अतर्क्य

(13)
  • 16.9k
  • 1
  • 7.5k

अतर्क्य.. हेल्लो निधी अग किती वाजता येते आहेस दुपारी . चार पर्यंत पोचते ग प्रिया .. चार .?..अग इतका का उशीर ? ..कार्यक्रम पाचला सुरु आहे माहित आहे न ? आणि जीजू येणार आहेत चार पर्यंत त्याआधी तरी ये ना ग .. बर बाई आणखी लवकर पोचते ओके ? आणि लक्षात आहे न रात्री पण इथेच राहायचे आहे आईला घरी निट सांगून ये तसे .. हो हो हो ..आता ठेवला फोन तर मी माझे आवरू शकेन न ? हा हा हा ...बर बर बाय निधी .. प्रियाने फोन ठेवला आणि आईकडे बघून हसली . “तुझी मैत्रीण येईपर्यंत

Full Novel

1

अतर्क्य भाग १

अतर्क्य.. हेल्लो निधी अग किती वाजता येते आहेस दुपारी . चार पर्यंत पोचते ग प्रिया चार .?..अग इतका का उशीर ? ..कार्यक्रम पाचला सुरु आहे माहित आहे न ? आणि जीजू येणार आहेत चार पर्यंत त्याआधी तरी ये ना ग .. बर बाई आणखी लवकर पोचते ओके ? आणि लक्षात आहे न रात्री पण इथेच राहायचे आहे आईला घरी निट सांगून ये तसे .. हो हो हो ..आता ठेवला फोन तर मी माझे आवरू शकेन न ? हा हा हा ...बर बर बाय निधी .. प्रियाने फोन ठेवला आणि आईकडे बघून हसली . “तुझी मैत्रीण येईपर्यंत ...Read More

2

अतर्क्य भाग २

समित आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता . एक बहीण होती पण ती लग्नानंतर आपल्या पतीसोबत परदेशी झालेली होती . त्याचे आईवडील दिल्लीला स्थायिक होते .तिथे त्यांची मोठी कोठी असुन पिढीजात कार व्यवसाय होता समितचे काका व वडील मिळुन हा व्यवसाय पहायचे .. सी ए झालेल्या समितने स्वतःचे ऑफिस नागपूरला येथे थाटले होते . प्रथम भाड्याच्या जागेत असलेले हे ऑफिस तीन चार वर्षातच स्वतःच्या जागेत स्थलांतरित झाले होते . शिवाय त्याचा स्वतःचा चार खोल्याचा एक ब्लॉक पण होता . लहान वयात त्याचे कर्तृत्व वाखाणण्याजोगे होते, हे स्थळ अगदी लाखात एक होते ,प्रियाला कसलाच त्रास होणार नव्हता ना कसली जबाबदारी ...Read More

3

अतर्क्य भाग ३

लग्न सुरळीत झाले. संपूर्ण कार्यक्रमात निधी आणि प्रिया दोघींचे डोळे सारखे भरून येत होते . जड अंतःकरणाने एकमेकींचा निरोप घेतला . फोन होतेच की संपर्कासाठी .. आणि मांडव परतणीसाठी प्रिया माहेरी येणारच होती काही दिवसासाठी .मग भेट होणारच होती . हनिमुनसाठी नवीन जोडी मनालीला गेली होती . समित खुप उत्साहित होता . बरेच प्लान होते मनात त्याच्या . पण गेल्यावर एक दिवसभर प्रिया उदासच राहिली होती . कदाचित थकली असेल म्हणून समितने काहीच फोर्स नाही केला . बाहेर फिरायला गेले तरीही प्रिया बळेबळे सगळे रेटत होती असे वाटले समितला दुसर्या दिवशी रात्री जेवण झाल्यावर दोघे थोडे फिरुन ...Read More