“काय मग? कसं होतं पॅरिस?”, नुकतीच पॅरिसला काही दिवस सुट्टी एन्जॉय करुन परत आल्यावर अनेकांनी विचारलं पॅरिस कसं आहे? हे एका शब्दात सांगणं कठीण आहे, खरं तर पॅरिस कसं आहे हे शब्दात सांगणंच कठीण आहे. पॅरिस हा एक अनुभव आहे आणि तो अनुभवायला हवा. तरी पण माझ्या परीने प्रयत्न करून बघतो… आपण आपल्या आयुष्यात अचानक एक्झीट घेणारी अनेक लोकं बघतो. “अरे! काल परवा पर्यंत तर चांगला होता की..” असं म्हणून आपण हळहळतो आणि आपल्या कामाला लागतो. श्रीदेवीच्या अकाली मृत्यूने आपण सगळेच हळहळलो आणि आयुष्य किती क्षणभंगुर आहे ह्याची पुन्हा एकदा जाणीव झाली. त्यावेळी पैसा, प्रसिद्धी काही कामी येत नाही.

Full Novel

1

पॅरिस - १

“काय मग? कसं होतं पॅरिस?”, नुकतीच पॅरिसला काही दिवस सुट्टी एन्जॉय करुन परत आल्यावर अनेकांनी विचारलं पॅरिस कसं आहे? एका शब्दात सांगणं कठीण आहे, खरं तर पॅरिस कसं आहे हे शब्दात सांगणंच कठीण आहे. पॅरिस हा एक अनुभव आहे आणि तो अनुभवायला हवा. तरी पण माझ्या परीने प्रयत्न करून बघतो… आपण आपल्या आयुष्यात अचानक एक्झीट घेणारी अनेक लोकं बघतो. “अरे! काल परवा पर्यंत तर चांगला होता की..” असं म्हणून आपण हळहळतो आणि आपल्या कामाला लागतो. श्रीदेवीच्या अकाली मृत्यूने आपण सगळेच हळहळलो आणि आयुष्य किती क्षणभंगुर आहे ह्याची पुन्हा एकदा जाणीव झाली. त्यावेळी पैसा, प्रसिद्धी काही कामी येत नाही. ...Read More

2

पॅरिस – २

टिक-टॉक .. टिक-टॉक .. टिक-टॉक … घड्याळाचा काटा अती संथ गतीने पुढे सरकत होता. एअरपोर्ट वरच महागडं आणि बेचव घरुनच मस्त पुरी-भाजी करुन न्हेली होती. ती खाल्ली, थोडं झोपायचा हि प्रयत्न केला, पण त्या खुर्चीत असं अवघडून बसून कितीशी झोप लागणार.? उगाच इकडे तिकडे टाईमपास फोटोही काढून झाले. मला असं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं असं निरीक्षण करायला वगैरे नै आवडत. लोकांना भारी आवडतं ब्वा हे व्यक्तीनिरीक्षण. नेट वापरुन वापरुन फोनच्या बॅटरीने मान टाकली मग चार्जर घेऊन चार्जिंग पॉईंटपाशी जाऊन उभा राहीलो. तेथे जमलेल्या काही लोकांनी भारी शक्कल लढवली होती. स्मार्ट-फोन बरोबरच एक साधा कि-पॅड वाला फोन पण बरोबर ठेवला होता. ...Read More

3

पॅरिस – ३

०७ मे, २०१८ एअरपोर्ट वरचे फ्री-वायफाय पकडून सगळ्यांना व्यवस्थित पोचल्याचे कळवून टाकले. बाहेर कुठून पडायचे वगैरे बघत असतानाच शेजारी असलेल्या जाहिरातींच्या होर्डिंगकडे लक्ष गेले. बेल्जीयम च्या ब्रुज गावाची काही चित्र त्यावर झळकत होती. हो, तेच बेल्जीयमचे चॉकलेटसाठी प्रसिद्ध असलेले ब्रुज. छोटे छोटे रस्ते, टुमदार घर आणि दुकानं, भली मोठ्ठी चर्च, सर्वत्र गर्द झाडी आणि ह्या सगळ्यांमधून वाहणारा कॅनाल. त्या कॅनाल मध्ये पोहणारी बदकं, फुलांचे ताटवे.. “Wow.. is this for real?”,असंच काहीसं क्षणभर वाटुन गेलं. पटकन तिथलं ब्रोशर उचललं आणि बाहेर पडलो. काचेचं सरकतं दार उघडलं आणि गरम हवेचा एक झोत अंगावर आला. मी आणि बायकोने चमकून एकमेकांकडे बघितलं. बॅगेतले ...Read More

