प्यार मे.. कधी कधी

(386)
  • 373.6k
  • 154
  • 247.7k

“वेडी आहेस का तु?”, मी जवळ जवळ नेहावर ओरडतच म्हणालो.. “काय लावलं आहेस सकाळपासुन चल ना.. चल ना? जाऊ का मी घरी?”“प्लिज जानू.. चल ना रेssss”, नेहा लाडीक हेल काढत म्हणाली. “नाssssssही.. मी येणार नाही.. आणि प्लिज ते जानू जानू बंद कर.. एक तर ते कसलं फिल्मी आहे.. आणि त्यात मला ती सारखी ‘होणार सुन मी..’ मधली जान्हवी आठवते.. सो बोअरिंग..” “एsss जान्हवीला काही बोलायचं नाही हं..”, नेहा गाल फुगवुन म्हणाली.“बरं बरं.. सॉरी..” खरं तर ना, मला नेहाने जानू म्हणलेलं खुप आवडायचं.. ती ज्या पध्दतीने लाडाने म्हणायची ना, मस्त वाटायचं ऐकायला. पण म्हणुनचं मुद्दाम मी आवडत नाही असं दाखवायचो.. आणि

Full Novel

1

प्यार मे.. कधी कधी (भाग-१)

“वेडी आहेस का तु?”, मी जवळ जवळ नेहावर ओरडतच म्हणालो.. “काय लावलं आहेस सकाळपासुन चल ना.. चल ना? जाऊ मी घरी?”“प्लिज जानू.. चल ना रेssss”, नेहा लाडीक हेल काढत म्हणाली. “नाssssssही.. मी येणार नाही.. आणि प्लिज ते जानू जानू बंद कर.. एक तर ते कसलं फिल्मी आहे.. आणि त्यात मला ती सारखी ‘होणार सुन मी..’ मधली जान्हवी आठवते.. सो बोअरिंग..” “एsss जान्हवीला काही बोलायचं नाही हं..”, नेहा गाल फुगवुन म्हणाली.“बरं बरं.. सॉरी..” खरं तर ना, मला नेहाने जानू म्हणलेलं खुप आवडायचं.. ती ज्या पध्दतीने लाडाने म्हणायची ना, मस्त वाटायचं ऐकायला. पण म्हणुनचं मुद्दाम मी आवडत नाही असं दाखवायचो.. आणि ...Read More

2

प्यार मे.. कधी कधी (भाग-२)

“सो टुडे…”, देसाई मॅडम सुरु झाल्या.. “वुई विल बी अ‍ॅनालायझिंग द डिफ़रंट अस्पेक्ट्स ऑफ़ अ ह्युमन ब्रेन” सगळ्या विद्यार्थीनी देसाई मॅडम बोलतील ते लिहुन घेत होत्या.. “नेहा, प्लिज इंट्र्युड्स द ऑब्जेक्ट टु अस..” देसाई मॅडम.. नेहा उठुन उभी राहीली. “थॅक्यु मॅम..”, नेहा थोडंस्स कमरेत वाकुन म्हणाली..”अ‍ॅन्ड माय फ्रेंन्ड्स.. द ऑब्जेक्ट टुडे इज तरुण.. ही इज माय फ्रेंड…” “जस्ट अ फ्रेंड?? की….”, हळुच मागुन कुणी तरी विचारले आणि वर्गात एकच हश्या पिकला.. नेहाने एकदा माझ्याकडे हसुन बघीतलं आणि तिने तो प्रश्न इग्नोर करुन पुढे म्हणाली.. “ही इज अ सॉफ्ट्वेअर इंजीनीअर..”“वुवुवुह्ह्ह…..”, वर्गात एकजुट आवाज झाला… “अ‍ॅन्ड ही इज वर्कींग इन अ ...Read More

3

प्यार मे.. कधी कधी (भाग-३)

