Devika in Marathi Short Stories by Arun V Deshpande books and stories PDF | कथा - देविका

Featured Books
  • ખજાનો - 36

    " રાજા આ નથી, પણ રાજ્યપ્રદેશ તો આ જ છે ને ? વિચારવા જેવી વાત...

  • ભાગવત રહસ્ય - 68

    ભાગવત રહસ્ય-૬૮   નારદજીના ગયા પછી-યુધિષ્ઠિર ભીમને કહે છે-કે-...

  • મુક્તિ

      "उत्तिष्ठत जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत। क्षुरस्य धारा निशि...

  • ખરા એ દિવસો હતા!

      હું સાતમાં ધોરણ માં હતો, તે વખત ની આ વાત છે. અમારી શાળામાં...

  • રાશિચક્ર

    આન્વી એક કારના શોરૂમમાં રિસેપ્શનિસ્ટ તરીકે નોકરી કરતી એકત્રી...

Categories
Share

कथा - देविका

देविका

देविका नाव आहे तिचे, पण या नावाने तिला कुणीच आवाज देत नाहीत, घरात आणि बाहेर - " देवी " हेच तिचे नावघरातील सर्वांच्या, म्हणून तिच्याही सवयीचे झालेले.

सामान्य घरातली, चारचौघींसारखी एक मुलगी - असेच देविका बद्दल म्हणता येईल, लग्न जमेपर्यंत नोकरी करण्याची परवानगी दिली, . नसता आता पर्यंत तिच्या आई-वडिलांनी रीतसर तिचे लग्न करून दिले असते पण, त्यांनी अजून तशी सुरुवात केली नव्हती म्हणून देवीची नोकरी चालू आहे. असेच म्हणणे जास्त योग्य ठरेल.

लग्नास योग्य झालेल्या वयाच्या मुलीसाठी जी घाई केली जाते, काळजी केली जाते " ते वातावरण देवीच्या घरात होते, नातीवाईक मंडळीत सांगण्यास सुरुवात झाली होती देवीची आई म्हण्यची.. लक्ष असू दे बरे का.. एखादा छान मुलगा त्याचे स्थळ दिसले तर, आपल्या देविकासाठी लक्ष असू द्या.

आई-बाबांनी सुरूवातीलाच तिला सांगितले हे बघ - देवी, आम्ही नव्या पद्धतीचे विरोधक आहोत असे समजु नकोस,

तू स्वतः काही ठरवुन ठेवलं आहेस का ? हे अगदी मोकळेपणाने, स्पष्ट आणि स्वच्छ पणे सांगुन टाक, कारण आजकालच्या मोकळ्या वातावरणात मुलं मुली भेटून, बोलतात आणि परस्पर ठरवून, , मग घरच्यांना सांगतात.. आम्ही आमच ठरवलंय, किंवा सरळ म्हणतात. आम्ही लग्न करून आलोय.. .. !

आम्ही " प्रेम-विवाह विरोधक आहोत असे समजू नको, फक्त एक समजून घे -आणि विचार करून बघ -.

त्या अगोदर आम्ही काय सांगतो आहोत हे लक्षात असे दे तुझ्या

देविका -प्रेम करणे सोपे असते, हेच प्रियकर व प्रेयसी, लग्नानतर नवरा- बायको, पती- पत्नी " झाले की सगळं चित्र बदलुन जात असतं, एक वेगळे लाईफ सुरु होते. सह-जीवनाचे पर्व. नवरा-बायको झालेल्या प्रियकर आणि प्रेयसी या दोघांन आपण प्रेमात आकंठ बुडालेलो असायचो याचा लागणा नंतर विसर पडतो. ते संसार करू लागतात..

सुरुवात कशी करायची ? गोंधळ सुरु होतो.. त्यांना समजून घ्यावे लागते की - संसार "एकट्याचा नसुन तो दोघांनी मिळुनच करायचा असतो", सारासार विचार करायचा असतो त्यालाच संसार म्हणतात.

