फार्महाउस

(151)
  • 167.9k
  • 45
  • 104.8k

फार्म हाऊस ही कथा जत्रा या कथेच्या पुढील कथा आहे... # जत्रेच्या शेवटी वाचकांना जे प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरे वाचकांना फार्म हाऊस या कथेमध्ये मिळतील .$ त्यामुळे तुम्ही जत्रा ही कथा वाचली नसेल तर अवश्य वाचा .....【सारांश जत्रेचा 】¢ गावातील जत्रेमध्ये आलेला ऑर्केस्ट्रा पहायला निघालेले तीन मित्र काटेवाडीचा जंगलातील भुताच्या तावडीत सापडतात .¢ तिथून निसटताना त्यांच्यातील दोघे मृत्यू पावतात व एका मित्राला म्हणजेच गण्याला त्याच्या लहानपणीची मैत्रीणचे , अंजलीचे भूत वाचवते .....इथून पुढचा भाग या कथेमध्ये आलेला आहे तुम्ही प्रकाशित साहित्य मध्ये जाऊन जत्रा आवश्य वाचा . त्या पोलिस अधिकाऱ्याने गाण्यावर ती प्रश्नांची सरबत्ती लावली होती " तू इथे काय

Full Novel

1

फार्महाउस - भाग १

फार्म हाऊस ही कथा जत्रा या कथेच्या पुढील कथा आहे... # जत्रेच्या शेवटी वाचकांना जे प्रश्न पडतात त्या प्रश्नांची वाचकांना फार्म हाऊस या कथेमध्ये मिळतील .$ त्यामुळे तुम्ही जत्रा ही कथा वाचली नसेल तर अवश्य वाचा .....【सारांश जत्रेचा 】 गावातील जत्रेमध्ये आलेला ऑर्केस्ट्रा पहायला निघालेले तीन मित्र काटेवाडीचा जंगलातील भुताच्या तावडीत सापडतात .¢ तिथून निसटताना त्यांच्यातील दोघे मृत्यू पावतात व एका मित्राला म्हणजेच गण्याला त्याच्या लहानपणीची मैत्रीणचे , अंजलीचे भूत वाचवते .....इथून पुढचा भाग या कथेमध्ये आलेला आहे तुम्ही प्रकाशित साहित्य मध्ये जाऊन जत्रा आवश्य वाचा .त्या पोलिस अधिकाऱ्याने गाण्यावर ती प्रश्नांची सरबत्ती लावली होती " तू इथे काय ...Read More

2

फार्महाउस - भाग २

फार्महाउस भाग1 वाचला नसेल तर प्रकाशित साहित्य मध्ये जाऊन अवश्य वाचा .... भाग 1 सारांश 【 बेटावरून गण्याला पोलिसांनी व तुरुंगात टाकले . बप्पांनी गण्याला सोडवून आणले व तो सत्याचा शिपाई किंवा शिलेदार झाल्याचे सांगितले . पण गण्याला ते पटले नाही त्यामुळे तो गावाकडे जाऊन आला . तेव्हा त्याला सत्याची जाणीव झाली कारण गावात त्याला कोणीही ओळखत नव्हते . बेशुद्धावस्थेत अंजलीने गण्याला एक घर दाखवलं . तेच फार्महाउस होतं पण जेव्हा गणेश शुद्धीवर आला त्याच्या हातात एक शिंपला होता ....... 】 पुढे चालू त्या शिंपल्याचा लिबलिबीत स्पर्श त्याला तेव्हाच जाणवला . प्रतिक्षिप्त क्रिये मुळे त्याने तो शिंपला जोरात ...Read More

3

फार्महाउस - भाग ३

अंजली पुढे जात होती . गण्या मागे . आता एक कॉलनी नजरेत पडत होती. सारी घरे एक सारखीच दिसत होती . रात्रीच्या बारा वाजून गेल्याने साऱ्या घरातल्या लाईट बंद होत्या . फक्त एकच घराच्या दुसऱ्या मजल्यावर ती पिवळसर उजेड तेवत होता . त्या उजेडाकडे बोट करत अंजली म्हणाली त्याच घरात जिथे उजेड दिसतोय ना तिथल्या एका माणसाला वाचवून बाहेर आणायचं आहे पण मीच का...? आणि कोण आहे तिथे .... कारण तुझीच निवड झाली आहे आणि तिथल्या माणसा वरतीच माझं भवितव्य अवलंबून आहे ..... हे ऐकून गण्या त्या घराकडे पळतच निघाला ..... घराचं दार उघडंच होतं . ...Read More

4

फार्महाउस - भाग ४

तो दचकून जागा झाला . तो बेडवरतीच होता . तो घामाने निथळून निघाला होता . तो त्याच खोलीत होता जिथे तो झोपला होता . शेजारीच बाप्पा बसले होते . त्याला चेहऱ्यावरचा घर्मबिंदू टिपताना पायाला भयंकर वेदना जाणवल्या . त्याच्या पायावरती कोणीतरी धारदार वस्तू ने ओरखडे ओढले होते . त्यामुळे रक्तस्राव होत होता . बप्पांनी पटकन ते रक्त पुसून घेऊन त्याला अँटीसेप्टिक लावले . " कुठे गेलता ..... " मला माहिती आहे तो बंगला , ती वाट ... " मग चल लवकर , नाहीतर उशीर होईल .... " पण मग मी इथे आलोच कसा ....? " म्हणूनच म्हणलं तू शिपाई ...Read More

