आजा गुन्हा कर ले

(19)
  • 12.6k
  • 9
  • 6.2k

“दिन्या हळु चालव रे गाडी, काय घाई आहे एवढी?”, शेवटी मी न रहावुन दिन्याला म्हणालोच. भारी डँबीस आहे दिन्या, एक नंबरचं अवलादी कार्ट. कधी, कुठे तो कसा वागेल ते फक्त दिन्याच सांगु शकतो. मला तर कधी कधी जाम भिती वाटते त्याची. त्या उलट तो गाडीत मागे बसलेला संजु. महा-भित्रट, आम्ही तर त्याला फट्टुच म्हणतो. प्रत्येक गोष्टीची त्याला भितीच असते. मी मात्र अगदी बॅलन्स्ड आहे. प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करुन निर्णय घेणारा. आम्ही तिघंही अगदी वेगळा विचार करणारे तरीही एकमेकांचे घट्ट मित्र. लागुन आलेल्या सुट्टीचे निमीत्त साधुन आम्ही गोव्याला निघालो होतो माझ्या गाडीतुन. पण दिन्या इतकी भयानक गाडी चालवत होता ना!!

Full Novel

1

आजा गुन्हा कर ले (भाग-१)

“दिन्या हळु चालव रे गाडी, काय घाई आहे एवढी?”, शेवटी मी न रहावुन दिन्याला म्हणालोच. भारी डँबीस आहे दिन्या, नंबरचं अवलादी कार्ट. कधी, कुठे तो कसा वागेल ते फक्त दिन्याच सांगु शकतो. मला तर कधी कधी जाम भिती वाटते त्याची. त्या उलट तो गाडीत मागे बसलेला संजु. महा-भित्रट, आम्ही तर त्याला फट्टुच म्हणतो. प्रत्येक गोष्टीची त्याला भितीच असते. मी मात्र अगदी बॅलन्स्ड आहे. प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करुन निर्णय घेणारा. आम्ही तिघंही अगदी वेगळा विचार करणारे तरीही एकमेकांचे घट्ट मित्र. लागुन आलेल्या सुट्टीचे निमीत्त साधुन आम्ही गोव्याला निघालो होतो माझ्या गाडीतुन. पण दिन्या इतकी भयानक गाडी चालवत होता ना!! ...Read More

2

आजा गुन्हा कर ले (भाग-२)

“वॉस्को..वॉस्को..वॉस्को..वॉस्को..”“पणजीम..पणजीम..पणजीम..पणजीम..पणजीम..” बसचालक, खाजगी वाहतुकदार, टॅक्सीवाल्याच्या आवाजाने गोव्याचा स्टेशनपरीसर गजबजला होता. काळरात्र ओसरली होती आणि सुर्याची सोनेरी किरणे गोव्याच्या निळ्याश्यार चमकवुन टाकत होती. कालच्या रात्रीचे आमचे ते विद्रुप मुखवटे अंधारात विरुन गेले होते आणि आम्ही गोव्यात आलेल्या असंख्य पर्यटकांपैकीच एक होऊन गेलो होतो. दिन्याने यावेळेस एक बऱ्यापैकी हॉटेलपाशी गाडी थांबवली..“दिन्या.. अरे लय महाग वाटतेय हॉटेल.. परवडायचे नाय..” दिन्याला म्हणालो..दिन्या परत एकदा तस्साच भयानक हसला आणि त्याने जाकीटाच्या खिश्यातुन पैश्याची पुडकी काढुन माझ्यासमोर फेकली..“दिन्या.. इतके पैसे?? कुठुन आणले..” मी चाचरतच विचारले..“काल त्या म्हाताऱ्याला टपकवला ना.. त्याच्या खोलीत कॅश-पेटीची किल्ली होती.. म्हणलं इझी-कॅश… कश्याला सोडा..उचलली..” दिन्या बेफीकीरीने म्हणाला.. “शिवाय ते बघ वर ...Read More