असेल तर मात्र विरोध हा झालाच पाहिजे
धन्यवाद
आपण जशी आपल्या घराची काळजी घेतो तशीच आपल्या देशाची काळजी घेणंही खूप गरजेचा आहे. माझ्या लेखातून तुम्हाला विचारांची दिशा मिळाली असेल अशी आशा आहे.
***