मला फक्त आणि फक्त तिच दिसत होती. अगदी आपण इंन्स्टाग्राम मध्ये बाकीच्या गोष्टी धुसर करुन टाकतो एखाद्या गोष्टीवर फोकस अगदी तस्संच. मी कुठे होतो? माहीत नाही! ती कुठे होती??.. काय फरक पडतो.. ती ‘होती’, ह्यातच सर्वकाही होतं. तिच्या हसण्याचा आवाज, तिचे स्पार्कलिंग डोळे, क्षणाक्षणाला तिच्या चेहर्‍यावर येत असुनही मनाला गुदगुल्या करणारे तिचे केस सर्व काही अगदी स्पष्ट दिसत होतं. तिने एकदा तरी माझ्याकडे बघावं ह्यासाठी मन आक्रंदत होतं. पण तिचं लक्षच नव्हतं माझ्याकडे. काय करू म्हणजे ती एकदा तरी माझ्याकडे बघेल? काय करु म्हणजे माझं अस्तीत्व तिला जाणवेल? मला तिच्या समोर जायचं होतं, पण सिमेंटमध्ये रोवल्यासारखे पाय जमीनीमध्ये घट्ट ...Read More

4

प्यार मे.. कधी कधी (भाग-४)

“डू आय बिलीव्ह इन लव्ह अ‍ॅट फ़र्स्ट साईट?”, ऑफीसला जात असताना डोक्यात एक विचार चमकुन गेला…“फ़र्गेट फ़र्स्ट साईट, डू बिलीव्ह इन लव्ह?” “व्हॉट इज लव्ह?”“मनांशी मन जुळणं?, की जस्ट अ फिजीकल अ‍ॅट्रॅक्शन? का दोन्ही? का अजुन काही तिसरं पण असतं?”“असणारंच.. कारण दोन भेटींमध्ये प्रितीबद्दल जे काही मला वाटत होतं ते ह्या दोन्हींपैकी कुठल्याही मुद्यावरुन नव्हतं. तिच्याबद्दलच्या भावना ह्या मनाच्या खूप आतून आल्या होत्या.. आणि खुपच स्ट्रॉग होत्या.. जसं काही मला तिच्याबद्दल जे वाटत होतं त्याबद्दल कुठलंही दुमत नव्हतंच..” सोमवारची सकाळ ही बहुतांश आय.टी. वाल्यांची अजातशत्रु असते, आणि तो आय.टी. इंजीनीअर माझ्यासारखा.. नुकताच प्रेमात पडलेला असेल तर ती सकाळ अगदी ...Read More

5

प्यार मे.. कधी कधी (भाग-५)

“देख कर तुमको.. यकीन होता है..कोई इतना भी हसीन होता है..देख पा ते है कहा हम तुमको…दिल कही.. होश होता है॥” जगजीतच्या आवाजातले मला गाण्याचे ते शब्द आठवले जेंव्हा प्रितीला मी मॅक्डीला पाहीलं. आई-शप्पथ, काय दिसत होती मस्त. पिंक कलरचा टाईट फिटींग्सचा कुर्ता आणि व्हाईट कलरचे लेगींज्ज होते आणि स्ट्रॉबेरी रंगाच्या ओढणीने तिने आपले केस बांधले होते. “थोडी ओल्ड फॅशन्ड स्टाईल नाही ही?“, मी मनाशीच विचार केला.. “म्हणजे रेट्रो मुव्हीज मध्ये नितु सिंग, किंवा मुमताज ना मी असली फॅशन केलेली पाहिलं होतं.. बट एनीवेज हु केअर्स, प्रिती वॉज लुकींग गॉर्जीअस…” आणि मग माझं लक्ष पाठमोर्‍या बसलेल्या नेहाकडे गेलं आणि ...Read More

6

प्यार मे.. कधी कधी (भाग-६)

