मित्र my friend

(139)
  • 158.6k
  • 18
  • 66.5k

(सदर कथा काल्पनिक असून त्याचा संबंध कोणत्याही सिनेमाशी... कथेशी नाही... संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा... हि कथा आपल्याला खूप मागे घेऊन जाते.... ज्या काळात social media, FB , मोबाईल असं काही अस्तित्वात नव्हतं ... निदान भारतात तरी... ) " हो सर.. करतो मी... रात्री पर्यंत देतो करून... " विवेक त्याच्या बॉसला म्हणाला. मनात नसून सुद्धा त्याला पुन्हा कामाला बसावं लागलं. एकतर तिघांचे काम एकटा करून दमला होता. दोघेजण ऐनवेळी आले नव्हते. त्यांचे काम करून निघत होता ,तर निघताना पुन्हा त्याच्या बॉसने वेगळं काम करायला सांगितलं. काय करणार मग... करत बसला काम रात्रीपर्यंत. दुसऱ्या दिवशीही तेच... एक संपत

Full Novel

1

मित्र my friend - भाग १

(सदर कथा काल्पनिक असून त्याचा संबंध कोणत्याही सिनेमाशी... कथेशी नाही... संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा... हि कथा आपल्याला मागे घेऊन जाते.... ज्या काळात social media, FB , मोबाईल असं काही अस्तित्वात नव्हतं ... निदान भारतात तरी... ) हो सर.. करतो मी... रात्री पर्यंत देतो करून... विवेक त्याच्या बॉसला म्हणाला. मनात नसून सुद्धा त्याला पुन्हा कामाला बसावं लागलं. एकतर तिघांचे काम एकटा करून दमला होता. दोघेजण ऐनवेळी आले नव्हते. त्यांचे काम करून निघत होता ,तर निघताना पुन्हा त्याच्या बॉसने वेगळं काम करायला सांगितलं. काय करणार मग... करत बसला काम रात्रीपर्यंत. दुसऱ्या दिवशीही तेच... एक संपत ...Read More

2

मित्र my friend - भाग २

विवेकला प्रियाचा स्वभाव माहित होता.. हट्टी होती ती... उडी मारणारच... त्यासाठी,त्याने ती बोलत असतानाच, खांद्यावरून त्याची बॅग हळूच बाजूला आणि तिच्या मागे जाऊन उभा राहिला. विवेक आपल्या मागे येऊन उभा राहिला हे जसं प्रियाच्या लक्षात आलं तसं तिने उडी मारली. विवेकने चपळाई करत प्रियाचा हात पकडला. खाली पडता पडता वाचली, पण एका झटक्याने खालच्या भिंतीला आपटली. डोक्याला लागल्याने बेशुद्ध झाली... आली का पंचाईत... विवेकने घट्ट पकडून ठेवलं होतं. पण तिला वर कसं खेचणार.. आजूबाजूला कोणी नाही.. मग काय करणार... हळू हळू तिला वर आणलं. कठड्यावर झोपवलं... तिला बसवण्याचा प्रयन्त करत होता तर पुन्हा तोल गेला.आणि ती उलट दिशेला, विवेकच्या ...Read More

3

मित्र my friend - भाग ३

या .... विवेकला बघून इन्स्पेक्टर बोलले. काय झालं साहेब ? विवेकने खुर्चीवर बसत चल चल बसू नकोस.... इन्स्पेक्टर उभे राहत म्हणाले. विवेकला मागोमाग यायला सांगून एका खोलीत शिरले. जखमींवर उपचार करायची खोली ती... विवेकने डोकावून पाहिलं आत. च्यायला !! हि तर प्रिया.... हि इकडे कशी.. ? विवेक ओरडलाच.. तुझ्या मैत्रिणीला जीव देयाची एवढी घाई आहे का... इन्स्पेक्टरने विचारलं. म्हणजे ? विवेक... म्हणजे... समुद्रकिनारी... जिथे तुम्ही दोघे सापडला होतात , तिथे... या बाईसाहेब... उभ्या होत्या कठड्यावर... नशीब, आमचा एक हवालदार होता तिथे.. त्याला बघून उडी मारली पाण्यात... बरं ...Read More