तू समझदार आहेस तुझ्या मनाची काय तयारी आहे हे तू आम्हाला सांगितल्यावर मग पुढे काय करायचे ठरवु. समजा तसे काहीच नसेल तुझे तर मात्र आम्ही तुझ्यासाठी "वर -संशोधन मोहीम सुरु करू, त्यात ते जो कुणी योग वाटेल त्याचा तू विचार करायचा आहेस.

.. रोजचीच ओळखीची - कंपनीची बस, ठरलेल्या थांब्यावर जाऊन उभे राहयचे. बस आली की नेहमीच्या सीटवर जाऊन बसायचे, तिच्या घरापासून कंपनीत जाई पर्यंत एक तास कमीत कमी लागत

असायचा, आताही ती रोजच्या सीटवर बसली. भली मोठ्या कंपनीत ती जॉब करीत होती.. बस मध्ये स्टाफचे असले तरी तिच्या फार ओळखी नव्हत्या.. कवचित कधी तिच्या फ्लोर मधला कुणी असला तर हाय हेल्लो व्हायचा, एरव्ही सगळे अनोळखी, ते आपापल्या कानात मोबाईल स्पीकर अडकवून स्वतःच्या नादात असायचे मग, आजूबाजूच्या जगाकडे ते पहातही नसत.

देवीच्या मनात विचार येऊ लागले.. आई-बाबाना आपल्या लग्नाची इतकी घाई झालेली आहे.. हे त्यंच्या भूमिकेतून विचार केला तर बरोबर आहे, पण. माझ्या मनाची तशी काहीच तयारी नाही.. आई बाबा लाख म्हणाले असतील.. तुझं काही असेल तर सांग. त्याचा आम्हे विचार करू..

देवीला ठरवता येईना की- नरेश बद्दल आपल्याला नेमकं काय वाटतयं ? त्यच्या मनाचा अंदाज त्या दृष्टीने तिने घेतला नव्हता, समजा त्याच्या मनात आपल्या बद्दल काहीच नाहीये, मग आपल्याला जे वाटते आहे. त्याचा काही उपयोग नाही.. हे सगळं वाटनं म्हणजे एकतर्फी प्रेम ठरेल.. पण जे वाटतंय ते प्रेम आहे की आकर्षण ?

आपल्या मनात सध्या फक्त गोंधळ आणि गोंधळ आहे.. लगेच निष्कर्ष काढण्यात अर्थ नाही. तूर्तास हा विषय आणि नरेशचा विचार करू नये “तेच ठीक राहील.

देविकाच्या मनाला थोडे मोकळे वाटले.. दडपण आणि ओझे या दोन्ही गोष्टी त्रासदायक होण्यास आपण स्वठाच कारणीभूत असतो.. कारण सगळेच प्रश्न हे कधीच चुटकी सरशी कधी सुटत नसतात.

नरेश तिच्या ऑफिसात नियमित येत होता. एका मोठ्या सप्लाय एजन्सीचा तो प्रतिनिधी आहे “हे देवीला तिच्या बाजूला असणार्या नीला ने सांगितले होते

देवीच्या कंपनीला आवश्यक वस्तू पुरविणे, कुरियर सेवा मिळवून देणे, कंपनीचे कॅन्टीन सुद्धा नरेशच्या एजन्सीकडे होते. मार्केट मधली इतर महत्वाची काम त्याच्या एजन्सीकडेच होती, त्यामुळे ज्याच्या त्याच्या तोंडी सतत नरेशचे नाव असायचे, याचेच काम करील, त्याचेच काम करील “ असा दुजाभाव नरेशच्या वागण्यातून बोलण्यातून देवीला बिलकुल जाणवत नव्हता. त्याला असलेली डिमांड पाहून त्याच्याविषयी तिच्यामनात कौतुकाची भावना होती.

