अव्यक्त

(20)
  • 54.9k
  • 11
  • 28.8k

वेदनेतून सुटका‘व्हिटॅमिन बी वन’च्या माझ्यावरच्याच उपाचारामुळे त्याचं महत्त्व मला माहीत होतंच, या व्हिटॅमिनचा उपचार मी मासिक पाळीच्या दुखण्यावर करायला सुरुवात केली आणि मुलींचं दुखणं एकदम कमी झालं. त्यासाठी केलेल्या संशोधनाविषयी..मा सिक पाळीतील वेदना, या अतिशय त्रासदायक दुखण्यावर एक अचूक आणि सोपा उपाय कसा शोधून काढला त्याची ही गोष्ट. मला वाटतं उन्हाळ्याचे दिवस होते. १९५६ चा मे किंवा जून महिना असावा. मी पुण्याला प्रॅक्टिस सुरू करून तीन वष्रे झाली होती. खरं म्हणजे अशा तऱ्हेच्या केसेस मी आधीसुद्धा तपासलेल्या होत्या. पण या वेळेला कसे कोण जाणे काहीतरी वेगळे झाले हे मात्र खरे. माझ्या मोठय़ा बहिणीची, मालूताईची मत्रीण तिच्या १८ वर्षांच्या मुलीसह माझ्याकडे

Full Novel

1

अव्यक्त ( भाग - 1)

वेदनेतून सुटका‘व्हिटॅमिन बी वन’च्या माझ्यावरच्याच उपाचारामुळे त्याचं महत्त्व मला माहीत होतंच, या व्हिटॅमिनचा उपचार मी मासिक पाळीच्या दुखण्यावर करायला केली आणि मुलींचं दुखणं एकदम कमी झालं. त्यासाठी केलेल्या संशोधनाविषयी..मा सिक पाळीतील वेदना, या अतिशय त्रासदायक दुखण्यावर एक अचूक आणि सोपा उपाय कसा शोधून काढला त्याची ही गोष्ट. मला वाटतं उन्हाळ्याचे दिवस होते. १९५६ चा मे किंवा जून महिना असावा. मी पुण्याला प्रॅक्टिस सुरू करून तीन वष्रे झाली होती. खरं म्हणजे अशा तऱ्हेच्या केसेस मी आधीसुद्धा तपासलेल्या होत्या. पण या वेळेला कसे कोण जाणे काहीतरी वेगळे झाले हे मात्र खरे. माझ्या मोठय़ा बहिणीची, मालूताईची मत्रीण तिच्या १८ वर्षांच्या मुलीसह माझ्याकडे ...Read More

2

अव्यक्त ( भाग - 2)

गाभारामाणूस जन्माला आल्यावर त्याला नाव मिळते आधार म्हणून कुटुंब मिळते आणि जगण्याचे साधन म्हणून जात मिळते ...त्याला कुटंबात वावरतांना धर्म परंपरेचे धडे मिळते मग तो माणुसकी विसरून जातीयतेच्या गटारगंगेतभर धारेने वहात सुटतो ...ऑफिस मध्ये एकदा मी आपलंच काहीतरी कंम्प्युटरवर काम करत बसली एक छोटा पहिल्या वर्गात शिकणारा बाजूच्या ग्लॉसरी शॉप मधला मुलगा माझ्या जवळ आलाआणि चेअर वर येऊन बसला आपला .... त्याची प्रश्नावली थोड्यावेळातच सुरु झाली त्याचा पहिला प्रश्न कंम्प्युटरला बघूनच होता ," कंम्प्युटरचा शोध कोणी लावला ?? "----मी त्याला म्हणाली , " चार्ल्स बेबेज .. "मग तो म्हणाला , " ताई आपल्याला त्याला ह्या pc वर बघता येईल ...Read More

3

अव्यक्त ( भाग - 3)

