ना कळले कधी - Season 1

(733)
  • 580.8k
  • 348
  • 437k

आर्या अग उठ लवकर, आज ऑफिस चा पहिला दिवस ना तुझा किमान पहिल्या दिवशी तरी उशीर नको उठ बघु आईच्या सकाळच्या ह्या आवाजनेच आर्या ला जाग आली खरी पण तिची काही मनातून उठण्याची ईच्छा नव्हती पण आता आईशी वाद घालून काही उपयोग नव्हता तशी आर्या थोडं नाईलाजनेच उठली आणि आपलं आवरायला सुरवात केली. खर तर तिला पण उशीर करायचा नव्हता. आर्या म्हणजे एक हुशार बुद्धीमान मुलगी नुकतच MBA complete केलं आणि लगेचच एक MNC मध्ये जॉबही लागला. पण तिला मात्र ह्या कशाचीच आवड नव्हती ती एक निसर्गप्रेमी एक स्वच्छदी जगणारी मुलगी .निसर्गाच्या सानिध्यात रहायचे त्याच्यावर कविता करायच्या आणि ह्या निसर्गाचे

Full Novel

1

ना कळले कधी - Season 1 - Part - 1

आर्या अग उठ लवकर, आज ऑफिस चा पहिला दिवस ना तुझा किमान पहिल्या दिवशी तरी उशीर नको उठ बघु सकाळच्या ह्या आवाजनेच आर्या ला जाग आली खरी पण तिची काही मनातून उठण्याची ईच्छा नव्हती पण आता आईशी वाद घालून काही उपयोग नव्हता तशी आर्या थोडं नाईलाजनेच उठली आणि आपलं आवरायला सुरवात केली. खर तर तिला पण उशीर करायचा नव्हता. आर्या म्हणजे एक हुशार बुद्धीमान मुलगी नुकतच MBA complete केलं आणि लगेचच एक MNC मध्ये जॉबही लागला. पण तिला मात्र ह्या कशाचीच आवड नव्हती ती एक निसर्गप्रेमी एक स्वच्छदी जगणारी मुलगी .निसर्गाच्या सानिध्यात रहायचे त्याच्यावर कविता करायच्या आणि ह्या निसर्गाचे ...Read More

2

ना कळले कधी - Season 1 - Part - 2

तो आला आणि आर्यांच्या बाजूला बसला. hii everyone सॉरी डिस्टर्ब तर नाही केलं ना तुम्हाला, मी बसलो तर चालेल तुम्हाला. अस त्याने म्हंटल आत मात्र सगळ्यांचा थोडा मूड खराबच झाला पण सगळे अगदी आनंदी असल्याचं भासवत होते. आर्या मात्र थोडी गंमतच वाटली काय घाबरतात यार ह्याला हा तर cool दिसतो. आणि सगळे शांत बघून सिद्धांतच बोलला अरे के मग कसा चालू आहे काम??? त्याने एकेकाला विचारलं आणि मग आर्या ला म्हणाला न्यू जॉईनी?? आणि लगेचच रेवा कडे वळून तिला प्रोजेक्ट बद्दल बोलायलया लागला. आर्या मात्र हो म्हणायचा पण chance नाही दिला.तिला फारच राग आला. तो जेवण आटपून लगेच निघाला ...Read More

3

ना कळले कधी - Season 1 - Part - 3

आर्या केबिन च्या बाहेर आली आणि आशिष व रेवा लगेच तिच्या जवळ आले. सिद्धान्त चा वाढलेला आवाज ऐकून त्यांना काय झालं ह्याची कल्पना होतीच. 'अरे पण आज तिचा पहिलाच दिवस आहे ना कमीत कमी आज तरी तिला बोलायचं नाही', रेवा म्हणाली. 'अरे रेवा, तो तसाच आहे. आपल्याला काही नवीन नाही हे', आशिष म्हणाला. 'हे बघ आर्या तो तसाच आहे तू त्यांच्याकडे अजिबात लक्ष नको देऊ,आम्ही कसं ignore करतो same तू पण तेच कर, कारण हा माणुस नाही सुधारु शकत. so just ignore him..' रेवा आर्या ला समजावून सांगत होती. अग रेवा पण माझी खरंच चुक नव्हती ग माझी गाडी ...Read More