थोडक्यात नरेश देखील तिच्या सारखा नोकरदार होता. देविकाकडे त्याला या सर्व कामासाठी यावे लागे, बोलावे लागे, कधी खूप वेळ, तर कधी घाई घाईत असणार्या नरेशच्या वागण्याची-बोलण्याची पद्धत तिला खूप आवडत होती, तिच्या विंग मध्ये आला की तो आपुलकीने, आणि हसतमुखाने बोलत असतो, तिच्याशीच बोलतो असेही नव्हते. जणू इथे जेव्हढे आहेत ते सगळे नरेशचे दोस्त होते, साहजिकच तिच्या भवती असलेल्या सर्वांना नरेश आला कि खूप आनंद होतो “हे देवी रोजच पाहत असे.

लंच मध्ये लीनाला ती म्हणाली.. काय ग, हा नरेश फार महत्वाचा माणूस आहे का ? प्रत्येकाला नरेश कडूनच काम करवून घेणे आवडते, हा आहे तरी कोण ?

लीनाचा स्वभाव मिस्कील आणि खेळकर ती म्हणाली.. देवी, एक दिवस तू हा प्रश्न मला विचारणार. हे मला पक्के माहिती होते, देवी, तुलाच काय सर्वांना हा नरेश आवडायला लागतो, , इथे जो कुणी येतो, तो या नरेशच्या प्रेमात पडतो., हे प्रेम म्हणजे. ते लव्ह यु वालं प्रेम नाही बरे का..

देविका तुला खरं सांगू का.. चार-पाच वर्षं झालीत, मी नरेशला रोज पहाते, भेटते, बोलते.. सतत इतरांसाठी काही तरी करीत राहण्याची याची धडपड पाहून मी थक्क व्हायची, आता नाही होत, नरेश असेच वागतो.. सगळ्यांशी. आपला परका “असे त्याच्या मनात कधीच काही नसते “हे जाणवल्या पासून नरेश एक मित्र म्हणून मला जाम आवडतो. मी पंखा झालेय त्याची.

आपल्या भल्या मोठ्या कंपनीसाठी सेवा पुरवणार्या खूप एजन्सी आहेत, त्यांची पण माणसे रोज येतात, भेटतात, बोलतात.., त्यातील कुणीही नरेश वागतो तसे “ माणूस” होऊन आपल्याशी कधी वागत नाहीत.. पक्के बिझिनेस पर्सन.. कोरडे रुक्ष आणि व्यवहारी मनाचे आहेत, ते चूक वागतात असे कसे म्हणता येईल ?ते जसे आहेत बरोबर आहेत कारण, या जगात भावनेवर जगता येत नसते देवी.

लीना बोलायचे थांबवत म्हणाली.. बाय द वे.. देवी.. हा नरेश तुला आवडू लागलाय हे नक्की. मी गेल्या काही दिवसा पासून पाहते आहे..

त्याच्या येण्याची वेळ झाली की. तुझे आतुर होणे, अधीर होणे.. तो आल्यावर त्याच्याशी बोलतांना त्याच्याकडे भान हरपून पहात बसने, तुझी ही अवस्था मी रोज पहाते. खरं सांगू का. मला हे आवडले.. तुझे आवडणे जर प्रेम असेल तर मी नक्कीच तुला मदत करीन, नरेश तर चांगला आहेच.. तू पण खूप गोड मुलगी आहेस. तुमचे कल्याण माझ्या हातून झाले तर आवडेल मला.

लीनाने जणू देवीच्या मनातील भावनेला अचूक जाणले होते, पण, लीनाच्या असे सरळ बोलण्यातून इतका स्पष्ट उल्लेख येईल याची तिला अजिबात कल्पना नव्हती.. म्हणून. स्वतहाला सावरून घेत देवी म्हणाली..

