चांदणी रात्र

(157)
  • 184.7k
  • 25
  • 85k

राजेशला सकाळी जाग आली तेव्हा त्याला फार आश्चर्य वाटलं. कारण तो त्याच्या घरी बेडवर नव्हता तर स्वारगेट बसस्थानकाच्या एका बाकावर होता. ‘यावेळी आपण इथे कसे आणि का झोपलो होतो?’ राजेशला प्रश्ण पडला. तो बाकावरून उठला. त्याने खिशाला हात लावला पण खिशात पाकिट नव्हतं. मोबाईल सुद्धा नव्हता. खिशात फक्त एक शंभराची नोट होती. राजेश बसने घरी पोहोचला. त्याच्याकडे घराची चावीसुद्धा नव्हती. पण दारात ठेवलेल्या झाडाच्या कुंडीखाली ठेवलेल्या जादाच्या चावीने राजेशने दरवाजा उघडला. राजेशचं डोकं फार दुखत होतं. त्यामुळे तो कॉलेजलाही गेला नाही. कीतीही विचार केला तरी कोडं सुटत नव्हतं. ‘आपल्याला कोणी किडनॅप तर केलं नसेल ना?’ राजेशच्या मनात विचार येऊन गेला.

Full Novel

1

चांदणी रात्र - १

राजेशला सकाळी जाग आली तेव्हा त्याला फार आश्चर्य वाटलं. कारण तो त्याच्या घरी बेडवर नव्हता तर स्वारगेट बसस्थानकाच्या एका होता. ‘यावेळी आपण इथे कसे आणि का झोपलो होतो?’ राजेशला प्रश्ण पडला. तो बाकावरून उठला. त्याने खिशाला हात लावला पण खिशात पाकिट नव्हतं. मोबाईल सुद्धा नव्हता. खिशात फक्त एक शंभराची नोट होती. राजेश बसने घरी पोहोचला. त्याच्याकडे घराची चावीसुद्धा नव्हती. पण दारात ठेवलेल्या झाडाच्या कुंडीखाली ठेवलेल्या जादाच्या चावीने राजेशने दरवाजा उघडला. राजेशचं डोकं फार दुखत होतं. त्यामुळे तो कॉलेजलाही गेला नाही. कीतीही विचार केला तरी कोडं सुटत नव्हतं. ‘आपल्याला कोणी किडनॅप तर केलं नसेल ना?’ राजेशच्या मनात विचार येऊन गेला. ...Read More

2

चांदणी रात्र - २

सकाळी आठ वाजता राजेश स्वारगेटला पोहोचला. ऑटोने तो घरी आला. दरवाजाला कुलूप नव्हतं म्हणजेच रवी परत आला होता. राजेशने वाजवली पण दरवाजा उघडला नाही. त्याने पुन्हा बेल वाजवली पण पुन्हा तेच. तिसऱ्या बेलनंतर मात्र दरवाजा उघडला. समोर रवी डोळे चोळत उभा होता. त्याच्याकडे पाहूनच कळत होतं की त्याची झोपमोड झाली आहे. “अरे राजेश! काय माणूस आहेस राव तू. तुला एवढे फोन केले तर तुझा फोन स्वीच ऑफ. अन एक फोन करता येत नाही होयरे तुला. मला वाटलं काय गचकला की काय हा.” एवढे बोलून रवी मोठयाने हसू लागला. “मला आत तर येउदे पहिलं. सांगतो की सगळं.” राजेश रवीला म्हणाला ...Read More