4

मित्र my friend - भाग ४

" ऑफिसचा पत्ता कुठे दिला त्याने... कुठे शोधणार त्याला.... हे, इथे शहरात सगळं नवीन... घाबरून गेले.. तहान-भूक लागलेली, एका पाणी पिण्यास थांबले.. तर चोरांनी कधी सामान नेलं ते कळलंच नाही.. पोलीस स्टेशनमध्ये गेले तर बोलतात कसे ,, लक्ष ठेवायला काय होते तुम्हाला... सामान , पैसे सगळं गेलं.. रडत बसले एका झाडाखाली तर चार-पाच मवाली, नालायक मुलं गोळा झाली भोवती.. काय काय बोलत होते माझ्याकडे बघून.. शी !! नशीब एका माणसाने त्यांना हटकलं तसे ते पळून गेले.. मलाही ओरडले ते... जाणार कुठे.. संध्याकाळ होतं आलेली.... चालता चालता दूरवर समुद्र किनारा दिसला.. गावी, माघारी घरी जायचा मार्गच नव्हता. त्यात हि सगळी ...Read More

5

मित्र my friend - भाग ५

" तुम्ही दोन दिवसापूर्वी ही आल्या होता ना.. " तिथे राहण्याऱ्या एका बाईने प्रियाकडे बघत विचारलं. " हो.. ", मग तुम्हाला सांगितलं तेव्हाच... केशव नाही राहत आता इथे... गेला तो... " बाई प्रियाकडे रागात बघत म्हणाल्या. " सॉरी काकू... त्रास झाला म्हणून खरंच सॉरी.. पण केशव कुठे गेला हे माहीत आहे का... आणि कधी गेला तो... ", विवेक... " तुम्ही कोण त्याचे... एवढी चौकशी करत आहात ते.. " खोटं तर बोलावंच लागेल.. " आम्ही मित्र आहोत त्याचे.. त्याची आई खूप आजारी आहे ना.. म्हणून आलो त्याला घेऊन जायला.. " , " असं आहे तर... केशव दोन महिन्यापूर्वीच गेला इथून... ...Read More

6

मित्र my friend - भाग ६

संदीपचं घर आणि कपड्यांचे दुकान शेजारी -शेजारी होते. " तू मघाशी फोन लावला तर कोणी उचलला ? " प्रियाने " कोणीतरी सँडी बोलत होता.. मी लगेच ठेवून दिला फोन.. ", "अरे.. बाळा... सँडी म्हणजे संदीप... तुला माहीत नाही का.. " प्रिया जोरात हसली. आता यात काय हसायचं एवढं... विवेकने दुरूनच बघितलं.. दुकान मोठ्ठ होतं ,शिवाय आजूबाजूला खूप सुधारणा झाली होती. ४ वर्षात खूप काही बदललं इथे.. विवेक आजूबाजूला बघत चालला होता.. इतक्यात त्याला " Wow !!! " अशी मोठयाने किंकाळी ऐकू आली. दचकला विवेक. समोर संदीप उभा... त्याच्या बाजूला प्रिया... नक्की कोणाला बघून ओरडला हा... असा विचार करत त्याच्या ...Read More

7

मित्र my friend - भाग ७

४ वर्षांनी येत होता तो. किती बदल झाला .त्यात गेल्या वर्षीच घराची डागडुजी केली होती, विवेकनेच तर पैसे पाठवले ते घर आता कसं दिसते ते बघायला विवेक उत्सुक होता.. घराजवळ पोहोचला तेव्हा वेगळाच नजारा. जरासं तुटक घर... आता एक मजली झालं होतं. व्वा !!! कमाल केली यांनी... घराचा आकार सुद्धा वाढवला.. आजूबाजूला झाडे देखील लावली होती. एकदम कायापालट... अनघा तर त्याच्या आधीच धावत घरी पोहोचली होती.. अनघा, आई एकत्र दारात उभ्या होत्या. विवेकलाही आईला बघून बरं वाटलं. डोळ्यात पाणी आलं दोघांच्या.. गळाभेट झाली. पाया पडून झालं. अनघा तितक्यात जाऊन आली कुठेतरी. विवेक घर न्याहाळत होता. किती सुधारणा केली... सुरेख ...Read More

