लायब्ररी

(49)
  • 67.9k
  • 16
  • 38k

सलग तीन तास चाललेलं ते बोरिंग लेक्चर ऐकून कंटाळा आला होता. लागोपाठ दूसर लेक्चर चालू असताना मला झोप आवरण कठीण होत चाललं होत. बरेच प्रयत्न करूनही मला ते आवरण जमेना. नकळतपणे माझे डोळे केव्हा झाकले कळलच नाही. मग लगेचच सरांनी रीतसर मला क्लास च्या बाहेर काढलं. तसही मला तिथून बाहेर कधी पडतेय अस झालं होतं.मी आनंदातच बाहेर आहे. सरांनीही निर्लज्जम सदा सुखी म्हणतात ना तस काहीस पुटपुटलयाचा मला भास झाला.......पण असो... मी बाहेर जायला भेटल्यामुळे खुश होते.आणि खर तर इथूनच आपली स्टोरी सुरू होते ना...तर मी सांगते तुम्ही एन्जॉय करा..हम्मम जस की मी सांगितलं मला बाहेर काढल्यावर ऐकत कुठे

Full Novel

1

लायब्ररी - भाग 1

सलग तीन तास चाललेलं ते बोरिंग लेक्चर ऐकून कंटाळा आला होता. लागोपाठ दूसर लेक्चर चालू असताना मला झोप आवरण होत चाललं होत. बरेच प्रयत्न करूनही मला ते आवरण जमेना. नकळतपणे माझे डोळे केव्हा झाकले कळलच नाही. मग लगेचच सरांनी रीतसर मला क्लास च्या बाहेर काढलं. तसही मला तिथून बाहेर कधी पडतेय अस झालं होतं.मी आनंदातच बाहेर आहे. सरांनीही निर्लज्जम सदा सुखी म्हणतात ना तस काहीस पुटपुटलयाचा मला भास झाला.......पण असो... मी बाहेर जायला भेटल्यामुळे खुश होते.आणि खर तर इथूनच आपली स्टोरी सुरू होते ना...तर मी सांगते तुम्ही एन्जॉय करा..हम्मम जस की मी सांगितलं मला बाहेर काढल्यावर ऐकत कुठे ...Read More

2

लायब्ररी - 2

भाग 2 सलग दोन आठवडे उलटून गेले ,आता मात्र मलाच ते पुस्तक सारख उघडून पाहण्याचा कंटाळा यायला लागला..पण मानातली उत्सुकता काही जाईना.. अशी गम्मत करायला मला फार फार आवडते पण अजून कुणी काही बकरा सापडेना म्हणून मी जरा खट्टू झाले.पण तरी ...Read More

3

लायब्ररी - 3

शेवटी दुखरा पाय ओढत मी लायब्ररी पर्यंत पोहोचले आता मात्र मला शोध लावायचाच होता. आल्या पासून मी चौकस नजरेने लक्ष ठेऊन होते ,आधी हा प्रयोग केला नव्हता अस काही नाही कॉलेज ला आल्या पासून नकळत पणे लक्ष आजू बाजूला जात होतं.लायब्ररी मधे रोज येत असेल ना तो म्हणजे आजही दिसेल मी आजू बाजूला पूर्ण लक्ष ठेऊन होते. पण माझं bad luck की कॉलेज ची लायब्ररी एवढी मोठी की पूर्ण भाग फिरून पाहायचा म्हणजे एक तास तरी आरामात जाईल आणि हे महाशय कोणत्या कोपऱ्यातून आले आणि कुठे गेले याचा शोध मला कसा लागणार बर हे मला पाहून कदाचित हळूच काढता ...Read More

4

लायब्ररी - 4

चला आज पार्टी…!!! सुयश ने अनाऊन्समेन्ट केली ..अरे पण कशाबद्दल?? सगळेच विचारायला लागल्यावर तो जरासा लाजला!! अरे ती हो ना!!!रोहन ओरडला…हो पार्टी तो बनती है.. सगळेच भुक्कड लगेच पार्टी करायला निघाले सगळ्यांसोबत मस्ती करत संध्याकाळ कधी झाली कळलंच नाही.त्यात संध्याकाळी आईने छोटीशी पूजा ठेवली होती ती ही पार पडली या दरम्यान मला कितीतरी वेळा त्या पत्राची आठवण आली कधी एकदा ते वाचेन अस झालं होतं, त्यातला एक एक शब्द मला नीट लक्ष देऊन ते पत्र उराशी धरून वाचायचं होत म्हणूनच मी ते काम सर्वात शेवटी ठेवलं.. रात्री भरभर जेवण उरकून मी धडकन माझ्या खोलीचा दरवाजा बंद केला,आणि हळुवार पणे ...Read More

5

लायब्ररी - 5

दिवसभर कॉलेज मध्ये प्रॅक्टिकल आणि सबमिशन ची गडबड चालू होती…संध्याकाळी घरी आल्या आल्या सरळ झोपायचीच तयारी केली होती की आठवला ,,काय करावं जावं का?? पण मीच तर त्याला बोलवलं होत आणि मीच नाही जायचं म्हणजे ते काही मला बरोबर वाटेना…संध्याकाळी तासभर मी आवरण्यात घालवला जाऊ की नको ????शेवटी हो नाही करत मी finally आवरून bridge वर पोहोचले मी तर जवळ जवळ वीस एक मिनटं लवकर आले होते तो अजून आला नव्हता बहुतेक तशी इकडेतिकडे फिरणारी तुरळक मानस सोडली तर फारशी गर्दी तिथे नव्हती.मी ही समोरून कुणी आलं तर लगेच दिसेल अशाच हिशोबाने बसले.नऊ वाजायला अजून दहा मिनिटे तरी बाकी ...Read More

6

लायब्ररी - 6

सवत्ताच्याच विचारात मग्न होऊन गाडी भरधाव वेगाने लव्हर्स ब्रिच कडे चालली होती.आज पुन्हा त्याच्या येण्याने जणू मी मधला काळ आता स्वत्ताच्याच दुनियेत हरवले होते. जुन्या स्मृती जाग्या झाल्या तेव्हा प्रेम वगैरे आहे का नाही हे कळतच नव्हतं खर तर आता ही अगदी तीच स्थिती आहे पण त्याच्या जाण्याने काहीतरी बदल झालेला.अल्लड अशी स्वतःत मग्न असणारी मी माझ्यातून वेगळी झाले सारखी बडबड करणारी आता कमालीची शांत दिसते याच माझंच मला नवल वाटायला लागल की तो पुन्हा माझ्या आयुष्यात आला…आज अस अचानक त्याच समोर येण म्हणजे नवलच होत माझ्यासाठी ,त्याला माहित असावं का हे???माहीत नाही पण काहीही असो आज मात्र मला ...Read More