मेंदू लुळा पडावा असचं झालं .... काल रात्रभर झोपेतही विचाराची कालवकालव सुरूचहोती .. मी तर झोपलेली होती पण झोपतही मेंदूत विचाराचं गतीशील चक्रव्यूह भरवेगानेफिरतच होतं आणि त्यात मी पिसल्या जाते भरडल्या जाते आहे हे प्रत्यक्षाने मात्र दुसर्या दिवशी उठूनतोंडावर थंड्या पाण्याचे शिंतोडे मारल्यावर कळलं ...कसं बस्स त्या प्रश्नाच्या गर्दीतून स्वतः ला दुर सारतं उत्तम कांबळे ह्याचं पुस्तक " आई समजून घेतांना " वाचलं ....गॉर्कीची आई कादंबरी साने गुरूजीचे श्यामची आई आणि उत्तम कांबळे लिखित आई समजूनघेतांना ह्या लेखकांनी नवा इतिहास रचून ठेवलाय बालमनावर तरूणमनावर संस्कार घडवण्यासाठीपण तो जोपासला कोणी ? कोणीच नाही का ?प्रश्नाच वलय तयार होतं आणि उत्तर ...Read More

4

अव्यक्त (भाग - 4)

" ओहहहहहहह ओओ बाई जरा होता का बाजूला .... रस्ता धरूनच बोलायला जागा सापडते ह्यांना जाणारे जावो ह्यांच्या उरावर देऊन ..."शांतीने तोंडातला पदराचा गोळा काढत रेवतीला रस्त्याच्या कडेला नेले .दोघीही आज त्या सबजीमंडी मध्ये कितीतरी वर्षांनी भेटल्या . शांती आणि रेवती दोनसख्या बहिणी बाप मेल्यावर पोटच्या लेकरांना पोसायचं कसं म्हणून तिच्या मायनंपहिल्याचा ह्या धंद्यात पाऊल ठेवलं . शांती आणि रेवती उपवर झाल्यावरत्यांना आपल्या पासून दुर सारत हा धंदा करणार्या मालकांला तिच्या आईने विकली .आणि त्या पैशाने कुटखाना उभारून नव्या कोर्या पोरीचा सौदा कराचा बेत ह्या मालतीबाईने आखला . शांती आणि रेवती ...Read More

5

अव्यक्त (भाग - 5)

आताच तुझं पत्र आलं बघ . तसा उत्साह संचारून आला . खरचं येशील पॅरिसला जून महिन्यात ? जमेल ना यायला . तुझं नेहमीचं . विकेंड मध्ये भेटू ... प्रत्येक वेळेला प्लॅन फसतोच ह्या ना त्या महत्वाच्या कामात . की खुद्द तुला वाटतं मला न भेटावं ? असो , तुझं तुला ठावं .इथे आल्यापासून वाटतं आपली माणसं आपला देश आपल्या मातीशी असलेली नाळ ब्रिटिश म्युझियमच्या एखाद्या प्रचंड भल्या मोठ्या वास्तू समोर थिटी पडेल . मी तिथे असतांना आपण नेहमीच एकमेकांना एखाद्या अपराधीन नजरेने बघत असू . तुला आठवतं . शेफालीचा जन्म झाला तेव्हा तू नव्हतास जवळ . ...Read More

6

अव्यक्त (भाग - 6)

कनिका दिसायला सावळी पण तेज बाण्याची . स्वभावाने तेवढीच नम्र . मनात मालती बद्दल तिच्याही आदर होताच . ऐवढचं तिच्या वागण्यातून मालतीला झळकत नव्हता . आपल्या संसाराला आधीपासूनच ह्या कनिकामुळे ग्रहन लागलं असा खोटा गैरसमज मालतीने करून घेतला .कनिकात असं काय आहे जे आपल्यात नाही ? माझ्यासारखी बायकोही निरजला शोधून कुठे सापडणार नाही . म्हणातात ना प्रेम हे आंधळं असतं त्याचाच प्रत्यय तिला यायला लागला . दोन प्रतिस्पर्धी मध्ये श्रेष्ठ कोण ह्याचा जसा हेवा होतो तसचं काहीस मालतीला वाटतं होतं .तिकडे निरज मालतीला घरी ड्रॉप न करून देता कनिकाला घेऊन तिच्या रूमवर निघून गेला .मालती प्रेग्नेंट आहे हे ऐकून ...Read More

7

अव्यक्त (भाग - 7)

जगातल्या सर्व शक्तीच्या तुलनेत मानवी मेंदू हा अधिक शक्तीशाली आहे . एखाद्या दैवी शिकतीपेक्षा ही मानवाच्या मेंदू मध्ये सर्वाधिक शक्ती असते . पण ती त्याने कधी जाणून घेतलीच नाही . मानवी माईंड हे दोन भागात विभागले गेले आहे . conscious maind & sub - conscious maind म्हणजेच चेतन आणि अचेतन मन . तुमचे विचार , राहणे , मनन चिंतन , निश्चय करणे हे तुमच्या चेतन मनात येतं ह्या उलट तुमच्या सवयी , विश्वास , भावना ह्याला कुठे तरी थांबा मिळतो एखादी गोष्ट करण्यापासून मागे ओढल्या जाते .तुम्ही उठता बसता खाता पिता तेव्हा काही ना काही तुमच्या मनात विचार रेंगाळत ...Read More