4

ना कळले कधी - Season 1 - Part - 4

'इथून लोकल ट्रान्सपोर्ट मिळुन जाईल'आर्या म्हणाली. 'आर्या for your kind information ह्या वेळेला इथून काहीही मिळणार नाही.आणि जरी काही ना तर ते safe नाही'. खर तर आर्याला पण माहिती होत की ह्यावेळेला इथून काहीही मिळणार नाही पण तिला सिद्धान्त चा इतका राग आलेला होता की तिने ठरावलंच होत की काहीही झालं तरी मी ह्याची मदत घेणार नाही.आणि खर तिला कळत नव्हतं की हा इतका का चांगला वागतोय म्हणजे हा सकाळचा खरा की आताचा तिला काहीही कळत नव्हते. पण तिने ठरवलं होतं काहीही होऊ दे पण मी ह्याच्या सोबत जाणार नाही. 'आर्या should we',....??? sir ,खरच तुम्ही जा मी कॅब ...Read More

5

ना कळले कधी - Season 1 - Part 5

आर्याला ला कळलेच नाही काय झालं तिला वाटलं हा देतो आता आपल्याला उतरवून तिने आजूबाजूला पाहिले रस्ता तसा सामसूम होता तिला थोडी भीतीच वाटली. काय झालं सर is everyting ok??? घाबरू नको आर्या तू विचार करतेस तस काहीही नाही आहे . मी तुला इथे काही उतरून वगरे देणार नाही just relax. ह्याला कस कळलं मी काय विचार करतीये.???बापरे, 'नाही सर मला मी घाबरत नाही आहे'. आर्या एकदा चेहरा बघ स्वतःचा किती घाबरलीये. पण मी पुढे जाऊ शकणार नाही कारण मला कुठे जायचे हेच माहिती नाही. तुझा address सांगतेस का??? ohhh extremely sorry sir आणि तिने पुढे address सांगितला. अरे ...Read More

6

ना कळले कधी - Season 1 - Part - 6

आज आर्या थोडं लवकरच निघाली कारण तिच्या कडे गाडी नव्हती आणि आज तिला अजिबात उशीर करायचा नव्हता. ती वेळेतच ला पोहचली. पण सिद्धांत तिच्याही आधीच ऑफिस मध्ये हजर होता. पण त्याच्या केबिन मध्ये अजून कोणी तरी बसलेलं होत ज्या व्यक्तीला आर्या आज प्रथमच ऑफिस मध्ये पाहत होती . तिला थोड्या वेळाने कळले की हा विक्रांत आशिष, पूर्वा त्यांचा टीम लीडर जो सुट्टीवर होता आणि आज जॉईन झाला.आणि ऑफिस मधला सिद्धांताचा खास मित्र. आर्या तिचे तिचे काम करत होती .इतक्यात तिच्या एक्स्टेंशन आतून सिद्धांत ने कॉल केला व एक 5 मिनिटांमध्ये कॉन्फरन्स मध्ये सगळ्या टीम ला जमायला सांगितलं. त्याला मीटिंग ...Read More

7

ना कळले कधी - Season 1 - Part - 7

आर्या ला खुप भूक लागली होती तिने पटकन खाऊन घेतले, आणि तिने सिद्धांत कडे पाहिले तो तिच्या कडेच पाहत सर झालंय आता मी जाऊ का माझं काम थोडसच काम पेंडिंग आहे मी लगेचच पूर्ण करून देते. अग पण माझं बोलणं झालं नाही, तुला काय वाटलं मी तुला फक्त खाण्यासाठीच बोलावलं.??? नाही सर अजिबात नाही .मग?? आता आर्या निरूत्तर झाली. आर्या आजच काम पुरे झालं तू जाऊ शकते.नाही सर थोडंच बाकी आहे मला फक्त 10 मिनिटे द्या,मे हे करू शकते. अगं हो मला माहीती आहे तू हे करू शकते आणि तुलाच करायचं आहे उद्या हवं तर 10 मिनिटे लवकर ये ...Read More

8

ना कळले कधी - Season 1 - Part - 8

बराच वेळ झाला आर्या आलीच नाही. शेवटी सिद्धांतने hr डिपार्टमेंट ला कॉल केला आणि आर्यची आजची सुट्टी आहे का पण त्यांनाही तिने काही inform नव्हतं केलेलं. किती irresponsible आहे ही मुलगी.जबाबदारी नावाची थोडीही गोष्ट नाही. शेवटी न राहवून त्यानेच आर्यला कॉल केला. 'hello आर्या where are u??,कीती वाजलेत बघितलं का?' सिद्धांत, मी आर्या नाही तिची आई बोलत आहे, ओह extremely sorry मला वाटलं आर्याच आहे. 'by the way आर्या कुठे आहे? मला थोडं काम होत तिच्याशी'. 'अरे मला करायचं होतं ऑफिस मध्ये इंफॉर्म पण कोणाला करावं हेच कळत नव्हतं,बर झालं तूच केला कॉल आज आर्यला खूप ताप आहे तर ...Read More