टेबलावर ठेवलेलं ऑम्लेट ब्रेड गार होऊन गेलं होतं. खरं तर आई बर्‍याच वेळ माझ्याकडे बघत आहे.. माझ्या लक्षात आलं पण मला त्या ऑम्लेटमध्ये काडीचाही इंटरेस्ट नव्हता. शेवटी आई टेबलापाशी आलीच.. “का रे? काही खात नाहीस? तब्येत बरी नाही का?”“नाही.. ठिक आहे.. थोडं डोक जड झालंय..”“सुट्टी घे मग ऑफीसला.. सारखं आपलं दिवस-रात्र कॉम्युटरसमोर बसायचं ते..”“काय गं आई.. तेच काम आहे माझं. आणि असं कधीही आपण म्हणलं की सुट्टी घेता येते का?”“अरे पण.. तब्येतच बरी नसेल तर…”“काही धाड भरली नाहीये तब्येतीला.. ठिक आहे मी.. आत्ता भूक नाहीये फक्त.. ऑफीसमध्ये खाईन काही तरी..” “अरे मग ज्यूस तरी…”“आई प्लिज.. उगाच डोकं नको उठवूं.. ...Read More

7

प्यार मे.. कधी कधी (भाग-७)

११ सप्टेंबर, नेहाच्या लग्नाच्या इंव्हीटेशन कार्ड वर हीच तर तारीख होती.काही वर्षांपूर्वी अमेरिकेला ह्याच तारखेने रडवले होते ९-११, बहुदा माझा दिवस होता. नेहा रीतसर घरी येउन लग्नाची पत्रिका देऊन गेली होती, पण मी मात्र नेमकं त्याच वेळेस ‘बँगलोर’ला ऑफिसच्या कामासाठी जावं लागत आहे म्हणून `जमणार नाही’ असं आधीच सांगून टाकलं होत. नेहाच लग्न ठरलं आहे, किंबहुना तिचा साखरपुडा झाला हा विचारच मला किती असह्य झाला होता. तर मग तिला दुसऱ्याच्या गळ्यात माळ घालताना पहाण तर नेक्स्ट-टू-इम्पोसिबल होत. नेहाने खूप इन्सिस्ट केलं, पण तिच्या लग्नाला जायचं? का नाही? ह्याबद्दल माझ्या मनात कोणतेही दुमत नव्हते.मी तिच्या लग्नाला जाणार नव्हतो… फायनल !! ‘त्या’ दिवशी ...Read More

8

प्यार मे.. कधी कधी (भाग-८)

आयुष्य कध्धीच.. कुणासाठीच.. कश्यासाठीच थांबत नाही का?आपला म्हणवणारा वेळ, खरंच आपल्यासाठी असतो का?क्षुद्र.. किडुक-मिडूक भासणारा सेकंदकाटा सुध्दा आपण थांबवु नाही का? दिवस भराभर पलटत होते.. नेहाचं लग्न झालं त्याच्या दुसर्‍याच दिवशी.. रविवारी.. वाटलं होतं आजचा मोकळा वेळ आपला जिव घेणार, पण झालं उलटच.. जरा कुठं आवरुन होतं नाही तोवर.. विनीतचा, ऑफीसमधल्या कलीगचा फोन आला.. “अरे कस्टमर इश्यु आहे.. पट्कन लॉगीन कर.. तुला ब्रिफ करतो…” हाय.. हॅलो.. गुड मॉर्नींग कसलीही फॉर्मॅलीटी न करता तो म्हणाला ह्यावरुनच ‘आग लागलेली आहे’ ह्याची जाणीव झाली.‘कस्टमर हा भगवान असतो’ असं आम्ही सॉफ्टवेअर इंडस्ट्रीत म्हणतो आणि बर्‍याच वेळा ते पाळतोही.. किंवा पाळावे लागतेच. लगेच लॅपटॉप ...Read More

9

प्यार मे.. कधी कधी (भाग-९)

प्रितीने पाठवलेले फोटो मी आपले सहजच नजरेखालुन घातले. मला तसंही त्यात फारसा इंटरेस्ट नव्हता. माझं लक्ष वेधुन घेतलं ते व्हॉट्स-अ‍ॅपच्या डि.पी.ने. बहुतेक घरातच काढलेला सेल्फी होता. साधा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची स्लॅक, मान काहीशी तिरपी करुन एका हाताने केस कानांच्या मागे करतानाचा तो फोटो होता. त्या साध्या फोटोतही कसली क्युट दिसत होती. मी खूप वेळ त्या फोटोकडेच बघत बसलो. मी प्रितीचे स्टेटस चेक केले, ती अजुनही ‘ऑनलाईनच’ होती. आय वॉन्टेड टु से समथींग..पण काय? काही शब्दच सुचत नव्हते. पाच-एक मिनीटं शांततेत गेली. “यु ऑलराईट?”, अचानक प्रितीचा मेसेज स्क्रिनवर झळकला..“हम्म.. मी ठिक आहे..”“अ‍ॅक्च्युअली.. मी पाठवणार होते तुला फोटो आधी, पण ...Read More

