बहिर्जी नाईक आणि आग्र्याहून सुटका

(180)
  • 222.8k
  • 97
  • 139.3k

सह्याद्रीतल्या पावसाने बेफाम जोर धरला होता ..विजांसकट तो झिम्मा फुगडी खेळत होता..त्यात अमावस्येची काळोखि रात्र किर्रर्र अंधार ...सयाजी गुडघ्या एवढ्या चिखलतना वाट काढत होता...धावतच होता... मोगली छावणी पासून जेवढ्या लवकर दूर पळता येईल तेवढे पळायचे होते..स्वराज्यावर अस्मानी संकट धावून येत होते..कोणाही मोगली सैनिकाच्या हाती लागू नये याची काळजी सयाजी घेत होता..धावता धावता पडत होता कि पडता पडता धावत होता...हात पायाला खरचटले होता...अंगावरचे कपडे पण ठीक ठिकाणी फाटले होते...अगदी कशाचेही त्याला भान नव्हते...काही करून लवकरात लवकर बहिर्जीना गाठायचे होते. सयाजी...खबरचं अशी घेऊन आलं होता...ते ऐकून बहिर्जी चिंतेत पडले होते पण विचलित झाले नव्हते कारण त्यांना

Full Novel

1

बहिर्जी नाईक आणि आग्र्याहून सुटका - १

सह्याद्रीतल्या पावसाने बेफाम जोर धरला होता ..विजांसकट तो झिम्मा फुगडी खेळत होता..त्यात अमावस्येची काळोखि रात्र किर्रर्र अंधार ...सयाजी गुडघ्या चिखलतना वाट काढत होता...धावतच होता... मोगली छावणी पासून जेवढ्या लवकर दूर पळता येईल तेवढे पळायचे होते..स्वराज्यावर अस्मानी संकट धावून येत होते..कोणाही मोगली सैनिकाच्या हाती लागू नये याची काळजी सयाजी घेत होता..धावता धावता पडत होता कि पडता पडता धावत होता...हात पायाला खरचटले होता...अंगावरचे कपडे पण ठीक ठिकाणी फाटले होते...अगदी कशाचेही त्याला भान नव्हते...काही करून लवकरात लवकर बहिर्जीना गाठायचे होते. सयाजी...खबरचं अशी घेऊन आलं होता...ते ऐकून बहिर्जी चिंतेत पडले होते पण विचलित झाले नव्हते कारण त्यांना ...Read More

2

बहिर्जी नाईक आणि आग्र्याहून सुटका - २

"मिर्झा" म्हणजे राजपुत्र अकबर बादशहाने त्याचा सेनापती मानसिंग याला तो मान दिला होता...त्यांची कामगिरी तशीच होती...अशा शूर राजपूत कछवाह जन्माला आलेले मिर्झाराजे जयसिंग आपल्या वयाच्या आठव्या वर्षी जहागीरच्या सेवेत रुजू झाले. औरंगजेबाला गादीवर बसवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. शहाजहानच्या काळात शहजादा शहाशुजाबरोबर ते अफगाणिस्तानच्या मोहिमेवर सहभागी झाले होते...त्यांच्या उर्मट तलवारीने खूप मोठा पराक्रम गाजवला होता..काबुल, कंदाहारचा परिसर जिंकून मोगलाईला जोडण्यात त्यांचा मोठा वाटा होता.. मिर्झाराजे जयसिंग उर्दु, तुर्की आणि फारसी भाषांचे उत्तम जाणकार होते...मोगली शिष्टाचार,दरबारी रीतिरिवाज यात ते पारंगत होते...औरंगजेबाने त्या काळी फक्त मोगली राजपुत्रांना देण्यात येणार मन त्यांना दिला होता...त्यात उच्च प्रतीचा घोड़ा, हत्ती, मोत्यांची माळ असे ...Read More

3

बहिर्जी नाईक आणि आग्र्याहून सुटका - ३

तिथे खलिता पोचता झाला...आणि तिथे दिलेरखान आणि मिर्झाराजे यांनी पुरंदरच्या पायथ्याशी तळ टाकला ...जिथे बघावे तिथे अफाट सैन्यसागर... प्रथम हल्ला सुरु झाला.. मिर्झाराजे जय‌सिंगाने शिवाजी महाराजांविरोधात कुशल रणनीती अवलंबली होती...आधी किल्ल्याचा आसपासचा सपाटीचा प्रदेश जिकून...किल्ल्यावर होणारी रसद तोडायची आणि आसपासच्या परिसरात जाळपोळ, लुटालूट आणि किल्ल्याकडे येणारे जाणारे सर्व मार्ग रोखून धरायचे... राजांना वाटले त्यापेक्षा मिर्झाराजांशी कडवी झुंज होत होती...दोघेही कसलेले सेनानी होते...पण मोगलांच्या तुलनेत स्वराज्याचा खजिना आणि मनुष्यबळ कमी पडलं होते..राजे आपल्या वकिलांमार्फत वाटाघाटी करायला ऊत्सुक होते पण मिर्झाराजांनी स्पष्ट शब्दात आदेश दिला होता...जो काही तह होईल तो त्यांच्या अटींवर होईल.. आणि ...Read More