4

पॅरिस – ४

०८ मे, २०१८ सकाळी ५ वाजताच उठलो.. झोप पूर्ण झाली नव्हतीच, हवेत प्रचंड गारठा होता त्यामुळे परत पांघरुण ओढून मोह आवरत नव्हता. शेवटी २ मिनिटं, ५ मिनिटं करुन उठलो, पटापट आवरु म्हणूनही ६.१५ होऊन गेले होते. अजून मेट्रो पकडायची होती, तेथून पुढे काही अंतर चालून जाऊन मग ब्रुजला जाणाऱ्या बसचा थांबा होता. धावतच खाली उतरलो, काही अंतर पुढे गेलो आणि लक्षात आले, अरे आपण दुसऱ्या देशात चाललोय, दुसऱ्या गावाला नाही. व्हिसा, पासपोर्ट काहीच बरोबर घेतले नव्हते. परत माघारी येऊन पासपोर्ट्स घेतले आणि अक्षरशः धावतच स्टेशन गाठले. अर्थात त्यामुळे डोळ्यावर असलेली झोप उडून गेली. दोनच मिनिटांत मेट्रो आली. मेट्रोचे अंतरंग ...Read More

5

पॅरिस – ५

बेल्जीयम वरून पॅरिसला परत येताना, सकाळपेक्षा हायवे-वर वाहतूक अंमळ जास्त होती, पण अर्थातच कुठेही घाईगडबड नाहीच. ओव्हरटेकिंग नाही की नाही. शेजारी पसरलेल्या विस्तीर्ण शेतांमध्ये सधन शेतकरी आपली अवजड वाहन चालवत शेतातली कामं करत होती. सूर्याची तिरपी, कोमल किरणं मस्त गोल्डन लाईट पसरवत होती. बसमध्ये खायला परवानगी नव्हती, पण ऐकू तर आपण भारतीय कुठले. एकेठिकाणी थांबलेल्या मॉल वर काही वेगळ्याच चवीचे चिप्स आणि कुकीज घारेदी केल्या होत्या त्या खुणावत होत्या. आजूबाजूची जनता घोर झोपेत मग्न होती. मग हळूच पिशवीत हात घालून एक एक गोष्टी काढून, आवाज न होऊ देता चर्वण चालू केले. पॅरिसमध्ये शिरुन अर्धा-पाऊण तास होऊन गेला ...Read More

6

पॅरिस - ६

०९ मे, २०१८ पॅरिसला आल्यावर सायकलिंग करायचेच हे आमच्या ‘टु-डु’ लिस्ट मध्ये होते. ‘बाईक अबाऊट टूर्स’ नावाच्या एका संस्थेशी इथे येण्याआधीच बोलून ठेवले होते. ही लोक १५-२० लोकांचे छोटे ग्रुप्स बनवतात, त्यांना सायकली पुरवतात आणि पॅरिसचा काही भाग फिरवतात. साधारण ४-५ तासांची हि टूर असते. एक तर आम्ही सगळे सायकल-वेडे, इकडे पुण्यात खूप सायकलिंग करतो. पॅरिसला तर सायकलिंग मोठ्या प्रमाणात होते, त्यासाठी ट्रॅक्स पण आहेत बरेच, विचार होता सायकलवर फिरायला तर मजा येईलच, शिवाय बऱ्याच गोष्टी शोधाशोध न करता बघताही येतील. स्वातीताईला बुधवारी युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चरर्स असतात त्यामुळे त्या दिवशी ती आमच्याबरोबर नसणार होती. सायकलिंग आणि फिरणे दोन्ही गोष्टी होऊन ...Read More