8

मित्र my friend - भाग ८

बघता -बघता संध्याकाळ झाली. रात्रीचे ८ वाजले होते, तेव्हा विवेक घरी आला.बऱ्याच वर्षांनी एवढा निवांत वेळ मिळाला होता त्याला. तर प्रिया अजूनही त्याच्या घरीच... रात्रीच्या जेवणाची तयारी सुरु झालेली. त्यात प्रियादेखील मदत करत होती. हिला काय बोलू आता... स्वतःच घर सोडून आली आहे....त्याचं काहीच नाही, ठेवणार कुठे हिला.. विवेक आत आला आणि काहीतरी खूण करून त्याने प्रियाला बाजूला बोलावलं. " काय चालू आहे तुझं ? ", " मस्त बेत आहे तुझ्यासाठी... सॉलिड जेवण बनवलं आहे तुझ्यासाठी ..... ", " जेवणाचे नाही विचारलं... तुझ्या राहण्याची सोय काय...... आता तर रात्र पण झाली.. " तेव्हा प्रियाच्या डोक्यात प्रकाश पडला, घाबरली. ...Read More

9

मित्र my friend - भाग ९

पुन्हा रस्सीखेच.. " तुमच्या लफड्यात मला कशाला मध्ये ओढता... जा ना तू एकटी... ",अजूनही विवेक त्याचा हात सोडवू शकला " तुला यावंच लागेल... समजलं ना.. " प्रिया मोठयाने ओरडली. तिचा आवाज ऐकून अनघा दुकानातून बाहेर आली. " कुठे चालली आहेस ? ", " दिल्लीला.. ", " कशाला एवढ्या लांब.. " अनघाचा लगेच दुसरा प्रश्न.. " त्याचा एक काम असा... दिल्लीक... तुका जाऊचा असा काय दिल्लीक... " संदीप " वेगळ्या " भाषेत बोलला. "मग दादाला काय झालं... ", "याला बोलते कि चल ना माझ्यासोबत... मी एकटी कशी जाऊ... तर नाटक करतो आहे.. " प्रिया रडक्या आवाजात बोलली. " जाईल तो... ...Read More

10

मित्र my friend - भाग १०

मुंबईला पोहोचले तेव्हा पहाट झालेली. पहाट म्हणजे १० वाजत आलेले. आता ऑफिसमध्ये जाऊन फायदा नाही , म्हणत विवेकने त्याच्या रूमवर जाण्याचा निर्णय घेतला. पोहोचले हि घरी... " Wow !! that is room... gorgeous.... is the.." संदीप , विवेकच्या राहत असलेल्या रूममध्ये येत म्हणाला. विवेक तसाही वैतागला होता, रात्रभर या दोघांची बडबड ऐकून.... आता पुन्हा संदीपने बोलणं सुरू केलं आणि विवेकने स्वतःच डोकं धरलं. " काय झालं रे विवेक बाळा ? " प्रियाने लाडिक आवाजात विचारलं. " डोकं... तुमच्या दोघांच्या बडबडीमुळे झोप लागली नाही... त्यामुळे डोकं दुखते आहे... " विवेक डोक्याला हात लावून बसला होता. " आता कसलं डोकं ...Read More

11

मित्र my friend - भाग ११

" काय वेडं -बीड लागलं आहे का तुला... काय करत होतीस... भूत शिरलं आहे का अंगात.. " विवेक वैतागला " अरे सोडून दे रे ती कंपनी.. एवढं काम करतोस... सुट्टी देऊ शकत नाही तुला.. काय करायची असली कंपनी... " , " सोडून दे काय... आता गेलो तरी उभं करणार नाही बॉस... ऐकलंस ना काय बोलला... कायमची सुट्टी घे... तुझ्यामुळे.. थँक्स... " विवेकने हात जोडले आणि बसची वाट बघू लागला. बस स्टॉप वर दोघेच.. जाऊ का ऑफिसमध्ये.. बॉसला सॉरी बोलू ... नाहीतर नको.. डोकं गरम असेल अजून... इतक्यात बस आली. दोघांना जागा भेटली. प्रियाला तशी झोपच आली होती. गाडीत बसल्या ...Read More