9

ना कळले कधी - Season 1 - Part 9

दोघांनीही कॉफी घेतली आणि आणि सिद्धांत निघाला खरं तर त्याला मनातून आर्या ला ह्या परिस्थितीत सोडून जावं वाटत नव्हतं जास्त वेळ तो थांबू ही शकत नव्हता. चलो आर्या, आयुष Bye...मी निघतो आता आर्या, काळजी घे आणि काहीही गरज पडली तर मला कॉल कर..! I will be there...असं म्हणून तो निघाला. काय दीदी किती cool आहे ना सिद्धांत! मला तर तो बॉस वाटलाच नाही, मला वाटलं की हा friend आहे तुझा..ह्याला काय सांगू की कसा आहे तो आर्या मनातच म्हणाली. ती आयुषला फक्त हो म्हणाली. दीदी तू कर आराम मी बाहेर आहे. आयुष निघून गेल्यावर आर्या सिद्धांत च्याच विचारात हरवून ...Read More

10

ना कळले कधी - Season 1 - Part 10

आर्या ला बोलून सिद्धांत ची काळजी एकदम कमी झाली. त्याही पेक्षा उद्या पासून ती ऑफिस ला येणार हे ऐकून. तो निश्चित होऊन कामाला लागला. आर्याला सिद्धांतने फोन केल्याचं थोडं नवलच वाटलं पण आज काल सिद्धांतच वागणंच बदललं होत आणि तिला ते निश्चितच सुखवणारं होत. आर्याला आज फ्रेश वाटत होतं, थोडासा अशक्तपणा होता पण गेल्या दोन दिवसांपेक्षा आज खूप बरं वाटत होतं. आणि सिद्धांतचा फोन आल्यापासून तर आणखीनच बरं वाटत होत. ती ऑफिसला निघणार इतक्यात आयुष आला, 'मी सोडणार आज ऑफिस ला तुला!', 'अरे मी जाऊ शकते', 'हो! आजच बरं वाटतय ना, खर तर.. तू आज जायलाच नको आहे ...Read More

11

ना कळले कधी Season 1 - Part 11

आर्या आणि सिद्धांत निघाले, आर्याला सिद्धांतच्या आईला भेटून फार छान वाटले. 'किती छान काम करतात ना काकू. म्हणजे मला अशा NGO वगैरे चालवणाऱ्या महिलांचा खरचं खूप अभिमान वाटतो', आर्या म्हणाली. 'हो! तिला आवड आहे ह्या कामाची.' सिद्धांत त्याच्या आई विषयी भरभरून बोलत होता. त्यावरून आर्याला कळून चुकलं की ह्याचं सगळ्यात जास्त प्रेम ह्याच्या आईवरच आहे. इतर कोणाचा त्याने बोलतांना उल्लेखही केला नाही. आणि आर्यानेही त्याला बाकीच्या फॅमिली मेंबरबद्दल विचारलं नाही. त्याने आर्या ला घरी सोडलं आणि तो घरी आला. 'आला का आर्या ला सोडून? किती गोड मुलगी आहे ना आर्या?' सिद्धांत फक्त हं म्हणाला. 'अरे मी तुझ्याशी बोलतीये.' 'हे ...Read More

12

ना कळले कधी Season 1 - Part 12

सिध्दांतच्या मते चूक आर्याचीच होती आणि त्याला तर ऐकून घेण्याची सवयच नव्हती. 'आर्या, तुला वाटत नाही आहे तु थोडं बोलतीये.', सिद्धांत तिला ओरडूनच म्हणाला, 'जास्त नाही योग्य तेच बोलत आहे. आणि का बोलू नये मी? आणि माझ्या कडून का अपेक्षा ठेवताय तुम्ही? आपलं काहीही नातं नाही. तुम्ही आहातच कोण मला बोलणारे आणि विचारणारे?? माझ्या वर हक्क नाही आहे तुमचा!' सिद्धांत एकदम शांतच झाला. त्याला असं काही ऐकावं लागेल अस स्वप्नातही वाटलं नव्हतं, 'हो! बरोबर आहे मी कोण आहे तुझा?', 'कसं आहे ना सर, तुम्ही स्वतः भोवती एक कुंपण केलं आहे त्या कुंपणाच्या बाहेर तुम्ही कधी येतही नाही आणि कोणाला ...Read More