5

फार्महाउस - भाग ५

एखादा कागदाचा तुकडा असेल आणि जर तो पाण्यात टाकला तर तो झिजून झिजून नष्ट होतो . पण उलट त्याच तुकड्याच्या काही घड्या घातल्या आणि होडी बनवली तर ती होडी पाण्यात तरंगते . त्याच कागदाच्या तुकड्याच्या घड्या वेगळ्या पद्धतीने घातल्या तर तोच कागदाचा तुकडा हवेतही उडू शकतो . त्याचप्रमाणे परिस्थिती व अनुभव मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या व स्वभावाच्या अशा प्रकारे घडी घालतात की कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी तो त्याविरुद्ध लढतो . अनुभव मनुष्याला बनवतात , उभा करतात आणि जगवतात . आतापर्यंत गण्याने ही बऱ्याच चांगल्या-वाईट गोष्टी अनुभवल्या होत्या . त्या अनुभवावरून तो बरेच काही शिकलाही होता . त्यामुळे यावेळी तुरुंगात गेल्यावर ...Read More

6

फार्महाउस - भाग ६

माने , संभाळून राहा बरं ....झोपशील नाहीतर पाच- पाच खून केलेत त्यानं तुझा पण कार्यक्रम होईल म्हणून सांगतो..... ड्युटी बदलून आलेल्या हवालदाराला , घरी जाणारा हवलदार सावधानतेचा इशारा म्हणून हे सांगत होता ..... पण त्याला हेच कळालं नाही की डायरी मध्ये फक्त तीन खूनांचा उल्लेख होता . मग पाच खून कुठून काढले . ' मी कधी केले ५-५ खून ' तो जाम वैतागला इथे काहीतरी भलताच घोटाळा होता. त्याच्या विचारांची चक्रे उलटी सुलटी धावत सुटली . त्याच्या मनात विचारांचा गोंधळ उडाला . तेव्हाच त्याला तो बदलून आलेला हवलदार म्हणाला .... का ओ भाऊ , जगावर एवढा कसला ...Read More

7

फार्महाउस - भाग ७

' मी रामचंद्र इंगळे शहरात सध्या जी सिरीयल किलींग चालू आहे , त्यासाठी नेमलेल्या विशेष तपासणी पथकाचा प्रमुख आणि मुलगी शैला . मलाही तिच्याबद्दल एवढंच माहित आहे . तुझ्या मनात बरेच प्रश्न पडले असतील मी माझ्या परीने त्या प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करतो . आणि काही गोष्टी शैला तुला सांगणार आहे पण आधी मी सांगतो ... हे सिरीयल किलिंगचा प्रकरण ऐकून माझ्या कानावर आलं होतं . पण त्याच्या तपासणी पथकात माझी प्रमुख म्हणून निवड होईल असं वाटलं नव्हतं . कारण निवृत्त होऊन मला दोन वर्षे उलटली होती . माझ्या तब्येतीकडे बघून वाटत नसेल तुम्हाला माझं वय इतकं असेल पण ...Read More

8

फार्महाउस - भाग ८

तिच्या मधुर आवाजात ऐकत असताना त्याच्या समोर सारे शब्द दृश्यात रूपांतरित होत होते . शैला बोलत होती - आता तू म्हणशील कि मला हे सारं कसं कळलं वगैरे ....? तर ऐक , मीही एक प्रतिनिधीच आहे . तुझ्या सारखी . आपलं एकच काम आहे ते म्हणजे त्यांचा विनाश . ज्या दृष्ट आणि पाशवी शक्तींबरोबर आपला संघर्ष चालू आहे त्यांच्यासोबत एकटा-दुकटा लढू शकत नाही . आपल्यासारखे अजूनही असतील त्यांचा ही त्या शक्तींविरुद्ध लढा चालू असेल . ज्याला-त्याला , ज्याच्या-त्याच्या कामगिरी वाटून दिल्या आहेत . आतापर्यंत तु तुझी कामगिरी करत होता ; मी माझी कामगिरी करत होते . आता आपल्याला ...Read More

9

फार्महाउस - भाग ९

तो शुद्धीवर आला तो बप्पांच्या मठाच्या हॉलमध्येच होता . " म्हणजे मला हे सारं सांगण्यासाठी अंजलीने केलं होतं .... काय बोलतोय गणेश ...? काय केलं होतं ...? कोण अंजली....? " आपल्या मधुर आवाजात शैला विचारत होती . गण्याने तिला जत्रेपासूनची कहाणी व आता कळलेला सारा वृत्तांत सांगितला . " मग आपल्याला लवकरात लवकर त्या फार्महाउस ला पोहोचलं पाहिजे... रामचंद्र इंगळे साहेब म्हणत होते . " हो जायलाच पाहिजे ....." शैला ही म्हणाली " थांबा जरा ... बप्पांनी माझ्या नावाची डायरी लिहिली होती. त्यामध्ये आपल्याला काहीतरी सापडेल..... तीच ती डायरी जेव्हा गण्या पहिल्यांदा आला होता ...Read More

10

फार्महाउस - भाग १०

गण्याने जलद हालचाल केली . त्याने खिशात हात घातला . त्याच्या खिशात ते सूत होतं . त्याला कोणी दिलं कोणी ठेवलं हे काही आठवत नव्हतं . फक्त होतं . त्याने एक टोक शैलाकडे फेकलं , दुसरं स्वतःच्या हातात धरलं . त्याला तीन टोके होती . जेव्हा शैला व गणेश दोघांनीही एकेक टोक धरले तेव्हा आपोआपच तिसरा टोक बप्पा कडे जाऊ लागले व त्यानी ते पकडलं.... तेव्हाच तिला स्पर्शाची संवेदना जाणवली . तिच्या हातात काही तरी होतं . तिने ते घट्ट पकडून ठेवलं . हळूहळू सर्व ज्ञानेंद्रियांच्या संवेदना परतू लागल्या . तिने डोळे उघडले . तिच्या हातात सप्तरंगी सूत ...Read More