प्रेम पत्र
आय लव्ह यु...!
अरुण वि. देशपांडे -पुणे.
प्रिय मानसी
माझ्या मनाच्या घरातली तुझी जागा तू तुझ्या प्रेमाच्या शक्तीवर मिळवली आहेस, पेम ही भावनाच अबोल असते, भावना मुक्या असतात असे म्हणतात, आणि नजरेचे इशारे बोलके असतात, प्रेमाची भाषा अनोखी असते, सुरुवातीला अनोळखी असेते. पण. दोन मने जुळून येतात, एकमेकाची आवड समजू लागते..आणि जादू झाल्यागत..प्रेमाची भाषा दोन प्रेमी जीव.कधी नजरेच्या भाषेतून तर कधी गूढ -संकेताच्या शब्दातून बोलू लागतात, जणू ही भाषा, हे शब्द, नजरेचे इशारे..हे सगळे त्या दोघातल्या प्रेमाची गुज गोष्ट असते.
मानसी..तुझ्या प्रेमाची,मनाच्या निष्ठेचे खरे तर कौतुक करायला हवे..कारण..तुझ्या प्रेमाची जाणीव मला उशीरच झाली..तुझ्या मैत्रिणी म्हणायच्या तुला.. मानसी. काय पाहिलंय ग तू य्च्यात एवढे ? त्याला प्रेम कशाशी खातात ? हे सुद्धा माहिती नाहीये.. आणि तू त्याची दिवाणी झालीस ?, वेडी की खुळी ग तू ?
प्रश्न तुझ्या मैत्रिणींना पडला होता..तुला तर हा प्रश्न पडलाच नव्हता, तू या कडे तू कधीच लक्ष दिले नाहीस, "तुला तुझ्या प्रेमाची पुरेपूर खात्री होती..म्हणूनच तर..तू तुझ्या मनात "प्रेमाची पूजा बांधली होती माझ्या नावाने."
कॉलेजमध्ये एकाच वेळी होतो आपण.आपले वर्ग वेगळे ,शिक्षण वेगळे..मित्र.मैत्रिणी वेगळे..गोष्ट एक समान होती आपल्यात..मनात ओढ.कलेची.." या समान धाग्याने आपल्याला एकत्र आणले.. कथा -कविता लिहिणारा मी लेखक-कवी होतो, अभ्यासाने परीक्षेत कधी दगा -फटका केला नाही..म्हणून दरवर्षी पुढच्या वर्गात जायचो.. विद्यापीठ आणि कोलेज मधल्या लेखन - स्पर्धेत, युवक -मोहोत्स्वात मी लिहिलेल्या एकानिका विजेत्या ठरू लागल्या..एक कलाकार म्हणून कोलेज, विद्यापीठ. आणि रंगभूमीच्या वर्तुळात माझी छोटीशी का होईना ओळख निर्माण होऊ लागली...
मानसी.तू बोलून चालून कला शाखेची विद्यार्थिनी..कलेची आसक्ती..असलेली कलाप्रिय तू.. एकदा, स्पर्धेच्या नाटकात कोणती ही रोल द्या मी उतुसुक आहे असे सांगत माझ्या समोर पहिल्यांदाच उभी राहिली. तुझ्या नजरेतील आर्जव, मला मोहिनी घालून गेले, तू फारसे काही न बोलता निघून गेलीस,
हा माझ्या साठी एक वेगळाच अनुभव होता.
नाटकांचा सिझन सुरु झाला कि कोलेज मध्य मुली माझ्या भोवती असायच्या, गोड बोलून, मस्का लावून.माझी स्तुती करीत म्हणायच्या..
हिरोईनचा रोल "दिला तरच करीन.नाही तर.विचारयचे सुद्धा नाही मला...
अशा हवेत चालणार्या..या गर्दीत अगदी अचानक - एक साधी वाटणारी सरळ दिसणारी मुलगी.येऊन म्हणते...तुमच्या सोबत काम करायचे आहे,रोल कोणता देणार तुम्ही ? ते महत्वाचे नाही माझ्या साठी.मला आवडते भूमिका करणे.