13

ना कळले कधी Season 1 - Part 13

आर्या काहीही न बोलता तेथून निघून गेली.सिद्धांतला खूप वाईट वाटले, 'आपण उगाचच बोललो आर्या समोर. पण आर्या खरंच great आज मानलं तिला. दोघांच्या आयुष्यातही एकच कमी आहे. माझ्या कडे at least वडिलांच्या वाईट आठवणी तरी आहेत. पण तिच्या कडे तर त्याही नाही . तरीही ती कधीही परिस्थितीची तक्रार करत नाही, जे मिळालं त्यामध्ये खुश आहे. आपलं दुःख लपवून आनंदाने जगते आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. शी...... किती वाईट बोललो मी तिला. अस नव्हतं बोलायला पाहिजे, आणि काय चुकीचं बोलत होती ती,चुकी माझीच आहे प्रत्येक वेळेस अजाणतेपणे का होईना पण मी तिला दुखावतोच. आता नाही बोलणार ती ...Read More

14

ना कळले कधी Season 1 - Part 14

सकाळी सकाळी सिद्धांत ला आणि आर्याला सोबतच जाग आली. आर्याने त्याच्याकडे पाहून smile दिली. बाहेर छान धुके होते. 'किती आहे ना ही सकाळ! फार आवडतात मला ही धुके, थंडी. आपलं आयुष्य पण ह्या धुक्या सारखंच आहे. नाही का? म्हणजे पुढचं सगळंच खुप मोहक वाटतं, समोर काय आहे हे दिसत नाही पण चालायला लागलो की रस्ता पण आपोआप सापडतो.', आर्या म्हणाली. 'वा आर्या! खूप पुस्तकं वाचते का गं तू? नाही म्हणजे exact फिलॉसॉफी मांडली म्हणून विचारलं.' तिने थोडं रागानेच सिद्धांतकडे पाहिलं. 'sorry sorry!! अगं मला असं काही म्हणायचं नव्हतं. तू काही तरी चुकीचा अर्थ घेतीये. I am just saying, खरंच ...Read More

15

ना कळले कधी Season 1 - Part 15

दोघंही चहा घेत होते. 'काय मग भारी वाटतो ना चहा प्यायला?', आर्या ने विचारलं. 'पर कॉफी का अपनाही जुनून सिद्धांत म्हणाला. आर्या त्याच्याकडे पाहून म्हणाली, 'पर चाय मे ही सुकुन हेै।' 'सोड आर्या हा न संपणारा वाद आहे. कारण तू काही मान्य करणार नाही.' कॉफीच ग्रेट आहे.' 'मी का मान्य करू उगाचच', आर्या म्हणाली. 'एक दिवस मीच घेईल तुझ्याकडून मान्य करून. बघंच तू..' सिद्धांत तिला म्हणाला. 'बघू, असा दिवसच येणार नाही. चला निघायचं बाकीचे वाट बघत असतील.' 'आर्या, मी तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो त्या लोकांना ते इतक्या लवकर येणार नाही. वेळेचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही आहे.' त्यात ...Read More

16

ना कळले कधी Season 1 - Part 16

तो काहीच न बोलता समोर निघाला, ती ही त्याच्या मागे मागे गेली. 'सर मी काहीतरी विचारलं आहे?', त्याचं उत्तर मिळालं मला. सिद्धांत काहीही उत्तर देत नव्हता. आर्याने त्याचा हात पकडला आणि थांबवलं, 'मी तुमच्याशी बोलतीये ना. मूर्ख आहे का मी एकटीच बडबड करायला.' 'आर्या, हे बघ काही प्रश्नांना उत्तरे नसतात त्यातलाच हा समज.', असं म्हणून तो चालू लागला. आर्याला काय बोलावं कळलंच नाही. तिने पटकन विषय बदलला, 'तुम्हाला नाही घ्यायचं काही?' 'काय?', सिद्धांत म्हणाला. त्याला आर्या इतक्या लवकर हा विषय सोडेल असं त्याला वाटलंच नव्हतं. बर झालं हिने दुसरा विषय काढला. तो मनातच म्हणाला. 'नाही मला काही विशेष ...Read More

17

ना कळले कधी Season 1 - Part 17

सगळे गाडीत बसले. आणि आणि एकदाचा प्रवास सुरू झाला. आर्या आणि सिद्धांत एकमेकांच्या बाजूला जागा मिळाली म्हणून खूप खुश गेला ना आजचा दिवस! खूप मस्त वाटलं कितीतरी दिवसांनी इतकं enjoy केलं, हो ना सर...अगं आपले HR वाले करतच असतात अश्या ट्रिप वगैरे अरेंज...खूप ट्रिप केल्या पण ही काहीतरी वेगळीच होती म्हणजे somthing special सिद्धांत म्हणाला.. काय होतं असं ह्या ट्रिप मध्ये special ?? आर्याने लगेच विचारलं..तुला म्हटलंना आर्या काही प्रश्नांची उत्तरे नसतात त्यातलाच हा समज.. सर मला तर वाटतंय की फक्त माझ्याच प्रश्नांची उत्तरे नसतात तुमच्याकडे..ठीक आहे! तिने कानामध्ये headphones टाकले आणि गाणे ऐकत बसली. खर तर सिद्धांत बाजूला ...Read More

