फुलाचा प्रयोग..

(47)
  • 135.7k
  • 12
  • 51.3k

त्या देशात नुकतीच राज्यक्रांती झाली होती. नवीन राजा गादीवर आला होता. तो राजा तरुण होता, उदार होता. आपला देश भरभराटावा, सुखी व्हावा असे त्याला वाटत होते. इतर देशांचे कारभार कसे आहेत, त्या त्या देशांतून काय काय विशेष गोष्टी आहेत, ते सारे पाहावे म्हणून तो तरुण राजा प्रवासासाठी निघून गेला. त्याने राज्याची सर्व जबाबदारी दोन प्रधानांवर सोपवली होती.

Full Novel

1

फुलाचा प्रयोग.. - 1

त्या देशात नुकतीच राज्यक्रांती झाली होती. नवीन राजा गादीवर आला होता. तो राजा तरुण होता, उदार होता. आपला देश सुखी व्हावा असे त्याला वाटत होते. इतर देशांचे कारभार कसे आहेत, त्या त्या देशांतून काय काय विशेष गोष्टी आहेत, ते सारे पाहावे म्हणून तो तरुण राजा प्रवासासाठी निघून गेला. त्याने राज्याची सर्व जबाबदारी दोन प्रधानांवर सोपवली होती. ...Read More

2

फुलाचा प्रयोग.. - 2

त्याचे नाव होते फुला. फुलांचे त्याला वेड. त्याचे वय फार नव्हते. पंचवीस-तीस वर्षांचे असेल. फुलाने लग्न केले नव्हते. त्याने लग्न फुलझाडांशी लावले होते. तो शिकला होता. शास्त्रांचा त्याने अभ्यास केला होता. विशेषत: वनस्पतीशास्त्राचा त्याने अभ्यास केला होता. त्यातल्या त्यात पुन्हा फुलांच्या सृष्टीचा अभ्यास म्हणजे त्याचा आनंद. ...Read More

3

फुलाचा प्रयोग.. - 3

एके दिवशी फुला नित्याप्रमाणे आपल्या प्रयोगालयात काम करीत होता. इतक्यात गावात टापटाप असे घेडयांचे आवाज घुमू लागले. एक, दोन, हे घोडेस्वार! खंद्या घोडयावर शिपाई बसलेले होते. त्यांच्याजवळ शस्त्रास्त्रे होती. ते धिप्पाड होते. क्रूर दिसत होते. गावातील लोक घाबरले. घरांच्या दारांतून ते डोकावून बघत होते. का आले हे घोडेस्वार? काय पाहिजे त्यांना? ...Read More

4

फुलाचा प्रयोग.. - 4

फुलाचा तो शेजारी गब्रू राजधानीत आला होता. फुलाला फाशीची शिक्षा झाल्याचे त्याला कळले. फुलाच्या अंगरख्याच्या खिशात ती कलमे आतील, प्रयोग असतील परंतु कसा मिळावावयाचा तो अंगरखा? फुलाला त्याच्या कपडयांतच फाशी देतील का? सरकार स्वत:चे कपडे कशाला खर्च करील? फुलाच्या प्रेताची व्यवस्था कोण करणार? ते मांगच बहुधा ते काम करतील. त्या मांगाकडे जावे. फुलांचे कपडे त्यांनी द्यावे असे ठरवावे. ...Read More

5

फुलाचा प्रयोग.. - 5

फुलाला राजधानीतील तुरुंगात ठेवणे धोक्याचे होते. केव्हा लोक बिथरतील त्याचा नेम काय? राजाने समुद्रकाठच्या एका दूरच्या तुरुंगात फुलाची रवानगी फुलाची खोली एकान्त होती. त्या खोलीला एकच खिडकी होती. फुला उडी मारी व त्या खिडकीतून उचंबळणारा समुद्र बघे. समुद्राच्या लाटांवरचा फेस बघे. तुरुंगाच्या बागेतील फुले पाहून त्याला आनंद होई. आपल्याला बागेत पाठवतील का कामाला, येतील का फुलांना हात लावता? येतील का प्रयोग करता? असे त्याच्या मनात येई. ...Read More

6

फुलाचा प्रयोग - 6

त्या दिवशी उजाडत ढब्बूसाहेब फुलाच्या कोठडीजवळ एकदम आले. शिपायाने कोठडी उघडली. साहेब आत शिरले. ते खोलीत पाहू लागले. तेथे तो वेल वाढत होता. संशयी साहेब त्या वेलाकडे टक लावून पाहू लागले. ‘हा कसला वेल? हा वेल वाढवून खिडकीतून खाली सोडायचा असेल. त्या दोराच्या साहाय्याने पळून जायचे असेल. होय ना? मोठे बिलंदर बोवा तुम्ही क्रान्तिकारक. कोठे काय कराल त्याचा नेम नाही. कोठून आणलेस हे मडके? कोठून आणलीस माती?’ ...Read More