आग लीना.. माझ्या मनात सेम असेच आहे असे मुळीच नाहीये. तुला आणि सगळ्यांना नरेश जसा आणि जितका आवडतो.. अगदी तसाच तो मला आवडू लागलाय.

देवीचा हात हातात घेत लीना हस्त हस्त म्हणाली.. . ए बच्ची, कित्ती घाबरलीस ग, जणू काय तुझी चोरीच पकडली गेलीय तुझी “, अशी अपराधी होऊ नको. हे बघ देवी.. एखाद्या व्यक्तीबद्दल आधी तो आवडणे, त्याच्या सहवासाचे आकर्षण वाटणे, आणि अशा सहवासातून प्रेमाचे अंकुर फुटणे “ हे सगळे जादुई असते, हे अशी जादू नरेशने तुझ्यावर केलीयं हे नक्की, आता तू काबुल कर अथवा नको करू, तू तो पकडी गायी रे अब. !

देवी म्हणाली. लीना. हे कुणाला सांगायचे नाही अगदी नरेशला सुद्धा नाही. त्याच्या मनात तसे काहीच नसेल तर, मी असे मनात ठेवून वागणे मला आवडणार नाही, त्याचा अंदाज घेऊ दे, मला कळू दे, जाणवू दे.. मग.. बघू.. आगे आगे क्या होता है.

लीना म्हणाली.. ये बात.. मस्त एकदम, आवडला तुझा ठाम निर्धार, काही काळजी करू नको. ऑल इज वेल व्हेरी सून.. . !

अशा “प्रेममय “ वातावरणात बोलण्यात लंच टाईम संपून गेला, आपल्या मनातील गोष्ट आज लीनानाला मोकळेपणाने सांगून टाकल्यामुळे देवीला खूप हलके हलके वाटत होते, तिला लीनाचे वाक्य आठवत होते.. नरेश खूपच चांगला माणूस आहे “, म्हणजे आपली निवड मुळीच चुकलेली नाहीये “ ही भावना आपल्याला नरेश विषयी असणार्या भावना अधिक घट्ट करीत आहे “, असेच देविकाला वाटत होते.

ऑफिस वेळ संपत आलेली होती, ठरलेल्या गाडीने घरी परतण्याची गडबड सुरु झाली होती, लीनाची बस वेगळी असे, त्यामुळे देविका आणि तिची वेळ कधीच सारखी नव्हती, आपल्या वेळ झाली की निघून जायचे, एकमेकात अडकून पडायचे नाही “. लीना असे रोखठोक सल्ले स्पष्ट बोलून देत असते. समोरून येणाऱ्या नरेशला पाहून लीनाने देवीला आवाज दिला.. हे देखो वो आ गया.. , मैं तो चली.. !

आता बोलून अंदाज घेणे सुरु करा देविका बाई, उद्या सांगशील प्रोग्रेस.. असे म्हणून लीना निघून गेली..

नरेश समोर बसला. नेहमीच्या पद्धतीने त्याने नेलेली लिस्ट आणि समान देवीच्या समोर ठेवत म्हटले.. आज फार घाईत आहे, बाकी उद्या लिस्ट घेतो. झालं पहिल्याच दिवशी. ओम फस.. नरेश बरोबर कॉफी घेत बोलत बसणे मनातल्या मनात रद्द करून टाकावे लागले.

एकदम आयडिया सुचली तिला तसे देवी म्हणाली.. माझे एक छोटसे काम आहे. कराल का हो ? सांगू नये पण सांगते आहे म्हणून म्हणते.. !

खुर्चीतून उठलेला नरेश पुन्हा बसत म्हणाला.. काय हे.. अहो इथल्या कुणाला ही मी कधी नाही “म्हणत नाही, मग तुमचे काम मी करणार नाही ? असे वाटले तरी कसे तुम्हाला ?