18

ना कळले कधी Season 1 - Part 18

'झालं का सिद्धांत तुझं?' 'हो आई, बस एक - दोन मिनिटे.' 'अरे बरा आहेस ना तू?' 'का गं? काय 'अरे किती spicy बनवलंय तू जेवण. तू विसरलास का की तुला चालत नाही.' 'आई, मी माझ्या साठी साधं वेगळं बनवलं. हे तुझ्या आणि आर्या साठी बनवलंय. तिला साधं अजिबात आवडत नाही. आणि तुला ही माझ्या मुळे नेहमी साधंच खावं लागतं. so..' 'बरीच माहिती गोळा केलेली दिसतीये तू आर्याची. म्हणजे तिला काय आवडतं, काय नाही.' 'काही माहिती वगैरे नाही गोळा केली मी. हे ट्रिप मध्ये 2 दिवस सोबत होतो तर माहिती झालं thats it. बाकी मला काहीही माहिती नाही तिच्या बद्दल.' ...Read More

19

ना कळले कधी Season 1 - Part 19

आर्या ने आज सकाळी सकाळी उठून लवकर आवरलं. तिला आज सिद्धांतच्या भेटीची खूप ओढ लागली होती. केव्हा एकदा सिद्धांतला अस झालं होतं. तिला सततसिद्धांत बरोबर घालवलेले क्षण आठवत होते. कुठेतरी सिद्धांत तिला आवडत होता हे आता तिच्या मनालाही पटत होत. ती ऑफिस साठी निघाली तिने नेहमीसारखाच फोन silent करून बॅग मध्ये टाकला आणि निघाली. इकडे सिद्धांत पण आवरून निघाला. त्याला वेळेत पोहचायचं होत कारण त्याची एक महत्त्वाची मीटिंग होती. पण ऑफिसच्या जवळपासच संपूर्ण रस्ता ब्लॉक केला होता. त्याने गाडीतून खाली उतरून चौकशी केली तर त्याला कळलं की कुठल्यातरी मुलीचा accident झाला आहे. आणि तिला बरच लागलं ...Read More

20

ना कळले कधी Season 1 - Part 20

'मी प्रत्येक वेळेस आर्याला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतो. हो मी आहे तिच्या बद्दल possessive, पण हे तिला कळत का मी तिला रागावलो हे खरं आहे. मी नव्हतं असं सगळ्यांसमोर बोलायला पण मी का बोलतो हे, त्या मागची काळजी, आपुलकी हे तिला का कळत नाही. प्रत्येक वेळेस मी तिला हे नाही समजावून सांगू शकत. आणि जर तिला हे समजावून ही घ्यायचे नसेल तर मग काहीही फायदा नाही. ठीक आहे ती म्हणते ना आपला काहीही संबंध नाही तर मग आता नाहीच.', सिद्धांतने निश्चय केला. आर्या ऑफिस मधून काम संपवून निघाली. तिला विचार करून खूप त्रास होत होता, डोकं जाम दुखत होत, ...Read More

21

ना कळले कधी Season 1 - Part 21

आता आर्या थोडी stable झाली होती. तिथल्या स्टाफ मधील एक सिस्टर ने येऊन सांगितले आता तुम्ही त्यांना जेवायला द्या च्या आई ने तिला जेवण्यासाठी वाढले आणि त्या घास भरवत होत्या. आर्या खाऊन घे पटकन मग गोळ्या घ्यायच्या आहेत. तिची आई म्हणाली. सिद्धांत हे सगळं बाजूला बसून पाहत होता. आई प्लीज माझी काहीही खाण्याची ईच्छा नाही आहे. अग अस म्हणून कस चालेल ईच्छा नाही म्हणून कस चालेल काही तरी तर खावच लागेल, त्याशिवाय बर कस वाटेल. खा पटकन. आई तुला एकदा नाही म्हंटलेलं कळत नाही का ग का इतका आग्रह करत आहे मला नाही ईच्छा तर नाही, मी ...Read More

