Description
5सर्व जण मग्न असताना अचानक कुणीतरी ग्रंथालयाच्या दरवाज्यात येऊन उभ राहील. एक व्यक्ती होता तो,,पांढरीशी दाढी,मिशी,,डोळ्यांवर चष्मा,,आणि हातात आधार मिळावा म्हणून एक काठी.मुख्यध्यापक होते ते,, काय करताय रे पोरानो इथं,,माझ्या परवानगी शिवाय आतमधे घुसलच कसे? ,एकदम करारी आवाजात ते ओरडले. सर तुम्ही,,अहो आम्ही इथं..म्हणजे... ,श्रीधर अडखळत अडखळत बोलू लागला, इथं काय इथं,,इतक्या रात्री करताय काय? अहो सर आम्ही त्या वाड्याबद्दल माहिती शोधायला आलो होतो. ,कविता एका झटक्यात बोलली. कोणता वाडा? तोच जन्गलातला वाडा, ज्यामुळे सरपंच दगावले आहेत,,विजू म्हंटला कि त्या वाड्याबद्दल एक पुस्तक आपल्या ग्रंथालयात आहे,,म्हणून आम्ही वेळ न घालता रात्रीच इथे आलो पुस्तकाचं नाव ऐकताच अचानक ते गम्भीर झाले, विजय,तुला त्या पुस्तका बद्दल माहिती कुठून मिळाली? माझ्या बाबांनि लहानपणी मला सांगितलं