ये ग गौराबाई भाग १ गणपतीचे आगमन झाले की पाठोपाठ होते गौरीचे आगमन गणपतीच्या आगमनानंतर तिसऱ्या दिवशी गौरी व नंतर शंकरोबांचे आगमन होते.अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया गौरीपूजनाचे व्रत करतात. गौरीचा सण महिलांचा विशेषतः माहेरवासिनींचा अमाप उत्साहाचा सण असतो .जुन्या आठवणी उजळून निघणारे माहेरपण भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा म्हणावा लागेल. महिलावर्ग यामध्ये मोठ्या प्रमाणात एकत्र येतो.गौरी याचा अर्थ एक अनाघ्रात मुलगी ,गौरी म्हणजे पृथ्वी ,तरुण पत्नी ,तुळशीचे झाड जाईचा वेल असेही अर्थ आहेत.ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी सोबत तेरड्याचीही गौरी म्हणून पूजा केली जाते .भाद्रपद महिन्यातील या सणा दिवशी प्रत्येकाच्या कुलाचारा नुसार गौरीचे पुजन केल जाते .हिलाच महालक्ष्मी म्हणतात .ज्येष्ठ नक्षत्रावर पुजाहोत असल्याने ती
Full Novel
ये ग गौराबाई - 1
ये ग गौराबाई भाग १ गणपतीचे आगमन झाले की पाठोपाठ होते गौरीचे आगमन गणपतीच्या आगमनानंतर तिसऱ्या दिवशी गौरी व शंकरोबांचे आगमन होते.अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया गौरीपूजनाचे व्रत करतात. गौरीचा सण महिलांचा विशेषतः माहेरवासिनींचा अमाप उत्साहाचा सण असतो .जुन्या आठवणी उजळून निघणारे माहेरपण भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा म्हणावा लागेल. महिलावर्ग यामध्ये मोठ्या प्रमाणात एकत्र येतो.गौरी याचा अर्थ एक अनाघ्रात मुलगी ,गौरी म्हणजे पृथ्वी ,तरुण पत्नी ,तुळशीचे झाड जाईचा वेल असेही अर्थ आहेत.ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी सोबत तेरड्याचीही गौरी म्हणून पूजा केली जाते .भाद्रपद महिन्यातील या सणा दिवशी प्रत्येकाच्या कुलाचारा नुसार गौरीचे पुजन केल जाते .हिलाच महालक्ष्मी म्हणतात .ज्येष्ठ नक्षत्रावर पुजाहोत असल्याने ती ...Read More
ये ग गौराबाई - २
काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींनाच साडी चोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात. घरांत धान्यांची रास म्हणजेच गहू, तांदूळ ,ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी एकदोन धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात. बाजारात पत्र्याच्या, लोखंडी सळयांच्या किंवा सिमेंटच्या कोथळे मिळतात. त्यावर मुखवटे ठेवतात आणि कोथळ्यांना साडी चोळी नेसवतात. सुपात धान्याची रास ठेऊन त्यावर मुखवटा ठेवतात. किंवा गहू तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यांवर मुखवटे ठेवून पूजा करतात.काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवितात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवितात.नंतर त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवितात. गौरी आगमनाच्या दिवशी संध्याकाळी किंवा पंचांगात शुभ वेळ बघून मुखवट्यांची ...Read More
ये ग गौराबाई - ३ - Last part
सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली. मुला, तुझ्या बायकोला सांग मला न्हाऊ घाल असे म्हणाली. देवाला गोडधोड कर, नाही काही म्हणू नको, नेहेमीचे रड काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला, बायकोला हाक मारली, अगं अगं ऐकलेस का ? आजीबाईला न्हाऊ घाल मी भिक्षा मागून येतो नेवेद्यासाठी असे सांगितले. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोने सर्व गोडधोड स्वयंपाक केला नेवेद्य दाखवला . मुलबाळसुद्धा पोटभर जेवली. म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितले. ब्राह्मण म्हणाला, आजी, आजी, दूध कोठून आणू ? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. ...Read More