12

मित्र my friend - भाग १२

सकाळ होताच , बँक उघडताच संदीपचे पैसे देऊन आणि प्रवासात , दिल्लीला गेल्यावर पैश्याची अडचण भासू नये म्हणून त्याने पैसे काढले. पहिल्यांदा विमान प्रवास म्हणून प्रिया ,संदीप खुश... विवेक मात्र वेगळ्या विचारात... कसली चुकीची कामं करतो आहे केशव.. प्रियाला खरंच माहिती असेल, त्याच कारणास्तव आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असेल का... कि काहीच माहित नाही तिला... सांगावं का तिला.. कि दिल्लीला तिलाच खरं काय ते कळेल.. धक्का तर नाही ना बसणार तिला.. काय करू... विवेकचं लक्ष लागत नव्हतं. विमानात बसल्यावर सुद्धा विवेकला काही समजत नव्हतं, तिथे गेल्यावर काय होईल नक्की ते... " ये.. पाऊस.. पाऊस सुरू झाला.. " प्रियाच्या ...Read More

13

मित्र my friend - भाग १३

जरा दूरचं होतं ते ठिकाण , तरीसुद्धा पोहोचला. त्याचवेळेला पावसाने सुरुवात केली... काय यार हा पाऊस... नको त्यावेळेला नको ठिकाणी येतो, वैताग नुसता. विवेकला पाऊस तसा आवडायचा नाहीच. पावसातला चिखल, चिकचिकपणा.. अजिबात आवडायचा नाही. आजही ऐनवेळेला येऊन विवेकला अडचणीत आणलं त्याने. तरी केशव भेटेल म्हणून त्याने पावसाचा राग आवरता घेतला. विवेक त्याच्या घरी पोहोचला. केशवनेच दरवाजा उघडला. " पटकन आत ये. " विवेकला आतमध्ये घेतलं. आजूबाजूला कोणी नाही बघून दरवाजा बंद केला केशवने. " आई... दोन चहा घेऊन येते का ? " केशवने आईला बाहेरून आवाज दिला. आणि विवेकला एका वेगळ्या रूममध्ये घेऊन आला. घर मोठ्ठ होतं. विवेक ...Read More

14

मित्र my friend - भाग १४

" तू कोण ठरवणार केशव बरोबर नाही ते... तू नाही ओळखत त्याला.... खरं सांगायचं झालं तर, तूच त्याचा तिरस्कार कॉलेजमध्ये असल्यापासून... तेव्हा सुद्धा सांगायचा तू... केशव सोबत राहू नको म्हणून.. तो तुझ्यापेक्षा पुढे गेला म्हणून जळतोस त्याच्यावर... आणि हो... उपकारच केलेस माझ्यावर...मित्र आहेस ना... मित्रच रहा.. देव बनण्याचा प्रयन्त करू नकोस... ", " प्रिया !!! " विवेकचा हात उठला प्रियाला मारायला.. पुन्हा विजेचा जोरदार आवाज झाला.. थांबला विवेक तसाच. संदीप दारात उभा राहून बघत होता हे सर्व. " ok... fine... उपकार केले ना...ठीक आहे... उद्या सकाळीच त्याला भेटायला जाऊ... हा शेवटचा उपकार केला कि माझी जबाबदारी संपली... " ...Read More

15

मित्र my friend - भाग १५

सकाळी उशिराने जाग आली त्याला.. २ दिवस अपूर्ण झोपेमुळे असावं कदाचित... घड्याळात पाहिलं तर सकाळचे ९.३० वाजत होते. डोकं जड होते. पहिला विचार आला तो प्रियाचा.. काय झालं असेल तिथे.. तसाच बेडवर बसून होता. पोटात भुकेची जाणीव झाली. आपण आता मुंबईत आहोत, घरी आईने बनवून दिला नास्ता, जेवण... इथे सर्व स्वतः करावं लागते.. हे लक्षात आलं त्याच्या... अंघोळ करून.. काहीतरी नास्ता आणि साधंसं जेवण सुद्धा बनवलं. बॅगेतलं सामान काढून व्यवस्थित लावू लागला. काही पैसे सापडले बॅग मध्ये..... किती खर्च झाला काय माहित.... खर्चावरून आठवलं.. नोकरी शोधावी लागेल आता... प्रियाने तिथे जो तमाशा केला, त्यावरून वाटतं नाही.. बॉस मला परत ...Read More