8

अव्यक्त (भाग - 8)

कुसुमाग्रजांनी ज्या काळात लिहायला सुरुवात केली तो काळ पारतंत्र्याचा काळ होता. त्या काळात लिहिली जाणारी कविता ही देशप्रेमानं प्रेरित होतीच पण त्याचबरोबर निसर्ग, प्रेम तसेच जीवनविषयक भाष्य अशा विषयांवर केंद्रित झालेली होती. कुसुमाग्रजांच्या बहुतेक कविता या अशा आशयाभोवती फिरताना दिसतात. कुसुमाग्रजांचा लेखनकाळ हा जवळजवळ साठ-सत्तर वर्षांचा. ‘जीवनलहरी’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह १९३३ मध्ये प्रसिद्ध झाला. तेव्हापासून जवळजवळ त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९९९ पर्यंत ते लिहीत होते. इतक्या प्रदीर्घ काळात सातत्यानं कसदार लेखन करणं ही साधी गोष्ट नाही. पण कुसुमाग्रजांना ती जमली.कुसुमाग्रजांनी कवितेबरोबरच नाटक, रूपककथा, लघुनिबंधही लिहिले. त्यांची कविता असो की नाटक त्यांच्या लेखनात मानवतावादाचं दर्शन आपल्याला सतत घडत असतं. त्यांची ...Read More

9

अव्यक्त (भाग - 9)

सत्तर-ऐंशीच्या दशकातील मध्यमवर्गीय जाणिवांच्या जगात स्वत:ला कोंडून घेतलेल्या स्त्री-पुरुष दोघांनाही आकर्षित करणारं असं बाह्य़ तसंच आंतरिक जग गौरी तिच्या उभी करत होती. मनात इच्छा असूनही जे बंड त्या काळातील स्त्रिया करू धजत नव्हत्या ते बंड गौरीच्या जवळजवळ सर्वच नायिका करत होत्या.ज्या वयात प्रश्न पडायला लागतात आणि आपण आपल्या स्वतंत्र अस्तित्वाविषयी विचार करायला लागतो त्या वयात गौरी देशपांडेच्या नायिकांशी आपली भेट झाली तर दिलासा मिळतोच, पण आपण योग्य मार्गावरून निघालो आहोत याविषयी खात्री वाटायला लागते. मला गौरी नेमकी अशाच एका वळणावर भेटली, जेव्हा माझ्या आत लपलेली व्यक्ती आजूबाजूच्या जगाकडे कुतूहलाने पाहू लागली होती. लिंगभावाचं राजकारण कळायला सुरुवात होण्याचा तो काळ ...Read More

10

अव्यक्त (भाग - 10)

धुक्याची रात्र....थंडीचा गारवा वाढतच चालला नुकत्याच शरद ऋतुचे आगमन झाले .क्षितिजाच्या पल्याड सुर्य जाऊन मावळतो तसा काहीसा न संपणारा मिटणारा हा जीवनप्रवास अधोरेखित होतो रोज उजाडतो सुर्य पहाटेच्या किरणांसोबत दिवस ढळत जातो रात्र अधुक आपल्याच धुंदीत काळोख पसरवत पाऊलखुणाने विळखा घालते . त्या रात्रीची मी दिवानी ,मंदमंद वाहणारा तो वारा अंगाला स्पर्श करून जातो मोहात त्या रात्रीच्या मोहून घ्यावे स्वत:ला निसर्गांच्या सान्निध्यात बंद्धिस्त करावे ह्या मनाला किती अल्हादायक ही संजीवसृष्टी म्हणत मी एका भलत्याच शोधार्थात पडले .कुणा जीवाच्या नाही एका वेड्याच आणि खुळ्याच प्रश्नाच्या ..पुर्ण चंद्र झालेली रात्र असते ती पौर्णिमेची .मोकळे आकाश ते न वास्तव्यास त्यांच्या चांदण्याचा सडा ...Read More