अरे देवा.. ओ देविका मैडम तुम्ही असे बोलून.. माझ्या इतक्या दिवसांच्या सेवेवर पाणी टाकले की हो. हे बघा.. आपल्या माणसासाठी नेहमीच त्याच्या उपयोगी पडणे “ हे माझे मी ठरवलेले आहे, त्याचा मला अजिबात त्रास नसतो, आनंदाने हे करणे मला आवडते,

पुन्हा अशी शंका बोलून दाखवू नका प्लीज.

.. नरेशच्या बोलण्यातील तळमळीने, सच्चेपणाने, आपलेपणाने.. देविका नि:शब्द झाली, त्याचे बोलणे तिच्या मनात कोरले जात होते,

दोन्ही हात जोडीत ती म्हणाली. नरेश सॉरी, पुन्हा असे बोलून तुम्हाला दुखावणार नाही..

देविकाला थांबवत नरेश म्हणाला.. तुमचे काम काय आहे ते तर सांगायचे राहिले की. चला सांगा. मी आता घाईत आहे..

मला तुमच्या बद्दल जाणून घायचे आहे खूप काही.. सांगाल का मला ?

धीर करून देवीने नरेशला विचारून टाकले..

नरेश क्षणभर स्तब्ध उभा राहिला. आता. न बोलता नघून जाणार हा

असे देवीला वाटत होते.. तसे झाले नाही.. नरेश म्हणाला..

देविका मैडम- इतकी वर्ष झालीत इथे येऊन मला.. मी सगळ्यांना त्यांच्या बद्दल विचारून घेत होतो, त्यांच्या सुख-दुखात सहभागी होत होतो. पण आज.. “माझ्या बद्दल जाणून घायचे आहे.. असे म्हणणाऱ्या तुम्ही पहिल्या आहात, जरूर सांगेन तुम्हाला.. पण आज नाही, पुन्हा कधी तरी.

नरेश निघून गेला.. पण आपल्या मनात आणि हृदयात आता तो हक्काने आलाय, ही जागा त्याला आपण मोठ्या प्रेमाने दिली आहे “,

देविकाचे मन आज एका वेगळ्याच आनंदाची अनुभूती घेत होते.. .

ऑफिसमध्ये सकाळी सकाळी लीनाने देवीजवळ जात तिला कालच्या प्रोग्रेस बद्दल विचारले.. तेंव्हा देवीने. काय काय घडलं ते सविस्तर सांगितले. ते ऐकून लीना म्हणाली.. वा रे देवी.. तुझ्याकडे पाहून बिलकुल वाटत नाही यार की प्यार में पागल हो गई है येलडकी..

सुरुवात छानच झाली आहे तुझ्या लव्ह स्टोरीची.. आगे बढो..

रोजचा दिवस असा प्रेममय थोडाच असणार आहे.. ऑफिस आणि काम.. ते तर ओढत नेण्याशिवाय पर्याय नसतो, प्रत्येकावर त्याला

जखडून टाकणारी अशी ऑफिस जबाबदारी असतेच.. त्यामुळे बिझी दिवस, प्रोजेक्ट्स हातावर असले की.. स्वप्नवत असणार्या गोष्टी मनाच्या कप्प्यात कुलुपबंद ठेवाव्या लागतात, देवीला गेले कित्येक दिवसात नारेश्शी बोलण्याची संधीच मिळत नव्हती.. फोन करून बोलात बसण्य इतके जवळीक नव्हती.. त्याला हे आवडले नाही तर ? गोंधळ वाढत होता.

एका वीकेन्डला नरेश तिच्या समोर उभा रहात म्हणाला उद्या रविवार तुम्हाला वेळ आहे का ?

हे पत्ता असलेले कार्ड, या पत्त्यावर उद्या संध्याकाळी या, मी असेन इथे.

. तुम्हाला जाणून घायचे आहे ना माझ्या बद्दल ? तिथे खूप पहायला मिळेल तुम्हाला

. ते कार्ड हातात घेत देवी म्हणाली.. खूप छान वाटले, लक्षात ठेवून तुम्ही मला तुमच्या विषयी जाणून घेण्याची संधी देत आहात, उद्या जे काही काम असेल, ती सर्व काम पुन्हा करता येतील मला, मी येईन तुमच्या या पत्त्यावर.