7

पॅरिस - ७

घरी पोहोचलो आणि जरा वेळ विश्रांती घेऊन लगेचच आवरायला घेतलं. आजची संध्याकाळ स्पेशल होती. आम्ही आधीच प्लॅनिंग करून ठेवले मुलं त्यांच्या मावशीबरोबर कुठल्यातरी मस्त हॉटेल मध्ये जेवायला जाणार होतो आणि मी आणि बायको पॅरिसमधला प्रसिद्ध ‘लिडो’ शो बघायला जाणार होतो. ‘लिडो’ हा कॅब्रे शो आहे पण ह्यामध्ये नृत्य करणाऱ्या मुली सेमी-न्यूड असतात. पूर्णपणे टॉपलेस. सोबत जेवण आणि शॅम्पेन. ह्यावेळची मेट्रो जरा किचकट होती. पहिल्या मेट्रो नंतरची दुसरी मेट्रो जी पकडायची होती त्याचा प्लॅटफॉर्म पहिल्या प्लॅटफॉर्मपासून काहीसा दूर होता. बरीच डावी-उजवी वळणं घेतल्यावर आणि काही जिने चढ उत्तर केल्यावर शेवटी सापडले आणि वेळेत आम्ही लिडोला पोहोचलो. टेबल अगदी स्टेजच्या जवळ ...Read More

8

पॅरिस - ८

१० मे, २०१८ कालचा एकूण गोंधळ निस्तरून झोपेस्तोवर दीड वाजून गेला होता. त्यामुळे अर्थातच सकाळी उठायला जाम जिवावर आले वातावरण आज चांगलेच गार होते, साधारण ४ डिग्री तरी असावे आणि त्यात इथे वाहणारे गार वारे अजूनच झोंबत होते. वाटत होतं, सगळे प्लॅन्स रद्द करुन परत झोपून जावं. स्वातीताईंच्या प्लॅन नुसार आजची सकाळ आम्ही पॅरिसमधल्या कॅनल्स वरील एका क्रूज राईडला जाणार होतो, अर्थात हि राईड नेहमीसारखी नसून वेगळीच आहे, काय ते तेथे गेल्यावरच तुम्हाला कळेल असं सांगून तिने आमची आमचा उत्सुकता आधीच वाढवलेली होती, शिवाय तिकिटं हि काढलेली असल्याने उठून पटापट आवरले, ब्रेकफास्ट उरकला आणि बाहेर पडलो. सेंट मार्टिन ...Read More

9

पॅरिस - ९

बीच-बेबी-बीच- एट्रीटात- ११ मे, २०१८ पॅरिसला निसर्गाची, सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण आहे, .. पण समुद्र नाही. फ्रेंच रिव्हिएरा .. जेथे जगप्रसिद्ध फॉर्मूला-वन कार रेसेसचा मोनॅको ट्रॅक आहे तेथील बीचेस खूपच प्रसिद्ध आहेत पण एक तर तिथे जाणे आणि रहाणे अती महागडे आहे आणि तेव्हढा वेळही हातात नव्हता. पण दुसरा पर्याय होता तो म्हणजे एट्रीटातचा. परिसपासून साधारणपणे २५० कि.मी. वर वसलेले हे छोटेसे पण सुंदर हार्बर. मायाजालावर फोटोबघून इथे जायचेच हे आधीच ठरवले होते. पॅरिसवरुन इकडे जायला ट्रॅव्हल बसेस आहेत. ४-५ तासाचा प्रवास होता. बसचे बुकिंगही आधीच करून टाकले होते. फॉरेनचे बीचेस आणि ते पण उन्हाळ्यात म्हणल्यावर ...Read More

10

पॅरिस - १०

शेवटचा दिवस ... अलविदा पॅरिस .. अचानक पॅरिसचा प्लॅन ठरतो काय, दोन महिन्यात आम्ही इथे धडकतो काय, आणि आता जायची वेळही येती काय. सगळंच विलक्षण होते. इथले १० दिवस अक्षरशः वाऱ्याच्या वेगाने भुर्र्कन उडून गेले होते. दिवसाचे १६-१८ तासही कमी पडावेत इतके फिरलो, तरीही वाटतंय खुप काही बघायचं राहून गेलंय. इथे येण्यापूर्वी जी जी लोकं मला म्हणाली होती, अरे १० दिवस काय करणार पॅरिसला, पॅरिसला ३ दिवसही खूप आहेत की .. अश्या लोकांचं मला खरंच आता हसू आलं, आणि वाईटही वाटलं. पॅरिसला इतकं काही आहे बघायला, अनुभवायला, पण आजही अनेक लोकांच्या लेखी पॅरिस म्हणजे केवळ आयफेल टॉवर, ...Read More