जत्रा एक भयकथा

(195)
  • 153.2k
  • 35
  • 90.8k

भाग - 1 ऑर्केस्ट्रा ला जायला उशीर झाला.          काटेवाडी गावाला जत्रेची परंपरा जुनीच . फार वर्षापासून ही जत्रा होते . चार दिवस जत्रा चालते गावातील सर्व लोक तेथे जातात . गावातीलच नाही तर आजुबाजुच्या गावाचे तालुक्याचे सारेच लोक येथे येतात त्यामुळे जत्रा गर्दीत होते . जत्रेत वेगवेगळी दुकाने थाटली जातात उंच उंच पाळणे छोट्या छोट्या रेल्वे गाड्या तसेच लहान मुलांना आकर्षित करणारे वेगवेगळे घटक असतात. वेगवेगळ्या नाश्त्याची , ज्यूसची , प्रसादाची , चिरमूऱ्याची , धार्मिक पुस्तकांची नि कशाकशाची दुकाने जत्रेत लागतात . चार दिवस चालणाऱ्या या जत्रेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते . सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे तमाशा ऑर्केस्ट्रा

Full Novel

1

जत्रा - एक भयकथा - भाग १

भाग - 1 ऑर्केस्ट्रा ला जायला उशीर झाला. काटेवाडी गावाला जत्रेची परंपरा जुनीच . फार वर्षापासून ही जत्रा . चार दिवस जत्रा चालते गावातील सर्व लोक तेथे जातात . गावातीलच नाही तर आजुबाजुच्या गावाचे तालुक्याचे सारेच लोक येथे येतात त्यामुळे जत्रा गर्दीत होते . जत्रेत वेगवेगळी दुकाने थाटली जातात उंच उंच पाळणे छोट्या छोट्या रेल्वे गाड्या तसेच लहान मुलांना आकर्षित करणारे वेगवेगळे घटक असतात. वेगवेगळ्या नाश्त्याची , ज्यूसची , प्रसादाची , चिरमूऱ्याची , धार्मिक पुस्तकांची नि कशाकशाची दुकाने जत्रेत लागतात . चार दिवस चालणाऱ्या या जत्रेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते . सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे तमाशा ऑर्केस्ट्रा ...Read More

2

जत्रा - एक भयकथा - 2

तुम्ही जर मागील भाग वाचला नसेल तर माझ्या प्रकाशित साहित्य मध्ये जाऊन अवश्य वाचा....... जत्रा ( एक ) भाग 2 दिवसाउजेडी माणसाने कितीही फुशारकी मारली की आपण कशाला भीत नाही भूत असो नाहीतर काहीही असो मात्र रात्री अंधार पडल्यावर साऱ्यांचीच बोलती बंद होते . गण्याने कितीही मोठ्या बाता मारल्या असल्या तरी त्याच्या अंतर्मनात कुठेतरी भीती आपले पाय पसरवत होती. पाद्र्याची वाट ही काही वर्दळीची वाट नव्हत गाडीवाट असली तरी चाकाच्या 2 चाकोरीपुरतीच वाट राहिली होती बाकी सगळीकडे रानटी झाडे झुडपे माजली होती त्यामुळे जंगलात आल्यासारखं वाटत होतं . पायाखालचं वाळून गेलेलं गवत पाय पडल्यावर चुरचुर ...Read More

3

जत्रा - एक भयकथा - भाग ३

तो एका झोपडीत होता . झोपडी यासाठीच म्हणायचं कारण ती लाकडाची होती पण एकदम आलिशान होती . तो एका पलंगावर खोलीच्या एका बाजूला होता . त्याला लागूनच एक लाकडी कपाट होतं, त्याच्यावर अतिसुंदर वर्तुळाकार आरसा होता. त्यावरून खोलीतील दिव्याचा प्रकाश परावर्तित होऊन खोलीभर पसरला होता . खोली सुंदर सजवली होती . “ आयला रम्या आपल्या काटेवाडीच्या जंगलात असला बंगला हाय ते आपल्याला कसे माहीत नव्हते रे “ गण्या शुद्धीवर येत म्हणाला. आम्हाला तर कुठे माहीत होतं तेवढ्यात समोरचं दार कुरकुरीत उघडू लागलं . तिघेही प्रतिक्षिप्त क्रिये मुळे भलतेच जास्त सावध होत आक्रमक पवित्र्यात आले. “ अरे घाबरू नका मीच ...Read More

4

जत्रा - एक भयकथा - भाग - ४

एक दिवस मी तिला लग्नाची मागणी घातली . तिला अनपेक्षित नव्हते , ती म्हणाली मी तर केव्हाच तुझी झाली पण…. पण काय मी म्हणालो बाबा परवानगी देणार नाहीत मी येईन त्यांची समजूत काढून अरे जरी माझ्या प्रेमापोटी माझ्या बाबांनी परवानगी दिली तरी समाज हे स्वीकृत करणार नाही बाबा एकटे पडतील पाद्री सांगत होता मधेच राम्या म्हणाला मूर्ख मुलगी .. या मुली अशाच असतात त्यांना सांगायला पाहिजे हमको मिटा सके ये जमाने में दम नही हमसे जमाना खुद हे जमाने से हम नही तुमचं चालू द्या पुढे त्याच ब्रेकअप झाल्यापासून तो जरा पिसाळल्यासारखे करतोय मन्या आवेशाने उठलेल्या राम्याला बसवत म्हणाला ...Read More