3

चांदणी रात्र - ३

राजेशला मात्र एका वेगळ्याच विचाराने ग्रासलं होतं. आज वर्गांत आलेल्या त्या नवीन मुलीबद्दल त्याला एक प्रकारचं कुतूहल वाटत होतं. तो वृषालीला भेटलाही नव्हता पण तिला पाहताच त्याच्या मनात नक्कीच काहीतरी वेगळी भावना जागी झाली होती. हे प्रेम होतं का? हे त्यालाही कळात नव्हतं. पण ज्या व्यक्तीला आज आपण पहिल्यांदाच पाहिलं, जिच्याशी आपली अजून नीट ओळख देखील नाही तिच्याबद्दल आपल्या मनात प्रेमभावना कशा निर्माण होतील? याविषयी संदीपशी बोलावं असही राजेशला वाटलं पण संदीपला प्रेमाबद्दल विचारणं म्हणजे एखाद्या भिकाऱ्याला श्रीमंतीविषयी विचारण्यासारखं होतं. आणि त्याने संदीपला विचारलं जरी असतं तरी त्याने “कशाला असल्या भानगडीत पडतोस अभ्यासात लक्ष दे” असा रुक्ष सल्ला दिला ...Read More

4

चांदणी रात्र - ४

बरोबर नऊ वाजता राजेश घरातून बाहेर पडला. थोड्याच वेळात तो संदीपच्या घरापाशी पोहोचला. आज मात्र राजेशला थोडा वेळ थांबायला काही वेळाने संदीप घाईघाईतच घरातून बाहेर आला व गाडीवर बसला. गाडी चालवत असताना आज कॉलेजात वृषाली परत दिसेल या विचाराने राजेश सुखावला. “सहस्त्रबुद्धे सरांनी दिलेला होमवर्क झाला का?” संदीपच्या प्रश्नाने राजेश भानावर आला. वृषालीच्या नादात आज पहिल्यांदा राजेश होमवर्क करायला विसरला होता. राजेशच्या उत्तराची वाट न पाहताच संदीप सांगू लागला, “अरे काल आईची तब्येत अचानक बिघडली. बाबा पण घरात नव्हते. त्यांना ऑफिसमध्ये काम होतं. त्यामुळे मलाच तिच्याबरोबर दवाखान्यात जावं लागलं. काल काहीच आभ्यास झाला नाही. मग सकाळी उठुनच सगळा होमवर्क ...Read More

5

चांदणी रात्र - ५

आज रविवार होता. राजेशचा गावातला मित्र गणेश आज पुण्यात आला होता. त्याला कपडे खरेदी करायचे होते. त्यामुळे राजेशचा पूर्ण गणेशबरोबर फिरण्यातच गेला. गणेश रात्री राजेशच्याच फ्लॅटवर राहिला व सकाळी लवकर घराबाहेर पडला. राजेशनेच त्याला स्वारगेटला सोडलं. पण त्यामुळे आज त्याला बर्वे उद्यानात जाता नाही आलं. त्यामुळे राजेशला आज फार चुकल्यासारखं वाटत होतं. व्यायाम करायचा राहिल्यामुळे नव्हे तर एका वेगळ्याच कारणामुळे तो थोडा मलूल झाला होता. घरी परत येताच राजेशने झटपट आवरलं व नेहमीप्रमाणे तो संदीपच्या घरासमोर येऊन थांबला. संदीप व राजेश कॉलेजला पोहोचले. पहिल्या तासाची बेल वाजली व जाधव सर वर्गात आले. राजेशने आजूबाजूला पाहिलं. वृषाली कुठेच दिसत नव्हती. मुलांची ...Read More

6

चांदणी रात्र - ६

राजेशने चहा बनवण्यासाठी दुधाचं पातेलं गॅसवर ठेवलं व तो दात घासण्यासाठी बाथरूममध्ये गेला. दात घासुन झाल्यावर राजेश परत गेला व चहा बनवून चहाचा कप घेऊन तो हॉलमध्ये आला. रवी नेहमीप्रमाणे झोपला होता. राजेशने टीव्ही चालू केला व टीव्ही पाहतच चहा संपवला. आज रविवार असल्यामुळे कॉलेजला सुट्टी होती. आजचा दिवस कसा घालवायचा याचाच राजेश विचार करत होता, तेवढ्यात त्याचा फोन वाजला. फोन वृषालीचा होता. एका क्षणाचाही विलंब न करता त्याने फोन उचलला. “खूप बोर होतंय. ये ना घरी. आई-बाबा पण गावाला गेलेत. मी तुझ्यासाठी सँडविच बनवते मग आपण एखादी मुव्ही पाहुयात.” वृषाली झोपाळलेल्या, आळसावलेल्या आवाजात म्हणाली. “हो येतोच, मला फक्त अर्धा ...Read More