देविका रात्रभर जागी होती, उद्या नरेश कडे जायचे आहे, त्याला जाणून घेणे आहे, उद्याचा दिवस आपल्या साठी खूप महत्वाचा आहे.

अशी प्रार्थना करण्यात रविवार उजाडला होता. बरोबर चार वाजता देविका नरेशने दिलेल्या पत्त्य्वर पोंचली.

तिच्या समोर गावाकडे असते तसे चार पाच खोल्या असलेलेल एक जुनाट घर दिसत होते.. इथे चांगली ५०-७५ मुलं मुली रहात आहेत हे तिला दिसले.. ही सर्व मुलं रिकामी बसलेली नव्हती.. कोणत्या न कोणत्या कामात सर्व अगदी एकचित्त होऊन गेले होते, दोन मध्यम वयीन महिला या मुलाकडे लक्ष देत होत्या, बाजूच्या खोलीत किचन असावे.. त्यात संध्याकाळचे जेवण बनवण्याची तयारी सुरु होणार होती.. डाव्या बाजूला. ऑफिस दिसले, तशी देविका आत गेली.

कार्यवाह असा बोर्ड असलेल्या खुर्चीवर नरेश आणि त्याच्या भोवती १०-१५ माणसांचा गराडा दिसला, देविका आलेली पाहून नरेश खुर्चीवरून उठत म्हणाला.. तुम्ही ठरवल्या प्रमाणे आलात.. म्हणजे.. तुम्ही या अगोदर माझ्या बद्दल काहीच माहिती मिळवलेली नाहीये.. याची खात्री पटली

कारण या अगोदर मला भेटायचे, जाणून घायचे म्हणून खूप जनी उत्सुक होत्या, पण, माझ्या बद्दल सगळी चौकशी करून झाली की, प्रत्यक्ष इथे न येणारेच अधिक निघाले. आश्चर्य आहे तुम्ही असे कसे काही केले नाही ?

देविकाने त्याच्याकडे नुसते पाहिले आणि ती परिसर पाहू लागली, त्या ओघात नरेशने तिला सांगावयास सुरुवात केली.. पोटभरू नोकरी करीत जगायचे हे मला कधीच पटले नाही, वंचित आणि निराधार, अनाथ अशा मुला-मुलीसाठी अन्न-वस्त्र-निवारा हे देत असतांना त्याच बरोबर त्यांना शिक्षित करून स्वावलंबी करणे हे माझे ध्येय आणि स्वप्न आहे..

मी काम करती त्याच सेवा-पुरवठा करणाऱ्या एजन्सीने मला या कार्यात मदत केलीय, आणि जनता जनार्दन भक्कमपणे माझ्या पाठीशी उभी आहे.

गेल्या सात-आठ वर्षातला हर एक दिवस मी केवळ माझी म्हणून मानलेल्या या मुलांसाठी जगत आहे..

भक्कम पगार, अलिशान टू बीएच के, चारचाकी, श्रीमंती जीवन अशी स्वप्न पडणार्याना माझ्या या कार्याला पाहून माझ्या साठी काही करावे असे वाटत नसते. मुलांची ही अशी स्थिती, मुलींच्या बद्दल न बोलालालेले बरे. असो, ज्याची त्याची इच्छा, कुणाला बळजबरीने बदलता येत नसते, हे स्वीकारून मी माझ्या या अनवट वाटेने चालतो आहे.