5

जत्रा - एक भयकथा - भाग - ५

“ तुम्ही स्वतःला आवरा , याच्यावर ती काही ना काही उपाय असेलच “ गण्या म्हणाला “ नाही मला शतकानु असंच राहावं लागेल, नरक यातना म्हणतात त्या याच असाव्यात “ पादरी भावूक होऊन म्हणाला “प्रत्येक गोष्टीचं उत्तर असतं ,या अडचणीतून ही काही ना काही मार्ग सापडेलच “गण्या म्हणाला “ आहे एकच उपाय आहे “ पादरी म्हणाला “ कोणता ? “ तिघेही एकदमच ओरडले. “ मी हे कसं सांगू शकतो ? मी एवढा स्वार्थी कसा होऊ शकतो ? “ पादरी मधूनच वेड्यासारखं बडबडू लागला “ सांगा ना कोणता उपाय “ राम्या म्हणाला “ अरे मी तुम्हाला कसा त्रास देऊ ...Read More

6

जत्रा - एक भयकथा - भाग - ६

" गणेश लक्ष देऊन ऐक तुझं नि तुझ्या मित्रांचं आयुष्य तुझ्या वरती अवलंबून आहे . तुला जर जगायचं असेल मी सांगते तसं कर.... " कोण , कोण ? आहात तुम्ही आणि कुठे आहात ...? " ते सांगायला माझ्याकडे वेळ नाही . मी सांगत आहे तेवढं एक , नाही ऐकलं तर तुझा मृत्यू निश्चित आहे . " हे जे तू पाहत आहे ते स्वप्न आहे .;जेव्हा तू जागा होशील तेव्हा त्याच घरात असशील .तुझ्या मित्रांना तुला शुद्धीवर आणावं लागेल . आणि जेवढं लवकर शक्य होईल त्या घरातून बाहेर पडावं लागेल . घरातून बाहेर पडताना तेथील भांड्यावर ...Read More

7

जत्रा - एक भयकथा - भाग - ७

गन्या विसरला की त्याला कंदिलाच्या मागे जायचे होते जो उजव्या बाजूला थोड्या लांब अंतरावर होता . पुढे चालू .... मन्या व गण्या राम्याला घेऊन जात होते .त्या मशालीच्या पाठोपाठ . राम्या अजूनही बेशुद्ध होता . त्यामुळे दोघांनी मिळून राम्याला उचललं होतं . राम्याच्या ओझ्यामुळे त्यांची चाल मंदावली होती . मशाल असली तरी तिचा थोडा थोडका प्रकाश काळोखात हरवून जात होता . त्यातच वाटही व्यवस्थित नसल्याने सारखे धड-पडत होते दोघेही . ठेच लागून त्यांच्या पायाला जखमा झाल्या होत्या . खोलीतून येताना भांड्याचं झाकण खाली पडलं होतं . त्यामुळे अजूनही थोडं थोडं रक्त उडत-उडत जाऊन तिथे पडत होतं . मात्र याची ...Read More

8

जत्रा - एक भयकथा - भाग - ८

पुन्हा एकदा काळोखात गलका झाला आता पुढची शिकार होणार होती गण्याची किंवा मन्याची .... पुढे चालु... मन्या अजून पुतळ्यासारखा स्थिरच होता . गण्या त्याला ओरडत होता पण काही उपयोग नव्हता . पण तरीही गण्याने त्याचा हात सोडला नाही घट्ट दाबुन धरला . पण यावेळी गण्या काळोखाकडे खेचला जाऊ लागला . आणि अचानक सर्वत्र प्रकाश चमकू लागला .नष्ट झाला काळोख आणि सर्वत्र प्रकाशाचे साम्राज्य पसरले . सामान्य माणसाला एवढचं दिसत होतं की जी काही दुष्ट शक्ती होती, ती नष्ट झाली होती . तिला नष्ट केलं होतं कुणी तरी चांगल्या शक्तीने . पण एका घटनेमागे हजारो वर्षापासून चालत ...Read More

9

जत्रा - एक भयकथा - भाग - ९

" काय.....? पाद्रीने मारलं तुम्हाला " मन्या " हो " " पण तुमचं प्रेम होतं ना त्याने तुम्हाला का ? " गण्या . . पुढे चालू " जॉननेच मारले मला . आपल्याकडे जास्त वेळ नाही , तुम्ही पटकन निघा अन्यथा तुमचा ही जीव जाईल . " शेवंता " नाही त्याने आमच्या राम्याला मारले . त्याला आणि असं सोडणार नाही " मन्या " होय ज्याने आमच्या राम्याचा अंत केला , त्याचा अंत केल्याशिवाय आम्ही जाणार नाही " गण्या " गण्या मन्या असं करू नका लगा हो . जोपर्यंत तुम्ही जंगलातून सहीसलामत बाहेर जाणार नाही तोपर्यंत मला मुक्ती मिळणार नाही ...Read More

10

जत्रा - एक भयकथा - भाग - १०

" मीच तो " एक खर्जातला खरखरीत आवाज , कोणीतरी नख्यांनी लोखंडावर घासल्यावर येईल तसा आवाज आला. " मीच ज्याने गण्याला जंगल जाळण्यापासून रोखले . " मीच तो ज्याने तुम्हाला तिघांनाही त्या बनावट चर्चमध्ये नेलं " मीच तो ज्याने शेवंताच्या मृत्यूची खोटी गोष्ट सांगून तुम्हाला फसवून तुमचं रक्त घेतलं " मीच तो ज्याने शेवंताला गाण्याच्या स्वप्नात प्रवेश करू दिला " मीच तो , जो मशाल दाखवून तुम्हाला इथं घेऊन आला " मीच तो काळोख ज्याने राम्याचा अंत केला आणि " मीच तो ज्याने जॉनच्या शरीरात प्रवेश करून......... किती विचित्र आवाज होता . त्या आवाजाने गण्या व मन्या दोघांच्याही अंगावर ...Read More