10

प्यार मे.. कधी कधी (भाग-१०)

सकाळपासून शंभरवेळा मोबाईल चेक करून झाला, पण प्रितीचा काहीच मेसेज नव्हता. ‘लास्ट सीन ऑनलाइन’ पण बंद करून ठेवले होते. काही कोणी मनकवडा नव्हतो, पण समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला अदृश्य अश्या वेव्हज मिळत असतातच ना. गाडीवर प्रितीने ‘फिर मोहोब्बत’ च ऐकवलेले गाणे?घरी जाताना ‘मला दुसरी नेहा व्हायचं नाही’ अस प्रीती म्हणाली होती, त्याचा अर्थ काय असू शकत होता? आणि नेहाच्या घरी समशेर म्हणाला होता ते? अनेक वेडे वाकडे तुकडे एकत्र जोडून मी त्याच चित्र बनवू पाहत होतो. पण त्यावरून स्पष्ट अर्थबोध होत नव्हता. कदाचित, हे सगळे माझ्या मनाचेच खेळ होते. प्रिती प्लीज.. प्लीज ऑनलाईन ये… मी अगदी मनापासून याचना करत होतो, ...Read More

11

प्यार मे.. कधी कधी (भाग-११)

“वन्नक्कम थरुन..” आमच्या टीमचा बॅंगलोरचा लिड, स्वामी, मला वेलकम करत होता“अं.. स्वामी, इट्स तरुण, नॉट थरुन..”“येस्स येस्स.. थरुण..प्लिज कम.. कम..” ह्या लोकांना ‘त’ शब्दाचा उच्चार जमतच नाही बहुतेक, ‘नितीन’ चं ‘निथीन’, ‘रोहीत’चं ‘रोहीथ’ करतात तसं माझं ‘थरुन’ करुन टाकलं होतं. मी लगेचच त्याला करेक्ट करण्याचा नाद सोडुन दिला. पुढचा बराच वेळ फ्रेशर्सशी इंट्रो, जुन्या प्रोजेक्ट्सवरील कलीग्ज, स्किप-लेव्हल मॅनेजर्स ह्यांच्याशी मिटींग्जमध्येच गेले. सकाळी प्रितीशी बोलण्याच्या नादात फ्लाईटमध्येही काही खाल्ले नव्हते, त्यामुळे भयंकर भुक लागली होती. मग १२.३०लाच लंचब्रेक घेतला. कंपनीचा कॅफेटेरीया सॉल्लीड होता, जणु काही एखादा लाऊंजच. फुट-थंपींग गाणी चालु होती, गेम-एरीया ओसंडुन वाहात होता. वेगवेगळ्या प्रकारच्या खाण्याच्या प्रकारचे सेक्शन्स ...Read More

12

प्यार मे.. कधी कधी (भाग-१२)

घड्याळात १०.३०च वाजले होते. दुसर्‍या दिवशी न्यु-जॉईनीजना काही प्रेझेंटेशन्स द्यायची होती. पण त्याच्यावर फायनल टच द्यायचा राह्यला होता. आधी केला होता की बॅंगलोरला येताना फ्लाईटमध्ये करुन टाकीन, पण त्यावेळेस ‘इतर’ महत्वाची कामं असल्याने ते राहुनच गेलं होतं. चरफडत लॅपटॉप चालु केला आणि ‘लव्ह’, ‘विरह’, ‘फिलींग्स’ वगैरे गोष्टी बाजुला सारुन ‘क्लाऊड कंप्युटींग’, ‘डेटा-अ‍ॅनॅलिटीक्स’, ‘सॉफ्टवेअर-अ‍ॅज-अ-सर्व्हिस’ वगैरे किचकट गोष्टींमध्ये बुडुन गेलो. कसा बसा अर्धा तासच झाला असेल इतक्यात मोबाईलवर मेसेजचा दिवा लुकलुकला.. प्रितीचा मेसेज होता.. “अजुन जागाच आहेस?”“हम्म..”“का रे? झोप येत नाहीये का? मला तर येतच नाहीये झोप”” ” “बरं मग काय ठरलं आपलं?”“कश्याचं?”“अरे असं काय? मगाशी काय झोपेत बोललास का माझ्याशी? ...Read More