22

ना कळले कधी Season 1 - Part 22

सिद्धांत घरी आला तो फार थकला होता. 'काय रे सिद्धांत आज बराच वेळ झाला, खूप काम होत का?', त्याच्या ने विचारलं. 'नाही गं आई, आज आर्याचा accident झाला तर हॉस्पिटलमध्येच होतो इतक्या वेळ.' 'बापरे कुठे? लागलं तर नाही ना तिला जास्त? आणि आता कशी आहे ती?' 'आई किती प्रश्न विचारणार आहेस. घाबरू नको आता ती बरी आहे. सकाळी डिस्चार्ज मिळणार आहे. सगळे रिपोर्ट्स पण नॉर्मल आले.''मग तू का नाही थांबला? काही लागलं वगैरे तर रात्री.' 'अग तिच्या घरचे आहे, आणि तिला झोप लागली होती आता. आणि मी डॉक्टरांना बोललो ते ही म्हणाले घाबरण्याच काहीही कारण नाही. म्हणून मी ...Read More

23

ना कळले कधी Season 1 - Part 23

'ok then, मी तुम्हाला घरी सोडतो आणि घरी जाऊन माझा लॅपटॉप घेऊन येतो चालेल ना?', 'हो चालेल. तू ये आर्याची आई म्हणाली. आर्याला तर आजचा सिद्धांत फार आवडत होता. 'किती भारी दिसतोय हा. एकदम भारी! casulas मध्ये खरच किती छान दिसतो हा!' 'काय आर्या काय विचार करतीये? उतर घर आलं' सिद्धांतच्या बोलण्याने तिची तंद्री भंगली. आर्या आणि तिच्या आईला सोडून सिद्धांत त्याच्या घरी गेला. 'आर्या सिद्धांत किती चांगला मुलगा आहे न! किती निःस्वार्थी आहे तो. आणि किती शांत आहे. खुप कमी वयात किती जास्त mature झाला आहे तो. आर्या असे लोक खूप कमी असतात ग ह्या जगात.', आर्याची आई ...Read More

24

ना कळले कधी Season 1 - Part 24

'अच्छा येईल न, किंवा फोन करून बघ त्याला.', सिद्धांत ने तिला सुचवलं. 'हा फोन करते better idea.' तिने फोन घेतला, 'अरे आयुष चाच message, sorry didi, today I have to attend extra class after exam. So today I would be late and will come at 5:00pm, I am going to attend that class bye!' तिने त्याचा message वाचला, 'अरे काय!! ह्याचा class ही आजच व्हायचा होता.', 'ठीक आहे न आर्या तो थोडीच मुद्दामून करत आहे.', सिद्धांत तिला म्हणाला. 'आधीच ना मला एकाजागी बसून जाम बोर झालय, किती झोपणार झोपून झोपून.', आर्या चिडून म्हणाली. 'ए आर्या, अगं चिडतेस ...Read More

25

ना कळले कधी Season 1 - Part 25

'हे बघ आई ह्या विषयावर खूप वेळा बोलणं झालं आहे मला नाही वाटत ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट'. 'आणि मुलगी शोध शोध अस माहिती नसलेल्या कुठल्याही मुलीशी लग्न छे! आयुष्याचा प्रश्न आहे'. 'अरे मग माहिती असलेल्या मुलीशी कर ना',' मी कुठे काय म्हंटल तू ते ही करत नाही'. #तुझ्या इतक्या मैत्रिणी आहेत त्यातली एखादी', सिद्धांत ची आई म्हणाली. 'आई काही काय बोलतेस ग तू मैत्रिणींपैकी म्हणे'.' ही नको, ती नको पाहिजे कोणती मग तुला, ते ही सांगत नाही ह्याच तुझ्या एका गोष्टीला कंटाळली आहे मी'. 'सिद्धांत माझ्या कडे पण आहेत चांगले चांगले स्थळ मी सुचवू का'? आर्याची आई ...Read More

26

ना कळले कधी Season 1 - Part 26

सिद्धांत तिला ऑफिस झाल्यावर भेटायला आला. काय आर्या आज फार खुश दिसत आहेस काही विशेष, काही हो आहेच विशेष उद्या पासून ऑफिस ला येणार! डॉक्टरांनी परवानगी दिली आहे. अरे वा! मस्तच पण हे बघ आर्या डॉक्टरांनी जरी परवानगी दिली असली तरीही तुला अजून अशक्तपणा आहे त्यामुळे मी तुला गाडीने तर नाही च जाऊ देणार ! तू कितीही हट्ट केला तरीही. मी ऐकणार नाही. आई किती बंधन लादतेस ग ! हे नको करू इतक्या दिवस जाऊ दिल नाही आता काय तर म्हणे गाडी घेऊन नाही जायचं. मी ना खरच कंटाळली आहे, तुझ्या ह्या वागण्याला. त्या पेक्षा मी ...Read More

