प्रिती.. तुझी नी माझी

(60)
  • 40.9k
  • 32
  • 22.9k

निखिल सकाळी ६.३० ला ऑफिसपाशी पोहोचला. थोडीफार लोक आधीच येऊन थांबली होती. एक-एक करत सगळे येऊन निघायला ७.३० वाजले. इतके दिवस प्रचंड काम केल्यानंतर शेवटी तो दिवस येऊन ठेपला होता. आज ऑफिसची ट्रीप होती. एक आठवडा मस्त मौज करायची, कामाची कटकट नाही, तारखांचे गणीत नाही की मीटिंग्ज ची कंटाळवाणी बडबड नाही. आठवडाभर मस्त आराम आणि धिंगाणा. गप्पा, गाणी, ओरडा-आरडी यामध्ये अलिबाग कधी आले कळलेच नाही. अथांग पसरलेला समुद्र किनारा पाहून सगळ्यांचाच प्रवासाचा थोडाफार आलेला शीण निघून गेला. आणि राहण्यासाठी घेतलेले हॉलिडे-रिसॉर्ट पाहून तर त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. सगळेजण आनंदाने बेभान झाले होते.संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर दंगा-मस्ती, पाण्यात डुंबून सगळेजण

Full Novel

1

प्रिती.. तुझी नी माझी – भाग १

निखिल सकाळी ६.३० ला ऑफिसपाशी पोहोचला. थोडीफार लोक आधीच येऊन थांबली होती. एक-एक करत सगळे येऊन निघायला ७.३० वाजले. दिवस प्रचंड काम केल्यानंतर शेवटी तो दिवस येऊन ठेपला होता. आज ऑफिसची ट्रीप होती. एक आठवडा मस्त मौज करायची, कामाची कटकट नाही, तारखांचे गणीत नाही की मीटिंग्ज ची कंटाळवाणी बडबड नाही. आठवडाभर मस्त आराम आणि धिंगाणा. गप्पा, गाणी, ओरडा-आरडी यामध्ये अलिबाग कधी आले कळलेच नाही. अथांग पसरलेला समुद्र किनारा पाहून सगळ्यांचाच प्रवासाचा थोडाफार आलेला शीण निघून गेला. आणि राहण्यासाठी घेतलेले हॉलिडे-रिसॉर्ट पाहून तर त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. सगळेजण आनंदाने बेभान झाले होते.संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर दंगा-मस्ती, पाण्यात डुंबून सगळेजण ...Read More

2

प्रिती.. तुझी नी माझी– भाग २

निखिल रूम वर परतला तेव्हा फार खुशीत होता. त्याने आल्या आल्या आपल्या मित्रांना ओळखीबद्दल आणी झालेल्या सगळ्या गप्पा सांगितल्या. वगैरे उरकून निखिल आणि त्याची गॅग canteen मध्ये दाखल झाली. श्रेया आणि तिची मित्रमंडळी आधीच तिथे होती. आपल्या मित्रमंडळींसमोर आता आपण श्रेयाला ओळख देऊ वगैरे या विचारात निखीलने २-३दा श्रेयाच्या टेबलाकडे नजर टाकली पण तिचे लक्षच नव्हते. निखिल मात्र त्यामुळे फारच अस्वथ़ झाला. त्याची ही बैचैनी त्याच्या मित्रांच्या नजरेतून सुटली नव्हती. त्यांनी त्याची टर उडवायला सुरुवात केली. सगळेजण मुद्दामच श्रेयाला ऐकू जाईल अश्या आवाजात बोलू लागले. “अर्रे निखिल.. हाय..! कधी आलास.. मी पाहिलेच नाही.”, एक“काय निखिल Morning Walk ला एकटाच ...Read More

3

प्रिती.. तुझी नी माझी – भाग ३

हाय निखिल, कसा आहेस?? चिडलास ना माझ्यावर न सांगता गेले म्हणून? एकदा तरी भेटायला पाहीजे होते ना?? मलाही असेच होते. खूप वाटलं तुला भेटावे, तुझ्याशी बोलावे. पण मनाला खूप समजावले आणि न भेटताच गेले. खूप प्रेम करतोस का रे माझ्यावर?? हो ना?? असा दचकू नकोस. मी न कळण्याइतपत बुद्दू नाहीये? खूप इच्छा होती तुझ्या तोंडून ऐकायची. पण आयुष्याने इतक्या जखमा दिल्यात की आता प्रत्येक गोष्ट करताना हात मागे होतो. प्रेम, नाती या गोष्टींमधला खरं सांग तर माझा विश्वासच उडाला आहे. अर्थात एक नातं खोटं निघालं म्हणजे सगळीच नाती खोटी, फसवी असतील असं नक्कीच नाही. आठवतं निखिल आपली भेट कशी ...Read More

4

प्रिती.. तुझी नी माझी – भाग-४

खरेदी संपवुन निखील आणी अनु खाली पार्कीग मध्ये गाडीत सामान भरत होते, एवढ्यात, निखील ला कोणीतरी जोर-जोरात हाक मारतेय भास झाला. निखीलने मागे वळुन पाहिले तेंव्हा त्याच्या ऑफिस मधला मित्र- दिन्या – धावत येताना दिसला. “अरे काय झाले.. कशाला बोंबलतो आहेस एवढा.. आणी तु इथे काय करतो आहेस?”, दिन्या जवळ येताच निखील ने त्याला विचारले.“अरे माझे.. सोड.. “, दिन्याला पळाल्यामुळे प्रचंड धाप लागली होती, “श्रेया.. श्रेया..” कसा बसा धापा टाकत निखीलला म्हणाला.श्रेयाचे नाव ऐकताच निखीलने हातातल्या पिशव्या खाली टाकल्या आणी दिन्याच्या खांद्यांना धरुन त्याला गदा गदा हलवत विचारले.. “अरे काय श्रेया.. काय झाले.. तु मला निट सांगणार आहेस का?” ...Read More