13

प्यार मे.. कधी कधी (भाग-१३)

थोड्या वेळानंतर पुन्हा एक मेसेज आणि नंतर पुन्हा एकामागोमाग एक.तरुणला कुठलाही मेसेज वाचायची किंवा रिप्लाय करायची इच्छा नव्हती. तो बंद करुन पडुन राहीला, उशीरा कधी तरी त्याला झोप लागली. सकाळी फोनच्या आवाजाने मला जाग आली, घड्याळात ६.३०च वाजत होते. चडफडत फोन उचलला.. प्रितीचा होता. “हॅल्लो…”“अरे काय? कुठे आहेस? काल किती मेसेज केले.. एकाचा पण रिप्लाय नाही?”“हम्म.. अगं जरा डोकं दुखत होतं, त्यामुळे लवकर झोपलो..”“ओह.. मग आता बरं आहे का?”“हम्म ठिक आहे आत्ता. तु काय सकाळी सकाळी?”“अरे जॉगींगला आले होते बाहेर.. सॉरी.. झोप मोड केली का?”“नाही, तसं काही नाही…” काही वेळ शांततेत गेला. “तरुण, सगळं ठिक आहे ना?”“हम्म.. ”“पण तुझ्या ...Read More

14

प्यार मे.. कधी कधी (भाग-१४)

“तरुण, बॅंगलोर ऑफीस कन्व्हेड स्पेशल थॅक्स टु युअर व्हिजीट, इट हेल्प्ड देम अ लॉट..”, मुरली दुसर्‍या दिवशी मला ऑफीस म्हणत होता.. “दे वेअर जस्ट चेकींग इफ़ यु वुड लाईक टु रिलोकेट टु बॅंगलोर?” “रिलोकेट? यु मीन परमनंटली? ऑर टेंम्पररी?”“लेट्स सी.. स्टार्ट विथ अ इअर फ़स्ट अ‍ॅन्ड इफ़ यु लाईक, यु कॅन टेक अ कॉल.. आय एम गुड विथ इट.. यु डिसाईड..” कल्पना खरं तर चांगली होती.. सगळ्यांपासुन काही काळासाठी दुर गेलो तर कदाचीत हे सगळं विसरायला होईल असं काहीसं वाटत होतं, पण त्याचबरोबर प्रितीपासुन इतक्या दुर जायचं मनाला पटत नव्हतं. म्हणजे.. जस्ट दोन दिवसांपुर्वीच तर आम्ही ब्रेक-अप केलं होतं.. ...Read More

15

प्यार मे.. कधी कधी (भाग-१५)

परीक्षेच्या दोन दिवस आधी प्रितीचा मेसेज आला की नेहाने तिचं नावं कॉलेजमधुन काढून घेतलं आहे.. बहुतेक ती पुढे शिकणारच मी तो मेसेज दोनदा वाचला आणि डिलीट करुन टाकला. मनामध्ये एक आशा होती की नेहाशी संबंधीत ही शेवटचीच गोष्ट.. कदाचीत.. ह्यापुढे नेहा किंवा तिच्याशी संबंधीत कुठलीच गोष्ट माझ्या.. ‘आमच्या’ आयुष्यात येणार नाही… कदाचीत.. प्रितीची परीक्षा संपण्याची तारीख मी दिवस मोजुन मोजुन जवळ आणत होतो. तिचं परीक्षेचे पुर्ण टाईम-टेबल मला पाठ होते. कुठल्या दिवशी, किती वाजता, कोणता पेपर आहे सगळं. ह्या काळात मी प्रितीला कधी फोन केला नाही, की मेसेज.. मग प्रत्यक्ष भेटण्याचा तर प्रश्नच नव्हता. साधं ‘बेस्ट-लक’ सुध्दा म्हणालो नव्हतो. ...Read More