7

चांदणी रात्र - ७

राजेश नेहमीच्या वेळेला संदीपच्या घरापाशी पोहोचला. संदीपने नेहमीप्रमाणे कालच्या होमवर्कबददल विचारलं. ‘या संदीपला आभ्यास सोडून इतर गोष्टीसुद्धा असतात हे नाही. नेहमी हा आभ्यास, होमवर्क एवढंच बोलतो. त्यामुळेच याचे आपण सोडलं तर फारसे मित्र नाहीत.’ राजेशच्या मनात विचार आला. एक दिवस संदीपला माणसात आणायचा त्याने मनोमन संकल्प केला. राजेश आणि संदीप कॉलेजात पोहोचले. ते मेनगेट मधून आत आले. कॉलेजचे शिपाई गण्याकाका नोटिसबोर्डवर नोटिस लावत होते. “कसली नोटिस आहे काका?” राजेशने त्यांना विचारलं. त्यावर ते नेहमीच्या खोचकपणे म्हणाले, “मला काय ईचारतो, बोर्डावर लिव्हलय ते वाच.” राजेशने गण्याकाकांकडे दुर्लक्ष केलं व तो नोटिस वाचू लागला. नेहमीप्रमाणे कॉलेजने यावर्षी सुद्धा मुलामुलींसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित ...Read More

8

चांदणी रात्र - ८

कॉलेज संपताच राजेश आणि संदीप फ्रेश होण्यासाठी राजेशच्या घरी पोहोचले. संदीपने सकाळीच पार्टीला घालायचे कपडे बरोबर घेतले होते. दोघेही घरातून बाहेर पडले. तासाभरात ते मनालीच्या घरी पोहोचले. मनालीचा बंगला एखाद्या पॅलेसपेक्षा कमी नव्हता. मनालीचे वडील एका नावाजलेल्या कंपनीचे मालक होते. बंगल्यासमोर मोठं लॉन होतं. तिथे टेबल खुर्च्या मांडल्या होत्या. राजेश आणि संदीप जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्यांच्या वयाची पंधरा वीस मुलं-मुली तिथे होती. त्यांच्या वर्गातल्या काही मुलीदेखील आल्या होत्या. थोड्या वेळाने मनाली तिथे आली. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये ती फार सुंदर दिसत होती. संदीपची नजर तर तिच्यावरून हाटतच नव्हती. एवढी गर्दी आणि झगमगाट पाहुन तो थोडा बुजला होता. या सगळ्याची त्याला ...Read More

9

चांदणी रात्र - ९

दुसऱ्या दिवशी सकाळी राजेश कॉलेजला जायला निघाला. राजेश वृषालीच्या घरापाशी पोहोचला. वृषाली गाडीला किक मारत होती पण तिची गाडी होत नव्हती त्यामुळे ती फार वैतागली होती. राजेशने गाडी थांबवली. वृषाली राजेशकडे पाहून हसली व “हाय” म्हणाली. “तुझी हरकत नसेल तर मी प्रयत्न करून पाहतो.” राजेश वृषालीला म्हणाला. जणू याचीच वाट पाहत असल्याप्रमाणे वृषाली बाजूला झाली व तिने गाडी राजेशच्या ताब्यात दिली. राजेशने दोन वेळा किक मारली पण गाडी स्टार्ट नाही झाली. राजेशने कॉक ओढला व पुन्हा एकदा किक मारली पण तरीही गाडी स्टार्ट झाली नाही. शेवटी राजेशने गाडी डाव्या उजव्या बाजूला हलवून गाडीतलं पेट्रोल ढवळलं. आता मात्र गाडी एका ...Read More