7

फुलाचा प्रयोग - 7

तो पाहुणा फुलाची कुंडी घेऊन प्रदर्शनाच्या गावी गेला. तेथे नाना देशांतून फुले आली होती, शास्त्रज्ञ आले होते, परंतु संपूर्णपणे प्रयोग यशस्वी झाला नव्हता. कोणाच्या एकाच पाकळीवर सोनेरी छटा उठली होती. कोणाची पुसट होती, परंतु या पाहुण्याने जे फूल आणले ते संपूर्णपणे कसोटीला उतरत होते. सारे शास्त्रज्ञ पाहात राहिले. ...Read More

8

फुलाचा प्रयोग - 8

वृध्द आत्या घरी होती. एक दिवस सारे चांगले होईल हया आशेवर ती जगत होती. फुलाच्या बागेची काळजी घेत होती एके दिवशी फुला घरी आला. एकटा नाही आला, तर त्याच्या बरोबर कोणी तरी होते. ‘आत्या, ओळखलेस का मला?’’ फुला पाया पडून म्हणाला. ‘अरे, तुला का मी ओळखणर नाही? आलास ! मी म्हणतच होते की, तू येशील. किती रे वाळलास? तुरूंगातून जिवंत आलास हीच देवाची कृपा. आणि ही कोण?’ ...Read More

9

फुलाचा प्रयोग - 9

परमेश्वर आपल्या दिव्य सिंहासनावर बसला होता. देवदूत स्तुति-स्तोत्रे गात होते. इंद्र, चंद्र, सूर्य, वायू सारे हात जोडून उभे होते. तुझा महिमा किती वर्णावा? हे अनंत विश्व तू निर्माण केलेस. इंद्राल पाऊस पाडायला लावलेस सूर्याला तापावयास सांगितलेस. तुझ्या आज्ञेने वायू वाहातो, अग्नी जळतो, समुद्र उचंबळतो तुझ्या आज्ञेने पर्वत उभे आहेत, नद्या धावत आहेत, फुले फुलत आहेत, वृक्ष डोलत आहेत, किती विविध ही सृष्टी किती सुंदर, किती मोठी आणि सर्वात कौतुक करण्यासारखी गोष्ट म्हटली म्हणजे मनुष्यप्राणी. देवा, परमेश्वरा, तुझे सारे बुध्दिवैभव मनुष्य निर्मिण्यात ओतले आहेस. एवढासा साडेतीन हात देहात राहणारा हा मनुष्य, परंतू सर्व विश्वाचे तो आकलन करू शकेल, सर्व सृष्टीवर सत्ता गाजवू शकेल. तो पृथ्वीवर राहून तार्‍यांचा इतिहास लिहील, पाताळातील घडामोडी वर्णील. मानवाला अशक्य असे काही नाही.’ ...Read More

10

फुलाचा प्रयोग - 10

तो गाव फार मोठा नव्हता. फार लहानही नव्हता. समुद्रकाठी होता तो परंतु गावाची हवा बिघडली होती. जिकडे तिकडे झाल्या होत्या. त्यामुळे बेसुमार डास झाले होते. गावात हिवतापाच्या साथीचा कहर होता. घरोघर अंथरूणे पसरलेली होती. माणसांचे सापळे झाले होते परंतु कोण नष्ट करणार हया दलदली? श्रीमंत लोक शहरांत राहू लागले. त्यांना हया लोकांची करुणा येईना. लोकांचे जीवन सुखी करणे म्हणजे धर्म असे कोणाला वाटेना. एका श्रीमंताने त्या गावात आणखी एक मोठे मंदिर बांधायचे ठरविले. लाख दोन लाख रुपये खर्च होणार होते. ...Read More

11

फुलाचा प्रयोग - 11

परंतु सर्वज्ञ माधव आज असमाधानी होता. इतक्या वर्षात असे असमाधान त्याला कधी वाटले नव्हते. तो नेहमी पुस्तकांत रंगलेला असावयाचा परंतु आज पुस्तके नि:सार वाटत होती. जी पुस्तके वाचता-वाचता इतकी वर्षे तो घामाघूम झाला, त्या पुस्तकांत काडीमात्र राम नाही असे त्याला वाटले. तो शून्य दृष्टीने दिवाणखान्यातील त्या ज्ञानभांडाराकडे बघत होता. ...Read More

12

फुलाचा प्रयोग - 12

निराशेला खोल दरीत भिरकावून माधव तेथे बसला होता. ‘अस्तास जातानाही सूर्य लाल आहे, मरतानाही झगडत आहे. मलाही झगडू दे असे त्याच्या मनात आले. आता जरा अंधार पडला परंतु थोडया वेळाने चंद्र वर आला. सुदर चांदणे पडले. माधव घरी जाण्यासाठी निघाला. इतक्यात त्याच्या पायाशी एक कुत्रे आले. कोठून ते आले? एकदम कसे आले? ...Read More