27

ना कळले कधी Season 1 - Part 27

आर्याला घरी सोडून सिद्धांत घरी आला. 'बरं झालं आर्याशी ह्या विषयावर बोलणं झालं, नाहीतर माझ्या मनावरचं ओझ काही कमी नसत. पण मानलं आर्याला, मी किती घाबरत होतो हा विषय तिच्या समोर काढायला, पण तिने तर अगदी सहज हाताळला. किती सहजपणे तिने माझ्या मनावरचं दडपण हलकं केलं. मी न बोलताही माझ्या मनातलं अगदी सहज हेरलं ग तू.. कस जमलं हे तुला हीच तुझ्या वागण्यातली सहजता मला तुझ्या आणखीन जवळ आणत आहे dear!!!', 'सिद्धांत जेवायला चल', त्याच्या आईने त्याला आवाज दिला आणि त्याची तंद्री भंगली. 'हो आलोच' म्हणून तो जेवायला गेला. 'बर झालं सिद्धांतशी आज बोलणं झालं नाहीतर बिचारा उगाचच ...Read More

28

ना कळले कधी Season 1 - Part 28

Hey सिद्धांत बघ आर्या आली.....!!! विक्रांत जवळजवळ ओरडलाच, हे बघ विक्रांत माझा अजिबात मूड नाही आहे आणि ती येणार उगाचच माझी घेऊ नको. अरे ऐ मूर्खा बघ तर मागे एकदा. नंतर बोलविक्रांत म्हणाला. सिद्धांत ने मागे पाहिलं आणि तो पाहतच राहिला त्याच्या मागे चक्क आर्याच उभी होती आणि तीही one piece त्यावर तिचे मोकळे केस, त्यात तर ती आणखीन उठून दिसत होते. सिद्धांत फक्त आता आनंदाने वेडा व्हायचाच बाकी होता. त्याला पटकन जाऊन तिला मिठीच मारावी वाटली पण त्याने कंट्रोल केलं. आज ही मेनका ह्या विषमित्रा ची तपस्या भंग करणार विक्रांत सिद्धांत कडे पाहून म्हणाला. इतक सोपं ...Read More

29

ना कळले कधी Season 1 - Part 29

सिद्धांत घरी आला. खूप उशीर झाला त्यामुळे त्याने स्वतःच्याच किल्लीने दरवाजा उघडला. त्याने पाहिलं त्याची आई झोपलेली होती, त्याने disturb केलं नाही. तो आपल्या रूम मध्ये आला. खरं तर झोपण्यासाठी तो बेड वर पडला पण त्याची झोप उडालेली होती, 'sorry तर बोललो तिला तरीही का तगमग कमी होत नाही आहे. तीचही बरोबर आहे चुकी दोघांचीही आहे. मग मला का इतकं वाईट वाटतंय? आर्यालाही वाईट वाटत असेल.. तिची चुकी असेल नसेल मला माहिती नाही, पण मी limits cross नव्हत्या करायला पाहिजे. आर्याने काय विचार केला असेल माझ्या बाबतीत की मी ही बाकी मुलांसारखा...... कितीतरी वेळेस कित्येक मुलींनी माझ्या ...Read More

30

ना कळले कधी Season 1 - Part 30

सिद्धांत काय बोलतोय ह्या कडे आर्याचं अजिबात लक्ष नव्हतं. तो उठला आर्याच्या जवळ गेला, हलकेच तिच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने विचारलं, 'आर्या काय झालं? सगळं ठीक आहे ना?' ती एकदम दचकली आणि भानावर आली. 'काही विचारलं का सर?' 'अगं तुझं लक्ष कुठे आहे?तेच विचारतो आहे मी.' 'नाही कुठेच नाही.' जर तिच्या जागी दुसरं कुणीही असत तर आता पर्यंत सिद्धांतने त्या व्यक्तीला अपमानित करून बाहेरपाठवलं असत पण केवळ ती आर्या असल्यामुळे तो हे सगळं सहन करत होता. 'आर्या काहीतरी बोल काही टेन्शन आहे का?' एव्हाना ऑफिस सुटलं ही होत आता त्यांच्या शिवाय कोणी राहील नव्हतं. आर्या काहीच ...Read More