16

प्यार मे.. कधी कधी (भाग-१६)

“संध्याकाळी काय करतो आहेस आज?”, परत येताना प्रितीने विचारले“आजचीच काय, ह्यापुढची प्रत्येक सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र फक्त आणि तुमचीच मॅडम.. तुम्ही सांगा, आम्ही ऐकु..”“बास आता फ्लर्टींग, झालेय ना तुझीच..”, प्रिती हसत म्हणाली“बरं बोल, संध्याकाळचं काय म्हणत होतीस..” “हम्म, संध्याकाळी ७.३० ला घरी ये माझ्या.. तुझी आईशी ओळख करुन देते. बाबा नाहीयेत घरी, पण आई आहे..ओके?” प्रितीला पण आई-वडील आहे हे मी विसरुनच गेलो होतो.“पण आईने विचारलं मी कोण? कुठे भेटलो वगैरे तर?”“माझी आई नाही मला असले प्रश्न विचारत, माझा मित्र आहे म्हणलं तरी खूप आहे..”, प्रिती म्हणाली “ओके देन.. नक्की येईन..”, मी क्षणाचाही विलंब न करता म्हणालो. संध्याकाळी ...Read More

17

प्यार मे.. कधी कधी (भाग-१७)

ऑफीसमध्ये सगळ्यांचा मुडच एकदम वेगळा होता. प्रचंड तापदायक, कष्टदायक प्रयत्नांनंतर अखेर आमचं रिलिज झालं होतं. बॅंगलोरहुन आमचे डायरेक्टर खास टिमला भेटायला आले होते आणि संध्याकाळी एका पॉश रेस्टॉरंटमध्ये पार्टी होती. कामाचं सोडा, सकाळपासुन कुणी ई-मेल्सलाही -हात लावला नव्हता. आणि माझा मुड खराब असण्याचं तर कारणंच नव्हतं. नुकत्याच प्रेमात पडलेल्या कुणाला तुम्ही दुःखी-कष्टी पाहीलं आहे का कधी? संध्याकाळी पार्टीमध्ये काही तरी भारी अनाऊंन्समेंट होणार ह्याची सर्वांना कुणकुण लागली होती आणि त्यामुळे सगळे सुपर एक्साईटेड होते. मे बी प्रमोशन्स.. मे बी पगारवाढ.. बोनस.. तर्कवितर्कांना नुसते उधाण आले होते. ‘स्टोन-वॉटर-ग्रिल्स’ आमच्या टिमने पार्टीला दणाणुन सोडलं होतं. डि.जे. पण जाम मुड मध्ये होता.. ...Read More

18

प्यार मे.. कधी कधी (भाग-१८)

“संध्याकाळी घरी ये..”, हॉटेलमधुन निघताना प्रिती म्हणाली..“प्लिज यार.. घरी नको.. तुझी आई परत खायला घालत बसेल…”“नाही नाही.. आय प्रॉमीस.. ये ७ वाजता, मी वाट बघतेय ओके?” ठरल्यावेळी मी प्रितीच्या घरी पोहोचलो.. दार उघडेच होते. कसलातरी मस्त, मंद सुगंध पसरला होता. बाहेर कोणीच नव्हते.. “प्रिती..”, मी हलकेच हाक मारली..“आले आले.. बसं.. दोनच मिनीटं..”, प्रिती आतुन म्हणाली. मी सोफ्यावर बसलो, दोन मिनीटांत प्रिती बाहेर आली. पुर्ण अवतारात होती. केस विस्कटलेले.. हाताला, गालाला, नाकाला पिठ लागलेलं.“ओह प्लिज.. आता तु नको पराठे करुस..”, मी घाईघाईने सोफ्यावरुन उठत म्हणालो..“नाही रे.. पराठे नाही करत आहे.. केक करतेय तुझ्यासाठी..”, प्रिती मी दचकुन इकडे तिकडे बघीतलं. “घरी ...Read More