4

बहिर्जी नाईक आणि आग्र्याहून सुटका - ४

पुरंदर पडला ...अगदी नेटाने झुंजला...मुरारबाजी फक्त सातशे मावळ्यांनिशी आणि दिलेरखानाच्या ५००० मोघलांना भारी पडला..पुरंदर शेवटच्या घटका मोजत होता...आणि आता तर मारूनच मरायचे...काही कळण्याचा आत गडाचा दरवाजा उघडला गेला कोणी कल्पनाच केली नव्हती तिथे राजे मिर्झाराजे जयसिंग बरोबर वाटाघाटी करत होते इतके दिवस झुंजणारा गड असा पडला...दिलेरखानाला वाटले गड आला ताब्यात..लढाई काही काळ थांबली...मोघली फोज...नाचायला लागली...आनंद झाला सर्वाना...किल्लेदार मुरारबाजी आणि मावळे खाली धावत येताना दिसले.. येवढी कसली घाई होती त्यांना?? हत्यार टाकायची?? शत्रुसमोर मान झुकवायची??...मोघली वेढा क्षणाक्षणाला जवळ येत होता....पण हे काय दौड कमी करायची सोडून...अजून जोमाने दौडत होते..मोघली सैन्य आता काही हांतांवर होते..आणि अचानक मुरारबाजी ...Read More

5

बहिर्जी नाईक आणि आग्र्याहून सुटका - ५  

मजल दरमजल करीत राजे आणि सारा लवाजमा आग्रा शहराजवळ पोहचला...तारीख होती ११ मे १६६६..मिर्झाराजे जयसिंग यांचा मुलगा रामसिह यांच्याकडे सर्व जबाबदारी सोपवण्यात आली होती..१२ मे १६६६. औरंगजेबाचा वाढदिवस होता..आधी ठरविल्याप्रमाणे रामसिह राजांना येऊन भेटणार होता..पण रामसिहाकडे ऐनवेळेला औरंगजेबाने दुसरे काम सोपवले आणि रामसिहाने आपला मुन्शी गिरधारलाल याला राजांचे स्वागत करण्यासाठी पाठवले..आपल्या स्वागतासाठी एक साधा कारकून यावा हे महाराजांना खटकलं..आणि पुढे त्यांची आणि रामसिह यांची चुकामुक झाली..झाली का करवली गेली ??? औरंगजेबच तो...राजांचा बसता उठता त्याला अपमान करायचा होता..पण राजे सुद्धा आपल्या स्वराज्यासाठी सर्व सहन करत होते...आणि त्याची अशी इच्छा असावी..राजे आणि शंभु राजे ...Read More

6

बहिर्जी नाईक आणि आग्र्याहून सुटका - ६

बहिर्जी नाईक आणि आग्र्याहून सुटका ६ आपल्या वाढदिवशी अनेक देशी परदेशी पाहुणे,वकील,सरदार...आणि त्यातल्या त्यात महत्वाचे म्हणजे.. पर्शीयन अर्थात इराणचा शहा अब्बास दुसरा यानेही औरंगजेबाचे अभिनंदन करण्यासाठी आपल्या दरबारातील कवी,सरदार,वकील यांना पाठविले होते.. आणि त्यांच्यासमोरच इतर लोक माना झुकवून उभे असताना...हा असा मस्तवालपणा कोण दाखवणार ?? इराणचे भल्या मोठ्या साम्राज्याच्या सर्व मुसलमान जगतात या आधी वरचष्मा होता...औरंगजेबासारखे अनेक राजे त्यांच्या दरबारात माना झुकवून उभे असत .. इराणचा बादशहा शहा अब्बास दुसरा याने आधी एक खरमरीत पत्र लिहून औरंगजेबाला खडे बोल सुनावले होते..निम्मित होते औरंगजेब जेव्हा आपल्या वडिलांना आणि सख्या बंधूंना आणि पुतण्याना मारून " मयूर-सिहांसन" वर बसला.. इराणचा बादशहा शहा ...Read More