10

चांदणी रात्र - १०

स्पर्धेचा दुसरा दिवस उजाडला. संदीप व राजेश मैदानावर पोहोचले. थोड्याच वेळात मनाली आणि वृषाली सुद्धा तिथे आल्या. स्पर्धेची वेळ सर्व स्पर्धक आपापल्या जागी उभे होते. रेफरीने शिट्टी वाजवताच सर्वांनी पोजिशन घेतली. राजेशने वृषालीकडे पाहिले. दोघांची नजरानजर झाली व राजेशमध्ये एक वेगळीच शक्ती संचारली. रेफरीने दुसरी शिट्टी दिली व सर्व स्पर्धकांनी धावायला सुरुवात केली. राजेश वाऱ्याच्या वेगाने धावत होता व एकेकाला मागे टाकत होता. आता अगदी थोडं अंतर बाकी होतं. राजेशच्या पुढे एकच मुलगा होता. राजेशचे पाय आता घाईला आले होते पण तरीही तो पूर्ण ताकदीनिशी धावत होता. आता राजेश आणि तो मुलगा एका रेषेत धावत होते. अखेरीस राजेशने फिनिश ...Read More

11

चांदणी रात्र - ११

रात्री सात वाजता संदीप, मनाली आणि वृषाली कॉलेजात पोहोचले. वृषालीने मनालीला राजेशबद्दल विचारलं. तो ठीक असल्याचं मनालीने सांगितलं. तसेच फक्त तुझ्या गाण्यावर लक्ष दे असा सल्लाही तिने वृषालीला दिला. एकूण चार मुलं आणि चार मुलींनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. होस्टने घोषणा करताच पहिला स्पर्धक विक्रांत स्टेजवर आला. तो किशोर कुमारचं ‘पल पल दिल के पास’ हे गाणं गाणार होता. त्याने हातात माईक धरला व गाणं गायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याचे सूर चुकत होते. त्याची देहबोली पाहून त्याला स्टेजवर गायची फारशी सवय नसावी असं वाटत होतं. गाण्याच्या उत्तरार्धात त्याने स्वतःला सावरलं. गाणं संपलं. सर्वांनी टाळ्यांचा कडकडात केला. सुरुवातीला त्याचा सूर जरी ...Read More

12

चांदणी रात्र - १२

काही जुन्या आठवणींमुळे वृषालीचं मन विस्कळीत झालं होतं. ते पूर्वपदावर आणण्यासाठी कटू आठवणींच्या जागी सुखद आठवणी पेरणं गरजेचं होतं. जोपर्यंत वृषालीच्या मनाचे दरवाजे बंद होते तोपर्यंत हे शक्य नव्हतं. तसेच तिच्या घराण्यात मनोविकाराने ग्रासलेली ती काही पहिली व्यक्ती नव्हती. तिच्या आज्जीला देखील नैराश्याचे झटके बऱ्याचदा येऊन गेले होते. पण तरीदेखील काही महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेमुळे वृषालीच्या मनावर झालेली जखम इतक्या दिवसांनंतर पुन्हा एकदा ओली व्हावी याचं उत्तर मात्र खुद्द डॉक्टरांकडे देखील नव्हतं. विज्ञान कितीही पुढे गेलं असलं तरी मनुष्याचं मन इतकं गूढ आहे की ते पूर्णपणे ओळखणं विज्ञानाला सुद्धा अजून शक्य झालेलं नाही. राजेश, मनाली आणि संदीपने वृषालीच्या डॉक्टरांची भेट घेतली. ...Read More

