नवरंगी नवरात्र

(3)
  • 22.7k
  • 2
  • 9k

नवरंगी नवरात्र भाग १ नवरात्र ,नऊ रंग आणि नऊ दिवसांचा अत्यंत उत्साहवर्धक सण...!!शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव असुन ते देवीशी संबंधित व्रत आहे. हिंदु धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणजे ते शरद ऋतूच्या प्रारंभी येते. भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी-अधिक स्वरूपात पूजाअर्चा केल्या जातात . नवरात्र आपण तीन राज्यातले पाहणार आहोत एक म्हणजे महाराष्ट्र दुसरे गुजरात आणि तिसरे कलकत्ता म्हणजे बंगाल प्रांतातले . आश्विन

Full Novel

1

नवरंगी नवरात्र - भाग १

नवरंगी नवरात्र भाग १ नवरात्र ,नऊ रंग आणि नऊ दिवसांचा अत्यंत उत्साहवर्धक सण...!!शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव ते देवीशी संबंधित व्रत आहे. हिंदु धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणजे ते शरद ऋतूच्या प्रारंभी येते. भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी-अधिक स्वरूपात पूजाअर्चा केल्या जातात . नवरात्र आपण तीन राज्यातले पाहणार आहोत एक म्हणजे महाराष्ट्र दुसरे गुजरात आणि तिसरे कलकत्ता म्हणजे बंगाल प्रांतातले . आश्विन ...Read More

2

नवरंगी नवरात्र - भाग २

दुर्गानवमी आश्विन शुद्ध नवमी म्हणजे दुर्गानवमी किंवा महानवमी म्हणतात. शक्ती व संपत्ती यांच्या प्राप्तीसाठी हे व्रत करतात आघाड्याच्या काडीने दंतधावन करतात. केळीचे खांब व पुष्पमाला यांनी देवीसाठी मखर तयार करतात. या पूजा विधानात पुष्पांजली अर्पण झाल्यावर गंधाक्षतायुक्त व साग्र अशा ४८ दुर्वा ललितेला वाहतात. नैवेद्यासाठी लाडू, घारगे, वडे वगैरे पदार्थ करतात. पूजेच्या अंती घारग्यांचे वाण सवाष्णींना दिले जाते . रात्रौ जागरण व देवीच्या कथांचे श्रवण करतात. दुसऱ्या दिवशी देवीचे विसर्जन करतात. दुर्गामाता ही या व्रताची देवता आहे. प्रत्येक मासात भिन्न उपचारांनी देवीची पूजा करणे व उद्यापनाचे वेळी कुमारिकांना भोजन घालणे हा या व्रताचा विधी आहे.या काळात नऊ प्रकारच्या ...Read More

3

नवरंगी नवरात्र - भाग ३

दुर्गापूजा बंगाल आणि बिहार ,ओडीसा ,उतर प्रदेश या राज्यांत साजरे होणारे हे सहा दिवसांचे नवरात्र असते. ललिता दुसर्या दिवसापासून, म्हणजे षष्ठीपासून ते दसर्यापर्यंत हा उत्सव चालतो. महाअष्टमी(दुर्गाष्टमी)ला बकर्याचा आणि महानवमीला रेड्याचा बळी दिला जातो. दुर्गापूजा हा बंगाली लोकांचा वर्षातील महत्त्वाचा सण आहे. सुरुवातीला बांधकाम करणारे गवंडी, सुतार वगैरे लोक विश्वकर्म्याची सार्वजनिक पूजा करतात. दुर्गापूजा हा मूळचा धार्मिक सण होता, पण सध्या त्याला सामाजिक स्वरूप आले आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस दुर्गेचे नवरात्र मानतात. नवरात्रात नित्य दुर्गापूजा केली जाते. पूजा करताना घरचे मुख्य पुरुष सकाळी पाण्यात पांढरे तीळ टाकून त्या पाण्याने स्नान करतात. मग सपत्नीक ...Read More