13

फुलाचा प्रयोग - 13

‘उघड डोळे,’ सैतान म्हणाला. माधवने डोळे उघडले. कोठे आले होते ते? तेथे एक मोठा दिवाणखाना होता. तेथे खाणे-पिणे चालले मोठी मेजवानी होती. कोणी लाडू खात होते, कोणी जिलेबी खात होते कोणी चिवडयावर हात मारला, तर कोणी भज्यांवर खूष होते. कोणी फळांचे भोक्ते होते, ते द्राक्षांच्या घडांवर तुटून पडत होते. काहींना संत्री, मोसंबी आवडली. हे काय? एकदम अंधारसा झाला? सैतानाने गंमत केली. दिवे विझले. लोक एकमेकांच्या हातांतील ओढू लागले. कोणाला काही दिसेना. द्राक्षे म्हणून ओढायला जात, तो कोणाच्या तोंडाला हात लागे. ...Read More

14

फुलाचा प्रयोग - 14

माधव जे पेय प्यायला, त्याचा एक विशेष परिणाम होत असे. ते पेय प्यायल्यावर जी स्त्री प्रथम दिसेल तिच्यावर प्रेम असे होत असे. माधव व सैतान जात होते. माधवाच्या मनात आज निराळयाच भावना उचंबळत होत्या. तो आज नवीन झाला होता. ती पाहा एक मुलगी देवळात जात आहे. हातात पूजेचे ताट आहे. तिच्या अंगावर अलंकार नाहीत. साधे पातळ आहे. गरिबाची आहे वाटते ती? ...Read More

15

फुलाचा प्रयोग - 15

‘आईला देऊ हे औषध?’ मधुरीने विचारले ‘दे. पेलाभर पाण्यात हया बाटलीतील चमचा दोन चमचे औषध घाल. गाढ झोप खोकला उसळणार नाही. तू येशील ना रात्री?’ ‘हो.’ मधुरी औषधाची बाटली घेऊन गेली. ‘आज रात्री गंमत आहे एकूण!’ सैतान म्हणाला. ‘चूप. खबरदार असे काही बोलशील तर!’ माधव चिडून बोलला. रात्र झाली. मधुरीचा भाऊ घोरत होता. तिची आई खोकत होती. ...Read More

16

फुलाचा प्रयोग - 16

सैतान व माधव हवेतून दौडत येत होते. त्यांनी आपली गती जरा मंदावली. ‘ठक ठक’ आवाज कानावर आला. कोठून येत तो आवाज? ठक ठक. कोण काय ठोकीत होते? कोण काय दुरुस्त करीत होते? इतक्यात माधवाला दोनचार माणसे दिसली. ती माणसे काही तरी उभारीत होती. ...Read More

17

फुलाचा प्रयोग - 17

सैतानाने माधवाला एका दूरच्या देशात नेले. त्या देशाच्या राजधानीतून ते हिंडत होते. त्यांच्या मूर्ती सर्वाच्या डोळयांत भरतील अशा होत्या. तो त्या दुकलीकडे बघे. जशी भीमार्जुनांची जोडी परंतु सरकारी अधिकार्‍यांना त्यांचा संशय आला. पोलिसांनी त्यांना पकडून नेले. राजासमोर त्या दोघांना उभे करण्यात आले. ...Read More

18

फुलाचा प्रयोग - 18

माधवाच्या घरी म्हातारा भय्या होता. तो आपल्या धन्याची रोज वाट बघत असे. तो दिवाणखाना झाडून ठेवी, अंगण झाडून ठेवी. भय्या उठला व अंगण झाडायला गेला. तो अंगणात कोण निजले होते? तो तर धनी. माधव तेथे पडला होता. त्याला झोप लागली होती. भय्याला वाईट वाटले. धनीसाहेब का रात्री आले? त्यांनी हाका मारल्या असतील? मला जाग नाही आली. अशी कशी झोप लागली मला. ते खाली जमिनीवर निजले. पांघरायला नाही, अंथरायला नाही, अरेरे. त्या भय्याला फार वाईट वाटले. त्याने धन्याला हलके हलके हाका मारल्या माधवने डोळे उघडले. ...Read More

19

फुलाचा प्रयोग - 19

‘करार नीट पाहा. हा क्षण सुंदर आहे, किती पवित्र आहे. हा क्षण माझ्या जीवनात अमर होवो असे त्याने म्हटले परंतु ज्या विचारांत मग्न असता हे शब्द उच्चारले गेले, ते विचार तुमचे आहेत का? तुमच्या पोतडीत तसले विचार आहेत का? आजपर्यत तुम्ही हया आत्म्यावर नाना प्रयोग केलेत परंतु ‘हा क्षण अमर होवो. हे खरे सुख’ असे शब्द त्याच्या तोंडून तुम्हाला काढता आले का? खरे सांगा. जो क्षण अमर होवो असे हया आत्म्याने म्हटले तो क्षण दैवी होता. तो क्षण देवाचा होता. सैतानाने दिलेला नव्हता. म्हणून हा आत्मा देवाचा आहे.’ देवदूताचा नायक म्हणाला. ...Read More