मी ज्या ज्या कंपनीशी संबंधित आहे, तिथे चांगली माणसं आहेत, त्यांना माझ्या कार्याचा पत्ता लागतो, ते आपणहून येतात. त्यांच्या इच्छे प्रमाणे रोख रक्कम देऊ लागतात.. पण मी तसे न करता त्यांना विनंती करतो.. प्लीज. तुमच्या इच्छेप्रमाणे, धान्य रुपात, आवश्यक वस्तू रुपात मदत करा, पैसा स्थिर बुद्धी ठेवत नाही. म्हणून मी काळजी घेतो.

देविकाच्या मनात विचार येत होते - आपण समजतो त्या पेक्षा हा माणूस. भला तर आहेच. पण इत्घ्ल्या मुलांसाठी साक्षात देवदूत, देव माणूसआहे.. नरेश विषयीच्या भावनेत पुन्हा प्रेमाची वाढ होते आहे हे देविकाला जाणवत होते.

नरेशने मग संस्थेत तिला सगळीकडे फिरवून आणले, काय काय काम केले जाते हे पण दाखवले, देविकाचे जाणून घेणे इथल्या सर्वांना खूप आवडलेले आहे, नरेशला हे अचानक जाणवले.

देविकाला घराकडे परतायचे होते.. नरेश म्हणाला.. तुम्ही थोडावेळ थांबाल का ? आत्ता काही उमेदवार मुलं-मुली येतील मला काही मदतनीस म्हणून नेमणूक करयच्या आहेत, तुम्ही या मुलाखती पहा, यातील कोण योग्य आहेत, तुमचे या बद्दल मत द्याल तर मला खूप सोपे जाईल. आणि हो, मी सोडीन तुम्हाला घर पर्यंत.. काळजी करू नका.

नरेशला ५-६ उमेदवारांच्या नेमणुका करायच्या होत्या.. आज आलेल्या उमेदवारात नरेशचे कार्य आवडल्या मुळे, हेच कार्य करायचे आहे अशी इच्छा व्यक्त करणाऱ्या उमेदवारांची नेमणूक करावी “देवीचा हा सल्ला नरेशला आवडला.. पण एक अडचण राहिली.. पूर्णवेळ देऊ शकणार्या व्यवस्थापक या साठी कुणीच आले नव्हते.. पुढच्या महिन्यात पुन्हा इंटरव्ह्यू घ्यावे लागणार होते.

देविका निघे पर्यंत जेवणाची वेळ झाली होती.. सगळ्यांनी देविकाला आग्रह करकरून जेवायला बसवून घेतले, देविका सर्वासोबत छान रमली आहे हे नरेशला जाणवत होते. त्यालाही या मुलीचे कौतुक तर वाटत होते त्या पेक्षा आचार्य जास्त वाटत होते. या वेळी त्याचा मनात आलेले विचार मनाशी हसत हसत झटकून टाकले.

नरेशने देविकाला तिच्या घरी सोडीत म्हटले. तुम्ही आलात, मला जाणून घेत, माझ्या कार्याबद्दल आस्था दाखवलीत, आभार मानीत नाही, पण, खूप समाधान वाटले हे नक्कीच म्हणेन.

घरात जाण्या अगोदर त्याला देविका म्हणाली.. तुम्ही पुढच्या महिन्यात जो इंटरव्यू घेणार आहात, गरज नाहीये आता त्याची,

नरेश.. तुमच्या कार्यात तुमची साथीदार होण्याची इच्छा आहे माझी, मी आनंदाने तुमच्या कार्यात आयुष्यभर साथ देईन, सध्याची नोकरी सोडून देईन आणि तुमच्या कार्यात मनापसून सहभागी होईन, मी प्रोमीस करते आहे तुम्हाला.

तुम्हाला आवडेल की नाही, मला माहिती नाहीये, पण, मला मनापसून आवडेल.. तुमची कायमची सोबत.

नरेश एक शब्द बोलू शकत नव्हता.. देविकाचा हात हातात घेत म्हणाला.. देवी.. प्रसन्ना झाली मला.

कथा –

देविका

अरुण वि. देशपांडे –पुणे.

Mob- 9850177342