31

ना कळले कधी Season 1 - Part 31

दोघंही आपापल्या घरी गेले. आज खूप दिवसांनी दोघांच्याही मनावरचा ताण हलका झाला होता. आणि त्यात दुसऱ्या दिवशी सुट्टी होती दोघेही आणखीनच relax होते. आर्याचा फोन वाजला, 'सिद्धांतचा फोन ह्या वेळेला. आता काय!' तिने call receive केला 'yes sir!!''आर्या उद्या सकाळी ऑफिसला यायचं आहे. be on time', सिद्धांत तिला म्हणाला. 'काय!!! उद्या ऑफिस.. उद्या तर सुट्टी आहे ना, मग ऑफिस कस काय??', सिद्धांतला ह्यावेळेस आर्याचा चेहरा कसा झाला असेल हे विचार करूनच हसायला आलं. 'ए रडू नको. उद्या काही ऑफिस वगैरे नाही आहे हा' 'काय सर, घाबरले ना मी! एकच तर दिवस मिळतो तेवढा झोपायला आणि आधी का म्हणालात ...Read More

32

ना कळले कधी Season 1 - Part 32

सिद्धांत सकाळी आर्याला घ्यायला आला. आर्या छान तयार होऊन आली. सिद्धांत मनातच म्हणाला अशी इतकी छान तयार होऊन येत नको ग, गाडी चालवताना लक्ष नसत माझं मग! ती आली त्याचा बाजूच्या सीट वर बसली चला निघायचं, आर्या म्हणाली. बाय द वे जायचं कुठे आहे. म्हणजे तिच्या घरी or बाहेर कुठे आर्याने त्याला विचारलं. अग हो आर्या थोडा धीर धर तिकडेच निघालो आहे आपण कळेलच थोड्या वेळात. बर नका सांगू मला असही काय करायचं आहे, बर कोण आहे ती मुलगी काय करते? कुठे शोधली? नाव काय आहे? फोटो असेल ना एखादा बघू मला आर्या म्हणाली. मला तर ...Read More

33

ना कळले कधी Season 1 - Part 33

दोघेही जण बसले होते कोणीही काहीही बोलले नाही. आर्याने आपला मोबाईल काढून त्यामध्ये निसर्गाचे सुंदर सुंदर फोटो काढायला सुरवात सिद्धांत तिच्या जवळ आला आणि म्हणाला 'आर्या, तुझा फोन बघू.' 'का काय झालं?', तिने विचारलं. अग काही नाही मला फक्त तुझी 'फोटोग्राफी बघायची आहे.', तिने फोन त्याच्या हातात दिला. 'काय बघणार आहे कुणास ठाऊक? फोटोग्राफी मधलं काय कळत असणार ह्याला, हा तर पुस्तकी किडा आहे.', त्याने एक दोन photos तिला दाखवले, 'हे बघ आर्या, हे सुंदरच आहेत पण आणखीन सुंदर कशे आले असते हे मी तुला सांगतो.', आणि त्याने तिला काढून दाखवले. 'wow sir, its really amazing!!!!! काय सुंदर फोटोग्राफी ...Read More

34

ना कळले कधी Season 1 - Part 34

'हो वाचलंय न! म्हणूनच तर विचारतोय की काय होत ते.', सिद्धांत म्हणाला. 'अरे यार!! काय हे सर, का वाचलं सगळं!' 'कॉल मी सिद्धांत, लिहिताना तर तू सिद्धांतच लिहिते ना, बरोबर ना!', आर्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून तर सिद्धांतला फार मजा येत होती, पण आज तो थांबणार नव्हता. आज आर्या कडून वदवूनच घ्यायचं हे त्याने ठरवलं होतं. 'आर्या बोल न!' 'सर ते काय आहे न.......!' 'सर नाही, सिद्धांत म्हण.' 'अस कस म्हणणार!', आर्या म्हणाली. 'सोप्प आहे, जितक्या सहज पणे लिहिलं तितक्याच सहजतेने.', सिद्धांत तिला म्हणाला. 'नाही मला नाही जमणार!' आर्या म्हणाली. 'बर.. सिद्धांत तर तू मला म्हणणारच, आज नाही तर उद्या.. ...Read More

35

ना कळले कधी Season 1 - Part 35

सिद्धांत सकाळी उठून छान तयार झाला. आज संध्याकाळची तो फार आतुरतेने वाट पाहत होता. इकडे आर्याला जास्त काही फरक नव्हता कारण सिद्धांत बोलेल की नाही ह्या वर तिला अजूनही शंका होती, पण ती खुश मात्र होती. ती तयार होत असतानाच तीचं लक्ष तिच्या डायरीकडे गेलं आणि तिने डायरी हातात घेतली आणि तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. 'किती वेडा आहे सिद्धांत. इतकं वाचलं तरीही बोलू नाही शकला, कस होणार ह्याच..ह्याला फक्त राग व्यक्त करता येतो. प्रेम करू शकतो पण व्यक्त नाही करता येत. बघू आज संध्याकाळी काय देतो प्रश्नांची उत्तरं.....' 'काय ग दीदी, अस एकटीच काय हसतीये.. बरी आहेस ...Read More