स्वार्थासाठी.प्रसिद्धी मिळवण्यासाठी माझा उपयोग करून घेणार्याची गर्दी नेर्ह्मी डोक्यात जायची, पण .तू अशी सरळ स्पष्ट बोलण्याने खूप वेगळी वाटली..पहिल्यांदाच कुणी डोक्यात जाण्या ऐवजी थेट मनात जाऊन बसले असावे. नंतर किती तरी दिवसात पुन्हा हा विषय निघाला नाही..तू तुझ्या विश्वात..मी माझ्या विश्वात...
एकदा एका प्रसिध्द कवींचा सत्कार आपल्या कोलेजात झाला..त्यांच्या भेटीच्या निमित्ताने -कवी सम्मेलन घेण्याचे ठरले.ऐनवेळी भाग घेणे खूप जणांना जमले नाही, ज्यांना जमले त्यात अर्थातच मी होतो, विशेष म्हणजे तू त्या दिवशी कविता सादर केलीस.ती माझी कविता होती.
तू म्हणालीस.. माझी कविता नाहीये ही..पण.माझ्या आवडत्या कवीची कविता आहे ही.त्यांची परवानगी घेऊन..मी हे कविता सादर करते आहे... तुझ्या मैत्रिणी गालातल्या गालात हसत आहेत हे मला जाणवले....
मानसी तूच शिकवलीस मला प्रेमाची भाषा..,आज त्या प्रेमाची अनुभूती पुन्हा घ्यावीशी वाटते.बघ
तू म्हटलेली माझी कविता..
तू एकदा
तू एकदा तरी
होऊन मी पहावे
का प्रीती तुजवरती
शोधूनी तूच घ्यावे...!
भुललो कधीच नाही
मी देखण्या रुपाला
गुणवान सुंदरी तू
भुललो तुझ्या गुणांना
हे गोड रूप तुझे
डोळ्यात या पहावे
तू एकदा तरी...!
जगणे हे ग कसले
की प्रीत ज्यात नाही
असणे हे ग कसले
की साथ तुझी नाही
मी एकटा नसे आता
साथीस तू असावे
तू एकदा तरी....!
मानसी.तू तुझ्या प्रेमाची अशी जाहीर कबुली तर दिलीस,तू या बाबतीत इतकी धीट असशील असे वाटले नव्हते. तुझ्या विषयी त्या वेळी तरी माझ्या मनात नक्कीच तसे " काही नव्हते...असे असले तरी.."आपण कुणाला तरी इतके आवडतो आहोत " ही जाणीव मात्र सुखद वाटत होती.
पण म्हणतात ना.. नादिष्ट लोकांचे काही खरे नसते..आत्ता इथे..तर नंतर कुठे..काही पत्ता नाही..माझे असेच असे..कोलेजच्या बाहेरच्या विश्वात सुद्धा माझी दखल घेतली जाऊ लागली..नाटक लिही, किंवा दुसर्याचे असेल तर डायरेक्टर हो आणि कर प्रयोग..अशा उपक्रमामुळे..डोक्यात एकाच वेळी.काय काय गोंधळ उडायचा माझे मलाच काळात नव्हते...
अशा वेळी.मानसी..तू माझ्या सोबतीस आली, कोणत्या अधिकाराने तू माझ्या मनाचा, माझ्या उपक्रमाचा ताबा घेतलास कळाले नाही, लोक सुद्धा तुला विचारीत,मग मला बोलत.तू माझी आहेस" याची जाहीर चर्चा सुरु नव्हती हे जितके खरे होते..त्या पेक्षा.." मी तुझाच आहे " यावर सर्वांचा पक्क विस्वास बसला होता.
नाटकत भले ही अजून तू माझी नायिका झाली नव्हती, रियाल लाईफ मध्ये मात्र तुझी हा रोल करण्याची तयारी सुरु झाली होती. आपले प्रेम ", आपली जोडी..ओपन सिक्रेट " झाले होते. मानसीचा..मानस " अशी माझी नवी ओळख तुला आवडणारी आहे..हे मला जाणवत होते.