19

प्यार मे.. कधी कधी (भाग-१९)

कॉफीचा दुसरा कप संपत आला होता, पण प्रितीचा काहीच पत्ता नव्हता. पुन्हा एकदा घड्याळात नजर टाकली. एक तास होऊन होता. मनातली बैचैनी क्षणा-क्षणाला वाढतच होती. अस्वस्थपणे मी पुन्हा एकदा कॉलेजच्या गेटकडे नजर टाकली. प्रितीचा आज रिझल्ट होता. जेंव्हा कॉलेजपाशी प्रितीला सोडलं तेंव्हा सॉलीड टेन्शनमध्ये होती. “आय एम स्केअर्ड तरुण…”, तिचा थंड पडलेला हात माझ्या हातावर ठेवत ती म्हणाली होती, “आय डोन्ट वॉन्ट टू फ्लंक..”“कश्याला काळजी करतेस प्रितु.. होशील अगं पास..”, मी समजावणीच्या स्वरात म्हणालो होतो.“काळजी करु नको म्हणजे.. कसा अभ्यास केलाय.. आणि काय पेपर लिहीले आहेत ते आता आठवतय मला तरुण..”“पण का? मग करायचास ना अभ्यास..” “करायचास ना अभ्यास ...Read More

20

प्यार मे.. कधी कधी (भाग-२०)

पाहुण्या-रावळ्यांनी आज घर अगदी भरुन गेले होते. बारश्यासाठी मावशीकडे आलेले अनेक नातेवाईक ‘लगे-हाथ’ मला भेटायला आले होते. अनेक जणांना सह्या करण्यात आणि ‘गेट-वेल-सुन’ मेसेजेस लिहीण्यातच जास्त उत्साह होता. १२.४५ला प्रिती आली तेंव्हा घरी इतके सारे अनपेक्षीत लोकं बघुन ती काही क्षण दचकलीच. “ओह.. हेच का ते.. अ‍ॅस्कीडेंटचं कारण?”, विमला मावशी डोळे मिचकावत म्हणाली..“तरुण दादा, क्युट आहे तुझी मैत्रीण”, नुकतंच कॉलेज जॉईन केलेली माझी कझीन म्ह्णाली“ओह तु.. मी ओळखते तुला..”, माझी दुसरी एक मावशी अचानकपणे म्हणाली..,”तु सिटी-लायब्ररीमध्ये काम करतेस ना?”“हो..”, प्रिती तीची हॅन्डबॅग ठेवत म्हणाली.. “तुला सांगते विमल..मला एकदा एक पुस्तक काही केल्या मिळत नव्हतं.. हिने मिळवुन दिलंन.. ते कंम्य्पुटरवर ...Read More

21

प्यार मे.. कधी कधी (भाग-शेवटचा)

आईशप्पथ प्रिती कसली चिकनी दिसत होती. राणी कलरची साडी, पापण्यांना हलक्या त्याच कलर्सचे शेडींग, डोळ्यांना काळ्या लायनर्सने अधीकच अ‍ॅट्राक्टीव्ह होते तर केसांची एक बट बर्गंडी रंगाने हायलाईट केली होती. माय हार्ट वॉज रेसिंग हेव्हीली…. थोडक्यात ओळख-पाळख झाल्यावर बाबा लोकांनी टी.व्ही चा ताबा घेतला. मॅच जस्ट सुरु झाली होती. हरभजनला कुत्र्यासारखा धुतला होता. प्रितीचे बाबा त्याला पंजाबी ढंगात शिव्या हासडत होते. “तुम्हाला नाही आवडत हरभजनसिंग?”, बाबांनी प्रितीच्या बाबांना विचारलं..“लेट मी टेल यु.. ही वॉज गुड.. अ‍ॅट टाईम्स.. अनप्लेएबल.. पण आता काही अर्थ नाही राहीला त्यात…”, प्रितीचे बाबा..“ओह.. आय थॉट.. ही इज पंजाबी.. सो तुमचा फेव्हरेट असेल..”“सो व्हॉट.. ईट्स अ इंडीअन ...Read More