13

चांदणी रात्र - १३

सकाळी उठून नाष्टा करून शेतात जायचं. दिवसभर शेतात काम करायचं. बरोबर आणलेल्या डब्यातलं दुपारी जेवायचं. संध्याकाळी नदीवर जाऊन सूर्याचं घ्यायचं व घरी परतायचं असा राजेशचा रोजचा दिनक्रम ठरला होता. रोज वृषालीला एकदा तरी फोन व्हायचा. पण काहीवेळा फोन लागायचा नाही. मग वृषालीशी बोलणं नाही झालं तर राजेशला खूप उदास वाटायचं. पाहतापाहता निकालाचा दिवस उजाडला. राजेश संदीपला फोन लावणार होता तितक्यात वृषालीचा फोन आला. “अभिनंदन” राजेश काही बोलायच्या आतच वृषाली म्हणाली. “तू वर्गात तिसरा आलास.” राजेशला हे अपेक्षितच होतं, त्यामुळे त्याला काही वेगळं वाटलं नाही. “थँक्स. तुझं काय झालं. झालीस का मॅथस मध्ये पास.?” राजेशने विचारलं. “हो झाले एकदाची. मी काही ...Read More

14

चांदणी रात्र - १४

सकाळी उठताच राजेशने पटापट आवरलं. आज त्याच्या मनात एक वेगळीच हुरहूर, एक वेगळाच उत्साह संचारला होता. खरंतर कालची निम्मी तो जागा होता पण थकवा बिलकुल जाणवत नव्हता. संध्याकाळी काय काय करायचं याची त्याने मनात उजळणी केली व वृषालीला फोन लावला. आज संध्याकाळी सहा वाजता टेकडीवर ये, तुला काहीतरी सांगायचंय असं राजेशने वृषालीला सांगितलं व फोन ठेवला. राजेश संध्याकाळी साडेपाच वाजताच टेकडीवर पोहोचला. अजून सूर्यास्त व्हायला बराच वेळ होता. उन्हाळ्याच्या दिवसात उगवणाऱ्या रान फुलांनी सारी टेकडी बहरली होती. पांढऱ्या पाकळ्या व पिवळ्या रंगाचे परागकण असलेली ती फुले अतिशय मोहक दिसत होती. राजेशने बरीच फुलं पटापटा खुडली व एका पिशवीत भरली व ...Read More

15

चांदणी रात्र - १५

राजेश आणि संदीप हॉटेलात पोहोचले. थोड्याच वेळात मनाली आणि वृषलीही पोहोचल्या. जेवता जेवता चौघांच्या अगदी छान गप्पा रंगल्या होत्या. झाल्यावर राजेशने घड्याळात पाहिले. रात्रीचे दहा वाजले होते. आता निघायला हवं होतं. त्यामुळे त्यांनी गप्पा आवरत्या घेतल्या व चौघेही आपापल्या घरी जायला निघाले. टेकडीवरच्या त्या क्षणांची जादू आता हळूहळू राजेश आणि वृषालीवरून उतरत होती. पूर्वीसारखेच ते आता एकमेकांशी मोकळेपणाने वागत, बोलत होते. कॉलेजमध्ये दोघांची भेट रोज व्हायची पण तिथे बोलायला फारसा वेळ मिळत नव्हता व इतर मुलामुलींसमोर मोकळेपणाने बोलताही येत नव्हतं. आज रविवार असल्यामुळे राजेशकडे वेळचवेळ होता. त्याने वृषालीला फोन लावला. “आज काय प्लॅन आहे तुझा?” राजेशने वृषालीला विचारलं. “खूप कंटाळा ...Read More

16

चांदणी रात्र - १६

वृषालीच्या अकस्मात मुत्यूमुळे राजेश पूर्णपणे खचला होता. अजूनही तो धक्क्यातून बाहेर आला नव्हता. त्याचे आईवडील सुद्धा फार काळजीत होते. आणि मनालीनेसुद्धा राजेशला सावरण्याचा खूप प्रयत्न केला, पण राजेशवर काहीच परिणाम होत नव्हता. त्याला ते स्वप्न आठवत होतं. काही महिन्यांपूर्वी त्याला जे अभद्र स्वप्न पडलं होतं त्याप्रमाणेच सगळं घडलं होतं. मग ते स्वप्न म्हणजे एक प्रकारची पूर्वसूचनाच होती का? राजेशला काहीच समजत नव्हतं. एक दिवस रात्री राजेश त्याच्या खोलीत झोपला होता. खिडकी जोरात आपटल्यामुळे मोठा आवाज झाला व त्या आवाजामुळे राजेशला जाग आली. राजेशने खिडकीच्या दिशेने पाहिलं. एक प्रकाशाचा लालसर गोळा खिडकीतून आत आला. ‘आपण स्वप्नात तर नाही ना’ राजेशच्या मनात ...Read More