तू कधी कधी म्हण्यची..मानस,तुझ्याकडून तुझ्या प्रेमाची कबुली मिळाली नाहीये,मीच आपली, तुला माझा मानून " प्रेमाची जाहीर कबुली देत फिरते आहे, कधी तू मला.म्हणणार आहेस.. मानसी आय लव्ह यु...! मी आतुरले आहे तुझ्या कडून हे अमृत शब्द ऐकण्यासाठी.
मी विचार करायचो..प्रेम..किती अद्भुत भावना आहे ही, "ढाई अक्षर प्रेम के ",किती असीम अशी शक्ती आहे या प्रेमात, जो या बंधनात अडकला त्यालाच अनुभूती होऊ शकते प्रेमाची, बाकीच्यांना काय कळावे प्रेमातले ?
एका जुन्या गीतात शायर म्हणतोय - मुहब्बत ही न जो समझे , वो जालीम प्यार क्या जाने...!
मानसी सारख्या भावनाप्रधान मुलीच्या प्रेमाला होकार देता येईल एकवेळ, पण पुढे काय ? आपल्यातला कलाकार, मिळालेली कलेची देणगी.त्या बळावर जगण्याची असोशी..आयुष्य काढता येईल यावर ?
स्वप्न पाहणे छान असते, स्व्पांत जगणे त्याहून सुंदर असते..वास्त्व्यातल्या जगण्याचे काय ? नोकरी करायची नाही ? असे मन ठरवते, हे मनस्वीपण झेपेल का मानसीला ? मान मिळेल,सन्मान मिळेल.धनाचे काय ?
त्याविना संसार चालत नाही..याचे भान मला ठेवावे लागेल..
मानसी तू प्रेमाने भाव वेडी झाली आहेस..वास्तवाचा विचार कर..मनाने भरलेला,रिकाम्या खिशांचा हा असा बे भरवसी आयुष्यभर तुझ्या सोबत असणार आहे..हे कटू सत्य तू स्वीकारशील ही.पण पुढे हेच जळजळीत वास्तव दाहक होत जाईल,ते चटके स्वीकारण्या शिवाय आपण काही करू शकणार नाही.
हे सर्व मी कितीदा तरी तुला सांगितले..पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही.. तू या प्रेमाच्या लढाईत गनिमी काव्याने माझ्यावर मात केलीस, माझे घरचे माणसे फितूर झाली ", तुझ्या प्रेमाचा विजय झाला, सर्वांनी मला आकल शून्य ठरवले, भावना शून्य ठरवले. आपले कोलेज संपले,शिक्षण संपले..त्याच वर्षी..आपले श्बुः मंगल झाले.
आपल्या प्रेमाच्या दुनियेत माझा "वर-चष्मा " कसा असणार. चष्मेवाल्या वधूने. मानसीने नजरेच्या कैदेत कायमचे बंदिवान केले मला.
मानसी..नेहमीच इतके छान आणि चांगले घडू लागले की.भीती वाटायला लागते, सुखाचे ओझे वाटायला लागते,आणि तसेच झाले.. एका रात्री..प्रयोग करून तेन्तांना आमच्या टीमच्या गाडीला अपघात झाला, त्या भीषण अपघातात कुणी जीव गमावला नाही,पण जबर जायबंदी करून गेला हा अपघात, डोळ्या पुढे अंधार, मना मध्ये काळोख दाटला.. जो तो पुन्हा नव्या उभारी घेण्याच्या प्रयत्नात.. अशावेळी..ज्याला सावरणारे होते, ते सावरून गेले, ज्यांना कुणीच नव्हते ते कोसळून पडले..
मानसी..मी नशीबवान.. तू सावरलेस, उभारी दिलीस, संजीवनी झालीस माझ्या जीवनाची.. माझ्यातील कलावंत तू जपून ठेवलास, आणि मनाला व्यवहाराची जाणीव करून दिलीस.. मन भरून चालत नाही, पोट पण भरवता आले पाहिजे.." हे सत्य शांतपणे तू मला समजावलेस.
आज तुझ्यामुळे मी आहे..
मानसी आय लव्ह यु.....!
तुझा
मानस.
***