17

चांदणी रात्र - १७

थोड्यावेळाने चहा पिऊन झाल्यावर रिवा आणि राजेश झोपडीच्या बाहेर आले. आता अंधार थोडा कमी झाला होता. काही सूर्यकिरणे झाडांचा पार करून जमिनीपर्यंत पोहोचली होती. झाडांच्या फांद्यांना चुकवत मातीला स्पर्श करण्याची जणू त्यांच्यात स्पर्धा सुरू होती. राजेशने समोर पाहिले. पुढच्या बाजूला वेगवेगळ्या आकाराच्या बऱ्याच छोट्या मोठ्या झोपड्या दिसत होत्या. रिवा आणि जांदी सारखा पोशाख केलेले बरेच स्त्री-पुरुष दिसत होते. काही लहान मुलेही होती. रिवाच्या मागून राजेश चालत होता. वाटेतली माणसं राजेशकडे एखादा एलियन दिसल्याप्रमाणे आश्चर्य आणि कुतूहलाने पाहत होती. त्या सर्व लोकांकडे पाहून राजेशला आपण फार उंच असल्यासारखं वाटत होतं. कारण ती माणसं रिवाप्रमाणेच उंचीला कमी होती. विशेष म्हणजे स्त्रियाही ...Read More

18

चांदणी रात्र - १८

जगदीश यादव हॉटेलमधून बाहेर पडले. सकाळची वेळ होती. जंगलाची पाहणी करण्यासाठी ते निघाले. बोटीत त्यांच्याबरोबर आणखी चार माणसं होती. गावातील लोकांनाही खूप आग्रह केला पण कोणीही यायला तयार झालं नाही. बोटीने ते पलीकडच्या बाजूला गेले. समोर दाट जंगल एखाद्या राक्षसासारखं दिसत होतं. जगदीश बोटीतून उतरले व जंगलाच्या दिशेने जाऊ लागले. त्यांची पूर्ण देहबोलीच एखाद्या माजलेल्या रेड्यासारखी होती. चालण्यात तोरा होता. चेहेऱ्यावर मग्रुरी होती. बोटीतील दोन माणसं त्यांच्याबरोबर चालू लागली. दोन जण बोटीतच थांबले. बरच पुढं गेल्यावर त्यांना एका बाजूला ओळीने बांधलेल्या झोपड्या दिसल्या. रिवा त्याच्या झोपडीच्या दारातच बसला होता. त्याने जगदीश यादवला समोरून जाताना पाहिले. तो एकटा असता तर ...Read More

19

चांदणी रात्र - 19 - अंतिम भाग

राजेशला आता सर्वकाही आठवत होतं. अलिबागची ट्रिप, ते अद्भुतरम्य जंगल, जंगलात राहणारे आदिवासी, रिवा, गरू, वाघ आणि अगदी जगदीश सुद्धा. “मला माहितीये तुला वृषालीची फार आठवण येते.” रिवा राजेशला म्हणाला. एवढा वेळ जुन्या आठवणींमध्ये बुडालेला राजेश वृषालीचं नाव ऐकताच भानावर आला. तो रिवाला म्हणाला, “रिवा मला माहितीये तुझ्या कडे खूप गूढ शक्ती आहेत. काहीही कर पण माझ्या वृषालीला पुन्हा जिवंत कर. मी नाही जगु शकत तिच्या शिवाय.” राजेश अगदी काकुळतीला येऊन बोलत होता. “माणूस एकदा मेला की परत येत नाही.” रिवा म्हणाल. “तूच असं म्हणालास तर मी काय करायचं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या माझ्या सारख्या सामान्य माणसासाठी अशक्य ...Read More